काव्यशिल्प Digital Media: नवरगाव

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नवरगाव. Show all posts
Showing posts with label नवरगाव. Show all posts

Saturday, June 09, 2018

 अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नवरगाव/प्रतिनिधी:
सिंदेवाही मार्गावरील लाडबोरी गावाजवळ मुख्य रस्त्याने दूध घेऊन जात असलेल्या दुचाकी स्वारकास अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वारकाच्या डोक्यास जबर मार लागल्याने घटनास्थळावर त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक ०९ जुन २०१८ रोज शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. मृतकाचे नाव दिनेश रणछोड जोगराणा वय १८ वर्ष रा.पडोली चंद्रपुर असे आहे.
गाईच्या दुधासह गाईचा कडप शेतात बसविण्याचा भटकंती व्यवसाय करणारे गवडी हे सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील शेतात गाईच्या कडपाचा बसका बसविण्यात आला आहे. भटकंती करून व्यवसाय करणाऱ्या गवडी समाजाचा पडोली - चंद्रपुर रहिवासी असलेला युवक दिनेश जोगराणा वय १८ हा मिनघरीच्या गाईच्या बसक्याच्या स्थळावरून सिंदेवाही येथे गाईचे दूध विकण्यासाठी नेत असतांना समोरून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने लाडबोरी गावाजवळ त्याचा अपघातात मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतकाचे शव तपासणी करिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. तसेच अज्ञात वाहनाविरोधात सिंदेवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहे.

Tuesday, November 07, 2017

कलावंत  राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत नवरगावचे कलावंत अव्वल

कलावंत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत नवरगावचे कलावंत अव्वल

सिंदेवाही/प्रतिनिधी
कलावंत न्यास उज्जैन(मध्यप्रदेश) आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील   नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या  बावीस विद्ध्यार्थ्यानी वेगवेगळी बक्षिसे पटकावून अव्वल येण्याचा मान पटकावला आहे . भारताच्या विविध प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यानी या स्पर्धेत भाग घेतला होता.
रेखा व रंगकला  विभागाचा  कृनाल धनझोडे यांस पाच हजार रुपये रोख आणि
अक्षय मेश्राम याला दोन हजार रुपये रोख पारितोषिक प्राप्त झाले. हे दोन्ही पुरस्कार त्यांच्या ग्राफीक्स या कलाप्रकाराला देण्यात आलेत.
रेखा व रंगकला विभागाचा रोहित बन्सोड याच्या चित्राला तीन हजार रुपयांचे पारोतीशिक मिळाले.
अबोली लांबे आणि अक्षय पिंपळक यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले असून अन्य विध्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट जाहीर झालीत.
त्यात श्वेता गुरू, निखिल आत्राम, सुरभी कागदेलवर,अश्विनी गावळे, चेतन वाढई, भाग्यश्री फुकटकर, प्रियंका रॉय, प्रवीण कुंभारे, निखिल जनबंधु, अक्षय बोबडे, धयनदेवी नंदनवार, भावना काशट्टीवार, पूजा गावंडे, मारोती चौधरी, नेहा भोगे, प्रिया निकुरे आणि स्वाती लोणकर यांचा समावेश आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेचे हे 17 वे वर्ष असून भारतातल्या दिग्गज परिक्षकांकडून चित्रांचं मूल्यमापन करण्यात येते
           महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर आणि मार्गदर्शक अद्यापक चित्रकार प्रा अतुल कामडी, प्रा कैलाश घुले, प्रा निवृत्ती बावणे आणि लक्ष्मीकांत लेंझे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.