काव्यशिल्प Digital Media: ठाणे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ठाणे. Show all posts
Showing posts with label ठाणे. Show all posts

Monday, November 06, 2017

'विद्या मला माफ कर' - कंत्राटदाराची आत्महत्या

'विद्या मला माफ कर' - कंत्राटदाराची आत्महत्या

ठाणे/ प्रतिनिधी-
गोडबंदर रोडवरील एका कंत्रटदाराचा कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव संकेत जाधव असे आहे. घटनेची माहिती पोलिसांना ंमिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कारमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. गाडीमध्ये एक रिव्हाल्वर आणि एक चिट्टी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार स्वताच्याच  रिव्हाल्वरने आत्महत्या केली असवी असे प्रथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिट्टी मिळाली आहे. या चिट्टीमध्ये “विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालं” अशा वाक्याचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली.

जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासारवडवली पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.