अवैध दारू वाहतूकीसाठी नाकेबंदी केली असतांना राजुरा तालुक्यातील लक्कडकोट गावात तेलंगाणा वरून महाराष्ट्र राज्यात गांजा तस्करी करण्याची गुप्त माहिती राजूरा पोलिसांना मिळाली, या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी महामार्गावर नाकेबंदी करून वाहनांची झडती घेत अभियान सुरू केला असताना वाहन क्रमांक MP.20.CF.225 इंडिका या वाहनात तब्बल ३० पाकिटात गांजा आढळून आला. या प्रकरणी राजूरा पोलिसांनी माधव खोरा वय 24 मलकनगिरी उडीसा येथील रहिवासी व ओमेन मुका कोबासी वय 28 तोडपल्ली उडीसा या दोघांना अटक करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या व्यक्ती जवळ तीन मोबाईल, वाहन असे मिळून दहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.यात एकून १४८ किली गांजा जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून राजूरा पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे,उपनिरीक्षक राजकुमार मडावी,नायब तहसीलदार अमित बन्सोड, बी के वांढरे वन विभाग,एन एल नान्हे, हवालदार राधेश्याम यादव, रविंद्र गेडाम, प्रशांत येंडे, भुपेश अवघडे, अमोल मत्ते,साजिद शेख व अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या दोघांवर अमली पदार्थ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.

