काव्यशिल्प Digital Media: क्रीडा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label क्रीडा. Show all posts
Showing posts with label क्रीडा. Show all posts

Friday, September 07, 2018

बॉक्सिंगसाठी नागपूर येथे ॲकॅडमी सुरु करणार

बॉक्सिंगसाठी नागपूर येथे ॲकॅडमी सुरु करणार

                                           
राज्यातील 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती
एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात
मुलींनी मेरीकोमचा आदर्श समोर ठेवावा

नागपूर/प्रतिनिधी:
बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येवून खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वर्ग-1 व वर्ग- 2 या पदावर 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठी येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पीयनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदक देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. 
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे, दयाशंकर तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तसेच बॉक्सिंग असोसिएशन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत केल्यानंतर स्पर्धेतील अंतिम लढतीच्या कुमारी संजना (दिल्ली) व कुमारी देविका (महाराष्ट्र) यांच्या लढतीला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राची कुमारी देविका ही विजेती ठरली. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील देदिप्यमान यश आपण सर्वजण पाहात आहोतच. खेळ हे मोठे करिअर असून याला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये अव्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंना थेट भरतीद्वारे शासन सेवेत समाविष्ट करुन घेण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले. ही बाब नागपूरसाठी गौरवास्पद आहे. बॉक्सिंग क्षेत्रातील मेरीकोम हे अनेकांचे आदर्श स्थान असून अशाप्रकारच्या स्पर्धांमधून भावी मेरीकोम तयार होतील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातून एशियाड व ऑलिम्पिकच्या सन 2020 व 2024 या स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदकविजेते खेळाडू राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

महापौर नंदाताई जिचकार म्हणाल्या, नागपूर येथे राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही बाब नागपूरकरांसाठी नक्कीच गौरवास्पद आहे. महापालिकेतर्फेही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून विविध क्रीडा प्रकारात मुली यश संपादन करीत असल्याचे जिचकार यांनी सांगितले.
बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 31 राज्यातील 399 खेळाडू सहभागी झाले असून केरळमध्ये पुराचे मोठे संकट आल्यानंतरही तेथील 14 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. बॉक्सिंग खेळामध्ये अकोला हे मुख्य केंद्र असून नागपूर येथेही या खेळाला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे बॉक्सिंगसाठी राष्ट्रीय अकादमी सुरु करावी अशी विनंती आयोजन समितीचे प्रमुख दयाशंकर तिवारी यांनी केली. या स्पर्धेसाठी प्रथमच रोख पारितोषिक देण्यात येत असून यासाठी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार 1 लाख 40 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sunday, May 27, 2018

नागपुरातील पावसाचा सचिन तेंडुलकरला फटका

नागपुरातील पावसाचा सचिन तेंडुलकरला फटका

नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने शहरात नव्हे तर देशात पहिल्यांदा आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप शनिवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे होणार होता. परंतु, पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे खासदार क्रीडा महोत्सवाचे समारोप पुढे ढकलण्यात आले. समारोप स्थगित करण्यात आला नसून कार्यक्रमाची पुढील तारीख काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी उपस्थितांना दिली. 


खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी या उद्देशाने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ६ मे रोजी सिनेअभिनेता अक्षयकुमार व केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. ७ ते २५ मेदरम्यान २० खेळांच्याही स्पर्धा शहरातील विविध भागात रंगल्या. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महापौर नंदा जिचकार आणि अनेक मान्यवर उपस्थित खासदार क्रीडा महोत्सवाचे समारोप होणार होता.

सचिन तब्बल ८ वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागपूरात येणार असल्यामउळे त्याला पाहण्यासाठी आणि खासदार क्रीडा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी दुपारी ५ वाजतापासून क्रीडाप्रेमींनी यशवंत स्टेडियम येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. सर्वांना सचिन तेंडुलकरची प्रतिक्षा होती. परंतु सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या रिमझिम पावसाने सात वाजता जोरदार हजेरी लागली. पावसामुळे सचिनच्या विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावरून लँडीगसाठी सिग्नल मिळत नव्हते. विमानतळाच्या अनेक फेऱ्या मारल्यानंतर विमान संभाजीनगरच्या विमानतळाकडे वळवण्यात आले.

Wednesday, February 28, 2018

जिल्हा क्रीडा भारती चंद्रपूर तर्फे आयर्नमॅन डॉ.विश्वास झाडे यांचा सत्कार

जिल्हा क्रीडा भारती चंद्रपूर तर्फे आयर्नमॅन डॉ.विश्वास झाडे यांचा सत्कार

चंद्रपूर:ललित लांजेवार 
कोलंबो (श्रीलंका) येथे रविवार २५ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. विश्वास झाडे यांनी विक्रम करत आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे. हा बहुमान पटकविणारे डॉ. विश्वास झाडे हे चंद्रपुर जिल्ह्यातील प्रथमच स्पर्धक ठरले आहे.या ट्रायथलॉन या स्पर्धेसाठी विदर्भातून चंद्रपूर येथील डॉ. विश्वास झाडे आणि नागपूरचे डॉ.अमित समर्थ यांनी भाग घेतला होता. हे दोघेही या स्पर्धेसाठी श्रीलंका येथे गेले होते.डॉ.विश्वास झाडे यांनी केलेल्या यशस्वी कामगिरी बद्दल सोमवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा भारती व जिल्हा क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयर्नमॅन डॉ. विश्वास झाडे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी क्रीडा भारतीचे जिल्हा प्रमुख डॉ.योगेश सालफळे,शहर प्रमुख डॉ.पंत,जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे,उपस्थित होते.
या स्पर्धेत २ किलोमीटर पोहणे यास वेळ १ तास , 90 किलोमीटर  सायकलीग ४ तास, 21 किलोमीटर धावणे ३ तास असा वेळ घेत हि स्पर्धा डॉ. विश्वास झाडे यांनी पूर्ण केली, या स्पर्धेचे वेळ ८ तास ३० मिनिटे  ठरविण्यात आले होते. तसेच डाँ विश्वास झाडे यांनी सदर स्पर्धा ८ तासातच पुर्ण केली. व आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे.
या सत्कार कार्यक्रमात पोलीस भरतीतील व जिल्ह्यातील सर्व खेळाळूनसाठी मोफत वैद्यकीय मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ.सालफळे म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना समोर आणण्यासाठी अनेक अडचणी येतात,या संपूर्ण अडचणी सोडविण्यास क्रीडा भारती चंद्रपूर विभाग नेहमी तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्तेक खेळाडूंना  कोणत्याही वैद्यकीय अडचणी असतील तर क्रीडा भारती व शहरातील तद्य डॉक्टरांकडून माफक दारात उपचार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या माफक उपचाराने खेळाडुंची चिंता कमी होणार  असून यातून आपल्याला चांगले खेडाळू निर्माण करण्यास मदत होणार आहे.

यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा भारतीचे सदस्य व्हावे असे आव्हाहन देखील केले.या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलन येथे रबरी सिंथेटीक ट्रॅकची देखील लवकरात लवकर भर पडणार असून असा प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.अशी माहिती दिली.यावेळी सत्कार समारंभासाठी चंद्रपूर शहरातील तद्य डॉ. रवी आलूरवार,डॉ.हर्ष मामिडवार,डॉ.उमेश अग्रवाल,डॉ.प्रसाद पोटदुखे, डॉ.गुरुराज कुलकर्णी,डॉ.अनुराधा सालफळे क्रीडा भारती नागपूरचे कुंभारे सर,हेमंत घीवे,प्रकाश सुर्वे,मकरंद खाडे,प्रवीण चवरे,क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर,रोषण भुजाडे,अॅथलेटीक असोशिएशन चंद्रपूरचे सचिव सुरेश अडपेवार संदीप वझे, यासह अनेक खेळाडू विद्यार्थी विध्यार्थिनी उपस्थित होते.
ट्रायथलॉन म्हणजे काय? 
ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं. कोलंबो येथे आयोजित  ट्रायथलॉन स्पर्धेत २ किलोमीटर स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर धावण्याचा समावेश होता.‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन स्पर्धा ८.३० तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं.
कोण आहेत विश्वास झाडे
डॉ. विश्वास झाडे हे चंद्रपुरातील प्रसिद्ध ह्दयरोग तद्य असून मागिल २ वर्षापासून चंद्रपुर शहरातील विविध भागात ते रियाजासाठी जातात शहरातील जमनजट्टी तलाव परिसर , जिल्हा स्टेडिअम , सायकलने जाम पर्यतचा प्रवास तर धावण्याकरिता बल्लारशाह रोड व नागपुर रोड वर दूरपर्यंत नेहमी सराव करायचे तसेच व्यायाम करीत जिममध्ये सुध्दा जाणे असा नित्यक्रम त्यांचा होता. पहाटे सकाळीच ५ वा. सुरूवात करुन रात्री सर्व रुग्ण तेवढ्याच नम्रपणे हसुन - समजावून तपासण्याचे काम करणारे अतिशय जिद्द बाळगुण मनातला ध्यास पुर्णत्वास नेण्याचे काम करणारे डॉ.विश्वास झाडे  यांनी केला यांच्या भरिव कामगिरी बद्दल त्यांच्या या विक्रमसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.डॉ.विश्वास झाडे यांनी केलेल्या भरिव कामगिरी बद्दल काव्यशिल्पचाचा सलाम... 

Tuesday, December 12, 2017

न्यू कबड्डी असोसिएशन चंद्रपूर जिल्हाचा पुरुष व महिलाचा संघ जाहीर

न्यू कबड्डी असोसिएशन चंद्रपूर जिल्हाचा पुरुष व महिलाचा संघ जाहीर

चंद्रपूर : दिनांक १५ ते १७ डिसेंबर २०१७ रोजी अमरावती येथे होणा-या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता न्यू कबड्डी असोसिएशन चंद्रपूर जिल्हयाचा पुरुष व महिलांचा संघ आज जाहीर करण्यात आला आहे. हा पुरुष व महिलांचा संघ राजूर बाजार तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे होणा-या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर पुरुषांच्या संघात विक्की तुळशीराम पेटकर ( कर्णधार ) धीरजकुमार पाशी ( उपकर्णधार ), सुरज रोडे, सागर अंबाघरे, शुभम गारोडे, संतोष जानवे, अमोल ठेंगणे, राहुल मत्ते, नितीन परचाके, चंद्रकांत वासनिक, सुशांत गुरनुले, विकास निशाद तसेच महिलांच्या संघात भक्ती गोलापल्लीवर  ( कर्णधार ), सीमा चौधरी ( उपकर्णधार ), संगीता देबनाथ, अश्विनी आस्वले, पल्लवी घोनमडे, सुजाता मेश्राम, बबली शील, तेजस्विनी कोयचाडे, समीक्षा जुमनाके, सारिका ठाकरे, नितीक्षा प्रधान यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरुषांच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. शंकर बोरघरे, व व्यवस्थापक म्हणून प्रा. प्रकाश चहांदे त्याचप्रमाणे महिलांच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. मुकेश पांडे तर व्यवस्थापक म्हणून प्रा. सुनिल डाखोळे यांची निवड करण्यात आली आहे.  
  सदर स्पर्धेच्या यशाबद्दल न्यू कबड्डी असोसीएशन चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अॅड. राहुल घोटेकर, न्यू विदर्भ कबड्डी असोसीएशन नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव श्री. उमेश पंधरे व कोषाध्यक्ष प्रा. सुनिल डाखोळे यांनी शुभेच्या दिले. 

Tuesday, December 05, 2017

शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव

शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव

ब्रम्हपुरी/शिक्षण विभाग पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत अऱ्हेरनवरगांव बिटस्तरीय शालेय बालक्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक महोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा साठी आलेले मा.आम. किर्तिकुमार भांगडीया यांचे हस्ते या कार्यक्रमाच उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. मा.आमदार महोदयानी विध्यार्थी यांना मार्गदर्शना मध्ये की सुप्त कलागुणांना वाव मिळणारे व्यासपीठ म्हणजे ही स्पर्धा याच्या मध्ये किती तरी विध्यार्थ्यानि  भाग घेऊन अंगीy असलेल्या कला सादर करुन आलेल्या मान्यवर मंडळीच मन मोहून टाकले या मुळे या मुलाच कौतुक किती ही करा तेवढे कमीच आहे असे आम.महोदय यानी व्यक्त केले.
 या कार्यक्रमाला उपस्थित  मा.श्री. क्रिष्णलाल सहारे उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे अध्यक्षतेखाली,मा प्रमोद चिमुरकर सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर, मा सौ दिपालीताई मेश्राम जिल्हा परिषद सदस्या, विलास उरकुडे उपसभापती प स ब्रम्हपुरी,मा थानेश्वर कायरकर सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी, सौ सुनंदाताई ढोरे सदस्या प स ब्रम्हपुरी,मा प्रदिप बिरमवार संवर्ग विकास अधिकारी प स ब्रम्हपुरी, मा वसंता वारजुरकर, मा दिपक उराडे, मा सौ भारती लांजेवार सरपंच ग्रा प पिंपळगाव आदि मान्यवरांचे उपस्थितीत दि ५ डिसेंबर २०१७ ला मौजा पिंपळगाव (भोसले) येथे संपन्न झाला

Wednesday, November 29, 2017

Monday, November 27, 2017

नागपूर कसोटी भारताने जिंकली

नागपूर कसोटी भारताने जिंकली

नागपूर-  कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली ४०५ धावांची आघाडी पार करणं श्रीलंकेच्या फलंदाजांना शक्य झाले नाही. तिस-या दिवशी पहिला गडी गमावल्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकणे सुरु ठेवले. श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कर्णधार दिनेश चंडीमलने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याचे प्रयत्न तोकडेच पडले.
test match india vs sri lanka news साठी इमेज परिणाम

Sunday, November 26, 2017

चेंडूशी छेडछाड केल्याने दसून शनाका अडचणीत

चेंडूशी छेडछाड केल्याने दसून शनाका अडचणीत

नागपूर -भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याने श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दसून शनाका अडचणीत सापडला आहे. त्यानं केलेल्या चुकीची कबुलीही दिली आहे. या प्रकरणी आयसीसीनं त्याच्यावर कारवाई केली आहे.

चेंडूशी छेडछाड करताना शनाका कॅमेऱ्यात कैद झाला होता. आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्यासमोर त्यानं चूक झाल्याचं मान्यही केलंय. या प्रकरणी आयसीसीनं शनाकाला दंडाची शिक्षाही सुनावली आहे. सामन्याच्या मानधनापैकी ७५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारला आहे. तसंच शनाकाला समजही दिली. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शनाकानं त्याची चूक मान्य केली असून, त्यामुळे या मुद्द्यावर आता कोणत्याही औपचारिक सुनावणीची गरज नाही, असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.

Tuesday, November 21, 2017

 क्रिकेट संघ नागपुरात दाखल

क्रिकेट संघ नागपुरात दाखल

भारत -श्रीलंका क्रिकेट संघ नागपुरात दाखल, 

जामठा येथे दुसरा कसोटी सामना 24 पासून

नागपूर – भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली हे नागपूर येथे दुसऱ्या भारत वि. श्रीलंका कसोटी सामन्यासाठी विमानतळावर आलेले असताना घेतलेले छायाचित्र.
फोटो सौजन्य – पीटीआय


 

Thursday, November 16, 2017

राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत यश

राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत यश


चंद्रपूर :  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॉल बटमिंटन (मुले) या स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १६ नोव्हेबर २०१७ रोजी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध महाविद्यालयांनी सहभाग दर्शविला होता. सदर स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर बॉल बॅडमिंटन मुलांचा संघ तृतीय क्रमांक पटकाविला.
मिनी मॅरेथान स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील स्पर्धकांना यश

मिनी मॅरेथान स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील स्पर्धकांना यश


चंद्रपूर-  शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चंद्रपूर द्वारा आयोजित राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्म शताब्दी महोत्सव या निमित्य नुकत्याच झालेल्या वयोगट ७ ते १२ वर्षातील मिनी मॅरेथान ( मुले ) स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील धावपटू मोहन सावरकर याने द्वितीय क्रमांक तसेच गणेश मोरेश्वर पारशिवे याने तृतीय क्रमांक पटकावून मंडळाचे नावलौकिक केले.

Monday, November 13, 2017

राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर प्रथम

राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर प्रथम

आंतर महाविद्यालयीन सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेत

चंद्रपूर -  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सर्कल स्टाईल कबड्डी ; मुले द्ध स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या संघाने प्रथम क्रमांक  पटकावून सदर स्पर्धेत आपले प्रथम स्थान निश्चित केले आहे.
         नुकताच पार पडलेल्या सर्कल स्टाईल कबड्डी मुलांच्या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या भव्य मैदानावर करण्यात आले होतेण् सदर स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या संघाने अंतिम सामन्यात डॉण् आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर या संघाला पराभूत करून सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेत आपले प्रथम स्थान पटकावलेण् या संघाला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून प्राण् विक्की पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होतेण् सर्कल स्टाईल कबड्डी मुलांच्या संघात हर्शल क्षिरसागर ; कर्णधार  योगेश नागपुरे, मनोज सध्ओ जसरामए नितेश क्षिरसागरए सोनू गंगा शरणए दीपक सध्ओ धन सिंहए अंकुश दिखितए सुरज परसूटकरए बद्री नाथ सध्ओ काश्मिरी लालए रजत कुमार सध्ओ केवळ क्रिशनए राहुल सध्ओ सतीश कुमारए सनी मोहुर्लेए मोहम्मद क़युमए नंदकिशोर सुरजागडे इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.
        या संघाच्या यशाबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राचार्य डॉ. दिलीप टिकाराम जयस्वाल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राण् विक्की तुळशीराम पेटकर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कौतुक केले.

Friday, November 10, 2017

आज महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा

आज महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा

  • नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी  : नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने १२ नोव्हेंबर रोजी लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर सायंकाळी ६ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहतील तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ. वी.बी.बी.ए.चे अध्यक्ष चंद्रशेखर गाडगीळ, आय.बी.बी.एफ.चे महासचिव चेतन पठारे, आ. जोगेंद्र कवाडे, अ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ.विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्षनेता मो. जमाल, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, राकाँ पक्ष नेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका मनिषा धावडे, आय.बी.बी.एफ.चे अध्यक्ष प्रेमचंद डेगरा उपस्थित राहतील. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, मनपाचे अपर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी केले आहे.

Thursday, November 09, 2017

भारत विरुद्ध श्रीलंका -

भारत विरुद्ध श्रीलंका -

पहिला कसोटी सामना
16 नोव्हें, 20170 9: 30 इ.स. 04:00 GMT
ईडन गार्डन्स, कोलकाता
---
भारत विरुद्ध श्रीलंका - दुसरा कसोटी सामना
24 नोव्हें, 20170 9: 30 इ.स. 04:00 GMT
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
......
भारत विरुद्ध श्रीलंका -
तिसरा कसोटी सामना
02 डिसेंबर, 20170 9: 30 IST | 04:00 GMT
फिरोज शहा कोटला, दिल्ली
…...

भारत विरुद्ध श्रीलंका -
पहिला एकदिवसीय सामना

10 डिसें, 201713: 30 IST | 08:00 GMT
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला

भारत विरुद्ध श्रीलंका -
दुसरा एकदिवसीय सामना

13 डिसेंबर, 201713: 30 IST | 08:00 GMT

पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली

शिशिर कामडी जगात टॉप 100मध्ये

शिशिर कामडी जगात टॉप 100मध्ये

 चंद्रपूर/प्रतिनिधी : अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयात अनेक कीर्तिमान आपल्या नावे करणाऱ्या चंद्रपुरातील शिशिर ऊर्फ ध्रुव सुभाष कामडी या स्केटिंंगच्या चिमुकल्या बादशहाने आणखी एक गगनभरारी घेतली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकने त्याची दखल घेतली असून, जागतिक पातळीवरील पहिल्या १०० रेकॉर्डमध्ये ध्रुवची नोंद झाली आहे.

ध्रुवचा हा गौरव सहा देशांच्या रेकॉर्ड बुकच्या मुख्य संपादकांच्या हस्ते येत्या १२ नोव्हेंबरला दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरियम येथे एका सोहळ्यात केला जाणार आहेत. याप्रसंगी जागतिक पातळीवरील शंभर रेकॉर्ड होल्डरला प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. मास्टर शिशिर ऊर्फ ध्रुवची वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकमध्ये नोंद झाली असून त्याचे नाव व रेकॉर्ड २०१८ च्या बुकमध्ये प्रकाशित होणार आहे. दरम्यान, त्याला मेडिकल ट्रेनिंगसुद्धा दिले जाणार आहे. 

  

Wednesday, November 08, 2017

सिंधूचा पराभव, सायना 'अजिंक्य'

सिंधूचा पराभव, सायना 'अजिंक्य'

    सिनिअर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा:                           

नागपूर - सिनिअर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही.सिंधूचा पराभव करत सायना नेहवाल हिने अजिंक्यपद पटकाविले. सायनाने सिंधूंचा २१-१७, २७-२५ अशा फरकाने पराभव केला.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या महिला गटाच्या अंतिम लढतीचा सामना अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. सायनाने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतली. सिंधूने केलेल्या चुकांचा पुरेपुर फायदा घेत सायनाने पहिला गेम २१-१७ ने जिंकला. तर दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने सुरुवातीपासून आघाडी घेतली. काही उत्कृष्ट ड्राप्सही तिने लगावले. १८ पॉईंट्सपर्यंत ती आघाडीवर होती. त्यानंतर सायनाने कमबॅक करत बरोबरी साधली. अखेर सायनाने आपला अनुभव पणास लावून २७-२५ अशी सरशी साधत दुसऱ्या गेमसह अजिंक्यपद पटकावले. . 
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा... सायना - सिंधू अंतिम फेरी

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा... सायना - सिंधू अंतिम फेरी

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा...
सायना - सिंधू अंतिम फेरी
नागपूर - मानकापूर स्टेडिअम परिसरातील क्षणचित्रे...