काव्यशिल्प Digital Media: वाघिणीचा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वाघिणीचा. Show all posts
Showing posts with label वाघिणीचा. Show all posts

Saturday, February 03, 2018

 वाघिणीचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत;दहा दिवसात दुसरी घटना

वाघिणीचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत;दहा दिवसात दुसरी घटना

 तळोधी/प्रतिनिधी: 
तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनविभागात चांगलीच खडबड उडाली आहे. सदर घटना हि शनिवारला दुपारच्या सुमारास उजेडात आली. मृत वाघीण हि कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने नेमका वाघिणीचा मृत्यू कशाने झाला हे अजूनही समजू शकले नाही. चंद्रपूर जिल्हा हा पत्तेदार वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात वाघांचे सर्वात जास्त प्रमाण आहे.या वाघिणीचा मृत्यू हा जवळ पास ७ ते ८ दिवसा अगोदर झाला असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविल्या जात आहे .गेल्या काही दिवसा अगोदर येथून जवळचा असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती.याच घटने पासून तब्बल १०  दिवसातच जवळच असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.  त्यामुळे  वारंवार होत असलेल्या वाघांचा मृत्यू वनविभागाच्या चांगलाच जिव्हारी लागू शकतो. मिळालेल्या  माहिती वरून वाघाचा मृत्यू हा नैसर्गिक रित्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती होताच वनअधिकारी व वनकर्मचारी यांचा ताफा घटना स्थळी पोहचला मात्र तो परियंत अंधार पडला असल्याने वाघिणीचे  शवविच्छेदन होऊ शकले नाही , त्यामुळे रविवारला या  वाघिणीचे शवविच्छेदन होणार असल्याची माहिती वनधिकारी यांनी दिली.त्यामुळे वाघिणीचे मृत्यूचे नेमके कारण काय ? हे अजूनही कळू शकले नाही.