काव्यशिल्प Digital Media: महिला

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label महिला. Show all posts
Showing posts with label महिला. Show all posts

Thursday, March 08, 2018

"राष्ट्रवादी"च्या महिला आक्रमक;महिला सुरक्षिततेसाठी महिलादिनी आंदोलन

"राष्ट्रवादी"च्या महिला आक्रमक;महिला सुरक्षिततेसाठी महिलादिनी आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी: इकीकडे जगभरात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात असतांना मात्र दुसरीकडे चंद्रपूर येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेस वतीने राज्यात महिलांवरचे वाढते अत्याचाराच्या विरोधात राज्यशासनाचा मूकपने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा  बेबीताई उईके यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या मूक मोर्चामध्ये वेगवेगळ्या नामफलक हातात घेऊन मूकपणे राष्ट्रवादीकाँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. यामध्ये महिलांविरोधात अत्याचार बंद करा, लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुन्हेगार, असे फलक हातात घेऊन राज्यशासनाच्या निषेध करण्यात आला.दरम्यान मूक मोर्चा संपन्न झाल्यानंतर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हनाल्याकी  आज देखील महिला सुरक्षित नाहीये. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून ३ वर्षाच्या मुलीपासून तर ६५ वर्षाच्या म्हातारीपरीयंत    
अत्याचार होतांना दिसत आहे.
 कायद्याचा कुणालाही धाक राहिलेला नाही. कारण कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आपण राज्याचे जबाबदार गृहमंत्री या नात्याने जो कोणी  बलात्कारासारखे वाईट कृत्य करत असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी तरतूद कायद्यात करणे आवश्यक आहे. जर पुन्हा असा प्रकार घडला  तर  राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वतः कायदा हातात घेऊन त्या नराधमाला  जनतेसमोर शिक्षा देऊ असे देखील त्या निवेदानामार्फात म्हणाले,सदर निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकारी आशितोष सलील यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.





Tuesday, January 02, 2018

लिंगभेदावरून कामाची समानता नाकारणाऱ्या वनविभागाच्या मुख्य वनसरंक्षकांसह संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार

लिंगभेदावरून कामाची समानता नाकारणाऱ्या वनविभागाच्या मुख्य वनसरंक्षकांसह संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली. सदर मुख्य वनसंरक्षकांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही तक्रारीत केली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कामाच्या ठिकाणी महिला-पुरूष असा भेदभाव करता येत नाही. भारतीय संविधानाचे अनुच्छेद १४ नुसार लिंगभेद करता येत नाही. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडना काम देताना महिला-पुरूष असा भेदभाव करून कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही तक्रारीतून केली आहे.

यापूर्वीच केली होती तक्रार...
महिला गाईड म्हणून काम करताना या कामात आधीपासून असलेल्या पुरूष गाईडनी महिला गाईडना सन्मानाची व समानतेची वागणूक दिली नाही. या महिलांचा अपमान होईल, अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी बोलणे व वागणे सुरू केले.
याबाबत त्याचवेळी भद्रावती पोलिसात तक्रार केली होती. तत्कालीन ठाणेदार यांनी याची दखल घेत पुरुष गाईडना याबाबत तंबी दिली होती. तरीही महिला गाईडना पुरूष गाईडसारखी वागणूक व कामे न दिल्याने या असमानतेबाबत १९ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्य वनसरंक्षक कार्यालयाला लेखी पत्र दिले आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वारंवार या कार्यालयाशी व उपसंचालक (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
उपसंचालक मानकर यांनी याबाबीची गंभीर दखल घेत असल्याचे सांगून आश्वस्त केले होते व पुरूष गाईडप्रमाणेच महिला गाईडनाही कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही, अशी माहिती अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिली.

श्रमिक एल्गारचे धरणे...
या प्रकाराच्या विरोधात महिलांनी सोमवारी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. महिला-पुरूष असा गैरकायदेशीर भेदभाव दूर करण्याबाबत श्रमिक एल्गारने वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अधिकाऱ्यांनी या महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले. आंतराष्ट्रीय दर्जाच्या व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड असल्याचा अभिमान वनविभागाला असायला हवा होता. मात्र या महिलांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा या महिलांचा आरोप आहे. धरणे आंदोलनात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार तसेच महासचिव घनश्याम मेश्राम व महिला गाईड सहभागी झाले होते.



Tuesday, November 21, 2017

देवपायली येथे असंघटित महीला कामगारांची कार्यशाळा

देवपायली येथे असंघटित महीला कामगारांची कार्यशाळा

गुलाब ठाकरे /ब्रम्हपुरी
दत्तोपंत ठेंगडी , राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड, नागपूर (श्रम व रोजगार मंत्रालय,  केंद्र सरकार, नवी दिल्ली. ) आणि
स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था , वर्धा
द्वारा ग्राम पंचायत देवपायली तालुका नागभिड येथे असंघटीत महीला कामगाराची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन देवपायली गटग्रामपंचायतचे सरपंच सौ.योगीता  देशमुख, यांचे अध्यक्षतेखाली, व श्रीमती इंदीरा नवघडे , उपसरपंच गटग्रामपंचायत देवपायली यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी हरीश्चंद्र पाल सचिव , स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था, तसेच प्रमोद रत्नपारखी, शिक्षणाधिकारी , श्रमिक शिक्षण बोर्ड , नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सौ़. शालू नवघडे,  , प्रास्ताविक प्रमोद रत्नपारखी यांनी तर आभारप्रदर्शन सौ. अल्का चिंचोलकर यांनी केले . या वेळी हरीश्चंद्र पाल, श्रीमती नवघडे, योगीता देशमुख यानी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या सत्रात हरीश्चंद्र पाल यांनी तंबाखुमूक्तीची गरज, महीला व्यसनांच्या आहारी गेल्या तर बिघडणारी कौटूंबिक परीस्थिती, आर्थीकतेचा होणारा अपव्य,तंबाखू सेवनाने होणारे विविध आजार , तंबाखू सेवनाचे विविध पद्धती, सेवनाचे प्रकार, कर्करोग होवू नये यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चात्मक व गिताचा आधाराने प्रशिक्षणार्थींना मंत्रमुग्ध केले. तसेच पहील्या सत्रात या कार्यशाळेची गरज आणि महत्व. असंघटीत कामगाराची होणारी पिळवणूक, नेट बँकीगची उपयुक्तता, ऑनलाईन व्यवहाराची गरज व फायदे  अशा विषयांवर मार्गदर्शन केले. तर सौ शालू नवघडे हिने बचत गट काळाची गरज, बचत गटाचे फायदे, विविध व्यवसाय., देवपायली येथील बचतगटाची यशस्वीतता इ. विषयावर माहीती दिली. रोजगार हमी कायदा, व कामगाराचे हक्क आणि कर्तव्य, घरगुती व्यवसाय, कूषी विभागाची गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यावर मार्गदर्शन केले. याशिवाय जिवनात यशस्वी होण्याकरीता वापरावयाची सप्तसुत्रे, 7 या अंकाच्या विकासात्मक खेळातून जिवनात संतर्कतेचे महत्व,  जिवनाचा आनंद कसा घ्यावा, व शारीरिक दूष्टया तंदुरूस्ती कशी राखावी याचे प्रत्याक्षिक गाडी आली, गाडी आली रे, या कृती गितातून महीलांना देण्यात आले.
       ग्रामीण भागात अशाप्रकारच्या कार्यशाळांचे नियमीत आयोजन झाले तर ग्रामीण महीला डीजीटल युगाच्या प्रवाहात हळूहळू सामील होतील व ग्रामीण महीला निर्भर होवून , त्यांचे सक्षमीकरण होईल असा आशावाद महीलांनी यावेळी व्यक्त केला.सदर कार्यशाळेला उपस्थित महीला कामगाराचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून प्रतीदिवस रू. 100/ प्रमाने केंद्र शासनाचे निर्देशानुसार ऑनलाईन भत्ता बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहीती रत्नपारखी यांनी दिली.

Tuesday, November 14, 2017

रामटेक  पोलिस स्टेशन समोर दारु विक्रिचे स्टॉल लावू

रामटेक पोलिस स्टेशन समोर दारु विक्रिचे स्टॉल लावू

रामटेक, प्रतिनिधी-  तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु आहे.
ही अवैध दारु विक्री पोलिसांचा संरकक्षणात सुरु असल्याचा आरोप करत आज प्रहार महिला आघाडी रामटेक तालुक्याचा वतीने पोलिस स्टेशन रामटेक वर धड़क देण्यात आली व् पोलिस उपनिरीक्षक तालिकोटे यांना निवेदन देवून तत्काळ ही  अवैध दारु विक्री बंद करावी अन्यथा पोलिस स्टेशन रामटेक समोर दारु विक्रीचा स्टॉल लावू अशा इशारा प्रहार तर्फे पोलिस स्टेशन ला देण्यात आला.