काव्यशिल्प Digital Media: खून

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label खून. Show all posts
Showing posts with label खून. Show all posts

Friday, October 19, 2018

 चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

बल्लारपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे युवकाची धारधार शस्त्राने हत्या 
शिवीगाळ केल्याने करण्यात आली हत्या 
खून साठी इमेज परिणामबल्लारपूर शांती नगर येथील गणेश बंडु दाडंगे (17) हा गेल्या २ ते ३ दिवसापासून नगर परिषद समोर असणाऱ्या भंगार व्यवसाईक आरिफ मो. शरिफ शेख (30) याला शिवीगाळ करत असल्याने मनात राग धरून दसर्याच्या दिवशी संध्याकाळी पेपर मिल मागे बल्लारपूर-विसापूर मार्गावर चाकूने गळा कापून हत्या केली.या  हत्येनंतर आरोपीनेच बल्लारपूर पोलिसांना घटनेची माहिती देत स्वताला पोलिसांच्या स्वाधीन केले.लगेच आरोपीच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली.घटनेनंतर अप्पर पुलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली.या संपूर्ण खून प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस स्टेशन असलेले शहर म्हणून बल्लारपूर पोलीस स्टेशनचे राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.या नंतर एका आठवड्यातच येथे खुनाची घटना घडली.

Monday, October 15, 2018

 कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या

कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या


 

  उस्मानाबाद/प्रतिनिधी:
कुक्कटपालन व्यवसायात सातत्याने हो
पत्नीचा खून साठी इमेज परिणामरा तोटा, पावसाअभावी नापिकी, कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून शिराढोण (जि. उस्मानाबाद) येथील एका शेतकऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आला.येथील शेतकरी रामभाऊ गुलाबराव यादव (वय 55) हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी सीताबाई यादव (वय 50) या मदत करतात. यादव कुटुंबाकडे शेतीसाठी व कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. हे पती- पत्नी शेतातस वास्तव्यास असतात. गेल्या तीन ते चार वर्षात पावसाअभावी नापिकीमुळे उत्पन्नात घट आली आणि कुक्कुटपालन व्यवसायत सातत्याने नुकसान व तोटा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे पती- पत्नी तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे रामभाऊ यादव यांनी मध्यरात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला व त्यानंतर स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, पोलिस उपनिरीक्षक महेश कांबळे, पोलिस नाईक बाबासाहेब मोराळे, अमोल उंबरे, दयानंद गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



Monday, September 03, 2018

नागपुरात खून

नागपुरात खून

भाच्यानेच केला मामाचा खून
लोखंडेनगर येथे मृतकाच्या घराजवळच घडली घटना 
 पप्पू ऊर्फ प्रवीण देवराव वंजारी (वय ३५) असे मृताचे नाव आहे.
कुख्यात पप्पू अट्टल गुन्हेगार होता
मृतकाच्या भाच्यानेच केली हत्या,घरघुती वादातून करण्यात आली हत्या  



Friday, August 24, 2018

 वर्ध्यात`बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह

वर्ध्यात`बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह

वर्धा/ विशेष प्रतिनिधी:

वर्धा येथील पुलफैल येथे राहणारा अट्टल गुन्हेगार `बच्चा` उर्फ मिलिंद सुभाष मेश्राम (वय ५१) याचा शुक्रवारी रात्री धारधार शत्राने वार करून त्याच्याच घरी खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोरील शौचालयाच्या टाक्यातील पाण्यात टाकलेला आढळून आला .
पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून चार जणांना ताब्यात घेतले असून यात त्याच्या सावत्र मुलीचाही समावेश आहे.विशेष म्हणजे त्याच्या सावत्र मुलीनेच मृतदेह शौचालयाच्या टाकीतील पाण्यात असल्याचे सर्वांना सांगितले.
याशिवाय आरोपी बच्चाचे दोन दात पडले असल्याचे तपासात पुढे "बच्चा" मेश्राम याच्या शरीरावर तब्बल २५ हून अधिक घाव असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच खुनाच्या वेळी त्याचा गळा चिरल्याचे दिसत होते.छातीवरही
शत्राचे वार होते. यावरून त्याचा अत्यंत निघृणपणे खून केल्याचे स्पष्ट दिसत होते.
बच्चा उर्फ मिलिंद मेश्राम हा वर्धा येथील रेल्वेगाडीत चहा विक्रीचे काम करायचा. बच्चा या टोपण नावानेच त्याची ओळख होती.तो विशाखापट्टणम येथील कारागृहात १८ महिने बंदिस्त होता. दरम्यान या काळात त्याच्या पत्नीचे निधन झाले होत, तो महिन्यापूर्वीच तो वर्ध्यात परतला होता.मुली सोबतही मिलिंदचा नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे ती नातेवाईकांच्या घरी राहायची. कालही तिचे वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ती गुरुवारीच नातेवाईकांकडे राहायला निघून गेली होती.पहाटे ती घरी आली तेव्हा तिला वडील घरी दिसले नाही.मात्र सर्वत्र रक्त व शितोडे दिसून आले. याच सोबत तेथे २ दात पडून असल्याचे दिसले.तिने सर्वत्र शोध घेतला,शोध घेत असतांना ती घरासमोरील शौचालयाच्या टाक्याजवळ गेली असता तिला वडिलांचा मृतदेह टाक्यात दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस श्वानपथकाश दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे, ठाणेदार चंद्रकांत मदने सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.व मृतदेह शवचिकित्सेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.



Saturday, July 21, 2018

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

 ललित लांजेवार:
वारंवार होणाऱ्या भांडणातून चिडलेल्या लहान भावानेच सख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील नकोडा येथे शुक्रवारी घडली. 
बिसु शिवानंद शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी लहान भाऊ दिपक शिवानंद शर्मा याला घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ हा तापट,उर्मट,व गुंड प्रवृत्तीचा असल्याने मोठा भाऊ बिसु व लहान भाऊ दीपक यांच्यात नेहमी वाद व्हायचे,हा वाद जास्तच विकोपाला जात असे,शुक्रवारी देखील बिसुने दिपकशी भांडण केले व झोपी गेला.अश्यातच राग धरून असलेल्या लहान भाऊ दीपकने त्याला जीवनेशी मारण्याचा मनात कट रचला व बिसू गाढ झोपेत असतांना घरातील कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले.
या हल्ल्यात बिसुचा जागीच मृत्यू झाला व दिपकने घरातून पळ काढला.घरचे इतर व्यक्ती कामानिमित्य बाहेर गेले होते ते घरात येताच बिसू रक्ताने माखलेला दिसताच आरडा ओरड करण्यात आली व यांची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले.शेवटी रात्री उशिरापरीयंत दिपकला नकोडा परिसरातुन अटक करण्यात आली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात PSI राहुल थांगणे,संतोष धांडेवार,गोपाल अतकुलवार,सचिन बोरकर,विनोद वनकर,सुधीर मत्ते करीत आहेत.





Wednesday, June 27, 2018

तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने केला आजोबाचा खून

तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने केला आजोबाचा खून

गडचिरोली/प्रतिनिधी:
  तंबाखू न दिल्यानं नातवानं आजोबाची हत्या केल्याची संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात घडली आहे. सोमनपल्ली गावात नातवानं तंबाखू देण्यास नकार दिल्यानं आजोबाची कुऱ्हाडीनं वार करत निर्घृण हत्या केली.
राजम तलांडी असं आजोबाचं नाव आहे. आरोपी नातू सुभाष तलांडी याला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोलीत तंबाखू सेवनाबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येतीये. डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्तीसाठी अभियानही राबवले जातात. मात्र तहीही व्यसनाचं प्रमाण काही कमी होत नाही आहे.तलांडी कुटुंबातील २७ वर्षीय मुलाने आपल्या ७० वर्षाच्या राजम तलांडी नामक आजोबाची निर्घृण हत्या केली. केवळ तंबाखू सेवनाची सवय असलेल्या नातवाने आजोबांकडे त्याची मागणी केली. आजोबाने ती नाकारली. रागाने पिसळलेल्या आरोपी नातवाने घरातून कुऱ्हाड आणून आजोबावर वार केले. आणि त्यांचा जीव घेतला.
गडचिरोली जिल्हा तंबाखू आणि खर्रा या २ व्यसनांच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली होती. मुखाचा आणि इतर कर्करोगाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण नेमके हेच दर्शवीत होते. आपल्या आसपासच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करणा-या धानोरा तालुक्यातील डॉ. बंग दाम्पत्याच्या शोधग्राम प्रकल्पात याची सविस्तर नोंद घेण्यात आली. आणि येथेच तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी 'मुक्तिपथ' अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.मुक्तिपथच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक सर्वेक्षणात जिल्ह्यातील लाखो नागरिक तंबाखूच्या विळख्यात अडकले असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. 'खर्रा' हा या भागात सुपारीत चुना-सुगंधित तंबाखू मिसळून घोटून तयार केला जाणारा लोकप्रिय पदार्थ.
पण अशा या व्यसनातून तर नात्यांचा जीव घेतला जाणार असेल तर अशी व्यसनं काय कामाची हे सर्वसामान्यांना समजणं गरजेचं. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Tuesday, June 12, 2018

चंद्रपुरात लग्नाच्या स्वागत समारंभात खून

चंद्रपुरात लग्नाच्या स्वागत समारंभात खून

murder साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 शहरातील बाबुपेठ येथील जुनोना चौकात आयोजित लग्नाच्या स्वागत समारंभात नातेवाईकात किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि धारदार शस्त्राने वार करून इसमाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. संतोष सिंग टाक (३५) रा. जुनोना चौक असे मृतकाचे नाव आहे.
बाबुपेठ येथील टाक परिवारातर्फे लग्नाचा स्वागत समारंभ जुनोना चौक येथे आयोजित करण्यात आला होता. स्वागत समारंभ सुरू असताना जुन्या वैमनस्यातून संतोष सिंग टाक यांचा नातेवाईकासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतोष सिंग यांना मारहाण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्र, लाथाबुक्या, लाठीकाठीने संतोषला मारहाण केली. त्यामुळे संतोष सिंग टाक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
संतोष सिंग टाक यांच्या पत्नी रिनाकौर टाक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद करून भादंवि ३०२, १४७, १४८, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे एपीआय बानबले करीत आहेत.

Wednesday, May 23, 2018

चंद्रपुरात आईचा खून करणाऱ्या मुलास कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

चंद्रपुरात आईचा खून करणाऱ्या मुलास कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात २० एप्रिल २०१६ ला झालेल्या एका खुन प्रकरणात दोषी असणाऱ्या कौस्तुभ कुलकर्णी याला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश खान यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
तुकूम परिसरात कौस्तुभ कुलकर्णी व त्याचे कुटुंब राहत होते,कौस्तुभवर कर्जाचा चांगलाच डोंगर होता.याच कर्जावरून त्याच्या घरी नेहमी वाद होत होते,अश्यातच २० एप्रिल २०१६ ला वाद झाला हा आव इतका विकोपाला गेला कि कौस्तुभने  रागाच्या भरात आई अंजली हिच्या हाताची नस कापली व तिला गंभीर केले,याच वेळी तिचा मृत्यू झाला ,नस कपल्याने बराच वेळ रक्स्तस्त्राव झाला.संपूर्ण घर रक्ताने लाल झाले,तेव्हा त्याचा परिवारात हे आई अंजली कुलकर्णी  (वय ५९), वडील हेमंत कुलकर्णी (वय ६०) आणि पत्नी पद्मजा कुलकर्णी  (२८) हे सर्व उपस्थित होते.आईचा खून करून मुलगा फरार झाला,या घटनेची माहिती आरोपीच्या पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने पोलिसात दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला.त्यावेळचे  सहायक पोलिस निरीक्षक विनोद पाचपोळ यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपी विषयी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर  २० एप्रिल २०१६  पासून सुनावणी सुरु होती 
ह्या सुनावणीत अतिरिक्त २३.०५.२०१८ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश खान साहेब यांनी या प्रकरणातील संपूर्ण   पुरावे,साक्षिदार, तपासून आरोपी कौस्तुभ कुलकर्णी याला कलम ३०२ अंतर्गत फाशी,व कलम  २०१ अंतर्गत पाच वर्षे कारावास तसेच एक हजार रुपये दंड ठोकला न भरल्यास एक महिना कारावास अशी ऐतिहासिक शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार कडून अभियोक्ता आसिङ्क सत्तार यांनी काम पाहिले,या प्रकरणात न्यायालयाने तब्बल २ वर्षाने ऐतिहासिक निर्णय दिल्याने या निर्णयाचे विविध स्तरावरून स्वागत केले जात आहे.
सदर प्रकरणात पोलीस विभागाने पुरावे गोळा केले या प्रकरणात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण, पोलिस निरीक्षक डी. बी. गोतमारे, सहायक पोलिस निरीक्षक निर्मला कन्नाके, मनोहर कांबळी, अजय गिरडकर, सुधीर जाधव, मुजावर अली, प्रमोद कोटनाकेसुरेश धाडसे, दिनकर धोबे, राजू मेश्राम,  यांची भूमिका महत्वाची ठरली.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Monday, November 20, 2017

गळा चिरून तरुणाची हत्या

गळा चिरून तरुणाची हत्या


नागपूर - वाडी येथील अंबाझरी आयुध निर्माणी परिसरात गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जितू कालबांडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. रविवारी डिफेंस येथे आठवडी बाजार असल्याने त्याने मित्रासोबत चांगलीच दारू ढोसली होती. त्यानंतर डिफेंस परिसरात गेला. तिथे वादची ठिणगी पडली व त्याची गळा कापून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

वाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयो रूग्णालयात दाखल केले. आरोपीचा शोध वाडी पोलीस घेत आहेत.

Saturday, November 18, 2017

मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताचा सडा

मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताचा सडा

शिराळ्यातील शिवरवाडीत खून

सांगली:  शिराळा तालुक्‍यातील शिवरवाडी येथील चक्रोबा मंदिराच्या गाभाऱ्यात आज (शनिवार) सकाळी एका 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आमावस्येच्या रात्री हा प्रकार उघडकीस आल्याने खून की नरबळी ? याबाबत चर्चा सुरु आहे.

मृतदेहाच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. त्याच्या जवळच लिंबू, हळद-कुंकू असे साहित्य सापडल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिरसी-शिवरवाडी रस्त्यावर डोंगरावर मंदिर आहे. मंदिराचा परिसर डोगरावर निर्जन आहे.

मंदिरात खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली. शिराळा पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाशेजारी लिंबू, हळद-कुंकू, पूजेचे साहित्य पडले होते. या मृतदेहाची ओळख दुपारपर्यंत पटलेली नव्हती. पाठीमागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असावी.
महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून

महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून

क्ऱ्हाड - महाविद्यालयीन युवक  प्रथमेश संजय सपकाळ (वय 18 रा. विहे, ता. पाटण)चा धारदार शस्त्राने भोकसून खून झाला. कालपासून संबधित युवकासह तीघेजण बेपत्ता होते. त्यातील एकाचा खून झाल्याचे आज स्पष्ट झाले. पार्ले येथे ही घटना घडली.


Wednesday, November 08, 2017

नागपूर: सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगाव फाटा येथे एका युवकाचा दगडाने ठेचून खून

नागपूर: सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगाव फाटा येथे एका युवकाचा दगडाने ठेचून खून

नागपूर: सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगाव फाटा येथे एका युवकाचा दगडाने ठेचून खून