काव्यशिल्प Digital Media: शिक्षक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शिक्षक. Show all posts
Showing posts with label शिक्षक. Show all posts

Wednesday, August 29, 2018

चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल 
ललित लांजेवार:
हि बातमी शिक्षक वर्गात खळबळ माजविणारी बातमी आहे.चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या एका उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग शिकवणीच्या कारणावरून झालेल्या वादाला भलतेच वळण मिळाले आहे, अन हा वाद पोलीस ठाण्यात पोहचला आहे.
शहरातील लालपेठ परिसरातील प्रगती एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याधापकावर महिला शिक्षिकेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेत कुणाल(बदललेले नाव) हे गेल्या १५ वर्षाहून अधिक वर्षापासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत,याच शाळेत मोनाली(बदललेले नाव) ह्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे,या शाळेतील ८ शिक्षक शिक्षिकेचा स्टाफ या मुख्याध्यापकांकडे आहे. अश्यातच मुख्याध्यापकाने वारंवार माझ्या वर्गाकडे नजर ठेवत मला वारंवार शिवणीचा लेखाझोका मागवीत असतात व अश्यातच गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक व शारीरिक छळ होत आहे, असा आरोप करत महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,महिला शिक्षिकेच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या मुख्याध्यापकाचे कार्य व्यवस्तीत रित्या पार पाडतो मात्र शिक्षक त्यांचे शिकवणीचे कार्य पार पडत नाही,शासन त्यांना पगार देतो व त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेणे माझी जिम्मेदारी आहे. तक्रारदार महिला शिक्षिका ह्यांच्या वर्गावर मी विद्यार्थ्यांची शिकवणी वर्गात गेल्यावर तपासणी केली असता विध्यार्थ्यांना वाचता लिहिता येत नाही, गणितातले गुणाकार भागाकार येत नाही व त्यामुळे मी त्यांच्या वर्गावर जाऊन विध्यार्थ्यांना विचारपूस केली.व रोजनिशी वही मागविली असता त्या संतापल्या व त्यांनी मला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.असे सांगितले. 
या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापकावर कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिक्षिकेवर अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कलम २९४,५०६ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील पुढील  तपास शहर पोलीस करीत आहे.

Thursday, July 12, 2018

15 जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा

15 जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा

शिक्षक साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 15 जुलै 2018 ला चंद्रपूर जिल्हयातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. 
परीक्षेस येतांना प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक शाळा, महाविद्यालयाचे अद्यावत ओळखपत्र यापैकी एखादा पुरावा जवळ असणे आवश्यक आहे. 
तसेच परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 मिनीटे आधी परीक्षागृहात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्र परीसरात किंवा परीक्षागृहात परीक्षार्थी, पर्यवेक्षक, लिपीक, शिपाई यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली असून असे साहित्य आढळल्यास प्रशासकीस कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कळविले आहे. 

                                  शिक्षक पात्रता परिक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू
 15 जुलै 2018 रोजी होणा-या शिक्षक पात्रता परिक्षा 2018 परिक्षा केंद्राच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांनी सकाळी 6.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सदर परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्राअंतर्गत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत परिक्षा दिनी परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्रअंतर्गत झेरॉक्स फॅक्स, ई-मेल, मोबाईल फोन आणि इंटरनेट सवलती किंवा अन्य कोणतेही कम्मुनिकेशन सवलतीवर प्रतिबंध राहील.सदर आदेश जनता विद्यालय, हिंदी सिटी हायस्कुल, विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल, सेंट मायकेल इंग्लीश स्कुल, ज्युबली हायस्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज व सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर या ठीकाणी लागू राहील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम वा समुह प्रचलित कायदेशिर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर, तहसिलदार चंद्रपूर, महानगर पालिका कार्यालय चंद्रपूर, शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक व माध्यमिक जि.प. च्या नोटीस बोर्डावर आणि सार्वजनिक ठिकाणी आदेशाचे प्रत चिटकवून नागरिकांना अवगत करावे असे निर्देश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहे.

Thursday, June 07, 2018

 शिक्षकांकडून अर्ज आमंत्रित

शिक्षकांकडून अर्ज आमंत्रित

शिक्षक साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील चिमूर व चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत चालविण्यात येणा-या शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राविण्यानुसार त्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देवून त्यांच्यामधील कलागुणांचा विकास व्हावा. याकरीता त्यांना खेळामधील बदललेच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार योग्य खेळाची ओळख होऊन शास्त्रोक्त खेळांची माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता कंत्राटी क्रिडा शिक्षक, मार्गदर्शकाची निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर पदाकरीता असणारी आवश्यक अर्हता, पात्रता, अटी शर्ती, अर्जाचा नमुना व इतर सविस्तर माहिती चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या chanda.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

Wednesday, April 11, 2018

 अन शिक्षकावर आली खर्रा घोटण्याची पाळी

अन शिक्षकावर आली खर्रा घोटण्याची पाळी

नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर येथील पारधी समाजातील  .वारंवार बदलणाऱ्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा फटका नागपूर जिल्ह्यातील संजय सर्जेराव पवार या शिक्षकांना बसला आहे .आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिक्षक  संजय पवार शासनाच्या दारोदारी भटकत आहे.
परंतु त्यांच्या तक्रारी कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही .त्यामुळे शिक्षक संजय पवार हे मानसिक तणावात आहे .या शिक्षकांचे वेतन जुलै 2017 पासून थांबवण्यात आले आहे .विशेष म्हणजे या शिक्षकानी नोकरीसाठी बँकेकडून आठ लाख कर्ज काडुन डोनेशन दिले आहे .संजय सर्जेराव  पवार सहायक शिक्षक म्हणून  हिंगना येथिल प्राथमिक शाळेतील  स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्यामंदिर हींगना जिल्हा नागपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून 100%टक्के अनुदान म्हणून कार्यरत आहेत.
 परंतु आता संचालक श्री विठ्ठल कोहाड़ यांनी संजय  पवार यांना 20%टक्के वेतनावर आणले असल्याचे संजय पवार यांनी सांगितले  पारधी समाजातील नागपूर जिल्ह्यातील एकमेव शिक्षक असल्याने या शिक्षकांवर चोरीचा  खोटा आरोप केला. स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्यामंदिर हींगना येथील  मुख्याध्यापक यानी संस्थापक विठ्ठल कोहाड  यांच्या सांगितल्या प्रमाणे मी संजय पवार यांच्या वर खोटा रजिस्टर चोरीचा आरोप केल्याचे सांगितले .संचालक विठ्ल कोहाड यांनी विनाकारण संजय पवार या आदिवासी शिक्षकाला  जातीवाचक शिवीगाळ केली असता खोटा आरोप केल्याचे संजय पवार यांनी सांगितले . या संदर्भात संजय पवार यांनी न्याय मागण्यासाठी  पोलिस स्टेशन ला धाव घेतली व अनुसूचित जाती जमती प्रतिबंधक कायदा 1989च्या अंतर्गत अट्रासिटि कायद्याने गुन्हा नोंदविण्यास सांगितले परंतु पि. आई .साहेब यांनी  स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्यामंदिरचे संस्थापक विठ्ठल कोहाड यांची बाजू घेतली असता विठ्ठल कोहाड यांच्या विरुद्ध आट्रासिटि गुन्हा दाखल केला नाही . हिँगना पोलिस स्टेशन चे पी आई यांनी संजय पवार याशिक्षकाला आश्वासन देत दिशाभूल केली असल्याचे  संजय पवार यांनी सांगितले .  मागील १३ महिन्यापासून  पगार थाम्बवलेला असून संजय पवार  यांच्यावर व  कुटुंबियावार उपासमारीची वेळ आलेली आहे .संजय  पवार हे पारधी समाजातील एकमेव शिक्षक असल्याने पारधी समाजामध्ये गौरव केला जातो . 
शेषनगर येथील एकागरीब कुटुंबातील असल्याने आईवडीलानी कर्जबाजारी करत  कसेबसे शिक्षण केलेले आहे . स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्यामंदिर हींगना आपल्या शाळेला ग्र्यान्ड मिळावीकरिता  आदिवासी शिक्षक भरती करणे कायद्याने असल्याने पारधी समाजातील  संजय पवार यांची नियुक्ती केली असता  आपल्या शाळेत आदिवासी शिक्षकाची जागा भरलेली असल्याने  शासनापासून  ग्रान्ड मिळवली असता संजय पवार  याना 100%टक्के वेतन सुरू असल्याने पुर्ण वेतन   मिळत आसताना शाळेचे  संस्थापक विठ्ठल कोहाड यांनी संजय पवार  यांच्या कडून  8 लाख रुपयाची डिमांड केली व  श्री संजय पवार यांची पैसा देण्याची एपत नसल्यामुळे त्यांना शिक्षक सहकारी बैंक हिंगना येथून आठ  लाख कर्ज काढायला लावले व आठ लाख संस्थापक विठ्ठल कोहाड यानी  घेतले असता अजून पैसेची डिमांड केली परंतु पुरेसा पैसा नसल्याने संजय पवार यानी नकार दिला असता आधीच आठ लाख चे कर्ज काढून दिले आणि बँकेतील पैसा भरणे कठीण झाल्याचे संस्थापक याना सागितले  श्री संजय पवार यांचे वर्षभरापासून पगार थांबल्याने बँकेचे पैसे भरणे कठीण झाले असून संस्थापक यानी संजय पवार याना नेहमी शाळेतून काढण्याची धमकी देत खोटे आरोप करत संजय पवार यांचे जगणे कठीण केले असुन स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्यामंदिर हींगना येथील  संचालक विठ्ल कोहाड यांच्या शाळेत बोगस कारोबार सुरू असल्याचे संजय पवार यांनी सांगितले .माहितीच्या आधिकार मध्ये महिती मागितली असून अजूनपर्यंत महिती दिलेली नाही  शासनाने तत्काळ या शाळेची चौकशी करावी अशी  मागणी केली आहे .
               

Saturday, November 25, 2017

प्राचार्यांनी दिले मुख्याध्यापकांना धडे

प्राचार्यांनी दिले मुख्याध्यापकांना धडे


सिंदेवाही- तालुकास्तरीय KRA मुख्याध्यापक  कार्यशाळा पंचायत समिती, सिंदेवाही  -( बीट :- सिंदेवाही, गुंजेवाही  अंतर्गत भारत विद्यालय , पळसगाव (जाट) येथे घेण्यात आली.
यावेळी बाबूपेठ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणचे प्राचार्य धनंजय चापले यांनी मार्गदर्शन केले.
KRA बाबत मुख्याध्यापकामध्ये  मार्गदर्शन व चर्चा, NAS सर्वेक्षण बाबत विशेष मार्गदर्शन व महत्व विषद केले, ASER  सर्वेक्षण बाबत आपल्या जिल्ह्याचे स्थान व आपली प्रगती कुठे आहे, यावरही मार्गदर्शन केले. गणितपेटीतील साहित्याची ओळख व घटकनिहाय वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले.दि. 14 जुलै 2017 च्या जीआर चे वाचन सर्व मुख्याध्यापकांनी करून त्यानुसारच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी-1 घेऊन गुणदान करावे, असे सूचित करण्यात आले.
कार्यशाळेत शिविअ केंद्रप्रमुख व सर्व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.
कार्यशाळेत मान. श्री. मेश्राम ( B.E.O. ), श्री. चहांदे, श्री. परचाके, बरगडे ( के. प्र. )  श्री. बोरकर मु.अ. भारत विद्यालय , पळसगाव श्री. भारत मेश्राम, श्री. बगडे, श्री. निकुरे, विषयतज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन  श्री. शेंडे ( के.प्र.) यांनी केले, तर आभार श्री. जनबंधू यांनी मानले.

Tuesday, November 14, 2017

मालेवाडा येथील मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मालेवाडा येथील मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

चिमूर/प्रतिनिधी:
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सीताराम बालाजी निब्रड यांचावर शिक्षिकेला व्हाट्सप्प वर अश्लील संदेश पाठविल्या बद्दल चिमूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      प्राप्त माहिती अनुसार मुख्याध्यापक सीताराम बालाजी निब्रड यांनी एका शिक्षिकेला २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दरम्यान व्हाट्सप्प व टेक्स मॅसेजेस च्या स्वरूपात अश्लील मॅसेजेस पाठविले. यापूर्वी या मुख्याध्यापकाला गावकरी व पोलिसांनी समाज दिली होती.परंतु त्याचा वागण्यात काही हि बदल न झाल्याने अखेर शिक्षिकेसह कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले आणि मुख्याध्यापक सीताराम बालाजी निब्रड याच्या विरोधात तक्रार नोंदविली.  या संदर्भात भादंवि ३५४ अ.५, ६७ कलमान्वये चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारा असून या मुख्याध्यापकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले आहे.

Friday, November 10, 2017

सावली तालुक्यातील मेहा बूज येथील मुख्याध्यापक निलंबित

सावली तालुक्यातील मेहा बूज येथील मुख्याध्यापक निलंबित

सरपंचांच्या तक्रारीवर जिल्हा परिषदेची कारवाई
चंद्रपूर - मेहा बुज येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात.
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील शाळेत आठ वर्षापासून रामचंद्र निरगुडे कार्यरत होते. तेव्हापासून त्यांनी शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करणे, शालेय कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारींना न बोलावणे, वारंवार रजेवर जाणे, महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करणे, विद्यार्थी कडून शाळेत कामे करवून घेणे  आदी तक्रारी होत्या.
सरपंच उषा भोयर आणि गावक-यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. यात ते दोषी असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. त्यानुसार मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात. यापुढे सूचनांचे पालन केल्यास बडतर्फ करू, अशी ताकिद देण्यात आली आहे.

Saturday, November 04, 2017

चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात निर्णय घेऊन न्याय प्रदान करण्यात यावा, या करीता आज चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक/शिक्षण विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार केला.समक्ष भेटून चर्चा केली. मात्र या प्रश्नांचे मार्ग अद्यापही निघाला नाही.

Friday, November 03, 2017

मोर्चा निघणारच

मोर्चा निघणारच

नागपूर -  शासनाचा विकास खरच पागल झाला आहे......शासनाला सर्व कामे, उपक्रम फुकट करून घ्यायची आहे....तोडा फोडा व झोडा अशीच स्थिती निर्माण करून शिक्षक संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न असून सरकारी जि प शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे.
आजपर्यँच्या इतिहासात दरवर्षी बदल्या होतील असा GR निघाला नाही....पण आज 27/02 च्या GR मुळे घडणार आहे....कारण वास्तव्य कालावधी हा शाळा किंवा तालुका स्तरावरील गृहीत न धरता.....*जिल्ह्यातील एकूण 10 वर्षे सेवा झालेला शिक्षक हा बदलीपात्र ठरवून तो संवर्ग 1 किंवा 2 मध्ये येई पर्यंत दरवर्षी बदलीपात्र राहणार व दरवर्षी त्याच्यावर बदलीची टांगती तलवार राहणार......हे 100% सत्य👌

ऑनलाईन कामा संदर्भात कुठलीही पायाभूत सुविधा न पुरविता सर्व कामे शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या खिशातून (वेतनातून) करावी ही शासनाची सक्ती म्हणजे आपल्याला आर्थिक गुलामगिरी कडे नेणारी बाब आहे...👌

शाळा A श्रेणी मध्ये आणावी तरच वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर हा तर शिक्षकांना न्याय हक्का पासून वंचित करण्याचा डाव आहे.....👌
गुणवत्ता वाढावी, शाळा सुंदर असावी यामध्ये कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही......पण दरवर्षी बदली पात्र शिक्षक राहणार असेल तर....गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही.... हेही तितकेच खरे👌

विद्यार्थी म्हणजे यंत्र व शिक्षक म्हणजे कामगार अशी नेमकी घोडचूक शासन करीत असून 27/02च्या GR ने अस्थिरता निर्माण करीत आहे...👌

*सजीवांच्या आंतरक्रिया, भाव भावना यांचे नाते तोडून तांत्रिक बाबी यशस्वी (ऑनलाइन बदल्या) करण्याचा असीम  अट्टाहास सुरू आहे.*

@ शरद भांडारकर
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना, नागपूर