काव्यशिल्प Digital Media: पिशव्या

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पिशव्या. Show all posts
Showing posts with label पिशव्या. Show all posts

Monday, January 22, 2018

प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी लघुउद्योग प्रेरणादायी:प्रविण टाके

प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी लघुउद्योग प्रेरणादायी:प्रविण टाके

संयुक्त महिला मंचचा पुढाकार
चंद्र्पुर/प्रतिनिधी:
पर्यावरण बचाव मोहिमेला हातभार लावण्यासाठी संयुक्त महिला मंच प्लास्टिक मुक्त भारत ही चळवळ राबविण्यासाठी कापडी पिशव्या बनवून जनजागृती करीत आहे.यातून आर्थिक विकास साधण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून महिलांसाठी हा लघुउद्योग प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी केले. स्थानिक इंदिरानगर येथील संयुक्त महिला मंच आयोजित कापडी पिशवी लघुउद्योग प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजिका आरती प्रविण टाके यांची विशेष उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत इंदुमती पाटील यांनी केले.संस्थेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संयुक्त महिला मंचाने कापडी पिशवी लघुउद्योग सुरु करुन जनजागृती सोबतच महिला वर्गाला यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत उद्योजिका आरती प्रविण टाके यांनी व्यक्त केले. 

प्रास्तविक व संचालन डॉ प्रतिभा वाघमारे तर आभार वर्षा कोडापे यांनी माणले. कार्यक्रमाला शीला देवगडे, गजानन राऊत यांनी सहकार्य केले. प्रा.विमल गाडेकर यांच्या मार्गदर्शनात निमंत्रित महिलांना संस्थेतर्फे कापडी पिशवी भेट देण्यात आली.