সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 30, 2017

 रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह

रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह

पारशिवणी ::
 पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्ज अँड ह्यूमन रिसोर्सेस नागपूर व दणका युवा संघटन,कांद्री,कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या रोग निदान शिबिराचे पदार्पण तेराव्या आठवड्यात पोचले आहे.या शिबिराने तालुक्यासह कन्हान उपशहरा लगत असलेल्या साटक जिल्हा परिषद व टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रा लगत तालुक्या बाहेर सुद्धा ग्रामीण व शहरी भागात गर्जुना मोफत रोग निदान तपासनी,मोफत चष्मे वितरण शिबिराच्या या आयोजना ला सातत्याने जोपासण्याची धुरा माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली होती.आणी यशस्वी रित्या या रोग निदान शिबिराचा लाभ ग्रामस्थांन पर्यंत पोचत असल्याने क्षेत्रात दणका युवा संघटनेच्या शिरावर यशाचा तुरा क्षेत्रातील लोकांनी रोवून दिलेला आहे.

          याच उपक्रमात मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी निशुल्क रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह शिव नगर कान्द्री- कन्हान येथे आयोजित करण्यात आलेला होता.या शिबिरात विविध प्रकार च्या रोगांची तपासणी करण्यात आली ज्यात ब्लड प्रेशर, शुगर, नेत्र रोग, मोतीया बिंद अश्या इतरत्र रोगांच्या निदानाचा लाभ कांद्री वासीयांनी घेतला,नेत्र रोग्यांना   मोफत चष्मे वितरित करण्यात आले.प्रसंगी शिबिराचे मुख्य आयोजक दणका युवा संघटन,युवा चेतना मंच कान्द्री आणि नेहरू युवा केंद्र पारशिवणी,माजी.जील्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे,दिनेश नानवटकर, रिंकेश चवरे, सुरेश तिवाडे, शैलेश शेळके, विनोद कोहळे, गौरव माहोर, राहुल चामट, सौरभ पोटभरे, यांची उपस्थित होती तर मंगळवार ५ डिसेंम्बर रोजी सालवा येथे चौदाव्या शिबिराचे लाभ घेण्या करिता जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आयोजकांकडून करण्यात आले.

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

यवतमाळ - नाकर्त्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यातून जाऊन 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावावर धडकणार आहे.
राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत.

बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतक-यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.

अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले

अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले

सांगली: अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी जो कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ते सांगलीत बोलत होते.

अनिकेत कोथळेचे खून प्रकरण हे पोलीस खात्याला कलंक लावणारी घटना असून, पोलीस कोठडीत थर्ड डिग्री वापरणे कायदेशीररित्या योग्य नाही. जे पोलीस थर्ड डिग्रीचा वापर करत असतील त्यांना पोलीस खात्यात ठेऊच नये असं मतही आठवले यांनी व्यक्त केलं.

थर्ड डिग्रीत अनिकेतचा मृत्यू

दरम्यान, पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

याप्रकरणात 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

शास्त्रांचे अध्ययन करा

शास्त्रांचे अध्ययन करा

निव्वळ कान फुकुन गुरू करण्यात अर्थ नाही :: प.पु.प.म.श्री.कळमकर बाबा

पारशिवणी/ प्रतिनिधी
तालुक्यातील टेकाडी येथे श्री कृष्ण मंदिरात कीर्तनाला सुरवात झाली ती महानुभाव पंथातील संत मयानंद महाराज यांच्या प्रपंचाचा सार सांगणाऱ्या चार चरणाच्या अभंगा पासून महानुभावातील तत्वज्ञान सांगत जगाच्या पाठीवर जीवनाचे तत्वज्ञान त्यांच्या अभंगातून मांडत,जगा मध्ये जीवन कशे जगावे,समाजात कशे वावरावे,कुठल्या पद्धतीने जगावे काय आचरणात आणावं काय आचरणात आणू नये याचा सार अभंगांमधून मांडत कीर्तनाला आलेल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं.
कीर्तनात शास्त्रांबद्दल बोलतांना प्रत्येक पंथाने आप आपल्या धर्म ग्रँथांचे वाचन करणे गरजेचे असून ते वाचून आचरणात आणनेही महत्वाचे आहे तेव्हा शास्त्रांचे अध्ययन करा निव्वळ काण फुकुन गुरू करण्यात अर्थ नाही अशे प्रबोधन टेकाडी येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जयंती महोत्सवा दरम्यान प.पु.प.म. श्री.कळमकर बाबा महानुभाव यांनी आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमा मधून केले. 

       प्रपंच व आश्रम व्यवस्थेवर देखील त्यांनी उत्तम रित्या प्रकाश टाकत धर्म,अर्थ,काम,मोक्ष तर ब्रह्मचर्य,गृहस्थ,

वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम या चार आश्रम व्यवस्थेमध्ये माणसाची जीवन जगण्याची प्रक्रिया आधारलेली असते.ज्यात धर्माने मोक्ष आणि अर्थाने काम साध्य समजल्या गेलेलं आहे.ब्रह्मचर्य आणि गृहस्थ जीवना मध्ये धर्म,अर्थ आणि काम याचे महत्व आहे.तर वानप्रस्था आणि संन्यास मध्ये धर्माचा प्रचार व मोक्षाचे महत्व मानल्या गेले आहे.आणि गृहस्थ जीवना मध्ये धर्म,अर्थ आणि काम चे महत्व आहे.ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म चर्चेत रत राहिने तर दूसरा प्रचलित अर्थ म्हणजे इंद्रियांनवर संयम ठेवणे तेव्हा युवा विद्यार्थी वर्गाने आपल्या इंद्रियांवर वयाच्या २१ वर्षा पर्यंत सय्यम ठेवायला पाहिजे कारण ब्रम्हचर्य म्हणजे ऊर्जेचा केलेला संग्रह आणि मनावर मिळवलेला विजय होय.तेव्हा मनुष्य असो की संत,देव असो की डाकू आयुष्यात ब्रम्हचर्या चे पालन अत्यंत महत्वाचे असल्याचे प.पु.प.म. श्री.कळमकर बाबा  यांनी आपल्या कीर्तनातुन युवा वर्गाला संबोधित केले.

श्री कृष्ण मंदिर टेकाडी (को.ख.) येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जयंती महोत्सवाला २६ नोव्हेंबर पासून प्रारंभ झालेला आहे.दररोज सकाळी देवाला उटी स्नान व विळा अवसराचा कार्यक्रम महानुभाव भक्तांन कडून केला जातो अयोजकांतर्फे ता.२९ नोव्हेंबर ला प.पु.प.म.श्री.कळमकर बाबा महानुभाव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता कार्यक्रमाला ग्रामस्थानी गुलाबी थंडीचा आनंद घेत भरभरून प्रतिसाद दिला किर्तना साठी तबल्यावर अरविंद वासाडे,हार्मोनियम वर गंगाधर आकोटकर तर गायना साठी किशोर वासाडे,कमलाकर बोराडे,प्रकाश बोराडे,मनोज बोराडे,अतुल खेडकर,दिलीप उमप,अभिजित कुरडकर यांनी साथ दिली तर कीर्तनाला प्रमुख उपस्थितीत प्रतिदिन प्रवाचक प.पु.प.म. श्री.माधवव्यासबाबा उपाख्य प.पु.प.म. श्री.महंतबाबा चिरडे ब्रम्हगिरी देवळी,भगवत पाठ ,दत्तात्रेय स्रोत प्रवाचक प.पु.ई. श्री.हरिपालदादा न्यायबास काटोल यांची उपस्थिती होती.येत्या ०२ डिसेंबर ला प्रभूंची पालखी व शोभायात्रा निघणार असून ०३ तारखेला कार्यक्रमाची सांगता दहीकाला व महाप्रसादाने होणार आहे तेव्हा श्री कृष्ण मंदिर पंचकमेटी तर्फे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.कार्यक्रमाल यशस्वी करण्यासाठी श्री कृष्ण मंदिर पंच कमेटी, श्री दत्तसेवा मंडळ,महानुभाव मंडळ,श्रीकृष्ण महिला मंडळ टेकाडी यांनी सहकार्य केले.

शहीद योगेश डाहूले यांना श्रद्धांजली

शहीद योगेश डाहूले यांना श्रद्धांजली

वरोरा/भद्रावती(प्रतिनिधी) वरोरा येथील
शहीद हुतात्मे  योगेश वसंतराव डाहूले यांना दिनांक ३०/११/२००४ ला आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले त्या प्रीत्यर्थ आज दिनांक ३०/११/२०१७ नगर परिषद वरोरा स्वच्छता विभाग  व शहीद हुतात्मे योगेश डाहुले  यांचा आई वडील , नातेवाईक व शहरातील सन्माननीय नागरिकांनी त्यांचा अदम्य साहसाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहीद योगेश डाहूले   यांच्या आई ,वडील  श्री वसंतराव डाहूले व सौ पार्वतीताई डाहुले , जेष्ठ कवी व साहित्यिक नागथुटे सर , श्री ठेंगणे सर ,व नगर परिषद च्या वतीने आरोग्य सभापती श्री छोटू भाई शेख , अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरक्षक भूषण सालवटकर , तसेच कर्माचारी सुनील नकवे , भारत नकवे  व शहरातील इतर नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

काण फुकुन गुरू करण्यात अर्थ नाही : प.पु.कळमकर

काण फुकुन गुरू करण्यात अर्थ नाही : प.पु.कळमकर

पारशिवणी/प्रतिनिधी :
तालुक्यातील टेकाडी येथे श्री कृष्ण मंदिरात कीर्तनाला सुरवात झाली ती महानुभाव पंथातील संत मयानंद महाराज यांच्या प्रपंचाचा सार सांगणाऱ्या चार चरणाच्या अभंगा पासून महानुभावातील तत्वज्ञान सांगत जगाच्या पाठीवर जीवनाचे तत्वज्ञान त्यांच्या अभंगातून मांडत,जगा मध्ये जीवन कशे जगावे,समाजात कशे वावरावे,कुठल्या पद्धतीने जगावे काय आचरणात आणावं काय आचरणात आनु नये याचा सार अभंगांमधून मांडत कीर्तनाला आलेल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं.कीर्तनात शास्त्रांबद्दल बोलतांना प्रत्येक पंथाने आप आपल्या धर्म ग्रँथांचे वाचन करणे गरजेचे असून ते वाचून आचरणात आणनेही महत्वाचे आहे तेव्हा शास्त्रांचे अध्ययन करा निव्वळ काण फुकुन गुरू करण्यात अर्थ नाही अशे प्रबोधन टेकाडी येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जयंती महोत्सवा दरम्यान प.पु.प.म. श्री.कळमकर बाबा महानुभाव यांनी आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमा मधून केले. 

       प्रपंच व आश्रम व्यवस्थेवर देखील त्यांनी उत्तम रित्या प्रकाश टाकत धर्म,अर्थ,काम,मोक्ष तर ब्रह्मचर्य,गृहस्थ,
वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम या चार आश्रम व्यवस्थेमध्ये माणसाची जीवन जगण्याची प्रक्रिया आधारलेली असते.ज्यात धर्माने मोक्ष आणि अर्थाने काम साध्य समजल्या गेलेलं आहे.ब्रह्मचर्य आणि गृहस्थ जीवना मध्ये धर्म,अर्थ आणि काम याचे महत्व आहे.तर वानप्रस्था आणि संन्यास मध्ये धर्माचा प्रचार व मोक्षाचे महत्व मानल्या गेले आहे.आणि गृहस्थ जीवना मध्ये धर्म,अर्थ आणि काम चे महत्व आहे.ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म चर्चेत रत राहिने तर दूसरा प्रचलित अर्थ म्हणजे इंद्रियांनवर संयम ठेवणे तेव्हा युवा विद्यार्थी वर्गाने आपल्या इंद्रियांवर वयाच्या २१ वर्षा पर्यंत सय्यम ठेवायला पाहिजे कारण ब्रम्हचर्य म्हणजे ऊर्जेचा केलेला संग्रह आणि मनावर मिळवलेला विजय होय.तेव्हा मनुष्य असो की संत,देव असो की डाकू आयुष्यात ब्रम्हचर्या चे पालन अत्यंत महत्वाचे असल्याचे प.पु.प.म. श्री.कळमकर बाबा  यांनी आपल्या कीर्तनातुन युवा वर्गाला संबोधित केले.

श्री कृष्ण मंदिर टेकाडी (को.ख.) येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जयंती महोत्सवाला २६ नोव्हेंबर पासून प्रारंभ झालेला आहे.दररोज सकाळी देवाला उटी स्नान व विळा अवसराचा कार्यक्रम महानुभाव भक्तांन कडून केला जातो अयोजकांतर्फे ता.२९ नोव्हेंबर ला प.पु.प.म.श्री.कळमकर बाबा महानुभाव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता कार्यक्रमाला ग्रामस्थानी गुलाबी थंडीचा आनंद घेत भरभरून प्रतिसाद दिला किर्तना साठी तबल्यावर अरविंद वासाडे,हार्मोनियम वर गंगाधर आकोटकर तर गायना साठी किशोर वासाडे,कमलाकर बोराडे,प्रकाश बोराडे,मनोज बोराडे,अतुल खेडकर,दिलीप उमप,अभिजित कुरडकर यांनी साथ दिली तर कीर्तनाला प्रमुख उपस्थितीत प्रतिदिन प्रवाचक प.पु.प.म. श्री.माधवव्यासबाबा उपाख्य प.पु.प.म. श्री.महंतबाबा चिरडे ब्रम्हगिरी देवळी,भगवत पाठ ,दत्तात्रेय स्रोत प्रवाचक प.पु.ई. श्री.हरिपालदादा न्यायबास काटोल यांची उपस्थिती होती.येत्या ०२ डिसेंबर ला प्रभूंची पालखी व शोभायात्रा निघणार असून ०३ तारखेला कार्यक्रमाची सांगता दहीकाला व महाप्रसादाने होणार आहे तेव्हा श्री कृष्ण मंदिर पंचकमेटी तर्फे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.कार्यक्रमाल यशस्वी करण्यासाठी श्री कृष्ण मंदिर पंच कमेटी, श्री दत्तसेवा मंडळ,महानुभाव मंडळ,श्रीकृष्ण महिला मंडळ टेकाडी यांनी सहकार्य केले.

भाजपा तालुका सरचिटणीसला मारहाण

भाजपा तालुका सरचिटणीसला मारहाण

- पोलीसात तक्रार
_ मूरपार येथील घटना

चिमुर तालुका प्रतिनिधी
       तालुक्यातील मुरपार येथील गावातील चौकात रात्री ओटयावर बसुन चर्चा करीत असताना अवैध दारू विक्रेत्याने तु आमच्या घराचे फोटो काढुन दारू विक्री बाबत पोलीसांना वाटसपवर माहीती देतो. या कारनावरून चिमुर तालुका भाजपा ग्रामीण चे, सरचिटनीस हंसराज श्रीरामे मुरपार यांना चौकात मारहान करून अश्लील शब्दात शिवीगाळ केली. हि घटना मंगळवार ला रात्री आठ वाजता घडली.
          मुरपार येथील गावातील किराणा दुकाना समोरील चौकात ग्रामपंचायत ने बांधलेल्या सिमेंट ओट्यावर बसुन श्रीरामे  मित्रा सोबत चर्चा करित असताना प्रमोद चौखे हा चौकात येवुन त्यांच्याकडे पाहुन तु आमचे घराचे अवैद्य दारू विक्री बाबतचे फोटो काढुन पोलीसांना वाटसपवर माहीती देतो त्यामुळे गावात पोलीसांची गाडी आली व माझ्या घराची चौकशी केली. या कारनावरून श्रीरामे सोबत चौखे यांनी झगडा केला. व अश्लील शब्दात बोलुन लाता बुक्यांनी जबर मारहान केली. व जिवे मारन्याची धमकी दिली.
      आमदार किर्तीकुमार भांगडीयांचे निकटवर्ती व चिमूर तालुका भाजपाचे ग्रामीण सरचिटनिस हंसराज श्रीरामे यांनी प्रमोद चौखे विरुद्ध पोलीसांत तक्रार दाखल केली असता पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक

आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक

ब्रम्हपुरी -  आज दि.२९/११/२०१७ रोजी चंद्रपूर येथील वीज विद्युत कामगार वर्कर फेडरेशन सोसायटी सभागृहात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिला कोन्सिल ची बैठक झाली 

संबधित संघटनेने आशा वर्कर व गटप्रवर्तक यानी  दि.१८ डिसेंबर २०१७ ला नागपूर हिवाळी अधिवेशनवर आयोजित राज्यव्यापी आक्रोश मोर्चा तयारी सुरु करण्याची माहिती देण्यात आली असून संघटनेच्या वतीने जिला आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान व मुखमंत्री याना निवेदन देऊन दि.७/१०/२०१७ च्या केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय परीपत्रका नुसार एन.एच.एम. मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी ५% मानधन वाढ व 1५% बोनस लागू करण्यात आला आहे त्याचा लाभ आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा हि मागणी करण्यात आली,यावेळीजिल्हाभराती ल शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते असे कॉ.श्री.विनोदजी झोडे यानी सांगितले.

पुढील तारखेला आणा जामीनदार

पुढील तारखेला आणा जामीनदार

तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावीसह अशोक माडावारला न्यायालयाची सूचना

गडचिरोली -
देसाईगंज येथील पत्रकार डा विष्णु वैरागडे यांना बातमी प्रकाशित केल्याची सबब पूढे करून पदाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन मारहाण, शिवीगाळ तसेच जबरी मौल्यवान वस्तु पळवून नेल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायाधिश संजय मेहरे यांनी मामला क्रमांक ३५/२०१७ व ३६/२०१७ मध्ये  ता. २८ ला विष्णु वैरागडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन विरुद्ध माधुरी मडावी या दोन प्रकणात जामिनावर सूटका करून घेण्यासाठी पुढील तारिख १६ डिसेंबर न्यायालयाने  दिली आहे.

देसाईगंज येथील नगर परिषदेच्या तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या विरूद्ध नगरसेवक, पदाधिकारी तसेच पालिका कर्मचारी यांच्याशी हूकूमशाहीने व मनमानी वृत्तीने वागत वारंवार अट्रासिटीची धमकी देतात. नियमबाहय, आकसापोटी कारवाई करित असल्याने त्यांच्या कामकाजावर विश्वासच न राहिल्याने देसाईगंज नगर परिषदेच्या विशेष सभेत प्रस्ताव क्रमांक ५७१ व ५७२ अन्वये ८ जून २०१० एकमताने अविश्वास ठराव पारित करण्यात आले होते. याबाबत पत्रकार डॉ विष्णु वैरागडे यांनी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने या अविश्वास प्रस्तावाला केराची टोपली दाखविले होते. अखेर अविश्वास ठराव घेणाय्रा नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावून रिठ याचिका क्रमांक २९७२ /२०१० अन्वये दाखल केली होती . यावर  उच्च न्यायालयाने २७ जूलै २०१० ला ८ आठवड्याच्या आत बदली संदर्भात निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला निर्देश देऊन प्रकरण निकाली काढले होते. या आठ आठवड्यात नगरविकास विभागाने तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी हीची शासन आदेश क्रमांक एम सी ओ १२१०/प्र. क्र. १२६ /नवि १४ नुसार दि. २७ सप्टेंबर २०१० ला रामटेक येथील नगरपारिषदेत उचलबांगडी केली होती. या दरम्यान मूख्याधिकारी मडावी या वैद्यकीय रजेवर जाऊन या बदली आदेशाला मॅट मध्ये ३० सप्टेंबर २०१० ला आव्हान दिले होते, त्यात सदर याचिका मॅटने फेटाळून लावली होती . त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन न करता आपल्याच बदलीआदेशाला स्थगीती दिली होती. त्यानंतर ती परत देसाईगंज नगर परिषदेत रूजू झाल्यावर नगर परिषद नगरसेवक व पदाधिकारी तसेच वास्तविक बातम्या प्रकाशित करणाय्रा पत्रकारांवर सूड भावनेतून आपल्या पदाचा गैरवापर करून बदला घेणे सूरू केले होते. दरम्यान अविश्वास ठरावासंदर्भात उच्च न्यायालय निर्णयाचे पालन न केल्याने अवमानना याचिका दाखल करून नगरविकास विभागाला नोटीस बजावण्यात आली. त्या नंतर तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी यांची पुन्हा रामटेकलाच नगरपारिषदेत स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र बदलीवर रामटेक ला जाण्यापूर्वि वादग्रस्त कार्यकाळ व बदली संदर्भात संपूर्ण प्रकरणाची सखोल बातमी प्रकाशित केल्याची सबब पूढे करून आपल्या पदाचा गैरवापर करून हेतूपूरस्पर कधी नगर परिषद गाळ्याचा विषय घेऊन, तर कधी पॅथालाजी संदर्भात देसाईगंज पोलीस स्टेशनने ५ सप्टेंबर १९९१च्या शासन परिपत्रकानूसार बोगस पॅथालाजी

धारकांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या पत्र क्रमांक २०७ /१० तसेच १३१५ /१० मध्ये दिलेल्या संपूर्ण संदर्भिय पत्रात डॉ विष्णु वैरागडे यांच्या पॅथालाजीचा नावच नसतांना एनकेन प्रकारे त्रास देणे सूरू केले होते.मात्र नगरविकास विभागाने उच्च न्यायालय नागपुर येथिल निर्णयाचा संदर्भ देऊन केलेल्या बदली संदर्भात पत्रकार डॉ विष्णु वैरागडे यांनी बातमी प्रकाशित केल्याने अक्षरशः चिडून जाऊन रामटेक ला रूजू होण्यापूर्वी कसली ही पूर्व सूचना न देता आरोपी माधुरी मडावी व अशोक माडावार हे दोघेही डॉ विष्णु वैरागडे यांच्या कार्यालयात बेकायदेशीर व नियमबाहय घूसून तू माझ्या विरूद्ध बातम्या प्रकाशित करतोस, माझी बदली करतोस काय असे संबोधून, अश्लील शिवीगाळ, मारहाण करून कार्यालयातील मौल्यवान वस्तु जबरीने पळवून नेल्याप्रकरणी देसाईगंज येथील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ००६७ /१० अंतर्गत २१ आक्टोंबर २०१० ला भारतीय दंड विधान २९४, ३९२, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. 

           गुन्हा दाखल झाल्यानंतर देसाईगंज पोलीस स्टेशनने आरोपी तत्कालीन मूख्याधिकारी माधुरी मडावी व आरोपी अशोक माडावार यांना अटक केली नव्हती. त्यानंतर डॉ विष्णु वैरागडे यांनी देसाईगंज येथील न्यायालयात  कलम १५६ (३) यासह कलम १९० क्रिमिनल प्रोसेक्यूशन कोड अंतर्गत फौजदारी मामला क्रमांक ९८९ /२०११ अन्वये देसाईगंज न्यायालयात दाखल केली होती. ही याचिकेवर मागील सहा वर्ष १० महिन्यांपासून सूनावणी सूरू आहे. सदर याचिका गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात पाठविण््यात आले.यात आता पर्यंंत याचिकाकर्ताकडून ४ तर बचाव पक्षाकडून पाच साक्षदारांनी साक्ष नोंदविले आहेत.याचिकाकर्त्याच्या वतीने अड संजय गुरू व मृनाल मेेेेञाम बघत आहेत.

माधुरी मडावी ह्या अद्याप ११.११.२००८ पासून परिविक्षाधीन कालावधी संपूष्ठात आलेला नसून रामटेक येथे कार्यरत असतांना त्यांचे विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शि. व अ.) नियम १९७९ नियम ८ खाली प्रस्तावित केली असून सदर शिस्तभंग विषय कारवाई परिविक्षाधीन कालावधी दरम्यान असल्यामुळे कारवाई प्रलंबित असल्यास विभागीय चौकशी पूर्ण होई पर्यंत परिविक्षाधीन कालावधी वाढविण्यासाठी नगर विकास विभागाने राज्यपाल च्या आदेशानुसार ६ सप्टेंबर २०१६ ला काढलेला होता. ज्या ठिकाणी कार्यरत होत्या त्या ठिकाणी नेहमीच वादग्रस्त ठरल्या अाहेत.

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

*चंद्रपूर-नागपूर महामार्गा बाजूचे सर्विस रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत.

*लवकरच कारवाईला सुरूवात

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :भद्रावती
नगरपरिषद क्षेत्रातील चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या ले-आऊट मधील सर्विस रोडवर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मुख्याधिका-यांनी अतिक्रमणधारकांना नोटिस बजावल्या आहेत. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
                  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये तथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1966 अन्वये सदर नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.
                 सदर नोटिस प्राप्त होताच सात दिवसाचे आंत कच्चे-पक्के अतिक्रमण काढुन सर्व्हिस रोड मोकळा करुन दयावा, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता, नगरपरिषदद्वारा अतिक्रमण काढुन घेण्यात येईल. या कार्यवाहीत झालेल्या नुकसानीची व तुटफुटीची जवाबदारी अतिक्रमणधारकांची असेल, व कारवाईसाठी लागणारा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल, असे नोटिसमधे नमूद केलेले आहे.
                  नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण फार जुने आहे. सदर अतिक्रमण कायमस्वरुपी हटल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल. अपघातांची शक्यता कमी होणार आहे. महामार्गाच्या बाजुच्या संताजी नगर, गुरुनगर, कुणबी सोसायटी, गौतमनगर ही ले-आऊट अतिक्रमणापासून मोकळी होतील. अतिक्रमणामुळे होणारे उपद्रव कमी होतील. पानठेले, खर्रा विक्री केन्द्र, बंद होतील. अवैध दारुविक्रीला आळा बसेल. रोडरोमीओंची संख्या कमी होईल. पैदल चालणा-यांना सुरक्षा मिळेल. महामार्गाशेजारची गर्दी व वर्दळ कमी होईल. शहर महामार्गाला लागुन असल्यामुळे शहराची ओळख बदलून महामार्गाने जाणा-यांचा शहराकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण बदलेल.
                प्रभु गॅरेज ते पंचशील नगर, वांढरे फ्रुट्स स्टॉल ते होटल पैराडाईज, कोंबे यांचे घर ते बस स्टॉप पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड मोकळा होण्यासाठी भद्रावतीकर वाट बघत आहे व नगरपरिषदेकडुन मोठी अपेक्षा लावुन बसले आहे. आता नगरपरिषदेच्या या निर्णयात कोणता अडथळा येवुन, अतिक्रमण हटविण्याचे काम थांबू नये, असे नागरीकांचे म्हणने आहे.
----------------------------------------
नगरपरिषदेने कोणतेही हितसंबंध न जोपासता, लहान-मोठे व्यवसायिक न बघता सगड्या अतिक्रमणधारकांना नोटिस पाठवुन न.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर अतिक्रमण हटवून सर्व्हिस रोड मोकळे करावे. -

मुश्ताक अली, व्यवसायिक, भद्रावती।