সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 12, 2018

वाढदिवसाच्याच दिवशी प्रेमातून युवतीवर चाकू हल्ला, प्रियकराला अटक

चंद्रपुर/प्रतिनिधी

 प्रियकराने चाकू हल्ला करून प्रेयसीला वाढदिवसाच्या दिवशी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी शहरातील अंचलेश्वर बसस्थानकाजवळ घडली. श्रृती असे प्रेयसीचे, तर मनान शेख असे प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 श्रृती कामानिमित्त अंचलेश्वर चौकात आली. भानापेठ वॉर्डात जाणाèया गल्लीत प्रियकर मनान शेख याने तिला गाठले. कोणत्या तरी विषयातून या दोघांत वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मनानने श्रृतीवर चाकूहल्ला केला. यानंतर मनानने घटनास्थळावरून पळ काढला.
श्रृतीच्या मानेवर, पोटावर, हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. स्वत:ला सावरत श्रृती बसस्थानकाजवळ आली. त्यानंतर तेथे उपस्थित तरुणाने ऑटोने तिला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालय गाठून चौकशी केली.शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगत, मालेकर, वंदीराम पाल, विक्की गहलोत यांनी पुरावे गोळा केले. त्यानंतर मनान शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.तपास सुरू केला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.