সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 17, 2017

" वृक्ष तिथे छाया,"बुवा तिथे बाया " विषयावर व्याख्यान संपन्न

 ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :-
गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया,  बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला.  मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते.

 या कार्यक्रमात  प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की  देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक  चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र मंत्राच्या सहाय्याने प्रात्यक्षिक भाजलेली पापड फोडून द्या आणि पंचवीस लाख रुपये पुरस्कार घेऊन जावे असॆ जाहीर आवाहन प्रा.श्याम मानव यानी सर्व जनतेला केले.1982 साली जादूटोनाविरोधी कायदा नागपूर वरून सुरू केली.आणि हा कायदा महाराष्ट्रच नाही तर आजुबाजुला प्रांतात पोहचला .  ही चळवळ अ.भा.अं.नी.स.ने  सुरू केली असून  जगामधली ही पहिली चळवळ आहे ,16डिसेंबर  2005 साली कायदा विधानसभेत  हिवाळी अधिवेशन मध्ये ठेवला असता याला सर्वानी विरोध केला आणि हा कायदा संमत होता होता पुन्हा  या कायद्याला ग्रहण लागले व  पुन्हा शून्यावर येवून पूर्ण सूत्र आमची बंद झाले  .
या कायद्यात  सामान्यजनतेला लुबाडनाऱ्या भोँदु बाबा विरोधी कायदा हे या कायद्याचे खास वैशिष्ट होती.
त्यामुळे संत ,समाज सुधारक यांचे वैचारिक जनजागृती कार्य पुढे सुरू ठेवून निकोप निर्भीड व विज्ञाननिष्ठ आनंदी समाज बनविण्यासाठी आपन प्रयत्न करावे असॆ जाहीर आवाहन  व्याख्यानात समाज बांधवाना  प्रा.श्याम मानव यानी व्यक्त केले

या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.योगीताताई बनपूरकर नगराध्यक्ष ,मा.श्री.विजय भाऊ वडेट्टिवार आमदार , श्री.झुर्रे सर , अँड.गोविंदराव भेंडारकर,डॉ.खिजेंद्र गेडाम ,श्री.सूजित खोजरे ,प्रा.बालाजी दमकोंडवार ,श्री.शशिकांत बाँबोळे,श्री.अभिजीत कोसे,  डॉ.बनवाडे ,सौ.मनीषाताई बनवाडे तसेच पत्रकार वर्ग , अधिकारी ,व हजारो संख्येने उपस्थित युवा ,महिला ,पुरुष व गणमान्य व्यक्ती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.