সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 31, 2017

  गोरेवाडा ते बर्डी बस सेवेचा शुभारंभ

गोरेवाडा ते बर्डी बस सेवेचा शुभारंभ

परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी दाखवली हिरवी झेंडी

नागपूर : नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने ‘आपली बस’ या उपक्रमाअंतर्गत गोरेवाडा ते बर्डी या बस सेवेचा शुभारंभ मंगळवार (ता.३१) ला गोरेवाडा बस स्टॉप येथे करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, नगरसेविका अर्चना पाठक, संगीता गिऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

गोरेवाडा येथून सुटणारी बस नायडु बंगला, काटोल नाका, दाभा गाव चौक, मारोती सेवा शोरूम, विद्यापीठ परिसर, रवीनगर, धरमपेठ मार्गे बर्डी अशी धावणार आहे. गोरेवाडा येथून पहिली बस सकाळी ७ वाजता तर अखेरची बस रात्री ९.३५ ला निघेल. बर्डी येथून पहिली बस ६ वाजता सुटेल तर शेवटची बस रात्री ८.३० ला निघेल. तिकीटाचे दर गोरेवाडा ते बर्डी २३ रूपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटीचे दर १२ रूपये इतके राहील. कार्यक्रमाला विनीत पाठक, विद्याधर मिश्रा, विनय कडु, दीपक सिंग, शिवप्रसाद, विक्की मिश्रा, रजनी पांडे, रेणू दास, परिवहन विभागाचे रामराव मातकर, एस.जी.सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.
एकतेची ज्योत अखंड तेवत राहो : महापौर नंदा जिचकार

एकतेची ज्योत अखंड तेवत राहो : महापौर नंदा जिचकार

‘रन फॉर युनिटी’ : नागपूरकरांनी दिला एकता आणि स्वच्छतेचा संदेश

नागपूर : जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले त्याकाळात देशवासीयांनी ‘एकते’चे दर्शन घडविले. नागपूरकरांनी वेळोवेळी एकतेचा परिचय करून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपूरकरांनी एकतेचे दर्शन घडविले. ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून नागपूरकरांनी दिलेला ‘स्वच्छ भारत’चा संदेश लाख मोलाचा असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी संविधान चौकातून ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. दौडच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, विधी समिती सभापती ॲड.मिनाक्षी तेलगोटे, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना शासनाने केवळ घोषित केल्या नाहीत तर त्या अंमलात आणल्या. देशातील आणि राज्यातील शासनाचा कारभार गेल्या तीन वर्षात पारदर्शक राहिला आहे. पुढील काळात तो अधिक पारदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशावर कुठलेही संकट आले तर या देशाचा नागरिक प्राणार्पण करायला तयार आहे. अशा या देशात नागरिकांच्या मनात एकतेची ज्योत सतत तेवत राहो, असे प्रतिपादन त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत नागपूरकरांमध्ये त्यांच्या जबाबदारीविषयी जागृती झाली आहे. नागपूर स्वच्छ आणि सुंदर करण्यात नागपूरकरांचा वाटा मोठा आहे. त्यांच्याशिवाय ते शक्य नाही. ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून ‘एकते’सोबतच ‘स्वच्छते’चाही संदेश नागपूरकर देत असून भविष्यात या देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नागपूरची ओळख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी घाटरोड चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. कार्यक्रमस्थळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मार्गदर्शनानंतर दौडमध्ये सहभागी झालेल्यांना महापौर नंदा जिचकार यांनी ‘एकते’ची शपथ दिली. त्यानंतर ‘एकता दौड’ला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली.
राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात

राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात

तीन वर्षात राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा - आमदार प्रकाश गजभिये

नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप शिवसेना सरकार तिन वर्षाच्या काळात जनतेच्या विश्वासावर अपयशी ठरले आहे, याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात संविधान चौकात भाजपचा तिसरा दिवस, होम हवन व कळूघाटा वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यंाना निवेदनाव्दारे तीन वर्षात राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात असून राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. भाजप शिवसेना सरकारने तिन वर्षाच्या काळात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामांचे भुमीपूजनच केले, कोणतीही नविन योजना न आणता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील योजनांचे निव्वळ नावे बदलविण्यात स्वताची पाठ थोपून घेतली. राज्यातील जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅस, जिवनावश्यक वस्तू, भाजीपाला आदींच्या किंमती वाढवून ‘‘अच्छे दिन’’ च्या रूपात नविन भेट दिली आहे.
मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

सामाजिक क्षेत्रात सेवा देऊन महापालिकेचा गौरव वाढवा : दीपराज पार्डीकर

नागपूर : नागपूर महानगरपालिकेला विविध माध्यमातून सेवा दिली, आता सामाजिक क्षेत्रात सेवा देऊन महानगरपालिकेचा लौकिक वाढवावा, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले. महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप व सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक आयुक्त महेश धामेचा, मनपा कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक विजय ताथोटे, मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे, मनपा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, सचिव डोमाजी भडंग, नागपूर मनपा कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व सेवानिवृत्त झालेले सुरेंद्र टिंगणे प्रामुख्याने उपस्थित होते.

 आॅनलाईन फ्राॅड करुन पैश्याची फसवणुक करणाऱ्याला चंद्रपूर पोलीसांकडून अटक

आॅनलाईन फ्राॅड करुन पैश्याची फसवणुक करणाऱ्याला चंद्रपूर पोलीसांकडून अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:(लालित लांजेवार)
दिनांक 06 सप्टेंबर 2017 रोजी रात्रो दरम्यान फिर्यादी सौ. त्रिरत्ना नारायण मेश्राम रा. नगीनाबाग चंद्रपूर हयांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार नोंदविली कि, कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे बॅंक आॅफ इंडिया येथील खात्याच्या एटीएम कार्डचे 16 अंकी नंबर व पासवर्ड वापरून फिर्यादीचे खात्यामधुन 15,945/-रू चे आॅनलाईन शॉपिंग करून तिची फसवणुक केली आहे. यावरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक 1473/2017 कलम 420 भादंवि चा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा हा तांत्रिक स्वरुपाचा असल्याने गुन्हयाचा पुढील तपास सायबर सेल चंद्रपुर कडे सोपविण्यात आला.

श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, आणि श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोउपनि श्री. विकास मुंढे व सायबर सेल चंद्रपूरचे पथकाने सदर प्रकरणातील फिर्यादीचे खात्यामधुन झालेल्या आर्थिक व्यवहाराचे तांत्रिक विष्लेशण करून प्राप्त पुराव्याच्या आधारे उत्तर प्रदेशातील मऊ जिल्हयातील अनुपार मठिया येथील काही नवयुवकांनी सदर अपराध केल्याचे निश्पन्न झाल्याने सायबर सेल येथील पथकाने उत्तर प्रदेश येथे जावुन त्या गुन्हेगारापैकी एका युवकास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

 सदर आरोपी कडुन 3 मोबाईल, 9 सिम कार्ड आणि 4 मेमोरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपीस गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता त्यांने सांगीतले की, ज्यावेळी एखादा इसम एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी उभे असतात त्यावेळी बरेच लोक एटीएम कार्ड हातात घेवुन उभे राहतात, तेव्हा आरोपी व त्याचे साथीदार हे एटीएम मध्ये उभे राहुन लोकांच्या हातात असलेल्या एटीएम कार्ड चे 16 अंकी नंबर, एक्सपायरी डेट, नांव इत्यादी पाहुन ते पाठ करून घेतात किंवा त्यांच्याकडील छोटया मोबाईलमध्ये नंबर डायल करुन घेतात व त्यानंतर सदर इसम एटीएम मध्ये पैसे काढण्याकरीता 04 अंकी पासवर्ड पिन टाकत असतांना त्यांचे मागे राहुन पासवर्ड सुध्दा पाठ करून घेतात. सदर प्रक्रीयेला सायबरच्या भाषेत SHOULDER SURFING AND SKIMMING CRIME म्हणुन संबोधले जाते.

गुन्हेगाराकडुन एटीएम कार्डचा 16 अंकी नंबर, एक्सपायरी डेट, नांव, पासवर्ड ई. प्राप्त झाल्यावर आॅनलाईन पैश्याची अफरातफर करणे सोयीचे होते. आणि याच पद्धतीचा वापर करून सदर गुन्हा केल्याचे आरोपीने प्राथमिक तपासात कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने प्राथमिक तपासात त्याचे साथीदाराचे नाव सांगीतले आहे, सद्या आरोपी हा 05 दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.


एकंदरीत सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासात ही बाब प्रामुख्याने निर्दशनास येते की, सर्वसामान्य लोकांकडुन एटीएम चा वापर करतांना विविध बैंके कडुन निर्गमित सुचनांचे योग्य पालन न केल्यामुळे, एटीएम मध्ये अगोदर असलेल्या इसमांचे व्यवहार पुर्ण होण्याअगोदरच आंत जावून गर्दी करणे, एटीएम मध्ये निश्काळजीपणाने वापर केल्यामुळे, एटीएम मशीनमध्ये पासवर्ड टाकतांना किंवा कार्ड स्वाईप करते वेळेस आजु-बाजुस छुपा कॅमेरा किंवा एखादा इसमांची नजर असु शकते याचे भान न ठेवणे ईत्यादि प्रकारचा गुन्हेगारांकडुन अभ्यास होवून अशा प्रकारचे गुन्हे करतात.

तरी, याद्वारे सर्व नागरीकांना पुनश्च आवाहन करण्यात येते की, बैंक व्यवहार/एटीएम व्यवहार/ आॅनलाईन शॉपिंग /दुकानातील स्वाईप कार्ड शॉपिंग करतांना काळजीपूर्वक आर्थिक व्यवहार करावा. तसेच फोनद्वारे कोणासही एटीएमचा 16 अंकी नंबर, सीवीवी नंबर आणि नंतर ओटीपी देण्यात येवू नये. तसेच एटीएम कार्डचे पासवर्ड पिन चेंज केले नसेल त्यांनी त्वरीत सदर पिन चेंज करावे. सर्वांनी त्यांच्या प्रत्येक आॅनलाईन अॅकाऊन्टचा पासवर्ड दर तिन महिण्याने नियमित चेंज करावेत. जेणे करुन आपल्या कडुन होणाऱ्या आंशीक चुकांचा गुन्हेगारांनी फायदा घेवू नये.असे आवाहन चंद्रपूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती द्या

विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती द्या


 भाजप ओबीसी मोर्चाचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती साठी गत शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळाली नाही. अनेकदा महाविद्यालयात विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर दिल्या जात आहे. हा प्रश्न तात्काळ निकाली कडून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चा चंद्रपूर यांनी समाजकल्याण विभागाकडे निवेदन दिले. शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या ओबीसी, एस. सी, एस. टी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप केली जाते. मात्र, गत शैक्षणिक सत्र २०१६-१७ या वर्षातील शिष्यवृत्तीचे फार्म भरून सुद्धा चंद्रपूर जिल्यातील एकही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने व महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला रोष व्यक्त केले आहे. समाज कल्याण अधिकारी यांनी तातडीने सर्व मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तात्काळ वाटप करावे अशी मागणी भाजप ओबीसी मोर्च्याचे महानगर जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग चंद्रपूर यांचे कडे केली आहे. यावेळी शिष्टमंडळ अभिषेक वाढरे, तुषार येरमे, शुभम गेडाम, प्रफुल नवघरे, प्रतीक नवघरे, आदिच्या समावेश होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता रॅली काढून केली नागरिकांमध्ये जनजागृती

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता रॅली काढून केली नागरिकांमध्ये जनजागृती

चंद्रपूर -नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहास सुरुवात झाली असून आज शहरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली. या सप्ताहात 4 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली.

30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या अवधीत दक्षता विषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्रीय दक्षता आयोगाने घेतला आहे. ‘मेरा लक्ष्य – भ्रष्टाचार मुक्त भारत’ अशी यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. सप्ताहाचे आयोजन राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत करण्यात यावे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावेळी सांगितले आहे
महामानवाचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर

महामानवाचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर

काव्यशिल्प /ऑनलाइन:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे.या अध्यादेशानुसार विद्यार्थी ७ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत.

                 ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जि. सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. इतकेच नव्हे तर ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
               परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्याव्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला, हे विशेष.
                कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे शासनाने या अध्यादेशानुसार जाहीर केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठपुराव्यास उचित न्याय दिला.
6 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिन

6 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिन


चंद्रपूर/प्रतिनिधी :- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते.  या लोकशाही दिनानिमित्य नागरीक व शेतकरी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल करतात.

            नोव्हेबर  महिन्याचा पहिला सोमवार हा 6 नोव्हेबर 2017 रोजी येत असल्यामुळे यादिवशी  लोकशाही दिनाचे आयोजन नेहमीप्रमाणे दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्‍यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाच्या प्रतीसह अर्ज सादर करावे. त्यानंतरच सदर तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल. या लोकशाही दिनात निवेदन स्विकारण्याची वेळ दुपारी 12.00 ते 1.00 वाजेपर्यंत राहील असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
विविध मागण्यांना घेऊन पाणलोट कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विविध मागण्यांना घेऊन पाणलोट कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


चंद्रपूर/प्रतिनिधी: - राज्याच्या वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पात गेल्या सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी तत्वावर सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश काढताच कर्मचाऱ्यांसमोर उपासमारीचे संकट उभे झाले असून जिल्हयातील पाणलोट कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले.

वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जलसंधारणाची कामे सरकारने हाती घेतली होती.हि कामे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात कंत्राटी तत्वावर कर्मचारी नेमण्यात आले होते.ज्यामध्ये समुदाय संघटक,उपजीविका तज्ञ्.कृषी तज्ञ्,जिल्हा प्रशिक्षक समन्वयक,लेखा लिपिक ,संगणक प्रशासक,डेटा एंट्री ऑपरेटर,शिपाई स्थापत्य अभियंता आदी पदे भरण्यात आली होती. गेल्या सहा ते सात वर्षांपासून हा प्रकल्प सुरळीत सुरु असताना मागील एक महिन्यापासून हा प्रकल्प राज्य सरकाने गुंडाळला आहे.त्यामुळे राज्यातील चार हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत ६० ते ७० कर्मचारी आहेत. शासनाने प्रकल्पच बंद केल्याने आता काम कुठे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात यावी,प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची जेष्ठता यादी तयार करून अन्य प्रकल्पात समायोजन करण्यात यावे. मृद व जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय रचनेमध्ये पाणलोट कर्मचारी यांचे समायोजन करण्यात यावे. या मागण्यांकरिता पाणलोट कर्मचाऱ्यांनि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी याना कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक लांडगे,पंकज गणवीर,मंजू कांबळे,संजय बोडे,सारून बारसागडे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.


Monday, October 30, 2017

रामाळा तलाव

रामाळा तलाव

  • रामाळा तलाव चौपाटीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा उचलणार पाऊल - चौपाटीवर लागणार सी.सी.टी.व्ही सह सुरक्षारक्षक 


  • माता जागरणाच्या नावाखाली बल्लारपुरात अश्लील डॉन्स -
  •  भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन



  • त्या आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी जमिनीत पुरलेले शव वाहेर काढून केले नातलगांच्या सुपूर्द - सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप


चंद्रपुरात प्रवेश करण्या अगोदर वे ब्रिजवर आकारण्यात येणारा टोल अवैध - 
चौकशी करून कारवाई करण्याची पप्पू देशमुख यांची मागणी 

सहाय्यक फौजदाराची आत्महत्या

सहाय्यक फौजदाराची आत्महत्या

नगर : स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी भागातील जॉगिंग ट्रॅक जवळील गुलमोहराच्या झाडाला त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली
आर्थिक मदत द्या; अन्यथा तीव्र निदर्शने किसान क्रांती मोर्चा

आर्थिक मदत द्या; अन्यथा तीव्र निदर्शने किसान क्रांती मोर्चा

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
 धान पिकाचे सर्वेक्षण करून एकरी 25 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा 1 नोव्हेंबर 2017ला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार -किसान क्रांती मोर्चा

आता रामाळा तलाव चौपाटीवर राहणार सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍याची नजर ;२ सुरक्षा रक्षक असणार तैनात

आता रामाळा तलाव चौपाटीवर राहणार सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍याची नजर ;२ सुरक्षा रक्षक असणार तैनात


चंद्रपूर/प्रतिनिधी:( ललित लांजेवार)
शनिवारी रात्री रामाळा तलाव परिसरात स्टंटबाजी करण्याच्या नादात 2 निर्दोष तरुणांचा बळी गेला. या घटनेनंतर चंद्रपूर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे,आणि रामाळा तलाव परिसरात आवश्यक असतील तितके सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय  यासोबतच त्या परिसरात दोन सुरक्षा गार्ड किंवा दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. काही दिवसा अगोदर या तलावाचे सुशोभिकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले होते. यानंतर तलाव परिसराचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक या परिसरात संध्याकाळच्या वेळेला चांगलीच गर्दी करत असतात. या परिसरातील रस्ता मोठा असल्याने अनेक युवा वर्ग या ठिकाणी आपल्या दुचाकीने स्टंटबाजीचा प्रकार करत असतात त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर मनपा प्रशासनाने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी काव्यशिल्पशी बोलताना सांगितले.




वढा यात्रेनिमित्त जिल्ह्यातून विशेष बस सेवा

वढा यात्रेनिमित्त जिल्ह्यातून विशेष बस सेवा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
घुग्गुस येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त  येत्या शनिवार पासून मुख्य यात्रा भरणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे. भाविकांची गर्दी लक्षात व त्यांना दर्शनासाठी कोणतीही गैरसोय व्हायला नको या अनुशंघाने विभागीय नियंत्रक कार्तिक सहारे  यांनी हि सोय उपलब्ध करून दिली आहे .

पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर प्राचिन विठ्ठल रुक्मिनीचे मंदीर आहे. वढा व जुगाद येथील प्राचिन शिवमंदिर धार्मिक विविधतेने परिचित आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी या पंचक्रोशीतीलच नव्हे तर, विदर्भातून हजारो भाविक येथे स्नान करण्याकरिता येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेवून चंद्रपूर एसटी महामंडळाकडून यात्रेकरिता विशेष बसेस व्यवस्था करण्यात आली आहे.

यात चंद्रपूर आगारातून 9 बस,राजुरा आगारातून ४ बस,चिमूर आगारातून ४ बस आणि वरोरा आगारातून ५ बस,अश्या प्रकारे बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे,या बस सेवेचा भाविकांनी  लाभ घेण्याचे आव्हाहन विभागीय नियंत्रक चंद्रपूर यांनी केले आst bus साठी प्रतिमा परिणाम
 चंद्रपूरकरांना मिळणारा दूषित पाणीपुरवठा बंद करा; मनपा आयुक्तांची पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला सूचना

चंद्रपूरकरांना मिळणारा दूषित पाणीपुरवठा बंद करा; मनपा आयुक्तांची पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला सूचना


 चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यावर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगर पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे जलशुद्धीकरणाच्या ठिकाणचे पहिले स्वच्छताकरण करा व नंतरच नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आल्यानंतर "संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे" अध्यक्ष राजेश बेले यांनी ही बाब चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्तांनी यावर लक्ष देत शहर अभियंता मार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला जलशुद्धीकरण होणाऱ्या शुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्याचे आदेश दिले.व त्यानंतरच पाणीपुरवठा करा असे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे अनेक नागरिकांच्या प्रकृतीवर देखील परिणाम पडून विविध आजारांची लागण होत असल्याचे लक्षात आल्यावर मनपाने जलशुद्धीकरण केंद्राची घान स्वच्छ करुण  झाल्यावर फोटो देखील पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.

ओबीसी युवा आघाडी जिल्हा कार्यकारणी गठित

ओबीसी युवा आघाडी जिल्हा कार्यकारणी गठित


चंद्रपुर/प्रतिनिधी -  रविवारी ओबीसी युवा आघाडी तर्फे चंद्रपुर जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.ओबीसी समाजाच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या युवा वर्गाची साखळी तयार करून भविष्यात ओबीसी हितासाठी लढा देणाऱ्या समाजकार्यात नेहमी तत्पर असणाऱ्या युवकांना नियुक्ति पत्र जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ डवरे, ओबीसी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.किरनताई भडके यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस पदी अभिषेक वांढरे आणि राहुल लांजेवार, जिल्हा सचिव पदी रोशन गिरडकर, जिल्हासंघटक पदी  मेघनाथ दुरटकार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष खनके.., आणि शहर कार्यकारिणी मध्ये शहर अध्यक्ष पदी सत्यम गाणार, उपाध्यक्ष पदी प्रफुल नवघडे, सरचिटणीस पदी आकाश मस्के, संपर्क प्रमुख पदी चेतन लाखे यांची नियुक्ती करण्यात आली.

सी. माे. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

सी. माे. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

श्रीराम पान्हेरकर, सुशीला बिजमवार, डाॅ. डी.बी. बनकर, गणेश खवसे अाणि डाॅ. अशाेक धाबेकर यांना पुरस्कार

नागपूर, दि. २९  (प्रतिनिधी) – सी. माे. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ चे पुरस्कार जाहीर करण्यात अाले असून येत्या १ जानेवारी राेजी नागपूर येथे  हे पुरस्कार वितरीत केले जातील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नारायण समर्थ यांनी दिली.

दिव्यागांसाठी कार्य करणारे चंद्रपूरचे श्री. श्रीराम पान्हेरकर यांना डाॅ. गाेविंद समर्थ अपंग सेवा कार्य पुरस्कार, व्यसनमुक्ती अाणि भूदानाचे काम करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील  साखरा येथील श्रीमती सुशीला बिजमवार यांना मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात काम करणारे अाणि गरीब हाेतकरु विद्यार्थ्यांना वसतीगृह उपलब्ध करून देणारे नागपूरचे डाॅ. डी. बी. बनकर यांना ना. बा. सपाटे अादर्श शिक्षक पुरस्कार, पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणारे श्री. गणेश खवसे यांना सी.माे. झाडे ग्रामीण  पत्रकारिता पुरस्कार अाणि अाराेग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करून सातत्याने जनजागृती करणारे डाॅ. अशाेक धाबेकर यांना डाॅ. अतुल कल्लावार  अाराेग्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात अाला अाहे.

पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी पाच हजार रुपये राेख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे अाहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गिरीश गांधी,  सर्वाेदयी विचारवंत अॅड. मा. म. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत साेमवार दि. १ जानेवारी २०१८ राेजी नागपूर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार अाहे.

Sunday, October 29, 2017

इको-प्रो च्या 'मन की बात' मधे गौरवपूर्ण उल्लेख

इको-प्रो च्या 'मन की बात' मधे गौरवपूर्ण उल्लेख

मन की बातऐकण्यासाठी


चंद्रपूर/ प्रतिनिधी: चंद्रपूर शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी इकाॅलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन म्हणजेच इको-प्रो संस्थे तर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज  229 दिवस पूर्ण झालीत. या स्वच्छता अभियानाचा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात ३७ व्या कार्यक्रमात करीत कामाचा गौरव केला.  ही बाब चंद्रपुर शहरासाठी तसेच इको-प्रो संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे. त्यामुळे चंद्रपूरचे नाव पुन्हा एकदा भारताच्या नकाशावर वर आले आहे.

खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे अभियानातील सहभागी सर्व सदस्याचे मनोबल उंचवले आहेत. मन की बात मध्ये इको-प्रोच्या कार्याची दखल म्हणजे संस्थेस मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आहे. यामुळे संस्थेचे काम अधिक जोमाने पुढे नेण्यास आणखी बळ मिळाले आहे असे मत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडु धोतरे यांनी व्यक्त केले. आपल्या आसपासच्या अस्वच्छतेकडे निराशाने न पाहता, संकट म्हणुन न पाहता एक आवाहन म्हणुन स्विकारावे, सातत्य आणी एकतेने सर्व आवाहने यशस्वी केले जाऊ शकतात.

सदर किल्ला स्वच्छता अभियान ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत जिल्हातील ऐतीहासीक वारसा संवर्धनाचा उद्देश समोर ठेवुन सुरू करण्यात आलेला आहे जे आजही नियमीतपणे अविरत सुरू आहे. ‘मन की बात’ मधे या सातत्यपुर्ण अभियानाचा तसेच अभियानातील सहभागी सर्व कार्यकत्र्याचे कौतुक केले आहे. स्वच्छताच नाहीतर आपला एेतिहासिक वारसा जतन केला जावा याकरीता सुध्दा या अभियानाचे महत्व असुन अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छते संदर्भात कार्य केले गेले पाहीजे असा उल्लेख सुध्दा केला. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या या अभियानाचे सामुहीकता आणी सातत्यता याचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे.

सदर किल्ला स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन नियमीतपणे रोज सकाळी 6 ते 10 या वेळेत इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. आज या अभियानाचा 229 वा दिवस असुन आजही सदर अभियान सुरू आहे. या अभीयानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन 550 वर्ष जुना किल्ला परकोट जो जवळपास 11 किमी बांधण्यात आलेला आहे. आज या किल्लाची परिस्थीती खंडहर स्वरूप झालेली आहे. यावर मोठया प्रमाणात वृक्ष-वेली, झाडी-झुडपे वाढलेली होती. मोठया प्रमाणात घर बांधकामाचे वेस्ट या किल्लाच्या पादचारी मार्गावर फेकण्यात आलेले होते. तसेच किल्ला लगतच्या घरातील अडगळ सुध्दा यावर ठेवण्यात आलेली होती. हे सर्व सफाई करून किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज 11 किमी किल्लाची भितींपैकी जवळपास 7 कीमी लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकुण 39 कुण बुरूज पैकी 25 बुरूज स्वच्छ करण्यात आलेले आहे. 4 मुख्य दरवाजे, 5 खिडक्या पैकी 4 खिडक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत.

 केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी 29 सप्टे 2017 रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर किल्लावर स्वच्छता अभियानात स्वःता श्रमदान करीता सहभागी झाले होते हे विशेष! केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या अभियानाची माहीती पंतप्रधान कार्यालयास एका पत्राव्दारे कळवीली होती तसेच पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रो च्या शिष्टमंडळाची भेट घेऊन अभियानाची संपुर्ण माहीती देण्यात आली होती.या अभियानात आतापर्यत चंद्रपूर येथील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैया अहीर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोश सलील, पुरातत्व विभागाचे वरीष्ठ अधिकारी एन ताहीर, श्री हाशमी, महापौर अंजली घोटेकर, महानगरपालीकेचे आयुक्त श्री संजय काकडे, जेष्ठ वन्यजीव अभ्यासक श्री गोपाल ठोसर, इतिहास अभ्यासक श्री तन्नीरवार, श्री अशोकसिंग ठाकुर यांनी भेट देऊन अभीयानाचे कौतुक केले आहे.
मे महिन्यात या अभियानाची दखल घेत चंद्रपुर येथील इंडियन मेडिकल असो. ने इको-प्रो चे अध्यक्ष बंडू  धोतरे  आणि त्यांची चमु आजचा सत्कार करीत या अभियनासाठी आर्थिक मदत सुद्धा केली होती.




timesofindia >PM Modi lauds Chanda NGO’s fort cleaning drive in Mann Ki Baat


A few days ago I received a very detailed report highlighting the story of transformation of Chandrapur Fort in Maharashtra. An NGO called Ecological Protection Organization launched a cleanliness campaign in Chandrapur Fort. In this campaign lasting for two hundred days, people performed the task of cleaning the fort, non-stop, without any fatigue and with team-work. Just think Two-hundred-days of continuous labour! They sent me photographs with a caption- ‘Before and After’! I was overwhelmed on seeing these and whoever will see these photographs, no matter how upset he is on witnessing the filth around him, and wondering how the mission of cleanliness will be fulfilled - then I have to tell such people that you can see for yourself the toil, resolve and determination of the members of the Ecological Protection Organization, in these living pictures.
Just on seeing these pictures, your disappointment will transform into hope. This mammoth effort of bringing about cleanliness is a wonderful example of fostering aesthetics, co-operation and continuum. Forts are symbols of our heritage. And it is the duty of all countrymen to keep our historical heritage safe and clean. I congratulate Ecological Protection Organization, their entire team and the people of Chandrapur.

-  http://www.firstpost.com/india

कंडोम ठरले फेल;आता होणार नसबंदी

कंडोम ठरले फेल;आता होणार नसबंदी

काव्यशिल्प/ ऑनलाइन:
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेशातील स्थानिक प्रशासनानं नवनव्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रोहिंग्यांच्या शिबिरांमध्ये कंडोम वाटूनही उपयोग न झाल्यामुळं अखेर रोहिंग्यांची नसबंदी करण्याचा विचार पुढं आला आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविरोधात तेथील लष्करानं कारवाई सुरू केल्यामुळं निर्वासितांचे लोंढे शेजारी देशांमध्ये धडकत आहेत. सर्वाधिक रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. बांगलादेशातील निर्वासित शिबिरांमध्ये आजघडीला ६ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान राहत आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या या निर्वासितांना अन्न व पाण्यांच्या सुविधा पुरवणं कठीण जात आहे. अशा स्थितीत त्यांची संख्या वाढत राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळंच रोहिंग्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. कुटुंब नियोजनासारख्या गोष्टींपासून ते खूपच लांब आहेत. त्यामुळं त्यांची कुटुंबं मोठी आहेत. रोहिंग्यातील अनेक पुरुषांना एकापेक्षा अधिका बायका आहेत. काही लोकांना १९ पेक्षाही अधिक मुलं आहेत. याची गंभीर दखल घेऊन स्थानिक प्रशासनानं रोहिंग्यांच्या शिबिरात कंडोम वाटप केलं होतं. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं स्थानिक प्रशासनानं केंद्र सरकारकडं नसबंदीची मोहीम राबवण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
काव्यशिल्पच्या बातमीची चंद्रपूर पोलिसांकडून दखल:

काव्यशिल्पच्या बातमीची चंद्रपूर पोलिसांकडून दखल:

त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई 

चंद्रपूर/प्रतिनिधी: "पोलिसांकडूनच  नियमांची ऐसीतैसी" या मथळ्याखाली शानिवारी काव्यशिल्प डिजिटल मिडियावर बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

या बातमीची दखल घेत चंद्रपूर पोलीस विभागाने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर चंद्रपूर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात आली. शानिवारी दिवसभर MH 34 BC 8660 ही शहरात गणवेशातील महिला पोलीस ट्रिपल सीट फिरत असताना आढळल्याने कोणीतरी पाठलाग करून ह्या वर्दीतल्या व नियम मोडणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा फोटो काढून तो व्हायरल केला होता.

या विषयाला अनुसरून बातमी प्रकाशित करताच पुलिस विभा विभागाकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे माहिती घेण्यात आली. व पूर्ण माहिती मिळाल्यावर त्या महिलेला वाहतूक शाखेत बोलण्यात आले व शहानिशा करून पोलिस विभागाने मो.वा कायद्यातील कलम 128/177  प्रमाणे ट्रिपल शीटची कारवाई करत दोनशे रुपये दंड ठोठावला.
त्या पोलिस कर्मचारी यांना जाब विचारला गेला असता त्यांनी सांगितले की ते शहराच्या बाहेर राहायला असल्याने  मुलीला ट्युशनला सोडायला गेले होते.

या संपूर्ण प्रकारावरून वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्या पोलिसांनाच "कायदेमे रहेंगे तो फायदेमे रहेंगे" असा संदेश दिला आहे.

Saturday, October 28, 2017

उपसरपंचावर तडीपारीची कारवाई म्हणजे सरकारच्या निर्लजपणाचा कळसच :वडेट्टीवार

उपसरपंचावर तडीपारीची कारवाई म्हणजे सरकारच्या निर्लजपणाचा कळसच :वडेट्टीवार


चंद्रपूर प्रतिनिधी
 सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वहाणगाव दारू विक्रीप्रकरण चांगलेच गाजत असतांना पोलीस प्रशासनाने वहाणगावव्हर उपसरपंच प्रशांत कोल्हे यांना ५६ दिवस तडीपारीची आदेश दिले.या प्रकरणी काँग्रेसचे  आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत उपसरपंचावर  तडीपारीची कारवाई म्हणजे सरकारच्या निर्लजपणाचा कळसच आहे अशी टीका आयोजित पत्रपरिषदेत केली.सरकार अवैध दारू बंदीवर पूर्ण पणे आद्य घालूशकत नाही आहे त्यामुळे दारूबंदी फोल ठरली असंदेखील ते म्हणाले.


स्टंटबाजीच्या नादात दोघां निर्दोष तारुणांचा मृत्यु

स्टंटबाजीच्या नादात दोघां निर्दोष तारुणांचा मृत्यु


चंद्रपूर /प्रतिनिधी:
स्टँड बाजी च्या नादात चंद्रपूर येथील  रामाला तलाव - जटपुरा  मार्गांवर  शनिवारी  रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एका भरधाव शेवरलेट गाडी पायी चालणाऱ्या 2 विशीतल्या तरुणाला चिरडले.मिळालेल्याप्राथमिक माहितीनुसार होंडा सिटी गाडी  त्या रोडवर स्टंटबाजी करत होती यात दोन युवक बसलेले होते. प्राथमिक माहितीवरुन  हे दोन युवक जेवण झाल्यानंतर रामाला तलाव मार्गाने फिरायला निघाले होते.  मात्र स्टंटबाजी करणाऱ्या या गाडी थेट त्यांच्यावर चढली त्यात त्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अविनाश पठारे आणि महेंद्र सोनार 20 वर्षे दोघही जेवण झाल्यावर रात्री फिरायला निघाले होते. बालीचे वडील जुबली हायस्कूल येथे चौकीदार असल्याचे सांगण्यात येत आहे.धड़क  इतकी जोरदार होती की धडक दिल्यानंतर हे तरुण  किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊन पडले ,गाडीत बसलेल्या पैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी रामनगर पोलिसांचा मोठा  फौज फाटा  तैनात करण्यात आला आहे.
दांपत्याची  रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

दांपत्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

पुणे, ता. कऱ्हाड- मुलीने प्रमेविवाह केल्याच्या नैराश्‍येतून येथील दांपत्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. बबन नारायण पवार (वय 56) व सुनंदा (वय 45) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
जनशताब्दी एक्‍सप्रेसचे इंजिन बंद

जनशताब्दी एक्‍सप्रेसचे इंजिन बंद


औरंगाबाद :  दादर - जालना जनशताब्दी एक्‍सप्रेस रेल्वेचे इंजिन शनिवारी (ता २८) कसारा घाट, इगतपुरी दरम्यान बंद पडले. चालत्या अवस्थेत गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन बंद पडल्याची माहिती सुत्रांनी दिली. अचानक बंद पडलेल्या इंजिनमुळे जनशताब्दी एक्‍सप्रेस साधारण दोन तास जागीच उभी होती. परिणामी मुंबईहून येणाऱ्या रेल्वेगाड्या खोळंबल्याचे चित्र होते. नंदीग्राम एक्‍सप्रेसही अर्धा ते एक तास लेट येईल अशी माहिती देण्यात आली.
व्हॉट्सअॅप Massage डिलिट करता येणार!

व्हॉट्सअॅप Massage डिलिट करता येणार!

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला संदेश परत घेत डिलिट करता येणार!

बरीच वर्षं एकदा एक संदेश व्हॉट्सअॅपवरून चुकून पाठवला की तो परत दुरुस्त किंवा डिलिट करता येत नव्हता. जरी आपण डिलिट केला तरी ज्यांना पाठवला आहे त्यांच्याकडे तो पोहोचायचाच म्हणजे तो फक्त आपल्याच फोनवरून डिलिट झालेला असायचा. आता मात्र दोन्ही फोनवरून संदेश काढून टाकण्याची सोय व्हॉट्सअॅप सुरू करत आहे! सात मिनिटाच्या आत जर Delete For Everyone पर्याय निवडला तर तो संदेश दोन्ही फोनवरून काढून टाकला जाईल! त्यामुळे आता एखादा संदेश चुकून पाठवला गेला कि लगेच तो मागे घेत डिलीट करता येईल!

  1. ही नवी सोय कशा प्रकारे वापरायची ?


1. व्हॉट्सअॅप उघडून जो संदेश डिलीट करायचा आहे तिथं जा
2. त्या संदेशावर टॅप करून दाबून धरा > डिलीटचे चिन्ह निवडा
3. Delete for Everyone निवडा
4. You deleted this message असं दिसेल.

डिलिट आयकॉन निवडल्यावर दोन पर्याय दिसतील
DELETE FOR ME : फक्त तुमच्या फोनमधून डिलीट होईल
DELETE FOR EVERYONE : तुमच्या व ज्याला संदेश पाठवला आहे त्याच्यासुद्धा फोनमधून डिलीट होईल!

यासाठी मर्यादा/नियम :
• पाठवल्यावर पहिल्या सात मिनिटाच्या आत डिलिट केला तरच दोघांसाठी डिलीट होईल
• सात मिनिटांच्या नंतर डिलिट केल्यास कोणत्याही मार्गाने Delete For Everyone करता येणार नाही!
• त्या सात मिनिटांमध्ये ज्यांना संदेश पाठवला आहे त्यांनी व्हॉट्सअॅप उघडलं तर ते तो संदेश वाचू शकतील!
• ही सुविधा वापरण्यासाठी दोघांकडे व्हॉट्सअॅपचं नवीन आवृत्ती असावी (Latest Version)
• ज्यांना संदेश पाठवला आहे त्यांच्या फोनमधून संदेश डिलीट झालाच आहे किंवा नाही यासंबंधी व्हॉट्सअॅप कोणतीही माहिती आपल्याला देणार नाही
महत्वाची बातमी

महत्वाची बातमी


नागपूर - मध्य रेल्वेकडून कामठी रोड गुरुद्वारा रेल्वे ब्रिज च्या डाऊन लाईन स्टील गार्डर दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर सुरू. शनिवारी दुपारपासून पुलाखालची वाहतूक बंद.
शेतात फवारणी करतांना शेतकऱ्याला विषबाधा; प्रकृती अस्वस्थ

शेतात फवारणी करतांना शेतकऱ्याला विषबाधा; प्रकृती अस्वस्थ


 चंद्रपूर /पोंभुर्णा:
चेकठाणेवासना येथे शेतात फवारणी करत असतांना रोजनदराचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शेतकरी गणपत वारलुजी सातरे यांना देखील फवारणी करतांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.लगेच त्यांच्यावर उपचार करत त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले सुद्धा त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे

ते भोई समाजातील प्रतिष्ठीत .व्यक्ति असून ते चंद्रपूर जिल्हा मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू हजारे हे तत्काळ विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पोहोचले.
                   देवाडा येथील मस्त्य व्यावसायिक सह संस्थेचे  ते अध्यक्ष असून ते अल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झालेला असल्याने ते किटकनाशक औषधी फवारणी करित होते.
तालुक्यात औषध फवारणी करणा-या रोजदाराचा मृत्यू  चेकठाणेवासना येथे घडली. ही घटना  ताजी असतांनाच  देवाडा खूर्द येथील शेतकरी गणपत वारलुजी सातरे यांना फवारणी करतांना विषबाधा होवून ते आजही अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर सरकारी इस्पीतळात उपचार सुरु आहे. ते भोई समाजातील असून ते चंद्रपूर जिल्हा मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.


देवाडा येथील मस्त्य व्यावसायिक सह. संस्थेचे  ते अध्यक्ष असून ते अल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झालेला असल्याने ते किटकनाशक औषधी फवारणी करित होते. ते आपल्या शेतीत फवारपणी करीत असतांना त्यांची प्रकृती अत्यन्त चिंताजनक झाली. मिळालेल्या माहितीवरून  सध्यातरी  रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी अजून तरी कोणीही प्रशासनाकडून कोणीही भेटण्यासाठी गेलेले नाही.यापूर्वी या क्षेत्राचे आमदार यांनी संबंधित विभागाला हे प्रकरण गांभीर्यांनी घेण्याचे निर्देश दिले असूनही  या प्रकरणाकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना असा सवाल यावेळी उपस्थित होतो.








पोलिसांकडूनच नियमाची ऐशीतैशी ;फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलिसांकडूनच नियमाची ऐशीतैशी ;फोटो सोशल मीडियावर व्हायरल


चंद्रपूर /प्रतिनिधी:
नियमांचे पालन करा अशा सातत्याने सूचना देणारे पोलिसच कसे नियमाचे उल्लघंन करतात याचा चांगला नमूना चंद्रपूर करांना आज बसस्थानक परिसरत अनुभवला.

चंद्रपूर मिळालेल्या महितीनुसार चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी भर दिवसा एक महिला पोलिस कर्मचारी आपल्या खाजगी गाड़ीवरुन MH.34.BC.8660 गाड़ी ट्रिपल सीट जातांना दिसली. यात त्या गाडीवर असणारे एक महिला पोलिस कर्मचारी व मागे बसणाऱ्या दोन्ही युवतीनी आपल्या चेहऱ्यावर स्कार्प बांधला आहे.   त्या गाडीचा कोणीतरी मागून पाठलाग करत आपल्या मोबाइल कॅमेरे फोटो काढला आणि हा फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाला. नियमानुसार दुचाकिने प्रवास करतांना ट्रिपल सीट प्रवास करू शकत नाही.हा कायद्याने गुन्हा आहे.हे माहित असून सुद्धा आम्ही पोलिस खात्यात आहोत आहोत आम्हाला कोणाची भीती नाही असा भ्रम बाळगणार्‍यांना सध्या सोशल मीडिया तिसरा डोळा म्हणून या घडामोडीनवर नजर ठेऊन असतो सध्या हा फोटो सध्या फेसबुक व्हाट्सएप यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात पोलीस चक्क ट्रिपल सीट जाताना दिसून येत आहे.

एखादा सामान्य व्यक्ती आपल्या गाडीवरून ट्रिपल सीट  बसवून घेऊन जात असतांना जर तुम्ही पोलिसांना दिसलात तर पोलीस नक्कीच तुमच्यावर वाहतूक नियम भंगाची कारवाई करतात. मात्र या प्रकरणात कायद्याचे रक्षण करणारेच कायदे पायदळी तुडवीत असतील तर अशा पोलिसांवर यांचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करातील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.

महावितरणच्या बड्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून गुन्हा दाखल

महावितरणच्या बड्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून गुन्हा दाखल

बुलढाणा /प्रतिनिधी:
 लाचलुचपत प्रतिबंध विभाग बुलढाणा येथे आज दिनांक २६/१०/२०१७ रोजी महावीतरण बुलढाणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजेंद्र प्रल्हाद सरनाईक(४७) तसेच राहुल विलास पवार(२५) सहाय्यक अभियंता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रखडलेले धनादेश काढून देण्यासाठी महावितरणाच्या या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच घेतली होती. त्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभाग बुलढाणा येथे तक्रारदाराने तक्रार नोंदवली. याच तक्रारीची दखल घेत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रश्नचिन्ह' समाजाला प्रेरणादायी उत्तरे देणारी धडपड  - सचिन कलंत्रे; समाजसेवक डाँ.गिरीधर काळे सामाजिक संस्थेचा उपक्रम

प्रश्नचिन्ह' समाजाला प्रेरणादायी उत्तरे देणारी धडपड - सचिन कलंत्रे; समाजसेवक डाँ.गिरीधर काळे सामाजिक संस्थेचा उपक्रम

चंद्रपूर/प्रतिनिधी :
            अनाथ व उघड्यावरच्या 450 फासेपारधी समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या जगण्याचा प्रश्नचिन्ह सोडवणारे तसेच भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'भिक मांगो आंदोलन' करणारे अमरावती येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मतिन भोसले यांनी सुरु केलेली 'प्रश्नचिन्ह' ही आश्रमशाळा समाजाला प्रेरणादायी उत्तरे देत आहेत. त्यासाठी त्यांची धडपड महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी केले. कोरपना तालुक्यातील समाजसेवक डाँ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक संस्था बिबी च्या माध्यमाने यंदापासून राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा 'जीवन गौरव पुरस्कार' मतीन भोसले यांना प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अँड.वामनराव चटप, समाजसेवक डाँ.गिरीधर काळे,  सविता काळे, सिमा भोसले, डाँ.अरुण कुलकर्णी, ठाणेदार रोकडे, संतोषकुमार पावडे, अंजना काळे, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेटकर, उपसरपंच आशिष देरकर, पोलीस पाटील राहूल आसुटकर, तंटामुक्त समितीचे शंकर आस्वले उपस्थित होते.
मागील 5 वर्षापासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त व ग्रामस्वच्छता मोहीमेने साजरी करण्यात येते. 'दिव्यग्राम 2017' या महोत्सवात हा पुरस्कार रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र देवून  सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.

शासनाचे कुठलेही अनुदान नसतांना ताटव्यांच्या शाळेत महाराष्ट्र व परप्रांतातील उघड्यावरच्या भिक मांगणा-या अनाथ पोरांच्या हातात मतिनने पाटी व पुस्तक दिले आहे त्यांची जिद्द समाजाला आशावादी ठेवण्याचे सुचक आहे असे मत माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मतिन भोसले यांनी 'प्रश्नचिन्ह' या आश्रमशाळेची निर्मीतीप्रकिया कथन केली. उघड्यावरच्या भिक मांगणा-या मुलांसाठी 6 वर्षापासून आपण स्वत: 'भिक मांगो आंदोलन' करत असून हे करतांना लोकांनी गुन्हे दाखल केले. तुरुंगवासाची शिक्षा भोगली. आज 'प्रश्नचिन्ह' ची अनाथ मुले उत्तराच्या शोधात शिक्षणाने मोठी होत आहे. शासनापेक्षा सामान्य जनतेची मदत मोठी असल्याचा मनोदय मतिन भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी उल्लेखनिय कार्याबद्दल चंदा झुरमुरे, हबीब शेख, शुभम ढवस, नामदेव घुगूल, नथ्थू घुगूल यांचाही सत्कार करण्यात आला. गावातील युवकांनी मान्यवर व गावक-यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीची शपथ घेवून नवा आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमाचे संचालन मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अविनाश पोईनकर यांनी केले. मानपत्राचे वाचन सुरज लेडांगे, प्रास्ताविक रत्नाकर चटप, तर आभार चंदू झुरमुरे  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतिश पाचभाई, गणपत तुम्हाणे, राजेश खनके, स्वप्निल झुरमुरे, महेश नाकाडे, शुभम डाखरे, हिराचंद्र कुमरे, इराणा तुम्हाणे, शंकर मडकाम, आकाश उरकुडे, समीर शेख, अकलेश येडमे, संदीप पिंगे, आकाश चटपल्लीवार, विठ्ठल अहिरकर, निलेश पानघाटे, प्राची लेडांगे यांनी परिश्रम घेतले.


 डाँ.गिरीधर काळे यांची समाजसेवा जगणे शिकवणारी - मतिन भोसले
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या हाडांवर निशुल्क उपचार करुन समाजाला आपले जगणे अर्पण करत आहे. समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांची समाजसेवा जगणे शिकवणारी आहे. यामुळे हा पुरस्कार मला नेहमी प्रेरणा देईल.

युवकांचे 'भिक मांगो आंदोलन'
मतिन भोसले यांच्या 'प्रश्नचिन्ह' शाळेतील अनाथ मुलांसाठी गावातील युवकांनी 'भिक मांगो आंदोलन' केले.  बिबी ग्रामस्थांनी योग्य प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली. गोळा झालेली मदत सामाजिक कार्यकर्ते मतिन भोसले यांना युवकांनी सुपूर्द केली.

 चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता विषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता विषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन


 चंद्रपूर /प्रतिनिधी:

नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहास सोमवारपासून (दि.30 ऑक्टोम्बर ) पासुन प्रारंभ होणार आहे . या सप्ताहात 4 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली.

30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या अवधीत दक्षता विषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्रीय दक्षता आयोगाने घेतला आहे. ‘मेरा लक्ष्य – भ्रष्टाचार मुक्त भारत’ अशी यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना आहे. 30 ऑक्टोबर 2017 रोजी एका समारंभात या सप्ताहाचा शुभारंभ होणार  आहे

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. सप्ताहाचे आयोजन राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत करण्यात यावे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती  असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in  तसेच नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक 1064 द्यावी , यासाठी चंद्रपूर येथील कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक देखील देण्यात आलेला आहे (०७१७२ -२५०२५१) असे परिपत्रकात नमूद आहे.

त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शहरातील प्रमुख भागात पथनाट्याचे (Street Plays) आयोजन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?
या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलक, स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. जिल्यातील तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती आयोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक डी.एम.घुगे यांनी दिली.






भाजपतर्फे रन ऑफ यूनिटी विषयावर बैठक संपन्न

भाजपतर्फे रन ऑफ यूनिटी विषयावर बैठक संपन्न


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 शुक्रवारी चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बल्लारपूर नगर परिषद आदरणीय श्री. हरीश भैया शर्मा यांच्या अध्यक्षते खाली ऍग्रो व्हिजन, मन की बात व रन फॉर युनिटी या विषयाबाबद जिल्ह्याची बैठक पार पाडण्यात आली.
या बैठकीला श्री रमेश जी मानकर यांनी ऍग्रो व्हिजन ची माहिती दिली व जिल्हा अध्यक्ष श्री. हरीश भैया यांनी मन की बात सर्व तालुक्या मध्ये कार्यकर्यांना घेऊन ऐकण्याचा आव्हान केला तसेच एक भारत श्रेष्ठ भारत रन फॉर युनिटी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्या मध्ये नगरपंचायत व नगरपरिषदांच्या माध्यमातून घेण्यात यावा अश्या सूचना केल्या.
या बैठकीला प्रामुख्याने ऍग्रो व्हिजन चे आदरनीय श्री. रमेश जी मानकर, माजी आमदार तथा माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री. अतुल भाऊ देशकर,  भाजपा जेष्ठ नेते आदरणीय श्री. प्रमोद भाऊ कडू, भाजपा जिल्हा महामंत्री आदरणीय श्री. संजय भाऊ गजपुरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री. ब्रिजभूषण जी पाजारे व आदी पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व महामंत्री उपस्थित होते.
भद्रावतीत बीमार छाव्याचा मृत्यू

भद्रावतीत बीमार छाव्याचा मृत्यू

  चंद्रपूर/भद्रावती;
भद्रावती परिसर आणि डिफेन्स हे दोन्ही जंगलालगत लागून असल्याने शुक्रवारी सायंकाळी बिबट्याचा ऐक छावा बीमार अवस्थेत आढळून आला. याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळतात छाव्याला गाठून चंद्रपूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. मिळालेल्या प्रार्थमिक माहिती वरुन वाटेत  येतांनाच त्याचा  मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारनंतर चंद्रपूरच्या ट्रांजिस्ट ट्रिटमेंट सेंटर मध्ये या बीमार छाव्याचे शवविच्छेदन करण्यात आले वृत्त लिहेपर्यंत वन विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

Friday, October 27, 2017

चंद्रपुरात स्वच्छता अभियानाचा फज्जा;महापालिकेला जनजागृतीची आवश्यकता

चंद्रपुरात स्वच्छता अभियानाचा फज्जा;महापालिकेला जनजागृतीची आवश्यकता

चंद्रपूर /प्रतिनिधी:
महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करतांना केली.यावेळी स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी चळवळीचे स्वरुप देण्यात आले.स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले होते.

कोणताही उपक्रम नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दोघांचे संगनमत असणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वच्छ भारत, निर्मल भारत अभियानाचा फज्जा मात्र नागरिकांच्या असहकार्याने उडाल्याचे चित्र  दिसून येतआहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर विकासाचे  स्वप्न बघण्याऱ्या चंद्रपूरात अक्षरश: घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शहरातील सपना टॉकीज समोर मागील काही दिवसापासून रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग रस्त्यालगत दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधि पसरत घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. या ठिकाणी या आधी महानगर पालिकेकडून कचरा कुंडी ठेवण्यात आली होती. मात्र हा रस्ता अरुंद असल्याने त्या ठिकाणची कचरा कुंडी उचलण्यात आली. आणि त्या ठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना घरातला कचरा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकावे असे आवाहन देखील करण्यात आले. अन्यथा 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल असे देखील या बॅनर वर लिहिण्यात आले आहे सोबतच मार्गदर्शक फलक सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ज्यात वर्गीकरणानुसार कचरा कसा आणि कोणत्या डब्यात टाकावा हे ह्यात नमूद केले आहे. मात्र इतकी जनजागृती करून सुध्दा या स्वच्छते योजनेचा या परिसरात तीन-तेरा वाजलेले दिसून येत आहे. याठिकाणी हा कचरा असाच रस्त्याच्या मधोमध असतो. मात्र महानगरपालिका यावर मार्ग काढत पर्यायी कचरा कुंडी दुसऱ्या ठिकाणी देत या ठिकाणची दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य रोखण्यास मदत करू शकते.

या परिसरात एक टॉकीज व इतर मोठमोठे प्रतिष्ठाने देखील आहेत हाच मार्ग समोर चंद्रपूर शहरातील मुख्य रेल्वे स्टेशनला जाऊन मिळतो अशा या मार्गावर अशा प्रकारची परिस्थिती ही चंद्रपूर करांसाठी लाजीरवाणीच बाब म्हणावी लागेल.

या संपूर्ण प्रकारांवरून महानगरपालिकेला नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता चंद्रपूर महानगरपालिकेला जनजागृती विषयी मोहीम राबवण्याची आवश्यकता भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने  छटपूजा उत्सव संप्पन

मावळत्या सूर्याच्या साक्षीने छटपूजा उत्सव संप्पन

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
 सूर्य देवतेची उपासना करणारे व्रत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  छटपूजेसाठी गुरुवारी लालपेठ कॉलरी येथील एका नदीकाठी हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि उपासनेला सुरूवात केली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पर्वाची शुक्रवारी (दि. २७) सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन सांगता होणार आहे.  कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी हे व्रत करण्यात येते.

                  या पूजेसाठी  घरातल्या अबालवृद्धांपासून शेकडो नागरिक  चंद्रपूर येथील इरई नदीकाठी  आपल्या कुटुंबासह आले होते. सूर्यास्ताच्या वेळी महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्ध्य दिले. शेतात पिकत असलेल्या सर्व फळांचा नैवेद्य दाखवून सूर्याची प्रार्थना करण्यात आली. पूजेसाठी टोपल्यातून फळे आणण्यात आली होती. त्यात सर्व प्रकारच्या भाज्या, सफरचंद, केळी, अननस इत्यादींचा समावेश होता, तसेच घरात तयार केलेल्या मिष्टांन्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
         आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी काही लोकांनी अर्ध्य दिले, तर काहींनी नवसपूर्ती झाली म्हणून पूजा केली. या वेळी सूर्याच्या १०८ वेळा जप करण्यात आला. या पूजेसाठी घरातल्या महिलांनी ४८ तासांपासून पाणी न पिता उपवास केले होते.  या पूजेमुळे  प्रत्येकाच्या मनात धार्मिक सलोख्याचे वातावरण तयार झाले होते .  दाम्पत्य ही पूजा करीत असल्याने पारंपरिक प्रथेनुसार छटपूजेसाठी लागणारे साहित्य डोक्यावर धरून एका टोपलीत पूजेच्या ठिकाणापर्यंत पुरूषांनी आणि महिलांनी या पूजेची मांडणी करत आरती आणि प्रार्थना केली.


बघा नागपूर येथील सक्करदरा चौकाची कचरा अवस्था...

बघा नागपूर येथील सक्करदरा चौकाची कचरा अवस्था...

हे आहे नागपूर येथील सक्करदरा चौक, या ठिकाणी सध्या दिवाळीच्या दिवसानिमित्य चांगलाच बाजार भरतो.मात्र नेह्मी बाजार संपला कि या ठिकाणी बिनकामाची सामुग्री रस्त्याच्या मधोमध टाकून अनेक विक्रेता निघून जातात. याच सक्करदरा परिसरात मार्केट लाईन असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा देखील निघतो मात्र कचरा कुंड्यांच्या कमतरतेने अश्या प्रकारे रस्त्याच्या मधोमध कचरा टाकला जातो ज्यामुळे परिसरात दुर्गंधी फैलत आहे. (छायाचित्र:ललित लांजेवार नागपूर )




भूमिपुत्र एकता युवा बहुद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भूमिपुत्र एकता युवा बहुद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
क्रिमिलेयरमधून कुणबी जातीला वगळण्याबाबतचे युद्ध सुरु होताच कुणबी समाजाकडून राज्यभरात विविध स्तरावर आक्षेप नोंदवण्यात येत आहे
याबद्दलच आक्षेप नोंदवित भुमिपुत्र एकता युवा बहुद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आलेग्रामीण भागात राहणार्‍या कुणबी- मराठा समाजाला अल्पउत्पन्न गटाच्या सवलती बंद करण्याच्या हालचाली शासनदरबारी चालू असून, राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाला सादर केलेल्या अहवालात कुणबी या जातीला क्रिमिलेअरच्या अटीमधून वगळण्याची शिफारस केली नसल्याची बाब समोर आली. अल्पमुदत व शासनाने केलेली लपवाछपवी ही बाब कुणबी समाजाला क्रिमिलेअरच्या सवलतींपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप कुणबी समाजातील मान्यवरांनी केला.

राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे कुणबी समाज राजकीयदृष्ट्या पुढारलेला असल्याने या समाजाला अल्पउत्पन्न गटाच्या सवलती सुरू ठेवाव्यात का? याबाबत अहवाल मागितला होता. यावर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात क्रिमिलेअरमधील ३४८ जातींपैकी ११६ जाती क्रिमिलेअरच्या अटींमधून बाहेर काढल्या आहेत. यामध्ये मात्र, कुणबी या जातीचा समावेश केला नाही. या संदर्भात क्रिमिलेयरमधून कुणबी जातीला वगळण्याबाबत आक्षेप नोंदवित असल्याचे निवेदन चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांन मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र युवा  बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, October 26, 2017

हातभट्टी उध्वस्त करत ६५ लाखाचा मोहा जप्त

हातभट्टी उध्वस्त करत ६५ लाखाचा मोहा जप्त

चंद्रपूर/सावली(प्रतिनिधी) :पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सावली पोलीस सटेशन अंतर्गत
मौजा किसान नगरला लागून असलेल्या झुडपी जंगलात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या हातभट्टीत दारू गाळण्याचा व्यवसाय सुरु आहे.
           या माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर मॅडम चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर उपविभागीय पोलिस अधिकारी मूल यांच्या नेतृत्वात पोलिस पथकांनी गावालगत लागून असलेल्या घनदाट झुडपी जंगलात दारू बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली.सदर शोध मोहीम राबवत असताना झुडपी जंगलात पोलिसांना ठिकठिकाणी शोध घेत हातभट्टी व सळवा उध्वस्त करत  ३२२ प्लास्टिक चुंगळ्या ज्यात ३२,२०० लिटर मोहा आढळून आला
             ,या मिळालेल्या मोहाची किंमत 64 लाख 40 हजार रुपये असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे , आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावली पोलीस करत आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक,तसेच विशाल हिरे,उपविभागीय पोलीस अधीकारी मूल ,यांच्या नेतृत्वात  पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे,पोलीस उपनिरीक्षक  जावेद शेख,पेटकुल,बावणे,मोहुर्ले,कोसनशीले,उईके,लाटकर,व इतर पोलीस कर्मचायांनी केली.