मोबाईलवर सेल्फी काढताय. अनेकदा धोका होऊ शकतो. सेल्फीने घेतला जीव अशा बातम्या आपण नेहमीच वाचल्या असतील. हा धोका टाळण्यासाठी सेल्फी स्ट्रीक selfie stickचा वापर करा.
खालील छायाचित्रावर क्लिक करा बघा वेगवेगळे मनपसंद
selfie stick
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
चंद्रपूर(ललित लांजेवार) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तहसील कार्यालायचे नायब तहसिलदार संजय राठोड यांना रेती ट्रॅक्टर अडवणूक प्रकरणात 15 हजार रुपयांची लाच घेताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. तक्ररदार हे ट्रक्टर मालक असून ते रेती घाटावरून रेती वाहतूक करत असतांना तुला जर महिनाभर रेती वाहतूक करायची असेल तर मला १७ हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले तक्रारदारास हि रक्कम द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार दाखल केली.यावरून गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी १५ हजार रुपये देत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदार यांना रंगेहात अटक केली. हि बाब संपूर्ण तहसील कार्यालयात वाऱ्या सारखी पसरली .व त्यामुळे सर्व महसूल विभागात धास्ती चे वातावरण निर्माण झाले सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर,अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर ला.प्र.वि,नागपूर,पोलीस उपअधीक्षक रोशन ...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...