काव्यशिल्प Digital Media: चंद्रपूर.डीजे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चंद्रपूर.डीजे. Show all posts
Showing posts with label चंद्रपूर.डीजे. Show all posts

Thursday, September 13, 2018

चंद्रपुरात वाजणार डीजेवाल्या बाबूंचे गाणे

चंद्रपुरात वाजणार डीजेवाल्या बाबूंचे गाणे

चंद्रपूर नाचणार डीजेच्या तालावर
हापसेट वजनार डेसीबची क्षमता ओलांडल्यास होणार कारवाई  




ललित लांजेवार:
चंद्रपुरात मंगळवारी DJ वाजविण्याच्या कारणावरून पोलिसांकडून गणेश भक्तांवर लाठीचार्ज झाला.या नंतर या घटनेचा निषेधही करण्यात आला.मात्र जिल्ह्यात डीजे वाजणार कि नाही हा प्रश्न अजूनही नागरिकांना व डीजेवाल्यांना सतावत असतानाच सोशल मिडीयावर लोकप्रतीनिधिनीच्या मध्यास्तीनंतर डीजे वाजविण्याला परवानगी मिळाली आहे असे संदेश व्हायरल होत असल्याने युवक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे चंद्रपुरात डीजे वाल्या बाबूंचे गाणे वाजणे आता स्पष्ट झाले आहे.




मंगळवारी घडलेल्या या संपूर्ण प्रकारानंतर युवकात प्रचंड रोष निर्माण झाला व चंद्रपुरातच हिंदू धर्मांच्या सणांवर व DJ वर बंदी का ?अस्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. या नंतर डीजे सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या याच संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व गणेश मंडळ व डीजेवल्याच्या प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली.या बैठकीत आवाजाची डेसिबल मर्यादा न ओलांडता डीजे वाजवू शकतो असा सामंजस्य विचार झाला असे सांगण्यात येत आहे.मात्र अधिकृत रित्या चंद्रपुरात डीजे वाजणार कि नाही हे मात्र कोणी सांगायला तयार नाही. त्यामुळे नागरिक व इतर डीजे चालक मात्र संभ्रमातच आहेत.सध्या युवकात डीजे वाजणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर डीजेच्या बुकिंगसाठी गणपती मंडळामार्फत रकमेची बोली लागणे सुरु आहे असे मंडळ सदस्यांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क केले असता संपर्क होऊ शकला नाही.