काव्यशिल्प Digital Media: खड्डे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label खड्डे. Show all posts
Showing posts with label खड्डे. Show all posts

Sunday, August 05, 2018

चंद्रपुरात उड्डाण पुलाच्या खड्ड्यात पडला १२ वर्षीय मुलगा

चंद्रपुरात उड्डाण पुलाच्या खड्ड्यात पडला १२ वर्षीय मुलगा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. कंत्राटदाराने पिल्लरसाठी खड्डे खोदले़ मात्र या खड्ड्यांभोवती सुरक्षेकरिता कठडे लावले नाही. दिशादर्शक फलक व पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था देखील न केल्याने याच परिसरातील श्रुक्र्वारी एका १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला असता,
शुक्रवारी रात्री ९ वाजता आपल्याच आनंदात रस्त्याने जात असलेल्या  प्रित पाटील नामक मुलगा अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिप्रित सताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माणुसकीचा प्रत्यय दिला़.हा खड्डा प्रित यांच्या उंची पेक्षा मोठा हों व त्यात मोठ्या प्रमाणत चिखल साचले होते.या चिखलात तो मानेपरीयंत फसला,त्याला खड्ड्याचा अंदाज न आल्याने पिल्लरच्या तो खड्ड्यात पडला. ही घटना नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून बालकाला सुखरूप बाहेर काढले़ कंत्राटदाराच्या चुकीमुळेच ही घटना घडली़ सात दिवसांच्या आत फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी दिला आहे.