काव्यशिल्प Digital Media: मुख्य बातमी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मुख्य बातमी. Show all posts
Showing posts with label मुख्य बातमी. Show all posts

Monday, November 20, 2017

 बोगद्यात दुर्घटना; नऊ ठार

बोगद्यात दुर्घटना; नऊ ठार

इंदापूर - नदीजोड प्रकल्पातील नीरा आणि भीमा नदीला जोडणाऱ्या बोगद्यात लिफ्ट कोसळून सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात नऊ मजूर मृत्युमुखी पडले. इंदापूर तालुक्‍यातील अकोले गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या बोगद्यात तीनशे मजूर काम करीत होते.
सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दिवसभराचे काम संपवून मजूर नेहमीप्रमाणे लिफ्टने वर येत होते. त्याच वेळी क्रेनचा दोर तुटून लिफ्ट खाली कोसळली. तब्बल दीडशे फूट खाली अत्यंत वेगाने लिफ्ट पडल्याने त्यात बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे नऊ मजूर जागीच ठार झाले. मुकेशकुमार जवाहरलाल मोर्या (वय 26, रा. पो. महावरी, ता. जौनपूर, उत्तर प्रदेश), सुपरवायझर संबिगे समाचंद नायडू (वय 38, रा. गौरीपुरम, विजयनगर, आंध्र प्रदेश), अविनाथ सिद्धा रेड्डी (रा. आंध्र प्रदेश), सुरेंद्र बच्चन यादव (वय 25, रा. उत्तर प्रदेश), छोटू गोले (वय 19, रा. बडगाव), बलराम स्वान, सुशांत पंढी, मुकेश कुमार आणि राहुल सुग्रीव नरुटे अशी मृतांची नावे आहेत.