काव्यशिल्प Digital Media: बाजारगाव

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बाजारगाव. Show all posts
Showing posts with label बाजारगाव. Show all posts

Friday, October 12, 2018

पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत जागतिक अंडी दिन साजरा

पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत जागतिक अंडी दिन साजरा

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे
अंडी उत्पादनासाठी प्रत्येक पशुपालकांनी पुढे येण्याचे कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हाहन 
गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:
जागतिक अंडी दिनाचे औचित्य साधुन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ धामना येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगवाडीत मुलांना अंडी वाटुन साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विष्णू आदमने,सरपंच वर्षाताई भलावी ,सदस्य लक्ष्मी करडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुळशीराम बेहरे ,मुख्यध्यापिका मंदा जवजवार,शिक्षिका देवका येवले, माया ढोले,विभा चिळे, मंगला येलेकर इत्यादी उपस्थित होते. दिनेश इंगळे यांनी सहकार्य केले.
जागतिक अंडी दिनाचे महत्व सांगतांना डॉ पवन भागवत म्हणाले हा दिन आँक्टोबर महीन्याचा दुसरा शुक्रवारी साजरा होतो.

मानवी आहार मुल्यामध्ये प्राथिनांची आवश्यकता व कुपोषण निर्मुलानासाठी अंडीसेवनाला विषेश महत्व आहे.शरीरातील प्रथिनांची गरज भागविन्यासाठी आपण आहरात फळभाज्या ,पालेभाज्या आणि डाळी वापर करतो.पण प्रथिनांचा उत्तम व सहज उपलब्ध होणारा स्तोत म्हणजे अंडी.
१००gm अंडयातुन आपल्याला १३gm प्रथिने मिळतात.अंडयात प्रथिने,मेद,जीवनसत्व अ ड ई रायबोफ्लोविन ,कँलसीअम ,फाँसफरस ,झिंक,आयर्न,काँपर,आयोडीन,सेलेनियम,फोलेट इ घटक असतात.
लहान मुलांमध्ये अंडी हाडांना व स्नायूंना बळकटी देतात.अंडयामधील पिवळा बलक हा मेदयुक्त असल्याने मुलांचे वजन वाढते.जीवनसत्व अ मुळे मुलांची दृष्टी सतेज होते.आणि रोगप्रतिकार क्षमताही वाढते.गर्भवती माता व स्तनदा भगिनी यांना अंडयातील कोलीन मुळे गर्भातील बालकाच्या मेंदुची वाढ ,आयोडीन मूळे मानसिक वाढ ,आयर्न मुळे महीलांना लोहाची कमतरता भासत नाही.

वयोवृद्ध माणसांकरीता हाडांचा ठिसुळपणा ,सांधेदुखी असे विकार अंडी सेवनाने कमी होतात.अंडयातील पांढऱ्या भागाचे नियमीत सेवन केल्याने हदय विकाराचा धोका टळतो.ओमेगा ३ मुळे उच्चरक्त दाब कमी ,वाढत्या वयामुळे उद्घभवणारा मोतिबींदु,लोहामुळे वॄध्दांना शारीरिक उर्ज़ा मिळते.यामुळे सन्डे हो या मंडे रोज खाओ अंडे या करीता अंडी उत्पादनासाठी प्रत्येक पशुपालकांनी पुढे येऊन जास्तित जास्त अंडी उत्पादन करून आपले आथिर्क स्तर्यही सुधारेल. आणि मानवी आरोग्य ही सुधारण्यास आपला हातभार लागेल असे मत व्यक्त केले.

जाहिरात 





कै.पा.ना.गावंडे (उपाख्य बाबूजी) यांची १९ वी पुण्यतिथी साजरी

कै.पा.ना.गावंडे (उपाख्य बाबूजी) यांची १९ वी पुण्यतिथी साजरी

गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:-
 आज सकाळी 10 वाजता शिवा सांवगा शिवा हायस्कूल च्या प्रांगणा मध्ये थोर स्वातंत्र्य सेनानि व कृषक कल्याण शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. पा.ना.गांवडे उपाख्य बाबूजी याची १९ वी पुण्यतिथी १२ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,तसेच शाळेतील सर्व शिक्षकानी आणि सर्व गांवडे परिवारणी बाबूजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आईसाहेब गांवडे ,विजयजी जावधीया (शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महा.)सुरेश खोंडे( माजी पंजाबराव कृषी विद्यापीठ प्राध्यापक)अशोक राऊत,माजी प्राचार्य शिवा सांवगा शिवा हायस्कूल,वाघमारे सर,माजी प्राचार्य शिवा सांवगा शिवा हायस्कूल,मुना गांवडे,सुनील गांवडे,मिलिंद मानकर, तसेच गावातील सर्व नागरिक व शिवा सांवगा शिवा हायस्कूल चे सर्व शिक्षक,तसेच कार्यक्रमाचे संचालन वाघमारे सर तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य सौ.बरडे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मदत केली.



Tuesday, October 09, 2018

नागपुरात ट्रेलर ट्रकने महिलेला चिरडले

नागपुरात ट्रेलर ट्रकने महिलेला चिरडले

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
चौदामैल चौक टि पाँईट परिसरातील घटना
तात्काळ गतिरोधक (ब्रेकर) लावण्याची स्थानिकांची मागणी
बाजारगाव/प्रतिनिधी:
 येथून जवळच असलेल्या कळमेश्वर पोलीस स्टेशन ठाणा हद्दितील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चौदामैल चौक कळमेश्वर वळण रस्त्यावर ट्रेलर ट्रक वळण घेत असता फळ विक्रेत्या महीलेचे रस्ता ओलांडत असतांनी ट्रेलर ट्रकखाली येऊन काळाने झडप घेतली.
सविस्तर वृत्त प्राप्त माहिती नुसार नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मंगळवार (९/आॕक्टोंबर) सकाळी ९.०० वा. दरम्यान चौदामैल चौक परिसरात फळ विक्रेता महिलेचे छोटेसे दुकान असून ती रोडच्या पलीकडे जाऊन आपल्या दुकानात नास्ता घेऊन वापसी परतीला महामार्ग रस्ता ओलांडत असतांनी नागपूरवरुन अमरावती ला भरधाव वेगात अज्ञात आयसर ट्रक जात असता.. महिला अर्ध्या मार्गावर (मधल्या रस्त्यावर) उभी होती. त्याचवेळी कळमेश्वर वळण मार्गाने येत असलेला ट्रेलर ट्रक आरजे १९ जिई २७०२ क्रमांकाचा नागपूर दिशेने वळण घेतेवेळी भरधाव जात असलेला अज्ञात आयसरने उभ्या असलेल्या महिलेला कट दिला व ट्रेलर ट्रक ला धडक देऊन सरळ महामार्गानी पसार झाला. त्याचवेळी महिला संकटात सापडल्याने ती घाबरून मागे सरली तर काय चक्क ट्रेलर ट्रकखाली आल्यानी तिच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्यानी दुर्गा शेरसिंग ठाकरे (३५) राहणार वार्ड क्रमांक पाच साईमंदीर जवळ गोंडखैरी हिचा जागिच मृत्यू झाला. व बघ्याची गर्दी वाढली.
घटनेची माहीती तिचा पती शेरसिंग ला मिळताच मृतक महिलेचे दोन लहान मुले (एक सात वर्षाचा तर दुसरा बारा वर्षाचा) घटनास्थळावर येऊन आई-आई बोलून रडू लागले.
तात्काळ घटनेची माहिती शेख कैश यांनी कळमेश्वर पोलीसांना दिली. व कळमेश्वर पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन तसेच खुर्सापार वाहतुक पोलीस मदत केंद्रातील साहयक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश हिवरकरसह अन्य वाहतुक पोलीसकर्मी दाखल होऊन बघ्याच्या गर्दीला आवरुन ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग सुरळीत करण्यात आला. व पंचनामा करुन मृतक महिलेला उत्तरीय तपासणी करीता कळमेश्वरचे ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात आयसर ट्रकच्या तपासाला सुरवात करुन ट्रेलर ट्रक ताब्यात घेण्यात आला.
पुढील तपास कळमेश्वरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या नेतृत्वात पिएसआय अमोल सांगळे, सुशिल धोपटे, एएसआय राजेंद्र यादव, हेडकाँस्टेबल भोजराज तांदुळकर, अतूल खोडनकर, ललीत उईके पुढील तपास करीत आहे.
 स्थानिकांची गतिरोधकाची मागणी
वारंवार मे. अटलांटा टोल कंपनीला गतिरोधकाबद्दल लेखी तक्रारी देऊनही अटलांटा प्रशासन कोणतीही दखल घेत नाही.या परिसरात वारंवार अपघात होत असतात. गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वेग कमी होत नसून नेहमीच अपघात होत असतात. चौदामैल परिसरात ताबडतोब गतिरोधक लावण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी जोर धरु लागली.

  माँ भवानी धाम चौकीगढ,मरकसुर येथे नवरात्र उत्सवाची सुरुवात

माँ भवानी धाम चौकीगढ,मरकसुर येथे नवरात्र उत्सवाची सुरुवात

गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:
 येथून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या मरकसुर चौकीगढ येथील निसर्गाने नटलेल्या घनदाट जंगलात वेणा नदीच्या उगमस्थानी काही काळा पूर्वी माँ भवानी स्वयंभू प्रगट झाली असून येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अश्विन नवरात्र उत्साहात साजरा होत आहे.
माँ भवानी धाम येथे आज सकाळी ६ वाजता घटस्थापना झाली तसेच २५१ अखंड मनोकामना ज्योत (घट )सुद्धा बसविण्यात आले आहे रोज सकाळ व सायंकाळी मातेची आरती करण्यात येते.

रविवारी १४/१०/२०१८ दुपारी १2 वाजता माँ भवानी जागरण मंडळ नागपूर,बुधवारी १७/१०/१०१८ ला सकाळी ११ वाजता न्यू म्युझिकल ग्रुप देवी भजन मंडळ कोंढाळी, गुरुवार १८/१०/२०१८ ला सकाळी ११ वाजता कामाक्षी देवी जस जागरण बालाघाट(म.प्र.) यांच्यातर्फे देवीच्या जागरण (भजन) चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे व महाप्रसाद चे आयोजन केले आहे.१७/१०/२०१८ ला रात्री ११ वाजता हवन व दसर्याच्या दिवशी सर्व घटाचे विसर्जन करण्यात येणार आहे अशी माहिती माँ भवानी धाम चौकीगढ येथील सदस्यांनी दिली आहे.

Tuesday, July 31, 2018

 गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
 कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले गोंडखैरी येथे स्वःताच्या घरीच तरुणाने विष घेऊन केली आत्महत्या सविस्तर वृत्त असे की मृतक चिंटू ऊर्फ जयंता शंकर अत्करी वय २२ वर्षे राहणार वार्ड क्रंमाक ३ हा मद्यपान करुण नेहमीप्रमाणे रात्री उशीरा साडेदहाच्या सुमारास घरी यायचा व वडीलाला पैशाची मागणी करायचा अगर पैशे दिले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी नेहमीच वडीलांना द्यायचा. असेच सोमवार ला रात्री साडेदहाच्या दरम्यान मद्य प्राशन करुण आला व बडबड करु लागला. घरच्यांनी त्यांचेवर लक्ष न देता, त्याला तसेच सोडून त्याच्या खोलीमध्ये बडबड करु लागला व आतमधून दरवाजाची कडी बंद करुन झोपला.
नेहमीप्रमाणे वडील मंगळवार (दि.३१/जूलै) ला सकाळी पाचच्या दरम्यान झोपून उठले असता खिडकीतून पाहले तर निद्रा अवस्थेत आढळून आला. व आतमधून दरवाजाची कडी बद असून त्याला आवाजाने उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. घरा लगत स्थानिक सरपंचाला व परिसरातील पोलीस पाटिल आणी स्थानिकांच्या मदतीने खिडकीतून दरवाजाची कडी काढण्यात आली. तर काय गार झोपीच गेला व काळाने झडपच घेतली. त्यांच्या तोंडातून फेस वाहत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला हलचल करुण उठवण्याचा प्रयत्न केला.पण त्याआधीच काळाने झडप घेतली.
ताबडोब कळमेश्वर पोलीसांना सूचना देण्यात आली. मंगळवार सकाळी ६.३० वाजता उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे मृतकाला रवाना करण्यात आले. दुपारी १.००वाजता त्याचे स्थानिक मोक्षधाम येथे अत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.त्यांच्या पच्छात आई-वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे.





गोंडखैरीत दोन दिवसीय शिवयोगी कृषी पध्दतीचे प्रशिक्षण संपन्न

गोंडखैरीत दोन दिवसीय शिवयोगी कृषी पध्दतीचे प्रशिक्षण संपन्न

शेकडो शेतकऱ्यांनी घेतला लाभ
बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गलगत गोंडखैरी स्थानिक श्री.विठ्ठल-रुख्मिनी देवस्थान सभागृहात दोन दिवसीय शिवयोगी कृषि पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले.तालुक्यातील गाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधिचा लाभ यावेळी घेण्यात आला.*
डाँ.अवधूत शिवानंद प्राचीन शिवयोगचे शिवयोग गुरु असून आधुनिक युगातले सनातन वंशाचे ब्रम्हांडीय वैज्ञानिक आहे.त्यांनी एक नविन शिवयोग ब्रम्हांडीय कृषी पध्दती निर्माण केली असून २०१४ पासून शेतकरी ही पध्दत अमंलात आणत आहे. शुन्य लागत असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ घेत आहे. या पध्दतीने शेत जमीन सुपीक होते.  
उत्पादनाची गुणवत्ता वाढते बी-बीयाने पृष्ट होतात. व पिकांचे सरक्षण होते. शेतीसाठी लागणारा खर्च पन्नास टक्के कमी व उत्पन्न दोन पटीपेक्षा जास्त होते. शिवयोगी पध्दतीचे अनुभव घेतलेले शेतकरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात व अनेक राज्यात घेण्यात आले.
आसाम, कृषी विद्यापीठ जुनागढ, कृषी विद्यापीठ गुजरात, जवहरलाल नेहरु कृषी विद्यापीठ जबलपूर व इतर कृषी वैज्ञानिकाने याचे सफल प्रयोग केले. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने या पध्दतीचे प्रशिक्षण आत्मा अग्रीकल्चर टेक्नालाँजी मँनजमेंट एजंशी अंतर्गत प्रत्येक जिल्हात तालुक्यातील गावागावात शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. सदर शिवयोगी कृषी पध्दतीचे दोन दिवसीय प्रशिक्षण गोंडखैरी येथे श्री.विठ्ठल-रुख्मिनी सभागृहात रविवार (२९/जूलै) ला संपन्न झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ घेतला. 
यावेळी स्थानिक सरपंच चांगदेव कुबडे, माजी उपसरपंच हेमराज पोहनकर, श्री.विठ्ठल-रुख्मिनी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष भास्कर तिडके,निरंजन अत्करी, शिवयोगी संस्थेचे किरण वंजारी,संगीता त्रिपाठी, वर्षा चौरसिया, दिपमाला घुमडे,फटींग, तसेच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Saturday, July 28, 2018

द्रुगधामना येथे वाडी व बाजारगाव केंद्राची शिक्षण परिषद

द्रुगधामना येथे वाडी व बाजारगाव केंद्राची शिक्षण परिषद

बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
पंचायत समिती नागपूर अंतर्गत असलेल्या समूह साधन केंद्र वाडी व बाजारगाव केंद्रस्तरीय जिल्हा परिषद शिक्षकांची अध्ययन निष्पत्ती शिक्षण परिषद गुरुवार २६ जुलै रोजी पार पडली . शिक्षण परिषदचे उदघाटन प्राचार्य पंकज भुजाडे यांनी केले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, मुख्याध्यापिका अन्नू पाल ,मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात घडत असलेल्या बदलांची माहिती दिली. सद्यस्थितीत अँड्रॉईड मोबाईल, संगणक, इंटरनेट चा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्यावत करण्याचे व अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करण्याची भूमिका विशद केली. शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर यांनी शिक्षकांनी बालस्नेही राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे व प्रत्येक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी परिषदेच्या प्रथम सत्रात अध्ययन स्तर निश्चिती व कृती आराखडा तर दुसऱ्या सत्रात अध्ययन निष्पत्ती व प्रश्ननिर्मिती याबाबत तज्ज्ञाच्या मदतीने मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाच्या के आरए बद्दल चर्चा करून वर्ग १ ली ते ८ वीच्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीनुसार राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण नुसार मेंदूला चालना देणारे व विचारप्रवर्तक प्रश्नाच्या निर्मिती बाबत नमुना उदाहरणे सादर केली. यानंतर दीक्षा व महास्टूडन्ट ऍप बद्दल सुलभक प्रवीण थेटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
गट साधन केंद्र अपंग समावेशीत शिक्षण विभागाच्या समन्वयक सेजल करवाडे यांनी दिव्यांगाचे २१ प्रकाराबद्दल माहिती दिली तर प्रणाली पाटील यांनी मतिमंद मुलं कसे हाताळावे याबद्दल सांगितले.
परिषदेला बाजारगाव केंद्रातील ४३ पैकी ३५ व वाडी केंद्रातील ८० पैकी ७० जि. प .शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे तिसऱ्या सत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मनीषा चौधरी(प्रा .शा. दवलामेटी), आशा दावळे (प्रा . शा .दृगधामना), प्रकाश कोल्हे (उ .प्रा .शा. सोनेगाव नि .), दीपक तिडके (उ .प्रा .शा. सोनबानगर), सुदाम नागपुरे ( प्रा .शा .शिवा) यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन आशा दावळे यांनी केले तर आभार विजय बरडे यांनी मानले.

धामना येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गुरुपौर्णिमा व तंबाखू मुक्त दिन संपन्न

धामना येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गुरुपौर्णिमा व तंबाखू मुक्त दिन संपन्न

 बाजारगाव/गजेंद्र डोंगरे
धामना (लिंगा) येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात दि.२७ जूलै ला दुपारी दोन वाजता गुरूपौर्णिमा व तंबाखू मुक्त दिन संपन्न झाला.
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक निळकंठ बोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत करून "गुरूची क्रुतज्ञता" व्यक्त केली. यावेळी वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गुरूची महत्ता पटवून दिली. यावेळी शिष्य एकलव्य व गुरु द्रोणाचार्य यांच्या नाथ्याची माहिती विषद केली व शिष्य व गुरुचे पवित्र नाते असते हे कथन केले.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त राहण्याची शपथ दिली व तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या हाणीची माहिती दिली यात तंबाखू पासून कँसर सारखे आजार होतात व अती सेवनाने तोंडाचा आजार होतात हे पटवून दिले.
ह्यावेळी मंचावर सहा. शिक्षक श्री. दयाराम राऊत, राजेंद्र दुधबडे, उमेश कट्यारमल, लेखनदास किटूकले, सुरेंद्र वानखेडे, हे होते.ह्यावेळी शालेय उपक्रम प्रमुख श्री. विजय खडतकर व दिलीप लाखे यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खांडेकर, देवराव वासेकर, आकाश देपट,विनोद क्षिरसागर यांनी अथक प्रयत्न केले.



Tuesday, July 24, 2018

आयुध निर्माणी मजदूर संघाचा नवीन पेन्शन योजनेला विरोध

आयुध निर्माणी मजदूर संघाचा नवीन पेन्शन योजनेला विरोध


बाजारगाव /गजेंद्र डोंगरे:
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ संलग्नीत डिफेन्स येथील आयुध निर्माणी मजदूर संघ अंबाझरी द्वारा सोमवार २३ जूलै रोजी भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ऑर्डन्स फॅक्टरी गेट नंबर तीन समोर विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . या कार्यक्रमानतंर सांयकाळी ५ वाजता आयुध निर्माणी मजदूर संघाचे अध्यक्ष बंडू तिडके, महामंत्री ओ.पी.उपाध्याय ,संघटन मंत्री मुकुंद रंगदळे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य आर.पी .चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात रॅली काढुन आंदोलन करण्यात आले . 
आयुध निर्माणी मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संगीतले की , नवीन पेन्शन योजना ही नवीन कर्मचाऱ्यांसाठी घातक असुन सरकारद्वारा कर्मचाऱ्यांप्रती अपमानजनक बाब आहे .५ वर्षानंतर निवडून आलेल्या खासदार व आमदारांना जुनी पेन्शन योजना लागु आहे .परंतु ३० ते ३५ वर्ष देशाचे संरक्षण करून निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून दूर ठेवण्यात येत आहे .भारतीय संविधानानुसार सर्वांना समानतेचा जगण्याचा अधिकार दिलेला आहे तरी सुद्धा आयुध निर्माणी कर्मचारी , अधिकारी वर्ग ,खासदार व आमदार यांच्या पेन्शन व्यवस्थेमध्ये अंतर का ? असा प्रश्न आवासून उभा आहे .भारतीय मजदूर संघ, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ तसेच आयुध निर्माणी मजदूर संघ २००४ पासून नवीन पेन्शन योजनेचा विरोध करीत आहे. भारतीय मजदूर संघ ,भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ व आयुध निर्माणी मजदुर संघ नवीन पेन्शन योजनाला रद्द करार देऊन जुनी पेन्शन योजने करीता नेहमी संघर्ष करीत राहील. या आंदोलनात एम.एम. व्यास, विनय इंगळे ,अनिल धुर्वे ,ब्रिजेश सिंग, संजय वानखेडे ,दिलीप चिन्नोरे, सचिन डाबरे ,अतुल चौरे ,हर्षल ठोंबरे ,सचिन थोराने ,महेश चरडे, सूर्यकांत चौधरी आदी सह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Sunday, March 04, 2018

सातनवरी येथील इंडस पेपर मिलला भीषण आग

सातनवरी येथील इंडस पेपर मिलला भीषण आग

  •  मध्य भारतातील सर्वात मोठी टिशू पेपर ची कम्पनी..!
  • १२०० टन ...! माल...! प्रती टन अंदाजे रुपये ३५०००/- किमतीचा बरोबर
  • अंदाजे १२०० टन स्क्रॅप सह महत्वाचे माल मत्ता जळून खाक !

गजेंद्र डोंगरे प्रतिनीधी- दि.४/मार्च

बाजारगाव:- येथुन जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गा लगत कळमेश्वर थाना अंतर्गत सातनवरी(खैरी) शिवारातील इंडस पेपर मिल ला अचानक आग लागली. कम्पनी परिसरात असलेला कच्चा माल (टिशू पेपर) चा जवळपास 1200 टन माल (रोल बंडल) जळून खाक झाला.
सविस्तर वृत्त असे की मध्य भारतातील सर्वात मोठी टिशू पेपर बनविणारी इंडस पेपर मिल चा कच्चा माल हा कम्पनी परिसरात असतो व त्याला लागून खैरी गावाला जाणारा रस्ता आहे या रस्त्याला लागून कडू निबाच्या झाडापाशी जो टिशू पेपर चा कच्चा माल ठेवला होता त्या माला ला दि.४/मार्च दुपारी २.०० वाजताच्या सुमारास आग लागली. अगोदर कोणाच्याच लक्षात न आल्याने व हवेचा जोर असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करून परिसरात ठेवलेला जवळपास १२०० टन माल जळून खाक झाला घटनेची माहिती कंपनी मँनेजर विजय शर्मा यांना मिळताच त्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठानेदार चंद्रशेखर बहादूरे व अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. लगेच कळमेश्वर पोलीस हे नगरपरिषद ची अग्निशमन गाडी घेऊन घटना स्थळी पोहचले व त्या नंतर हिंगणा एम आई डी सी,नागपूर महानगरपालिका येथील अग्निशमन दल दाखल झाले व आग विझवण्याचे प्रयत्न करू लागले जवळपास तीन तास उलटूनही आग आटोक्या आली नव्हती. घटनेचा तपास ठानेदार चंद्रशेखर बहादूरे यांच्या नेतृत्वात पिएसआय शुभांगी ढगे,पिएसआय कामडी सह अन्य पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

Saturday, March 03, 2018

कारची दुचाकीला जबर धडक...!

कारची दुचाकीला जबर धडक...!

अपघातात वडील मृत ... तर मुलगा गंभीर जखमी..!

गोंडखैरी परिसरातील घटना

-----------------------------------------

गजेंद्र डोंगरे
बाजारगाव-प्रतिनीधी-(दि.२/मार्च) 

  महामार्ग क्रमांक सहा वर गोंडखैरी परिसरात टोलनाका चांदविम कंपनी जवळच काल दि.२/मार्च सायंकाळी साडेपाच दरम्यान धूळवडीच्या दिवशी कार व दुचाकीची जबर धडक होऊन त्यात बाईकवर स्वार असलेल्या एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.   

        याबाबत सविस्तर वृत्त असे की गोंडखैरी निवासी घनश्याम केशव शिंदे वय ५२ वर्षे हे आपला  मुलगा अवि घनशाम शिंदे वय २० वर्षे यांचेसह त्यांचे डिस्कव्हर दुचाकी क्रमांक एमएच-४०-एजे-५८२१ घेऊन व्याहाड(पेठ) येथे रंग खेळायला त्यांचे नातेवाईक राजेश बाबूराव काळे यांच्याकडे गेले होते.तिथून रंग खेळून वापस परत येताना गोंडखैरी येथील टोलनाक्याजवळच्या चांदविम कंपनी लगत त्याच दिशेने मागून येणाऱ्या एमएच-३१-ईयू-०४५८ क्रमांकाच्या भरधाव आयटेन कारने त्यांना मागून धडक दिली.  ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे दोन्ही मोटरसायकलस्वार वर हवेत उडून जमीनीवर आपटले व पन्नास फूट फरफटत गेले.घटनास्थळी कारचा टायर फुटला त्यात वडील घनश्याम शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व मुलगा गंभीर जखमी झाला.

       अपघात घडल्यावर कारचा टायर फुटूनही कार चालकाने कार वळवून परत भरधाव वेगाने पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शिंनी कारचा नंबर घेऊन पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालक कार व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील परिसरातील शेतात लपवून पसार होण्यात यशस्वी झाला.

      व्याहाड(पेठ) परिसरातील लोकांनी पंचर कार टायरडिक्सवर टायर मध्यून आग(विस्तव) निघत असताना पाहून भरधाव कारला चालवित असतांना स्थानिक ग्रामस्थांना संशय आला.व परिसरात काही अपघात झाला असावा असा जोर धरु लागला.तात्काळ परिसरात अपघाताची माहीती पसरतात तोपर्यंत कारचालक कार शेतात ठेऊन पसार होण्यास यशस्वी झाला.

     जखमी मुलगा अवि शिंदे ह्यास वाडी येथील वेल-ट्रीट या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.घटनेची माहीती मिळताच कळमेश्वर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतकास उत्तरीय तपासणी करीता कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात    नेण्यात आले.कळमेश्वरचे ठानेदार चंद्रशेखर बहादूरे यांचे नेतृत्वात पिएसआय शुभांगी ढगे,पिएसआय चंदा दंडवते,काँन्स्टेबल काकडे,सोमकुवर,शेरे त्यांच्या सहकाऱ्यांसह पुढील तपास करीत आहे.

Friday, February 23, 2018

आयसर ट्रक व दुचाकी धडक

आयसर ट्रक व दुचाकी धडक

  • दुचाकी चालक गंभीर जखमी
  • सातनवरी शिवारातील घटना


बाजारगाव
गजेंद्र डोंगरे(प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील सातनवरी बस स्टॉप वर्ती आज सायंकाळी 7 च्या दरम्यान गावात जाण्यासाठी वळण घेत असलेल्या सीडी 100 दुचाकी क्र MH31-J1752 ला अमरावती वरून येणाऱ्या आयसर ट्रक MH40-7605 ने जबर धडक दिली यात दुचाकीस्वार दिलीप वाघमारे रा.भिलापार(३२) हा गंभीर जखमी झाला असून याला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दिलीप वाघमारे रा.भिलापार(३२) हा सातनवरी येथे कैलास खरे रा.सातनवरी यांच्याकडे पाहुनपणा आले होते गेल्या 2 दिवसापासून हा सातनवरी येथे राहत होता

Sunday, February 18, 2018

बाजारगाव येथे भव्य निशुल्क रोग निदान शिबिर आयोजित

बाजारगाव येथे भव्य निशुल्क रोग निदान शिबिर आयोजित

ग्रामपंचायत बाजारगाव,सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड व रोटरी क्लब नागपूर ईशान्य याच्या संयुक्त विद्यमाने
बाजारगाव
गजेंद्र डोंगरे (प्रतिनिधी)
आज दि 18 फेब्रुवारी ला सकाळी 8 पासून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भव्य आरोग्य शिबिर सकाळी 8 वाजता पासून सुरू असून 1 वातजता पर्यंत  सुरु राहील
या मध्ये सामान्य रोग,अस्थि रोग,बाल रोग,महिला रोग,हृदय रोग,दातांचे रोग,कर्क रोग,डोळे तपासणी, प्याथेलॉजी ,ई. सी.जी.,योगासन,स्वछ हात,रक्तदान,फिजिओथेरपी तसेच सर्व प्रकारच्या रोगाचे निदान लावण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी नागपूर येथील विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स,मातृसेवा संघ,विवेकानंद मेडिकल मिशन,जीवन ज्योती ब्लड ब्यांक ,प्रिजम आय क्लिनिक, समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम),आशा नर्सिंग होम,स्वर्गीय बापूसाहेब स्मृती डेंटल कॉलेज याचा सहभाग असून
या कार्यक्रमासाठी सोलार इंडस्ट्रीज चे संचालक सत्यनारायण नोवाल, मनीष नोवाल,सोमेश्वर मुंधडा(सिनियर जनरल म्यानेजर,सोलार) एम.के.सिंग(जनरल म्यानेजर, सोलर) पी. एन. सिन्हा (जनरल म्यानेजर,इकॉनॉमिक्स कंपनी)
त्याच प्रकारे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नाना गावडे,बाजारगाव सरपंच मायताई शेलार, उपसरपंच मंगेश भड ,बाजारगाव येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद शाळेच्य मुख्याध्यापिका शोभा सीडाम, किशोर वानखेडे,ध्यानेश्वर आपतुरकर,तसेच सर्व शिक्षक व परिसरातील नागरिक याचा मोठया प्रमाणात सहभाग

Friday, February 16, 2018

भीषण अपघातात पाच विद्यार्थी ठार

भीषण अपघातात पाच विद्यार्थी ठार


कार ने उभ्या कंटिनेर ला जब्बर  धडक...!

अपघात घटनेत पाच मृत...! तिन जखमी...!

अपघात दि.१६/फेब्रुवारी दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यान घडली...!

 बाजारगाव
गजेंद्र डोंगरे (प्रतिनिधी)

(दि.१६/फेब्रुवारी 
वडधामन्यात उभ्या कंटनेरला कारची धडक झाल्याने 5 जागीच ठार तर एक उपचार दरम्यान वाडीतील वेलट्रीट रुग्णालयात मृत झाले., दोन  गंभीर जखमी. फेब्रुवारीला दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यान मित्राचा वाढदिवस साजरा करून परतीच्या प्रवासाला असताना काळाने घात केल्यामुळे पाच मित्रांना आपला जीव गमवावा लागला.
     पोलीस सुत्राच्या माहितीनुसार हिस्लॉप महाविद्यालयाचे विद्यार्थी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मारुती सुझुकी आर्टिगा एम एच 40 ए सी 9209 ने आठ मित्र-मैत्रिणी एकत्र प्रवास करीत असताना अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्गाने नागपूर कडे भरधाव वेगाने नागपूर कडे
येत असताना ता 16 फेब्रुवारी दुपारी 3.15 चे दरम्यान वढधामना तकिया स्थित शहंशाह हॉटल जवळ व नागपूर गुडस ट्रान्सपोर्ट समोर उभा बी एच आर लॉजस्टिक प्रा ली बॉम्बे हरियाणा रोड लाईनचा  कंटेनर क्र एम एच 43 वाय 7936 ला कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार मधील चालक विशाल रतवानी वय 22 रामनगर नागपूर, निशा निकम वय 21 अंबाझरी नागपूर,सत्यासिंग वय 20,दिव्या पाकू वय 19 जरीपटका नागपूर, धीरज पठाळे वय 20 टेकडी वाडी हे अपघातात मृत पावले असून शहबाज जफर अली वय 22 जाफर नगर,युव्हाना परवीन खान वय 22
मानसी वसतिगृह हे दोघेही गंभीर असून खाजगी रुग्णालय मेडिट्रीना येथे उपचार घेत आहे तर मैत्रीय आवळे वय 21 झिंगाबाई टाकळी याच्यावर वाडीतील वेल्ट्रीट हॉस्पिटल मध्ये उपचार सुरूआहे . हे सर्व हिस्लॉप महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. वाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Friday, February 09, 2018

ट्रकची बसला धडक...!

ट्रकची बसला धडक...!

कोणतीही जिवीतहानी नाही..! किरकोळ जखमी 

जखमीस प्रा.आ.केंद्र कोंढाळी येथे रवाना..!

वाहचालकांच्या सतर्कतेने वाचले ४५ प्रवाशी...!

बाजारगाव-प्रतिनिधी-(दि.९/फेब्रुवारी) सायंकाळ ६.०० वाजताची घटना ट्रकनी बसला धडक देऊन ट्रकचालक ट्रकसह पसार झाला.
    घटनेचे सविस्तर वृत्त असे की नागपुर बसस्थानका वरुन आर्वी डेपोची बस क्रंमाक एमएच-४०-एन-९३१६ ही ४५ प्रवाशी घेऊन आर्वीला जात असता नागपुर-अमरावती महामार्गावर पांजरा फाटा बाजारगाव येथे ट्रकनी ओव्हरटेकच्या नांदात बस ला  धडक देऊन ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला. या धडकेत बस डिवायडरवर गेली असता बस   वाहचालकांचे संतूलन बिगडल्यानी तरी पण वाहनचालक गणेश हरीभाऊ गुल्हाने वय ५४ वर्षे राहणार आर्वी यांच्या सतर्कतेने ४५ प्रवाशांचे जिव वाचविले.
   घटनेची माहीती कोंढाळी पोलीसांना दिली असता ताबडतोब घटनास्थळी हजर होऊन पुढील तपास करीत आहे.

Monday, February 05, 2018

"ब्राईटस्टार" म्हणजे "तेजोमय"....! तारा निर्माण करणे...!

"ब्राईटस्टार" म्हणजे "तेजोमय"....! तारा निर्माण करणे...!

गोंडखैरी येथे ब्राईटस्टार काँन्व्हेंटमध्ये वार्षिक स्नेहमिलन

 प्रा.दिलीप चरपे...!
----------------------------------------------------------- 


     बाजारगाव-प्रतिनिधी-(दि.५/फेब्रुवारी) गोंडखैरी स्थानीक अग्रगण्य संस्था ब्राईटस्टार काँन्व्हेंटमध्ये(२/फेब्रुवारी ते ६/फेब्रुवारी) विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसम्मेलन व क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
        या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,सरस्वती, शारदादेवीच्या फोटोला माल्यार्पण करुण स्नेहमिलनाचा कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. स्नेहसम्मेलनांचे प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष विज्ञान महाविद्याल नरखेडचे माजी प्राचार्य प्रा.दिलीप चरपे  यांचे हस्ते उदघाटन संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कळमेश्वर पंचायत समितीचे सदस्य अजय वाटकर,प्राचार्य प्रा.दिपक चरडे,संस्थापक संदिप बोन्द्रे उपस्थित होते.
      या पाच दिवशीय सांस्कृतिक महोत्सवात ब्राईटस्टार काँन्व्हेंटच्या लहानग्यां विद्यार्थांनी उत्कृष्ट सांघिक व एकल नृत्य  सामूहिक नृत्य असे एकापेक्षा एक बहारदार व दिलखेचक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.एकुन बाविस नृत्यांचा सदाबहार कार्यक्रम रंगला असून  श्रोत्यांची मने जिंकली.या निमित्ताने विद्यार्थांच्या पालकांसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.समुपदेशनासाठी आलेल्या पालकांना मानव विकास क्षेत्रातील तज्ञ डाँ.सुरेंद्र गोळे यांनी व्यक्तीशः मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा गोंडाणे यांनी केले तर प्रास्तविक संदिप बोन्द्रे यांनी केले.तसेच आभारप्रदर्शन प्राचार्य रश्मी बोन्द्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसन जाधव,संजय बोंबले,स्नेहा वांढरे,आरती उइके,शितल काकडे,एकता झाडे,मोनाली चिचखेडे,शितल अत्करी,निर्मला अत्करी यांनी अथक परिश्रम केले.

Tuesday, November 21, 2017

४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला लावला गळफास

४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला लावला गळफास

 गजेंद्र डोंगरे
बाजारगाव:- मोहन अजाबराव धारपुरे (वय 30 वर्ष राहणार गोंदिया जि. आमगाव) येथील रहिवासी असून, त्याने घरगुती कलहातून ४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला गळफास लावल्याचे  निष्पन्न झाले. गणेश नगर वार्ड क्रमांक 1 डांबर प्लांटच्या मागील परिसरात 440 हाईटेंशन पावर लाइन आहे.