काव्यशिल्प Digital Media: शेतकरी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शेतकरी. Show all posts
Showing posts with label शेतकरी. Show all posts

Monday, September 10, 2018

आता शेतकऱ्यांची अडचण सोडवणार किसान कॉल सेंटर

आता शेतकऱ्यांची अडचण सोडवणार किसान कॉल सेंटर


Image result for किसान कॉल सेंटर' मुंबई/प्रतिनिधी:
कृषी मंत्रालयाने सुरू केलेल्या 'किसान कॉल सेंटर' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी केले आहे.
हे कॉल सेंटर राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४ विभिन्न ठिकाणी कार्यरत आहे. यासाठी ११ आकड्यांचा टोल फ्री क्रमांक १८००-१८०-१५५१ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर देशातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही मोबाइल/लॅन्डलाइन नेटवर्कवरून मोफत कॉल करता येतो. ही सेवा दररोज सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीमध्ये निरंतर सुरू असते. या क्रमांकावरून देशभरातल्या विविध २२ स्थानिक भाषांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांसाठी पुणे मुख्यालयी कार्यरत किसान कॉल सेंटरवरून मराठी व कोकणी या दोन भाषेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. दररोज दोन शिफ्टमध्ये चालणारे हे कामकाज ७२ विषयांच्या तज्ज्ञांच्या मदतीने चालविले जाते. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व माहितीसोबतच शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्यांवरदेखील समुपदेशन केले जाते.
किसान कॉल सेंटरचा प्रतिनिधी फार्म टेली अॅडव्हायजर (एफटीए) म्हणून ओळखला जातो. हा प्रतिनिधी कृषी किंवा कृषी मान्यताप्राप्त कृषी फलोत्पादन/ पशुसंवर्धन/ मत्स्यव्यवसाय/ कुक्कुटपालन/ मधमाशी पालन/ रेशीम उद्योग/ कृषिअभियांत्रिकी/ कृषिपणन इत्यादी विषयांतील पदवीधर किंवा उच्च पदवीधर असतो.
हे प्रतिनिधी स्थानिक भाषेमध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ताबडतोब प्रतिसाद देतात. फार्म टेली अॅडव्हायजरीद्वारे ज्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकत नाहीत, ते प्रश्न उच्चस्तरीय विशेषज्ञांकडे पाठविले जातात. हे विशेषज्ञ राज्य कृषी विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठांचे विशेषज्ञ आहेत. किसान कॉल सेंटरद्वारे कृषिसल्ला व विविध वस्तूंच्या बाजार किमती याबाबत लघु संदेश (एसएमएस) प्राप्तीसाठी एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणीसुध्दा करण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.

Wednesday, February 21, 2018

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: 
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी  प्रविण वामन ठाकुर वय 36 वर्ष यांनी 21फरवरीच्या पहाटे सकाळी 04 वाजताच्या सुमारास उटुन सकाळी डब्बल फसल धानरोवनी करीता मोटार पंपाचे पाणी लावण्यासाठी जातो असे घरच्या कुटुंबीयांना सांगून गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेताशिवात असलेल्या कडु लिंबू च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करुन आपली जिवन याञा संपवली ही घटना बुधवारी सकाळी  07:00 वाजताच्या सुमारास  येथील शेतमजुर शेतात काम करण्याकरिता गेला असता समोर आली.
मृतक शेतकरी प्रविण वामन ठाकुर याला अडीच एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी संस्था मधुन 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते,व श्तातील पिकांवर मावा,अळी, तूळतुळा रोगांनी शेतात नापिकी झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रविण वामन ठाकुर हा आर्थिक विवंचनेत दिसत होता.मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांच्या पाठीमागे आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,एक भाऊ असा बराच मोठा आपत्य परीवार आहे.सदर मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या ने कोथुळना नवेगाव येथील जनतेत शोककळा पसरली आहे.शासनाकडून सदर पिढीत कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात याव्ही अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे,गोविंदराव भेंडारकर,ड्रा .प्रेमलाल मेश्राम विनोद राऊत यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चव्हाण तहसीलदार चव्हाण साहेब यांना फोन केले व पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने जरी कर्ज माफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेवर उपाययोजना सुचविल्या नसल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यात मात्रालायातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत व शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली आत्महत्या असो हे आत्मह्तेचे प्रकरण सरकारच्या भविष्यात  चांगलाच जिव्हारी लागू शकते,त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना व सूचना करणे गरजेचे झाले आहे.
 

Monday, January 15, 2018

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


वरोरा/प्रतिनिधी: 
रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत असणाऱ्या एका शेतकऱ्याने जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यातील ताडगव्हाण येथे घडली. सदानंद दादाजी सूर वय ४४ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या पिकांवर अनेक रोगांनी घात घातला असून शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. 
वरून शेतीसाठी कर्ज घेतलेले परत कसे करायचे यामुळे ते अस्वस्थ असायचे. त्यातच पिकांवर अनेक प्रकारची लागण झाल्याने संपूर्ण पीक नष्ट झाले होते याच विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून सदानंद हे चिंतेत असायचे .सोमवारी सकाळी उठून शेताकडे गेले व परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद केली.

Monday, November 27, 2017

शेतकरी अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकटात जास्त - खा. राजू शेट्टी

शेतकरी अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकटात जास्त - खा. राजू शेट्टी

गजेंद्र डोंगरे/कोंढाळी:-
 स्वभिमानी शेतकरी संघटनेचे  संस्थापक  खासदार राजू शेट्टी यांनी अमरावतीकडे निघाले असतांना 
 नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्याचे जुनापानी व परिसरातील  शेतक-यांनी  जुनापानी येथील शेतकरी उत्तमराव काळे यांचे  नेतृत्वात   खासदार राजू शेट्टी याची  27नव्हेंबर ला साकाळी 10-30वाजता  जुनापानी गावात  भेट  घेऊन या भागातिल समस्या मांडल्या . 
 या प्रसंगी चंदनपारडी चे उपसरपंच सतीश पुंजे यांनी या भागात कापुस उत्पादक  शेतकरी लाल्या व बोंड अळीच्या प्रदुरभावाने कसा हवालदिल झाला आहे,तसेच संत्रा , सोयेबीन ची कशी वाट लागली व सरकार कडून होनारी पिळ नूकी बाबद  माहीती दिली.तर जि.प. सदस्य रामदास मरकाम यांनी जि.प. मधे शेतकर्याची अडवनूकीचा पाढाच वाचला,  उत्तम काळे व दिलीप  काळे यांनी  त सेच खासदारां सोबत आलेले वस्त्रोध्दोग महामंड़ळाचे  माजी अध्यक्ष रवीकांत तुपकर,युवा स्वभिमानी चे शामअवथ॓ळे यांनी शेतकर्यांच्या गर्हाणे व सत्यता मांडली.


दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच

दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच

चंद्रपूर/ मूर्तिजापूर- - शेतकऱ्यांच्या शेतमालाला बऱ्यापैकी भाव नाही. त्यामुळं कापसाच्या बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी शेतकरी जात नाही.  अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच भरून ठेवला आहे.
 विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे कापूस हे नगदी पीक आहे. चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहे. शासनाने कापसाला दिलेला हमीभाव, त्यापेक्षा अतिशय अल्प आहे. कापसाला भावच नसल्याने अतिशय अल्प दरात कापूस कसा विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना चांगलाच सतावत आहे.

 मूर्तिजापूर तालुक्यातील कपाशीचे नुकसान! 
मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक  बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच  शिवाय पांढर्‍या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. 

Tuesday, November 21, 2017

गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइनद्वारे न सोडता कालव्याद्वारे सोडा

गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइनद्वारे न सोडता कालव्याद्वारे सोडा

माजी सरपंच तथा शेतकरी गोपीनाथ मोरांडे

ब्रम्हपुरी(गुलाब ठाकरे/प्रतिनिधी)
ब्रम्हपूरी तालुक्यात असलेल्या चारही बाजूने अरण्याने वेढलेल्या बल्लारपुर येथील गोपीनाथजी मोरांडे यानी सांगितलेल्या गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइन द्वारे न सोडता कालव्या द्वारे सोडण्यात यावे अशी शिफारस केली आहे.
गोसीखुर्द कालव्याच काम जवळ पास पूर्ण झालेले आहे.लहान कालवे तयार करुन शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे(पाटाने ) शेतीला पाणि दिल जाते.पण ज्या शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे पाणी होऊ शकत नाही ते शेतकरी आईल इंजिन ,किवा इलेक्ट्रिक साधन (मोटर पंप )या साधनामुळे शेती पीकवली जात असून गुरे ढोरे ,पशु पक्षी इतर प्राणी याना सुद्धा लहान कालव्याच्या सहायाने खुलेआम पाणी उपयोग करीत आहे हे निर्विवाद आहे.पण असे ऐकण्यात आले असून की ज्यां शेतकऱ्यांना  पाणी होत नाही त्या शेतकऱ्यांना शेतीतुन तीन फूट खोलीत टाकलेल्या पाईपलाइन द्वारे शेतीला पाणी देण्यात येणार आहे अशी चर्चा परिसरात होत असून शेती ही चढ़ उतार असल्यामुळे शेतीला पाणी होऊ शकत नाही त्या मुळे गोसीखुर्द चे पाणी लहान कालव्याच्य सहायानेच पाणी शेतीला पुरविणे योग्य आहे असे शेतकरी यांची मत आहे.कोणत्याही मंत्री महोदयाना हे कळत नाही की सर्व जीव जंतूनाप्राणी मात्राणा भरपूर पाण्याचा आस्वाद हा कालव्याद्वारे घेता येत होते ते पाणी खोका असलेल्या इंजीनियर च्य डोक्यामुळे हा आनंद शेतकरी ,प्राणी जीवजंतु याना या पाईपलाइन द्वारे घेता येत नाही त्यामुळे गोसीखुर्द चे पाणी पाटानेच शेतीला देण्यात यावे असे मत शेतकरी गोपीनाथजी मोरांडे माजी सरपंच यानी सांगितले आहे.

Thursday, November 09, 2017

  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वरोऱ्यात आ.धानोरकरांच्या नेतृत्वात मुंडन व भीकमांगो आंदोलन

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वरोऱ्यात आ.धानोरकरांच्या नेतृत्वात मुंडन व भीकमांगो आंदोलन

  वरोरा/प्रतिनिधी :
तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केले व त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या करीता शिवसेनेच्या आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात खांबाळा येथे मुंडन व भीक मांगो आंदोलन अरण्यात आले. या आंदोलनाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतुक चांगलीच प्रभावित झाली होती,

गेल्या  सोमवारी आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालून दोन दिवसांत करारनामा करा आणि त्यानंतरच बांधकामासाठी शेतात पाय ठेवा, असा इशारा शेतकऱ्यानी दिला होता.वर्धा ते नागरी येथे ४०० केव्ही टॉवर उभारली. शिवाय, नागरी ते परळी ७६५ केव्ही टॉवरची उभारणी केली जात आहे. वर्धा ते नागरी मार्गावरील शेतात टॉवर उभारणी करणाऱ्या  शेतकऱ्यांना  प्रति टॉवर १५ लाख रूपये तर नागरी परळी मार्गावरील टॉवरखाली आलेल्या शेताला २५ लाख रूपये प्रति टॉवर मोबइला द्यावा, टॉवर लाईनमुळे अशंत: बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली होती .
मात्र ३ दिवस उलटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना आमदार  बाळू धानोरकर, यांच्या नेतृत्वात चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खाम्बाडा येथे  मुंडन व भीक मांगो आंदोलन करून ऊर्जामंत्रालयाच्या प्रधानसचिवांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे,पहिले संपूर्ण योग्य मोबदला देण्यात यावा त्यानंतरच शेतकऱ्यांच्या शेतात पाय ठेवायचा अश्या शिवसेना स्टाईलने यावेळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते किशोर जोरगेवार, सुरेश पचारे, मनोज पॉल ,यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

कोरपना : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने  कोरपना येथे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कोरपना-आदिलाबाद महामार्गावर ठिय्या मांडल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्या सोडविण्याकरिता ८ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला होता. भाऊराव पा. चटप आश्रमशाळा येथे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोरपना-आदिलाबाद महामार्गावर ठिय्या दिला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला व कार्यकर्त्यांचीही काही वेळानंतर सुटका करण्यात आली.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव चटप यांनी केले असून प्रभाकर दिवे, अरुण नवले, निळकंठ कोरांगे ,किसन अवताडे, अनिल ठाकूरवार, रवी गोखरे, रमाकांत मालेकर, मदन सातपुते ,इंदूताई काकडे, प्रवीण गुंडावार अनंता घोडे, अविनाश मुसळे, रत्नाकर चटप पौर्णिमा निरंजने, संध्या सोयाम, बंडू राजूरकर भास्कर मुसळे, सुभाष तुराणकर, पद्माकर मोहितकर, गजानन पगीवार, चंदू उईके, भास्कर मते मारुती काकडे आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
नुकसानग्रस्त भात पिकांच्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईसह पिक विम्याचा तात्काळ लाभ द्या  :नीलकंठ उरकुडे

नुकसानग्रस्त भात पिकांच्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईसह पिक विम्याचा तात्काळ लाभ द्या :नीलकंठ उरकुडे


ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
 ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसरात अंतर्गत येणाऱ्या  आवळगाव येथील धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर असूनसुद्धा कृषी अधिकारी निद्रा अवस्थेत आहेत.सदर परिसरात यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे शेतीची रोवनी काही ठिकाणी झाली नाही तर काही ठिकाणी रोवनी होऊन पाऊस पड्ल्याने रोवलेली धान पीक करपलीं आहेत.त्यामुळे सदर शेतीची सर्वे करण्याची मागणी  शिवसेना जिल्हा उपप्रमुख नीलकंठजी उरकुडे
तसेच  तालुका उपप्रमुख संजयजी लोणारे ,ब्रम्हपुरी शहर प्रमुख रविंद्रजी पवार ,उपशहर प्रमुख मंगेशजी माकडे ,राजेंद्र डोमळे,व आवळगाव येथील शेतकरी बांधवानी बँकव्यवस्थापक  जि.मध्य.सहकारी बँक आवळगाँव शाखा  व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले.

प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत सदर शेतीचा पीक विमा शेतकऱ्यांने स्वता उतरविण्यात आला तर काहींचा विमा हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फतिने बँकेने उतरवीला आहे.सदर पिक विमा योजने सुरक्षित प्रमुख बाबी यामध्ये नैसर्गिक आपत्ती पासून अधीसुचित क्षेत्र पातळीवर विमा, नुकसान भरपाई राज्य शासनानद्वारे दिलेल्या पिक कापनी प्रयोगाच्या आधारित चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठाउत्पन्नापेक्षा कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई देय ,हवामान घटकांच्या प्रतिकूल परस्थीतीमुळे पिकांची पेरणी किवा लावणी न झाल्यामुळे होणारी नुकसान पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परस्थीतीमुळे पीकाचे होणारी नुकसान,काढनी पच्छात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीचे संरक्षण इत्यादि घटकाचा समावेश केला आहे.यावर्षी अत्यल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रोवनी झाली नाही.काही ठिकाणी रोवनी झाली तर करपा ,मावा ,तुडतुडा आदी रोगानी  शेतीतील भातपीकाची दोन्ही बाजूने नुकसान झाले असून  परिणामी पिकविमा मिळावा म्हणून जिल्हा अध्यक्ष यांनी माहिती घेतली असता कृषी अधिकारी यांनी दोन महिन्याचा कालावधी होऊनही शेतीचा सर्वे करण्यासाठी कुणीच अधिकारी आले नाही.
 सदर परिसरातील ज्या शेतीच रोवनी झालीत त्या शेतीचे धान्यपिक कापणीच्या मार्गावर आले असून त्या धानपिकावर मावा करपा ,तुडतुडा इत्यादि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाला आहे.
  तरी शासनाने ताबडतोब कसल्याही प्रकारची दिरंगाई न करता  सदर शेतीच सर्वे करून योग्य त्या नुकसान ग्रस्त शेतकरी  बांधवांना शासनानी निसर्ग प्रकोपात नुकसानग्रस्त भात पिकांच्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई बरोबर पिक विम्याचा लाभ तात्काळ देण्यात  यावी अशी मागणी शिवसेना चंद्रपूर जिल्हा उपप्रमुख निलकंठ उरकूडे यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आले.


Sunday, November 05, 2017

२०हजार रूपये नुकसान भरपाई द्या

२०हजार रूपये नुकसान भरपाई द्या

गडचिरोली - जिल्ह्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे �शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २०हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रकाश उद्धवराव ताकसांडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद गडचिरोली, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा,किसान मंच महाराष्ट्र तथा महाराष्ट्र कृषक समाज जिल्हा गडचिरोली यांनी केली.

वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे

वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे


उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस जंगल नष्ट होत असल्यामुळे वन्यजीव शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या जीविताचे व शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान करतात परंतु वन्यजीवांची हत्या झाल्यास होणाऱ्या शेतमालाची नुकसानभरपाई मात्र अत्यल्प दिले जाते शिवाय ही भरपाई देखील बऱ्याच कालावधी नंतर दिली जाते.

ह्या अन्यायाविरोधात राजुरा तालुक्यातील शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली मागील ८ दिवसापासून वनविभागाच्या कार्यालया समोर उपोषणाला बसले असून आमदार अँड संजय धोटे ह्यांनी ह्या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.ह्यावेळी बोलताना आमदार अँड संजय धोटे म्हणाले की उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे प्रशन योग्य असून पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या निदर्शनास ह्या मागण्या आणून देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू व आगामी अधिवेशनातही शेतकऱ्याच्या मागण्या शासनाच्या लक्षात आणून देवू.

शेतकऱ्यावर अन्याय होवू न देण्याचीच शासनाची भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.ह्यावेळी वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल,भाजपा किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा शहर महामंत्री सय्यद कुरेशी,मंगेश श्रीराम,बाबुराव जीवने,अनिल दुबे,कैलास कार्लेकर उपस्थित होते.

उपोषणकर्त्याच्या वतीने उपोषणकर्ते व माजी जि.प.सदस्य गणेश झाडे ह्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या आमदार मोहदया समोर मांडल्या.ह्यावेळी तालुक्यातील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.