काव्यशिल्प Digital Media: बाजार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बाजार. Show all posts
Showing posts with label बाजार. Show all posts

Sunday, March 18, 2018

रामटेक बाजार समीतीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

रामटेक बाजार समीतीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

युवक कॉंग्रेसने केली घोषणाबाजी,पालकमंत्र्यांचा पुतळा जाळला 
रामटेक तालुका प्रतिनिधी-
नियमबाहय नियुक्ती रद्द झालीच पाहीजे,नही चलेगी....नही चलेगी तानाषाही नही चलेगी,पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा देत रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामटेकच्या कृषी उत्पन्न बाजार समीती कार्यालयाच्या आवारासमोर दिनांक 18 मार्च 2018 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास प्रचंड घोषणाबाजी केली.यानंतर युकॉंचे जिल्हा महासचिव सचिन किरपान यांच्या नेतृत्वात पालकमंत्री यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले.   
         याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने शिक्षक आहेत मात्र त्यांनी आपण शिक्षक असल्याची माहीती शासनाला सादर केलेल्या शपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रशासक या पदावर करण्यांत आली.त्यांनी आपला धंदा शेती असल्याची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चौकशी नागपुरचे जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशानुसार रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांनी चौकशी केली व तसा अहवाल जिल्हाउपनिबंधक नागपुर यांना पाठविण्यांत आला मात्र कारवाई झाली नाही.एका संघटनेने यासाठी दोन दिवस आमरण उपोशनेही केले मात्र पारदर्षक कारभार असल्याचा दावा करनाऱ्या या राज्य सरकारने कोल्हे यांना हटविले नाही याप्रकरणी स्थानीक आमदार व पालकमंत्री कोल्हे यांना अभय देत असल्याचा आरोप किरपान यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केला.आम्ही पालकमंत्री यांना भेटण्यासाठी आलो होतो मात्र ते येणार नसल्याचे कळलेकदाचित आम्ही आंदोलन करणार हे कळल्याने ते आले नसावेत त्यामुळे आम्ही याठीकाणी त्यांच्या पुतळयाचे प्रतिकात्मक दहन करून निदर्षने केल्याचे किरपान यांनी यावेळी सांगीतले.
 रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर निवडणूक न घेता वारंवार प्रशासक मंडळ लादण्याचाही त्यांनी यावेळी निषेध केला.विद्यमान परीस्थितीत या भागातील शेतकरी अतिशय अडचणीत आहेत.त्यांना या सरकारने मदतीचा हात दिला पाहीजे मात्र हे सरकार शेतकऱ्यांना  न्याय देवू शकले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी सवश्री देवेंद्र डोंगरे,मनोज नौकरकर,चेतन ईखार,स्वप्नील श्रावणकर व संदीप ईनवाते यांचेसह रामटेक विधानसभा क्षेत्रांतील युवक कॉगेंसचे कार्यकर्ते हजर होते. 
 

Monday, February 05, 2018

चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद

चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद

चिमूर/प्रतिनिधी:

 अंहिसा चौक ते नेहरू चौक परीसरात भरणारा दैनदिन भाजीपाला बाजार हुतात्मा स्मारक अभ्यंकर मैदान येथे हलविण्याकरिता नगर परीषदेने फर्माण काढले. आता भाजीपाला व्यावसायिकांना तेथे बळजबरीने नेले जात आहे. या जाचाला कंटाळून अखेर भाजीपाला विक्रेत्यांनी दैनदिन भाजीपाला गुजरी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चिमूर शहरातील दैनदिन गुजरी हुतात्मा स्मारक अंभ्यकर मैदान येथे अनेक वर्षांपासून भरत होती. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केल्याने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने ही गुजरी अहिंसा चौक ते नेहरू चौकात हलविली. तसेच यापूर्वी नेहमी यात्रा काळात नेहरू चौकापासून मुख्य रस्त्यावरच गुजरी भरायची. मात्र आता रहदारीला अडथळा होतो, या सबबीखाली नगर परिषदेने गुजरी अभ्यंकर मैदान येथे नेण्याचा घाट घातला आहे. व्यावसायिकांनीही अभ्यंकर मैदानात काही दिवस गुजरी भरविली. मात्र या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने पुन्हा भाजीपाला व्यावसायिक अहिंसा चौक ते नेहरू चौक येथेच परत आले. आता त्यांना पुन्हा अभ्यंकर मैदानात पाठविले जात आहे. २४ जानेवारीला भाजीपाला विक्रेत्यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. रोजच भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिकेच्या पथकाने उठविणे सुरू केले आहे. ३१ जानेवारीला तर या पथकाने व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करून कारवाई केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून सर्व भाजीविक्रेत्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली व रविवारपासून दैनंदिन भाजीपाला मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय त्यांनीच ध्वनीक्षेपकाद्वारे शहरात जाहीर केला. बाहेरगावावरून येणाºया भाजीपाला विक्रेत्यांनाही दुकान लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भातील एक निवेदन भाजीपाला व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
गृहिणींना चिंता
शहरातील भाजीमार्केटच बंद असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत. शहरात कुठेही भाजीपाला मिळत नसल्याने घरगृहस्थी कशी चालवायची, यात्रा काळात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा, या विवंचनेत गृहिणी आणि नागरिकही दिसून येत आहेत.
Chimur's daily market closed | चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद