काव्यशिल्प Digital Media: कानशिलात

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कानशिलात. Show all posts
Showing posts with label कानशिलात. Show all posts

Monday, February 12, 2018

आमदार बाळू धानोरकरांनी व्यवस्थापकाच्या हानली कानशिलात

आमदार बाळू धानोरकरांनी व्यवस्थापकाच्या हानली कानशिलात

चंद्रपूर:(ललित लांजेवार)
चंद्रपुरमध्ये वीज मनो-यांच्या उभारणी करणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाला  शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलीच कानशीलात हानली आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेतकऱ्यांच्या शेतात  मनोरे उभारणीचे काम सुरु आहे. मात्र याला शेतकऱ्यांना त्याचा विरोध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली. मात्र याआंदोलन कर्त्यांचे कोणी ऐकत नसल्याने शेतकऱ्यांनी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांना तक्रार केली.शेतकऱ्यांना दिलासा देत स्वता बाळू धानोरकराणी आक्रमक पवित्रा घेत मनमानी करणाऱ्या या कंपनीच्या  व्यवस्थापकाच्या  कानशीलात हाणली. 

राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे शिवसेने कडून हा प्रकार घडला . राजुरा येथे छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यातून येणा-या विजेच्या लाइनसाठी टॉवर उभारणीचं काम सध्या राजुरा येथे सुरु आहे. मात्र हे काम करण्यासाठी हजारो हेक्टर उभ्या शेतजमिनीतून पीक तुडवत मनोरे उभे करत आहे . शेतक-यांचा विरोध असतानाही कंपन्या दहशतीनं काम करत असल्यानं अखेर आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेना स्टाइलने हिंगा दाखवला आहे.बाळू धानोरकरांच्या या कारनाम्यामुळे धानोरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.