काव्यशिल्प Digital Media: चंद्रपूर शहर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चंद्रपूर शहर. Show all posts
Showing posts with label चंद्रपूर शहर. Show all posts

Thursday, January 11, 2018

इरई धरणातील पाणी शहरास आरक्षित करण्याची इको-प्रो ची मागणी

इरई धरणातील पाणी शहरास आरक्षित करण्याची इको-प्रो ची मागणी

200.500 मीटर धरणाची लेवल च्या वर विजनिर्मीती करीता पाण्याची उचल करू नये 

जिल्हाधिकारी यांना निवेदन - पाणी बचत करिता नागरीकांना इको-प्रो चे आवाहन

चंद्रपूरः यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विशेष करून इरई धरणात पाणी साठा फारच कमी आहे. यामुळे इरई धरणावर निर्भर असणाऱ्या चंद्रपूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. उन्हाळयात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई समस्या पासुन चंद्रपूर शहराला पाण्याचा समस्येपासुन वाचविण्याकरीता इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहराकरीता आरक्षीत करण्याच्या मागणीचे निवेदन इको-प्रो संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना (2 जाने रोजी) देण्यात आले आहे.

इरई धरणाच्या पाण्याच्या वापर विज निर्मीतीकरीता आणी शहरास पिण्यासाठी होत असल्याने आणी यंदा धरणात पाणी साठा अत्यल्प असल्याने ते वेळीच नियंत्रीत करण्यात न आल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे सध्या स्थितीत धरणात 203.175 मीटर पातळीपर्यत म्हणजेच 34 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्र व्यवस्थापन धरणातील पाण्याची पातळी 198.000 मीटर पर्यत विजनिर्मीती करीता पाण्याची उचल करणार असल्याचे कळते. 198.000 मीटर पातळी पर्यत धरणात जवळपास 7 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असेल.

धरणाच्या 198.000 मीटर पातळी नुसार धरणातील पाणी साठा अत्यल्प असुन इरई धरणाचा मृत साठा असेल. त्याचवेळेस इकडे भर उन्हाळयात शहरातील नागरीकांची पाण्याची समस्या अधिक तिव्र होणार आहे. कारण, यंदाचा अत्यल्प पावसामुळे भुजल पातळी सुध्दा वाढलेली नाही त्यामुळे शहरातील बोअर आणी विहरीची भुजल पातळी खालावलेली आहे. आज वर्तमान परीस्थीतीत चंद्रपूर शहराला 1 दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. तसेच विजनिर्मीती करीता 7 दशलक्ष घनमीटर पाणी असे दर महीन्याला 8 दशलक्ष घनमीटर पाणी उचल होत आहे. अशा परीस्थीतीत आजच्या धरणातील पाणी पातळीनुसार पुर्ण विज प्रकल्प येत्या 2-3 महीन्यात बंदच करावा लागेल. हीच परिस्थीती जवळपास 2010 मध्ये निर्माण झाली होती. पंरतु, चंद्रपूरकरांना पिण्याचे पाणी मिळावे याकरीता इको-प्रो संस्थेने घागर पदयात्रा, धरणे आंदोलन आणी चंद्रपूर बंद यासारखे आंदोलन केलेली होती. 

किमान यावेळेस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन येत्या काही महीन्यात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची संकटकालीन परीस्थीती असल्याने याचे पुर्व नियोजन होणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी 2010 मध्ये निर्माण झालेली समस्या आणी प्रशासनाला आलेला अनुभव यावरून त्वरीत निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. आणी 198.000 मीटर पातळीवर पाणी उचल बंद करण्यासंदर्भात खालील प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनातुन स्पष्ट करण्यात आलेले आहे.

1. 198.000 मीटर पातळीवरील मृत साठा खरंच 7 दशलक्ष घनमीटर पाणी असेल काय ? आणी असेल तर त्यात गाळ किती आणी पाणी किती असेल ? 

2. कारण धरणाच्या निर्मीतीपासुन (30 वर्षा पेक्षा अधिक काळ) अदयापही हा गाळ काढण्यात आलेला नाही. या पातळीला धरणात पाण्यापेक्षा अधीक गाळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3. यावेळी धरणात पिण्यायोग्य पाणी किती असेल आणी किती पाण्याची उचल करणे शक्य असेल. 2010 मधील अनुभव नुसार गाळ स्वरूपातील पाणी उचलणे मोठे जिकरीचे कार्य आहे. 

4. तसेच उन्हाळा सुरू होत असल्याने या महीन्यापासुनच पाण्याचे जमीनीत झीरपण्याचे (पाझर) आणी बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सुध्दा सतत वाढत जाणार आहे.

5. यंदा पावसाळा लांबला तर अजुनच शहरात पाणी समस्या अधीक तिव्र होईल. 

6. यावर उपाय म्हणुन धरणातील पाण्याची पातळी 200.500 मीटर वर विजनिर्मीती करीता पाण्याची उचल बंद करावी.

7. विजेपेक्षाही पिण्याचे पाणी महत्वाचे असुन जवळपास 4 लाख पेक्षा अधिक चंद्रपूरकर यावर निर्भर आहेत.

8. 2010 मध्ये पाण्याची समस्या बघता चंद्रपूरकरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय व्हावी म्हणुन चारगांव धरणातुन पाणी इरई धरणात सोडण्यात आले होते परंतु यंदा चारगांव धरणात सुध्दा पाणी साठा कमी आहे. 

या सर्व बाबीचा विचार करता जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे रितसर पत्रव्यवहार करून समस्या लक्षात आणुन दयावी, तसेच विज निर्मीती करीता पाण्याची उचल ही 200.500 मीटर पातळीवरच बंद करावी अशी मागणी इको-प्रो च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली आहे.

 

विज प्रकल्पाची महीन्याकाठी गरज आणी शहराची गरज यात प्रचंड तफावत आहे, चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्राने विज प्रकल्प बंद करण्यापुर्वी महानगरपालीकेने शहराच्या पाणीपुरवठा मध्ये कपात करू नये अशी मागणी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले आहे. तसेच उन्हयाळयातील पाण्यासंदर्भातील संकटकालीन परिस्थीती बघता चंद्रपूर शहरातील नागरीकांनी सुध्दा पाण्याचा अत्यल्प वापर करीत पाणी बचत करण्याचे आवाहन केलेले आहे.

Wednesday, January 03, 2018

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ashutosh salil साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 भिमा कोरेगाव येथील सोमवारच्या घटनेनंतर जिल्हयात कुठेही अनुचित घटना घडू नये , यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे .
       जिल्हयात या घटनेनंतर पोलीसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे .जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये . आवश्यक तेथे पोलीस प्रशासनाला मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे . काही संघटनांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे .आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने शासनापर्यत पोहचवण्यास शासन तत्पर आहे . त्यामुळे बंद काळात सार्वजनिक वाहन व्यवस्था व मालमत्तेचे नुकसान होणार नाही , याबाबत काळजी घ्यावी , सहकार्य करावे , असे आवाहनही त्यांनी केले आहे .
अफवा पसरविणाऱ्यांवर  सायबर सेलची नजर  सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून समाजजीवन बिघडवणाऱ्या समाजकंटाकांवर जिल्हयातील सायबर सेलचे लक्ष असून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .व्हाटस अॅप ग्रुपवरून चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले गेले असून जनतेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत करण्याचे आवाहन केले आहे .
भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड

भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड


 चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपुरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असतांनाच काही आंदोलनकर्त्यांनी चंद्रपूरचे भाजपचे आमदार नाना शामकुळे यांच्या गंजवॉर्ड स्थित कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असल्याची ताजी बातमी हाती येत आहे .जवळपास ४० त्यांच्या कार्यालयाकडे आले यात २० महिला व २० युवकांचा समावेश होता. काल भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.या आंदोलनाने चंद्रपुरात हिंसक वळण घेत येथील आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.यात तेथे राहणाऱ्या शहरातील प्रसिद्ध व्यापारी सारडा यांच्या गाडीच्या काचा  देखील फोडण्यात आल्या. तोडफोड सुरु असतांना मात्र आमदार नाना शामकुळे आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते , (सविस्तर वृत्त काही वेळातच )


Sunday, December 31, 2017

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर


पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव साजरा
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 31/12/2017 गावाचा ख-या अर्थाने विकास करायचा असेल तर, गावातील लहान मुल उद्याचे भावी नागरिक होणार आहे. यांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावांचा सर्वांगाने विकास करता येतो . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे,कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते ,सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे बोलतांना म्हणाले की, मुलांचा विकास करावयाचा असेल तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्या साठी तरुणांनी वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसना पासुन दुर राहिले पाहिजे. उल्वल जीवन घडविण्यासाठी  लहान पणा पासुनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे. पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता ,गुडमार्निंग पथक सह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे मनापासुन कौतुक करतो .असे मत व्यक्त केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्या करीता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे सर्व गावांनी ठरविले तेव्हाच घडुन येते. अशाप्रकारचा आदर्श पिपर्डा ग्रामस्थांनी दाखवुन दिला आहे. गावाची ताकद सर्वात मोठी असुन, गावक-यांनी एकत्र येवुन केलेला प्रत्येक संकल्प हा पुर्णत्वास जातो असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी एकत्र येवुन गावाला आदर्शवत करणारे सर्व ग्रामस्थ गावविकासाची प्रमुख भुमिका पार पाडत असुन, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नायब तहसिलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे  माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सोयल अली, रमेश पाटिल मालेकर तथा गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमात गावात शाश्वत स्वच्छता राखणारे जेष्ठ नागरिकांचा व गुडमोर्णिंग पथक उपक्रम राबविणा-या तरुणांचा भव्य  सत्कार करण्यात आला. शादीखाना सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पिपर्डा गावचे सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी केले.

Saturday, December 30, 2017

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार. 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक श्री अमोल कोंडबत्तूनवार यांचे चंद्रपूर नागभीड-नागपूर मार्गावरील भुयार येथे अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले.सावली मार्गे आपल्या तीन मित्रांसोबत अमोल चारचाकी गाडीने जात होते मात्र भुयार येथे रस्त्यावर एक बर्फाची लादी पडली होती. या लादीला  कट मारून जाण्याच्या गडबडीत समोरूनयेणाऱ्या ट्रक ला जोरदार धडक बसली. यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. 

भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .
आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Tuesday, December 26, 2017

जनता महाविद्यालयाचे विशेष  रासेयो शिबीर कोठारी येथे

जनता महाविद्यालयाचे विशेष रासेयो शिबीर कोठारी येथे

कोठारीः येथील जनता विद्यालय तथा कनिश्ठ महाविद्यालयात गोंडवाना विघापीठ गडचिरोली अंतर्गत जनता महाविद्यालय चंद्रपूर द्वारा आयोजीत राश्ट्रीय सेवा योजना पथकाचे विषेश षिबीराचे उद्घाटन जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एम सुभाश यांच्या हस्ते झाले. हे विषेश षिबीर ‘ स्वच्छ गांव,स्वच्छ भारत आणी सुदृढ आरोग्य ’  या मुख्य कल्पणेवर आयोजीत करण्यात आले आहे. या सात दिवषीय षिबीरात षिबीरार्थी विद्याथ्र्यांच्या वतिने गावस्वच्छता, स्वच्छतेबाबत गावात जनजागरण केले जाणार आहे. कोठारी परिसरात मानव वाघ संघर्श मोठया प्रमाणात असल्याने हे कसे थांबवता येईल यासाठी चंद्रपूरातील पर्यावरणीय कार्यकर्ते, जिल्हा वन्यजिव संरक्षक बंडू धोत्रे, विभागीय वनअधिकारी गजेंद्र हिरे, डाॅ. योगेष दुधपचारे यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले गेले आहे. भुमिगत पाणी वर उंचावन्यासाठी व विविध उपाययोजना म्हणून गाववासीयांना चंद्रपूर येथील जलबीरादरी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वैघ यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. दररोज मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी,  सुद्धा गांववासीयांना मिळणार आहे. 

उद्घाटनीय कार्यक्रमाची सुरवात चांदा षिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्री श्रीहरी जिवतोडे गुरूजी तथा श्रीमती लिलाताई जिवतोडे यांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन आणी माल्यार्पनाणे झाली, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जनता कनिश्ठ महिविद्यालय कोठारीचे प्राचार्य डाॅ. विजय मसराम पंचायत समीती सदस्य मा. मोरेष्वर पद्मगीरवार, सौ. स्नेहल टिंबडीया, उपसरपंच ग्रामपंचायत कोठारी, श्रीमती सायत्रा मोहूर्ले, डाॅ. योगेष दुधपचारे, डाॅ. सुनिल नरांजे, डाॅ. ज्योती पायघन, कु. संजना साखरकर, कु. प्रांजली पिसे, योगेष पाचभाई, कुनाल जोरगेवार उपस्त्थित होते. प्रास्ताविकीय मनोगत कार्यक्रम राश्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डाॅ. मिलींद जांभुळकर यांनी तर सुत्रसंचालन कु. कल्यानी पवार आणी अंबादास तिरानकर यांनी तर आभार प्रदर्षन प्रा. अमर बलकी यांनी केले. या प्रसंगी जनता विद्यालय तथा कनिश्ठ महाविद्यालय कोठारी येथील कर्मचारी वृंद आणी बहुसंख्य विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


Monday, December 25, 2017

'त्या' डॉक्टरांना गोळ्या घालू

'त्या' डॉक्टरांना गोळ्या घालू

 हंसराज अहिर यांची जीभ घसरली



चंद्रपूर: ज्यांना लोकशाही नको. त्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू ’ असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटनप्रसंगी केले.

 




भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरच्या उद्घाटनाला सुट्टया असल्यामुळे अनेक डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारली. हॉस्पीटलमधील अनेक डॉक्टर हे ख्रिसमसच्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आल्यावर हंसराज अहिर चांगलेच संतापले.   उद्घाटन सोहळ्यानंतर  अहिर यांनी दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त करताना त्यांची जीभ घसरली आणि नवा वाद निर्माण केला. ‘मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात?, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू’, असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं.

Saturday, December 23, 2017

२८ डिसेंबरला मुक्तेश्वरी गुरूपीठ येथे सोळाष्टी विधी

२८ डिसेंबरला मुक्तेश्वरी गुरूपीठ येथे सोळाष्टी विधी

  •  सुपूत्र प.पु सदगुरू श्री. दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा
 चंद्रपूर /(प्रतिनिधी):
वर्धा येथील मुक्तेश्वरी गुरूपीठ येथे दि. २८ डिसेंबर २०१७ षोडस (सोळाष्टी) विधी करून प.पु. सदगुरू प्रियानंद महाराज यांचे सुपूत्र प.पु. सदगुरू श्री. दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
शक्तीपात, ध्यान साधना व सिद्धयोगाची दिक्षा तसेच सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्ध महायोगी ,  शक्तीपाताचार्य, प. पु. सद्गुरु श्री वंसतराव गो. घोंगे उपाख्य. प.पु. सदगुरू प्रियानंद महाराज दि. १३ डिसेंबर २०१७ रोज बुधवारला ब्रम्हलीन झाले ही बातमी  कळताच केंद्रिय गृहराज्यमंत्री ना. हंसराजजी अहिर, खा. रामदासजी तडस, माजी. खास. सुरेश वाघमारे यांनी देखील घारपुरे लेआऊट येथील आश्रमामध्ये येवुन श्रद्धाजंली अर्पण केली. दि. १४ डिसेंबर २०१७ ला प्रियानंद ब्रम्हानंद श्री गुरूदेव ओम  नमो प्रियानंद‘ असा गजर करीत साधकांनी प्रियानंद महाराजांचे पार्थीव त्यांनी स्थापन केलेल्या मुक्तेश्वरी गुरूपिठ निमगांव येथे आणले. दिवसभर हजारो साधकांनी महाराजांचे दर्शन घेतले. विदर्भ तसेच पुणे, मुबई, कोल्हापुर, बिहार येथील साधक सुद्धा दर्शनासाठी आले. आजपर्यंत लाखो लोकांनी तसेच शेतकऱ्यानी दिक्षा घेतली आहे.  त्यांचे सुपूत्र प.पु. सदगुरू दादाश्री महाराज आणि त्यांचे असंख्य साधकांच्या उपस्थितीत दिनांक  १४ डिसेंबर २०१७ ला सांयकाळी ५ वा.समाधी सोहळा पार पडला.
याच पाश्र्वभुमीवर मुक्तेश्वरी गुरूपीठ निमगाव येथे दिनांक दि. २८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १२.०० वाजता षोडस (सोळाष्टी) विधी करून प.पु. सदगुरू प्रियानंद महाराज यांचे सुपूत्र प.पु\ सदगुरू श्री. दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या सर्व साधकांनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मुक्तेश्वरी गुरूपीठातर्फे करण्यात येते आहे.
निबंध स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

निबंध स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

चंद्रपूर-  मनात असलेली स्वच्छतेची कल्पना विद्यार्थ्यांना आपल्या शब्दात मांडता यावी, शहरात सुरु असलेल्या स्वच्छ चंद्रपूर मोहीमेत विद्यार्थ्यांना योगदान देता यावे यासाठी   चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील ३ केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत सुमारे ७००  विद्यार्थी  सहभागी झाले होते.  "बदलते चंद्रपूर,स्वच्छ चंद्रपूर,सुंदर चंद्रपूर" हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. स्पर्धा २ वयोगटात घेण्यात आली.वर्ग १ ते ५ - शब्द मर्यादा १५० शब्द,वर्ग ६ ते १० शब्द मर्यादा २०० शब्द. प्रत्येक शाळेतून ३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. स्पर्धेचा कालावधी १ तासाचा होता व प्रत्येक गटातून विजयी ३ स्पर्धकांना मनपातर्फे बक्षीसे,ट्रॉफी,व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा भावजीभाई चव्हाण हायस्कूल,सावित्रीबाई फुले शाळा,महानगरपालिका सभागृह येथे संपन्न झाली.               

Thursday, December 21, 2017

स्वच्छतादूतसाठी बंडू धोत्रे यांच्या नावाचा विसर

स्वच्छतादूतसाठी बंडू धोत्रे यांच्या नावाचा विसर

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 ची सुरुवात मोठ्या धडाक्यात सुरू केली. यासाठी चंद्रपुरात 3 स्वच्छता दुतांची नियुक्ती केली असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले. यात गडचिरोली  आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमेय वाघ तसेच चंद्रपूर येथील नाट्य दिग्दर्शिका डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र  इको -प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रेया कामाची दखल घेण्यात न आल्याने शहरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" मधून चंद्रपूरच्या स्वच्छता  मोहिमेचा
उल्लेख केला होता. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेला इको- प्रोचा विसर पडल्याचे दिसून आले. स्वच्छतेच्या कार्यात स्वतःला व  सवंगड्यांना झोकून काम करायला लावणाऱ्या बंडू धोत्रे यांची स्वच्छता दूत म्हणून निवड होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जिल्ह्यात 250 दिवसांहून अधिक दिवस स्वच्छतेसाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या बंडू धोत्रे च्या नावाची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे.

Monday, December 11, 2017

३०पैकी दोनच वाळू ट्रक्टरवर कारवाई

३०पैकी दोनच वाळू ट्रक्टरवर कारवाई

घुग्घुस - अवैध वाळू तस्करी करणारे ३० टॅक्टर सोडून फक्त २ ट्रॅक्टर वर कारवाई आज दुपारी दोन वाजता घुग्घुसच्या घोड़े घाट रेती घाटावार करवाई करण्यासाठी उत्खनन विभागाचे अधिकारी पेंढारकर, तलाटी पिल्लई पथका सह गेले परंत संबंधित सोडलेले ट्रॅक्टर मालक व अधिकारी यांच्या मध्ये आर्थिक व्यहार करून  बाकीचे ट्रैक्टर सोडून फक्त २ ट्रैक्टर वर थातुरमातुर करवाई करण्यत आली.
रेती घाटाजवळ  रस्तयचे काम करण्याकरिता ट्रेक्टरद्वारे मतिच्या उपसा सुरु होता।
या रास्तावरुन हायवा ट्रक व जेसीबी मशीन जाने येने करण्यासाठी नवीन रास्ता निर्माण करण्यत येत आहे.

Sunday, December 10, 2017

वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात इको-प्रोची उडी

वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात इको-प्रोची उडी

चंद्रपूर/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या आणि राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या विदर्भ राज्याच्या लढ्यात सक्रीय उडी घेण्याचा निर्णय इको- प्रोच्या कार्यकारिणीने घेतला आहे. त्यानुसार विविध संघटनांनी पुकारलेल्या 11 डिसेंबरच्या विदर्भ बंद मध्ये संस्था सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समीती व सर्व विदर्भवादी संघटनानी ‘विदर्भ बंद’ ची हाक दिलेली आहे. या ‘विदर्भ बंद’ ला चंद्रपूर जिल्हयातील इको-प्रो संस्थेचा पुर्ण पाठींबा आहे.
स्वंतत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भातील समस्या सुटणार नाही. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वंतत्र विदर्भ राज्य हेच एकमेव पर्याय असून, या बंद मध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे. तसेच सर्व व्यापारी  प्रतिष्ठाने, शाळा, महाविदयालय, तसेच खाजगी वाहतूक व्यावसायीक, युवक-युवती, विदयार्थी आदीनी शातंतामय रितीने कडकडीत बंद पाळावे. या बंद दरम्यान कोणीही सार्वजनीक शांतता भंग करणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था राखल्या जाईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.

Thursday, December 07, 2017

40  विद्यार्थ्यांनी खाल्या चंद्रज्योतीच्या बिया:अनेकांची प्रकृती गंभीर

40 विद्यार्थ्यांनी खाल्या चंद्रज्योतीच्या बिया:अनेकांची प्रकृती गंभीर

    • चंद्रपूर-  चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने चंद्रपूर येथील सुरज हिंदी प्राथमिक शाळा  लालपेठ येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. गुरुवारीवारी घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली असून, सर्व विषबाधित विद्यार्थ्यांना चंद्रपूर येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे '.
    • चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 विद्यार्थी पाझारे यांच्या खाजगी रुग्णालयात 7 विद्यार्थी तर लोढिया यांच्या खाजगी रुग्णालयात 10 विद्यार्थी उपचारासाठी भरती करण्यात आलेले आहे त्यामुळे घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे पंधरा दिवसांपूर्वी नागभीड़ तालुक्यातील कोर्धा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी 26 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. हे सर्व विद्यार्थी 10 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे.आणखी काही विद्यार्थी ईतर रुग्णालयात असल्याचे व्रुत आहे
दीड लाखांवर धान उत्पादकांना फटका

दीड लाखांवर धान उत्पादकांना फटका

चंद्रपूर : पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना फटका बसला आहे.
 जिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी येथे बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने  प्रकोप केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.

समश्यांना टाटा: ६५ गावांचा होणार विकास

समश्यांना टाटा: ६५ गावांचा होणार विकास


चंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने जिल्ह्याशी संबंधित तीन विषयांबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्टसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यातून जिल्ह्यातील ६५ गावांचा विकास होणार आहेत.
जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांमधील गाळ काढण्यासाठी टाटा सेंटर आॅफ डेव्हलपमेंट, शिकागो विद्यापीठसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून ३० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासन आणि कार्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून गावांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हयातील मूल, पोंभुर्णा, जीवती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी या तालुक्यांमधील ६५ आदर्श गावांचा विकास करण्यात येणार असून हा प्रकल्प टाटा ट्रस्टच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. या विषयांबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाटा ट्रस्टसोबत बैठकी घेऊन पाठपुरावा केला आहे.

वृद्धांसाठी विशेष प्रकल्प
वृद्धांसाठी एल्डरली हेल्थ केअर प्रोजेक्ट मूल तालुक्यात राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील काळात संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. मूल तालुक्यात पायलट प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नॅशनल हेल्थ मिशन आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून मूल तालुक्यातील २५ हजार वृध्दांना यांचा लाभ होणार आहे.

Tuesday, December 05, 2017

बनावट ATM कार्डची  टोळी जाळ्यात

बनावट ATM कार्डची टोळी जाळ्यात

 

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
मागील दोन महीन्याचे कालावधीत ATM  धारक यांचे बॅक
खात्यातील पैसे दिल्ली व गुडगांव येथुन परस्पर विड्राल करुन नागरीकांची फसवणुक होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन वरोरा, रामनगर, राजुरा या ठिकाणी एकुण 09 गुन्हयाची नोंद आहे. सदरचे गुन्हे उघडकीस आणने चंद्रपुर पोलीसांकरीता आवाहनात्मक होते. परंतू सायबर पोलीस ठाणे येथील तपास पथकाने अहोरात्र मेहनत घेवुन अत्यंत क्लिश्ट व तांत्रीक स्वरूपाचे सदरचे गुन्हे उघडकीस आणुन मुख्य आरोपीसह एकुण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपूत, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्षनाखाली सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयांचे तपासास तात्काळ सुरवात करुन तक्रारदारांच्या बॅंक खात्यांचे स्टेटमेंट पासुन वेगवेगळया मुद्दयांवर विष्लेशण केले. विष्लेशण व केलेला तपास यावरून प्रथम तपास पथकाने वरोरा येथे राहणारा  एटीएममध्ये जावुन 16 अकी नं. व पिन नं. चोरी करीत होता त्या आरोपीस  दिनांक 25/11/2017 रोजी दुपारी अंत्यत शितफीने पोस्टे वरोरा अप. क्र. 1334/2017 कलम 420 भादंवि मध्ये अटक करून न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला. जलदरीतीने तपास करीत सदर गुन्हयामधील मुख्य आरोपी तसेच गुडगांव येथील ATM  मधुन पैसे विड्राल करणारा आरोपी यांचे नांवे निश्पन्न करुन मुख्य आरोपी हा दिल्ली येथे असल्याचे विष्लशणामधुन माहीती प्राप्त केली. प्राप्त माहितीवरून तपास पथक दिनांक 29/11/17 रोजी दिल्ली येथे पोहचले. परंतू मुख्य आरोपीचा दिल्ली येथे शोध  घेतल्यानंतर आरोपी हा चंदीगढ येथे पसार झाल्याची माहीती समोर येताच तपास पथक तात्काळ दिनांक 01/12/2017 रोजी चंदीगढ येथे पोहचले. व  चंदीगढ पोलीसांची मदत घेेवुन आरोपीचा शोध घेतला तेव्हा आरोपी हा चंदीगढ येथील उद्योगपथ नगर ला लागुन असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये असल्याचे समजताच सायबर पोलीस ठाणे येथील पथकाने मुख्य आरोपीस त्या हॉटेल मधुन ताब्यात घेवुन अटक कार्यवाही पुर्ण केली व मुख्य आरोपीकडुन मिळालेली माहीती व तांत्रीक विश्लेषण  यावरून गुडगांव येथील  ATM मधुन पैसे विड्राल करणाऱ्या  दुसऱ्या  आरोपीस दिनांक 02/12/2017 रोजी दिल्लीचे रेल्वे स्टेशन जवळ सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीना चंद्रपूर येथे आणुन दिनांक 03/12/2017 रोजी न्यायलयासमोर हजर केले असता आरोपींचा 10 दिवस पिसीआर मिळाला आहे. यातील मुख्य आरोपी हा मलकानगिरी, राज्य ओडिसा येथील व दुसरा आरोपी हा नोनी, गया, बिहार येथील आहे.
  अटक केलेले आरोपी यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांची गुन्हा करण्याची पध्दत अशी  आहे की, यातील मुख्य आरोपीने त्याचे साथिदारांना ATM कार्डवरील 16 अंकी नं. व पिन नं. कसे घ्यावे याचे प्रशिक्षण  देवुन त्यांना अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, नांदेड, औरंगाबाद, वाशीम  ईत्यादी वेगवेगळया ठिकाणी पाठविले. या ठिकाणी गेलेल्या आरोपींनी ATM मध्ये जावुन येथील ATM  धारक पैसे काढत असताना येथील ATM  वरील 16 अंकी नं. व पिन नं. यांची SHOULDER  READING  द्वारे चोरी करुन मुख्य आरोपीस फोनद्वारे देत होते. त्यावरून मुख्य आरोपी हा 16 अंकी नं. चा उपयोग करून गुडगांव व दिल्ली  येथील ATM मधुन लाखो रुपये काढुन नागरीकांची फसवणुक करीत होता. चंदीगढ व दिल्ली येथुन अटक केलेल्या आरोपींकडुन काही बनावट ATM  कार्ड, मोबाईल हॅन्डसेट, तसेच काही ATM वरील 16 अंकी नं. व पिन नं. नोंद असलेले नोटबुक  असा मुददेमाल जप्त केला असुन त्याबाबत तपास सुरू आहे. चंद्रपुर पोलीसांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणुन केलेल्या या कार्यवाही मुळे गुन्हा करण्याच्या या पद्धतीमुळे भविश्यात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणुक यावर नक्कीच प्रतिबंध होईल.  नागरीकांना असे आवाहन आहे की,  मध्ये पैसे काढतांना आपल्या कार्ड वरील माहिती कोणाला दिसणार नाही याची दक्षता घेवुन सावध राहावे.

 सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सायबर पोलीस ठाणे येथील पोउपनि. विकास मुंढे, ना पोशि सुधिर तिवारी, पो शि  इमरान शेख , राहुल पोेंदे, महेश  बोथले, प्रशांत  लारोकर, छगन जांभुळे, नापोशि मुजावर अली, संतोश  पानघाटे, निशांत  जुनोनकर, पोशि वैभव पत्तीवार यांनी महत्वाची कामगीरी बजावली आहे.

Friday, December 01, 2017

‘स्पर्धा परीक्षा आणि अंधश्रध्दा’ यावर नितिष पाथोडे यांचे आज व्याख्यान

‘स्पर्धा परीक्षा आणि अंधश्रध्दा’ यावर नितिष पाथोडे यांचे आज व्याख्यान

चंद्रपूरः- स्पर्धा परीक्षांबाबत विदयार्थी-पालकांमध्ये असलेल्या अंधश्रध्दा आणि गैरसमजुतींबाबत प्रबोधन होण्याच्या उद्देषाने दिनांक 2 रोजी स्थानिक वासनिक सर्स अॅकॅडमी, जिल्हा ग्रंथालयाच्या बाजूला, चंद्रपूर येथे सकाळी 11.00 वाजता आणि चिंतामणी विदयालय, विसापूर येथे दुपारी 3.00 वाजता नितिष पाथोडे प्त्ै सहाय्यक आयुक्त (कस्टम्स अॅंड सेंट्रल एक्साईज) राजस्व विभाग, वित मंत्रालय, भारत सरकार यांचे षहरी तसेच ग्रामिण विदयार्थी-पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समिती, वासनिक अॅकॅडमी, क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले अभ्यासिका, विसापूर, ‘अभिन्न’ एज्युकेषनल अॅंड काॅउंसिलींग सव्र्हिसेस तर्फे करण्यात आले आहे.

Monday, November 27, 2017

चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र

चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीमेतंर्गत अवैध दारूविक्रीच्या जिल्हयात
एकुण 26 केसेस:-
महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याात दिनांक 01/04/2015 पासुन दारूबंदी घोषीत
करण्यात आलेली असुन पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवुन दिनांक
26/11/2017 चे 00ः01 ते 23ः59 वाजता पर्यंत जिल्ह्याात पोलीस स्टेशन  घुग्घुस, दुर्गापुर, शेगाव,
माजरी, ब्रम्हपुरी, नागभिड, चिमुर, सिंदेवाही, पोंभुर्णा, सावली, राजुरा, विरूर हददीत एकुण
20,00,870/-रू ची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन ला एकुण 26 गुन्हयाची नोंद
करण्यात आली असुन 03 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------
रोडवर धोकादायक स्थितीत वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन धारकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन घुग्घुस:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन घुग्घुस अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अषा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन घुग्घुस येथे
अप.क्र. 678/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन चिमुर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चिमुर अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
चिमुर येथे अप.क्र. 651/2017 व 652/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील 02 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन दुर्गापुर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन दुर्गापुर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा  स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अप.क्र. 458/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास दुर्गापुर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन भद्रावती:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
भद्रावती येथे अप.क्र. 1086/2017 व 1087/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले
आहे. सदर गुन्हयातील 02 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपी वाहन चालकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहरः-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप.क्र. 1569/2017 कलम
184, 185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आली असून पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीः-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेषन ब्रम्हपुरी येथे अप.क्र. 1124/2017 कलम 184,
185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात
आली असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन रामनगर हददी त संषयास्पदरित्या फिरणाऱ्या आरोपीतांना अटकः-
दिनांक 26/11/2017 रोजी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर येथे 23ः45 वाजता
दरम्यान 01 आरोपी इसम हा आपले अस्तित्व लपवुन कोणतातरी हस्तपेक्षीय गुन्हा करण्याचे उद्देशाने
फिरत असता मिळुन आल्याने पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. 1614/2017 कलम 122 (ब)
मुंबंई पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आले असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
मुंबई जुगार कायदा अन्वये कार्यवाही:-
पोलीस स्टेशन विरूर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन विरूर अंतर्गत कविठपेठ येथे 02 आरोपी इसम हा
सार्वजनिक ठिकाणी कोंबडयांची झुंजीवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगाराचा खेळ खेळताना
मिळुन आल्याने पो.स्टे. विरूर येथे अप.क्र. 437/2017 कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये
गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हयात घटनास्थळावरून जुगारच्या साहीत्यासह नगदी
असा एकुण 3,850/-रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास विरूर पोलीस करीत
आहे.
----------------------------------------------------------------------------------
प्रतिबंधक कारवाई:-
दिनांक 26/11/2017 रोजी जिल्ह्यात कलम 107 दंड प्रक्रिया संहिता अन्वये 12, कलम 122 मुंबई
पोलीस कायदा अन्वये 01, कलम 110/117 मुंबई पोलीस कायदा अन्वये 01 असे एकुण 14 ईसमांवर
प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------------------------------
मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई:-
दिनांक 26/11/2017 रोजी जिल्ह्याात मोटार वाहन कायदा अन्वये रिफलेक्टर/नोपार्किंग 03, दारू
प्राशन 02, इतर केसेस 166 एकुण 171 केसेस करण्यात आल्या आहेत.
----------------------------------------------------------------------------------

Sunday, November 26, 2017

चंद्रपुरातील रस्ते होणार मोकळे ; फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र

चंद्रपुरातील रस्ते होणार मोकळे ; फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र

चंद्रपूर- चंद्रपुरातील रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी मनपाने फुटपाथ तयार केले. मात्र व्यावसायिकांनी ते गिळंकृत केले आहे. आधीच अरुंद रस्ते हातठेले व फेरीवाल्यांमुळे आणखी अरुंद झाले. मात्र आता या व्यावसायिकांचे इतर ठिकाणी झोन तयार करून पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या दृष्टीने मनपाची कार्यवाही सुरू झाली असून लवकरच चंद्रपुरातील फुटपाथ रिकामे होऊन बरबटलेले रस्ते सुटसुटीत होणार आहेत.

चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, पठाणपुरा मार्ग, गांधी चौक मार्ग, तुकूम परिसरातील मुख्य रस्ता, मूल मार्ग आदी अनेक मार्गावर रस्त्याच्या बाजुला, फुटपाथवर फेरीवाल्यांनी आपली बाजारपेठ थाटली आहे. शहरात सुमारे ३ हजार फेरीवाले किरकोळ व्यावसायिक आहेत. या छोटेखानी दुकानावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र या व्यावसायिकांची आतापर्यंत नोंदणीच करण्यात आली नव्हती. त्यांच्यावर कुणाचाही वचक नव्हता. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली की त्यांना हटविले जायचे. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे. कुणाचाही वचक नसल्याने फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला किरकोळ व्यावसायिकांचा मेळाच तयार होऊ लागला. मात्र आता ही स्थिती बदलणार आहे.
महानगरपालिकेने रस्त्यावरील, फुटपाथवरील फेरीवाले, हातठेले, किरकोळ व्यावसायिक यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच शहरात विशिष्ट ठिकाणी फेरीवाल्यांसाठी झोन तयार केले जाणार आहे. या झोनमध्येच फेरीवाल्यांना आपली दुकाने थाटता येणार आहे. इतर कोणत्याही ठिकाणी हातठेले व इतर फेरीवाले दिसणार नाही. या दृष्टीने मनपाने आपली कार्यवाही सुरूही केल्याची माहिती आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी तीन महिन्यांपूर्वी एक बैठक घेऊन शहरातील फुटपाथ रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र असे करताना फुटपाथवरील व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावू नका, त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा, असेही स्पष्ट केले आहे. ही बाब फुटपाथवरील व्यावसायिकांना दिलासा देणारी आहे.
फेरीवाल्यांना ओळखपत्र मिळणार
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व ओळखपत्र तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी शासनाने एक साफ्टवेअर तयार केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांना एकदा प्रशिक्षण देण्यात आले आहे. साफ्टवेअरची लिंक अद्याप यायची आहे. लिंक आल्यानंतर आणखी एकदा कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर व्यावसायिकांची संपूर्ण माहिती साफ्टवेअरमध्ये अपडेट करून ओळखपत्र तयार केले जाणार आहे, अशी माहिती मनपाचे अधिकारी रफीक शेख यांनी दिली.

Saturday, November 25, 2017

कोळशाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने कामगाराचा मृत्य

कोळशाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने कामगाराचा मृत्य

तेलवासा कोळसा खाणीत अपघात
व्यावस्थापणेच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा कामगाराचा आरोप
 
  शिरीष उगे
*वरोरा/भद्रावती:* भद्रावती तालुक्यातील वेकोलिच्या माजरी क्षेत्रातील तेलवासा कोळसा खाणीत झालेल्या ह्या अपघात डोजर ऑपरेटर चा मृत्यू झाला. निरसु झा (५४ ) या मृतक कामगारांचे नाव असून तो वेकोलीच्या एकता नगर वसाहतीत राहत होता.
    सदर घटना दि. २४ ला रात्रौ ११:१५ वाजता घडली . याच खाणीत एका कामगाराला गंभीर दुखापत झाली होती. विशेष म्हणजे या खानीला अनेकदा सुरक्षा संबंधी पुरस्कार मिळालेले असून आठ दिवसापूर्वीच पेंच येथील सुरक्षा पथकाचे सदर  खणीचे प्रशिक्षण केले होते. कामगारांनी या खाणी संबंधी व्यवस्थापकाला कोणाची सुरक्षा दिली होती आज व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप कामगारांना होत आहे. कोळसा काढल्यानंतर निघालेल्या कोळशाचे समानतिकरन डोजर च्या साहाय्याने मृतक निरसु झा हे करीत होते त्याचवेळेस भूसळलन झाल्यामुळे संपूर्ण ओबी त्यांच्यावर कोसडली त्यात ते दाबून गेले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मातीच्या ढिगाऱ्यातून त्यांचे प्रेत काढण्यास सकाळचे सहा वाजले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.