সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 31, 2013

सरत्या वर्षाला निरोप

सरत्या वर्षाला निरोप

चंद्रपूर: नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना जिल्ह्यात खून, दरोडे आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी सन २0१३ हे वर्ष गाजले. पोलीस प्रशासनावर गुन्हेगारी वरचढ झाल्याचे पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदीवरून दिसून येते. गुन्ह्यात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असली तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे. गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रणमिळविण्यात पोलीस सपेशल अपयशी ठरले.
सन २0१३ या वर्षात जिल्ह्यामध्ये खुनाच्या ३४ घटना घडल्या. सन २0१२ मध्ये ४९ खुनाच्या घटना घडल्या होत्या. खुनाचा प्रयत्न करणे २४, दरोडा पाच, जबरी चोरी ४९, घरफोडी २0२, चोरी ७३३, गंभीर स्वरूपाची दुखापत करणे ५९६, दंगल ९६, बलात्कार ८२, विनयभंग १४८, विश्‍वासघात करणे ३९, फसवणूक ६३, सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला करणे ४६, हयगयीची कृत्ये २४७ व अन्य ९८0 गुन्ह्यांची नोद झाली. एकूण गुन्ह्यांची सख्या तेन हजार ३४४ आहे.
यातील खून व खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सन २0१२ च्या तुलनेत घट झाली असली तरी अन्य गुन्ह्यात मात्र मोठी वाढ झाली आहे. एक वर्षापूवी दिल्लीतील 'निर्भया' च्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला. मात्र त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली नाही. सन २0१२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात बलात्काराच्या ४५ घटना घडल्या होत्या. मात्र सन २0१३ मध्ये या घटना दुपटीने वाढल्याचे दिसून येते. या गुन्ह्यांची संख्या ८२ आहे.
पूर्वी अशा घटनांच्या तक्रारी करण्यासाठी महिला पुढे येत नव्हत्या. मात्र 'निर्भया' हत्याकांडानंतर देशभर झालेल्या आंदोलनामुळे महिलांमध्ये बळ आले. त्यातूनच आता महिला पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या संख्येत वाढ दिसून येत असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. एकूणच विविध गुन्हेगारीच्या घटनांनी सन २0१३ हे वर्ष चांगलेच गाजले. पोलीस विरुद्ध कामगार संघर्ष गाजला
भद्रावती येथील कर्नाटका एम्टा या कंपनीच्या विरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलीस विरुद्ध कामगार असा संघर्ष सुरू झाला. आंदोलक कामगार कुटुंबांची अटक व कामगार नेत्याला जबर मारहाण केल्याच्या आरोपाने पोलीस प्रशासन अडचणीत आले. हे सारे सरत्या वर्षात घडले.
मनसे कार्यकर्त्यांनी दिला बँक अध्यक्षाला चोप

मनसे कार्यकर्त्यांनी दिला बँक अध्यक्षाला चोप

 चंद्रपूरच्या कन्यका नागरी बँकेतील अश्लील sms वरून नाहीला कर्मचा-याचे निलंबन व बँक  अध्यक्ष - CEO यांनी केलेली शरीर सुखाचे मागणी प्रकरण वेगळ्या वळणावर पोहचले आहे. पोलिसात तक्रार व FIR दाखल झाल्यावरही बँक व्यवस्थापनाने प्रकरणात कुठलीही दखल न घेतल्याने संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी बँक अध्यक्षाला चोप देत त्याच्यावर शाई टाकली. आज या समस्येसंदर्भात मनसेच्या महीला आघाडी कार्यकर्त्यांनी बँक व्यवस्थापनाची भेट घेतली. यात चर्चा सुरु असताना वाद चिघळला. बँक अध्यक्षांनी याप्रकरणी ताठर भूमिका घेतली. वाद वाढत गेला यात सर्वप्रथम मनसेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्करवार यांना चोप दिला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शरीर सुखाची मागणी करण्याचे गुन्हे दाखल असलेल्या अध्यक्षांवर शाई टाकली. हा प्रकार सुरु असताना बँकेचे संचालक व इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता. घटना घडल्यावर मनसे कार्यकर्ते बँकेतून निघून गेले. बँकेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेचा तपास चालविला आहे. पिडीत कर्मचा-याला अज्ञात मोबाईलवरून अश्लील sms येत असताना बँकेने तिलाच निलंबित केले वर प्रकरण निस्तरण्यासाठी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. ही ऑफर नाकारणा-या पिडीतेलाच थेट बडतर्फ केले. या प्रकरणावरून चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण तापले असताना मनसे कार्यकर्त्यांनी उचललेले पाउल खळबळ उडविणारे ठरले आहे.

Sunday, December 29, 2013

माणसाने  "चंद्रपूरकर" असावे.....

माणसाने "चंद्रपूरकर" असावे.....

माणसाने  "चंद्रपूरकर" असावे.....
कोल्हापूरी तर चपला पण असतात..
सोलापूरी तर चादरी पण असतात..
नागपुरची तर संत्री सुद्धा असतात..
रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो..
नगराचा तर ऊस सुद्धा असतो..
आणि पुणेरी तर पाट्या सुद्धा असतात..
पण नजरेला नजर मिळवायला चंद्रपूरचं काळीज
लागतं...
बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे "चंद्रपूरकर"
माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे "चंद्रपूरकर"
राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे "चंद्रपूरकर"

दादागिरी मधे काटा किर्रर् "चंद्रपूरकर"
गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे"चंद्रपूरकर"

राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे "चंद्रपूरकर"

मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे  "चंद्रपूरकर"

सगळ्या जगाला हेवा वाटावा असे माझे "चंद्रपूरकर"

असे आम्ही "चंद्रपूरकर"
 अधिकार आता केवळ विधिमंडळालाच

अधिकार आता केवळ विधिमंडळालाच

आदर्श अहवालावर फेरविचार करण्याचे अधिकार
आता केवळ विधिमंडळालाच
                                                     - एकनाथराव खडसे

     जळगांव दि 29 आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकरणाचा अहवाल हा विधिमंडळात सादर झालेला आहे, त्यामुळे हा अहवाल आता सभागृहाची व सार्वजनिक मालमत्ता झालेला आहे. जर त्यात काही बदल करावयाचे असतील तर त्याचे अधिकार आता केवळ विधिमंडळालाच आहेत, सरकारला जर आदर्श अहवाल प्रकरणी फेरविचार करावयाचा असेल तर त्याबाबत निर्णय आता मंत्रिमंडळ घेऊ शकत नाही. विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे व त्यात बदल करण्याचे अधिकारही  आता विधिमंडळालाच आहेत असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
    आदर्श अहवाल प्रकरणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून फेरविचार संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले होते, त्या पार्श्वभूमीवर श्री खडसे बोलत होते. आदर्श अहवाल प्रकरणी फेरविचार करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ,असे सांगुन मुख्यमंत्र्यांनी  जनतेची दिशाभूल करू नये अशी  टिका श्री खडसे यांनी केली.

    आदर्श अहवाल प्रकरणी फेरविचार करण्यासाठी सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी श्री खडसे यांनी केली.

Friday, December 27, 2013

वनविभागाची राखेतून गगनभरारी

वनविभागाची राखेतून गगनभरारी

विट प्रकल्पातून दिला स्थानिकांना रोजगार

जिल्ह्यात पाच प्रकल्प कार्यान्वित

नागपूर, ता.27 - उद्योग व कारखान्याच्या बाबातीत गडचिरोली जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बराच मागे आहे. येथे नैसर्गिक स्त्रोतांचा मोठा खजिना असून घनदाट हिरवे जंगल व बारमाही वाहणा-या नद्यांचा हा परिसर आहे. याच स्त्रोतांचा उपयोग करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाला कोणतिही हानी न पोहचविता बांबुच्या राखेपासून पर्यावरणपुरक विट निर्मितीचे जिल्ह्यात पाच प्रकल्प कार्यान्वित करून वन विभागाने येथील नागरीकांचे जिवनमान उंचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील पेपर मिल इंडस्ट्री लिमिटेड हा विदर्भातील कागद निर्मितीचा एक मोठा उद्योग मानला जातो. या पेपर मिल अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आष्टी पेपर मिल कार्यरत आहे. बाबूंपासून पेपर तयार केल्यानंतर मिलमधून मोफत मिळणा-या राखेपासून जिल्ह्यात उद्योग उभारावा, यासाठी वनविभागाने चामोर्शी, मार्कंडा (आष्टी), एटापल्ली, सिरोंचा आणि कुरखेडा येथे विट निर्मितीचे प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पामुळे जवळपास 75 नागरीकांना वनविभागाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चामोर्शी येथील विट व टाईल्स निर्मितीसाठी वनविभागाने 12 लक्ष रूपयांच्या दोन मशीन खरेदी केल्या आहेत. या प्रकल्पात एकूण 15 मजूर कार्यरत असून प्रत्येक मजुराला एका दिवसाची 250 रूपये मजुरी दिली जाते. विशेष म्हणजे वनविभागाच्या जागेवर हा प्रकल्प कार्यान्वित असून पर्यावरणाला कोणतिही हानी होत नाही. जयनगर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हा प्रकल्प चालविण्यासाठी देण्यात आला आहे. या समितीमध्ये संपुर्ण गावातील नागरीक सभासद असल्यामुळे लोकसहभागातून वनविभागाने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे.

या प्रकल्पासाठी वनविभागाला आष्टी पेपर मिल मधून मोफत राख पुरविली जाते. एका महिण्याला दहा ट्रक राख आणण्याचा खर्च 20 हजार रूपये (2 हजार रूपये प्रति ट्रक) आहे. या महिण्याकाठी एक टन चुना (किंमत 4 हजार रूपये) दहा हजार रूपयांची दहा ट्रक रेती, 35 हजार रूपयांच्या सिंमेटच्या 100 बॅग, महिण्याचे विद्युत बिल 3 हजार रूपये आणि 250 रूपये प्रति दिवसांप्रमाणे 15 मजुरांची एक महिण्याची मजुरी 1 लक्ष 12 हजार 500 रूपये या प्रमाणे महिण्याचा एकूण लागत खर्च 1 लक्ष 87 हजार 500 रूपये आहे.

या प्रकल्पातील विटांच्या आणि टाईल्सच्या विक्रीतून दर महिण्याला 2 लक्ष 70 हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. लागत खर्च वजा करता या प्रकल्पातून महिण्याला जवळपास 80 ते 85 हजार निवळ नफा मिळत आहे. हा नफा सुध्दा मजुरांना बोनस म्हणून देण्याचा वन विभागाचा मानस आहे.

चामोर्शी येथील प्रकल्पात एक विट तयार करण्यासाठी 1.866 कि.ग्रॅ. राख, 0.666 ग्रॅ. चुना, 3.666 कि.ग्रॅ. रेती आणि 0.133 ग्रॅ. सिमेंटचे मिश्रण तयार केले जाते. येथे तयार होणारी मोठी विट 9 इंच लांबी, 6 इंच उंची आणि 3 इंच रूंद असून तिचे वजन 5.50 कि.ग्रॅ. आहे. तर छोट्या विटेचा आकार 9 इंच लांबी, 4 इंच उंची, आणि 3 इंच रूंदीचे आहे. छोट्या विटेचे वजन 3.50 कि.ग्रॅ. असून या प्रकल्पात प्रत्येक दिवशी 3 हजार मोठ्या विट्या आणि दीड हजार छोट्या विटांची निर्मिती केली जाते.
जिल्ह्यातील इतरही प्रकल्पात विट निर्मितीचे काम जोमाने सुरू असून तीन महिण्यात दोन लक्ष विटांची मागणी पुर्ण करण्यात आली आहे. तसेच सध्या स्थितीत संपुर्ण जिल्ह्यात 25 लक्ष विटांची मागणी आहे. जिल्ह्यात विटांची मागणी जास्त असून पुरवठा कमी होत असल्यामुळे यासारखे मोठे प्रकल्प कार्यान्वित करून आणखी रोजगार निर्मितीसाठी वन विभाग प्रयत्नशिल आहे.
अशोक भय्याला न्यायालयाचा दिलासा

अशोक भय्याला न्यायालयाचा दिलासा

ब्रह्मपुरी : पालिकेचे  पहिले नगराध्यक्ष अशोक भय्या यांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. 
अशोक भय्याला न्यायालयाचा दिलासा

अशोक भय्याला न्यायालयाचा दिलासा

ब्रह्मपुरी : पालिकेचे  पहिले नगराध्यक्ष अशोक भय्या यांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. 
गुरुजींचा निकाल जानेवारीअखेरीस

गुरुजींचा निकाल जानेवारीअखेरीस

पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेली ‘टीईटी’ या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली. या परीक्षेच्या निकालापूर्वी उमेदवारांना आलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी परिषदेने त्यांच्याकडून अभिप्राय आणि आक्षेपही मागविले आहेत. सर्व आक्षेपांचा परिषदेकडून विचार करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय परीक्षा मंडळाच्या धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’च्या परीक्षेत देण्यात आलेले प्रश्‍न व त्यांच्या उत्तरांची सविस्तर यादी परीक्षा परिषदेने आपल्या संकेतस्थळावर नुकतीच टाकली आहे. यामुळे निकालापूर्वीच प्रत्येक उमेदवारांना आपल्या चुका आणि त्यातील उत्तरांची माहिती मिळत आहे. मात्र, त्याहूनही काही शंका अथवा आक्षेप असल्यास त्याचाही विचार परिषदेच्या तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. १५ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या टीईटीच्या परीक्षेला राज्यभरातून ६ लाख २१ हजार ११५ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. मात्र, त्यापैकी ५ लाख ९१ हजार २६५ विद्यार्थीच परीक्षेला बसले
फेब्रुवारीत बहुजन साहित्य संमेलन

फेब्रुवारीत बहुजन साहित्य संमेलन



संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे
*गेल आम्वेट यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, - बहुजन कर्मचारी साहित्य संसदेच्या वतीने चौथे बहुजन साहित्य संमेलन येत्या ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी चांदा क्बल मैदानावर होत आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे राहणार असून, उद्घाटन विचारवंत गेल आम्वेट यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ऍड. कुणाल घोटेकर यांनी स्वीकारली आहे. संमेलनात डॉ. भारत पाटणकर, प्रा. प्रभाकर पावडे, प्रा. जैमिनी कडू यांचे मार्गदर्शन होईल. ८ फेब्रुवारीला सकाळी उद्घाटन सोहळा, सायंकाळी साडेचार वाजता ‘भाकर’ हे पथनाट्य, सायंकाळी सहा वाजता ‘भारतीय भक्ती व मुक्तीचा लढा’ यावर परिसंवाद, रात्री ९ वाजता प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचा ‘अंगार व शृंगार’ हा कार्यक्रम होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विदर्भाचा बुलंद आवाज, दुपारी साडेबारा वाजता परिसंवाद, दुपारी साडेतीन वाजता ‘बाबासाहेब का जागले, का रडले’ यावर नाट्य, सायंकाळी पाच वाजता परिसंवाद, सायंकाळी सात वाजता कीर्तन, रात्री नऊ वाजता कविसंमेलन होईल. १० फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी परिसंवाद, सायंकाळी साडेसहा वाजता जागर समतेचा हा कार्यक्रम होईल.

Thursday, December 26, 2013

 काशिनाथ घटे यांचे निधन

काशिनाथ घटे यांचे निधन


चंद्रपूर, १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनातील महत्त्वाचे शिलेदार येथील काशिनाथ घटे यांचे निधन झाले. गतवर्षी त्याना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा ‘समर्पित जीवन पुरस्कार' प्रदान करण्यात आला. कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. 
माळढोकच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’

माळढोकच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’

चंद्रपूर- नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी त्याच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’ बसवण्याचा पहिला प्रयोग चंद्रपूर जिल्ह्य़ातील आष्टी गावात यशस्वीपणे पार पडला. वाघ आणि बिबटय़ा या प्राण्यांना ‘रेडिओ कॉलर’ बसवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे उपक्रम सुरूच असताना जगात पहिल्यांदाच एका पक्ष्याचा अशाप्रकारे माग काढण्यात येत असल्याने या प्रयोगाला मोठे महत्त्व आले आहे. या प्रयोगांतर्गत, कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून माळढोकच्या संवर्धनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

उरले फक्त अकरा!
जगाच्या पाठीवरून माळढोक पक्षी हळूहळू दुर्मीळ होत चालले आहेत. आजच्या घडीला जगात केवळ ३०० माळढोक पक्षी शिल्लक राहिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात माळढोक पक्षाची गणना दर महिन्याला केली जात आहे. ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून वरोरा तालुक्यात आठ तर लगतच्या भद्रावती तालुक्यात तीन माळढोक पक्षाची नोंद घेण्यात आली आहे. त्यातही चार मादी व उर्वरित नर आहेत.

त्यांना वाचवण्यासाठी..
नामशेष होत असलेल्या या प्रजातीचे जतन करून संख्या वाढवण्यासाठी वन खात्याने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी वरोरा तालुक्यातील आष्टी गावातील एका माळढोक पक्षाच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे अभ्यासक डॉ. हबीब बिलाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या परिसरातील अन्य माळढोक पक्षांना सुध्दा अशाच पध्दतीने कॉलर लावली जाणार आहे.
 बिबट जेरबंद

बिबट जेरबंद

चंद्रपू- शहराच्या सीमावर्ती भागातील टावर टेकडीनजीकच्या वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगलानजीक धुमाकूळ घालणारा एक बिबट जेरबंद झाला. बुधवारी पहाटे साडेसहा वाजता ही घटना समोर आली.

वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ४८४मध्ये १३ दिवसात बिबट्याने दोन जणांचा बळी घेतला होता. यात अर्चना पितरे या महिलेसह सहा वर्षीय बालिका सरिता मारोती सवरसे हिचा बळी बिबट्याने घेतला होता. या घटनेनंतर भीतीचे वातावरण होते. त्यावर उपाय म्हणून दोन पिंजरे लावण्यात आले होते. जेरबंद झालेला मादी बिबट अडीच वर्षाचा आहे. त्याची रवानगी मोहुर्ली बचाव केंद्रात करण्यात आली आहे. या घटनेने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. यानंतरही सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक राव यांनी दिली आहे.
चंद्रपूरपासून ३० किमी अंतरावरील अजयपूरजवळील शेतशिवारात एक बिबट सिमेंट पाइपमध्ये शिरला. मात्र गावकऱ्यांनी गर्दी केल्याने तो घाबरून पाइपमधून बाहेर पडू शकला नाही. वनविभागाने प्रयत्न सुरू केले. मात्र गर्दीमुळे बिबट पाइमध्येच अडकून बसला. अखेर लोकांना बाजूला सारण्यात आले. काही क्षणातच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.

Tuesday, December 24, 2013

परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू

परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू

परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू

दिल्लीच्या राजपटावर पहिल्यांदाच सत्तेची मास्टर चाबी आपल्या टोपीत पाडणा-या आम आदमी पक्षाची भुरळ चंद्रपुरातही दिसून येत आहे. अनेक इच्छुक तरुण कार्यकर्ते येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपचा झाडू हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप वगळता इतर पक्षाला लोकसभा आणि विधानसभेत जाता आले नाही. केवळ शेतकरी संघटनेला दोनदा आमदार मिळविता आला. गत लोकसभा निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून बसप आणि शेतकरी संघटना उभ्या होत्या. मात्र, मतदारांनी जुन्याच पक्षाच्या नेत्यांना पसंती दिली. मात्र, विकासाच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपसून न सुटलेल्या समस्या आतातरी सुटाव्यात, यासाठी मतदारदेखील नवा पर्याय शोधत आहे. जिल्ह्यात तरुण नेते तयार होऊ लागले आहेत. वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनेमार्फत विकासाच्या मुद्द्यावर मोर्चे, आंदोलने करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न हे तरुण करू लागले आहेत. त्यामुळे मतदारांना नव्या तरुणांवरील विश्वास वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवख्या आप पक्षाने प्रस्थापित पक्षांचा झाडूने सङ्काया करीत सत्तेची मास्टर चाबी आपल्या हाती घेतली. त्यामुळे मआपङ्कची हवा चंद्रपुरातही पोहोचली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मआपङ्कच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि नागपुरात बैठका सुरू झाल्या आहेत. भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर, वकील, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकारी मआम आदमी पार्टीङ्ककडे आशेने बघू लागले आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली. राज्य ते ग्रामपातळीपर्यत कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. या पक्षात उमेदवाराची शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, चारित्र्य, संपत्ती आदींविषयी माहिती असेल. सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध राहणार असून, एखाद्या सदस्याच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीविषयी कुणाला माहिती असल्यास ते ऑनलाइन तक्रार करू शकतात.

चाचपणी सुरू
शहरातील विविध संघटना आणि काही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आप पक्षाविषयी विचारणा केली असता सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संपर्कात असून, चाचपणी सुरू असल्याचे एका पदाधिकाèयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सोशल नेटवर्किंगचा फायदा
शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे एसएमएसच्या माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम सुरू होते. आता ङ्केसबुकने ही जागा घेऊन परिवर्तनाची दिशा तरुणांना पटवून देत आहे.

पक्ष.....  .मनपा.........नपा.......जिप.......पंस....एकूण
काँग्रेस...  २६..........५०........२१........४५.....१४२
भाजप.... १८.........२५.......१८........३१.... ९२
राष्ट्रवादी.....४.......१७.........७........१३......४१
शिवसेना....५........१८.........२.........२......२७
बसप.........१........५.........१..........१.......८
मनसे.......१.......१..........१..........१.......४
अपक्ष.......११....८..........७.........२१.....४७
भाकप......०......२..........०............०.....२
शेतकरी संघटना...०..५..........०............०.....५
रिपाइं...........०......१..........०............०.....१
भारिप..........०.........३..........०............०.....३
                ६६.....१३५......५७.....११४.........३७२

स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस बलाढ्य पक्षजिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस बलाढ्य पक्ष आहे. एकूण ३७२ जागांपैकी एकट्या काँग्रेसकडे १४२ जागा आहेत.
 

  • काँग्रेस ३८%
  • भाजप २४%
  • राष्ट्रवादी काँग्रेस ११%
  • शिवसेना ७%
  • बसप २%
  • मनसे १%,
  • अपक्ष १२%
  •  शेतकरी संघटना १.३ %,
  • भाकप ०.५ %,
  • भारिप ०.८%,
  • रिपाइं ०.२ %,

Monday, December 23, 2013

 बंद पुकारला; पण बाजार पेठ दिवसभर सुरु

बंद पुकारला; पण बाजार पेठ दिवसभर सुरु

01.jpg प्रदर्शित करत आहे
राष्ट्रवादी चे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांनी मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन  सोमवारी (दि. २३) बंद पुकारण्यात आला. पण बाजार पेठ दिवसभर सुरु होती 
विमा योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी

विमा योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी

छात्रभारती चे राज्यपालांना पत्र; विद्यार्थी सुरक्षा

नगर :- पुणे विद्यापीठाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत जी विमा योजना राबवली जाते त्या योजनेची अपघात ग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणारी विमा रक्कम हि अत्यंत तटपुंज्या स्वरुपाची असून या योजनेच्या विमा निधी मध्ये वाढ करण्यात यावी अशा मागणीचे पत्र छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकरनारायण आणि पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू वासुदेव गाडे यांना पाठविण्यात आले. या योजनेचा पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ६१२ महाविद्यालयांमधील जवळपास साडे पाच लाख विद्यार्थ्यांना फायदा होतो.यावेळी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

या विमा योजनेंतर्गत जर विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झालाच तर त्याच्या पालकांना पन्नास हजार रुपये पर्यंत दावा रक्कम म्हणून मिळतात. तसेच जर त्या विद्यार्थ्याला अपघातात अपंगत्व आले असेल तर त्याला त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार ठराविक रक्कम दिली जाते. परंतु विद्यार्थ्याला अथवा त्याच्या पालकांना मिळणारी ही रक्कम अत्यंत तटपुंज्या स्वरुपाची आहे. वास्तविक पाहता अपघाताचे स्वरूप जास्त असताना सुद्धा विद्यार्थ्याला कमी रक्कम मिळते. यामध्ये फक्त अपघातानंतर झालेल्या दवाखान्यातील खर्चाची रक्कम मिळते. परंतु अपघातानंतर त्या विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक नुकसान झाल्याने / अपंगत्व आल्याने त्याला पुढील कित्येक महिने घरीच बसून राहावे लागते त्यामुळे त्याला मिळणाऱ्या विमा रकमेत वाढ होणे गरजेचे आहे. विमा रकमेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला दरवर्षी १० रु शुल्क भरावे लागते. परंतु जर याच शुल्कामध्ये अजून २० ते ३० रु ची वाढ केल्यास विद्यार्थ्याला मिळणाऱ्या विमा रकमेत कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रु पर्यंत वाढ होईल. आणि याचा गरीब आणि सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Sunday, December 22, 2013

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

  • सावली तालुक्यातील निफन्द्रा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • पीडित मुलगी चंद्रपूर च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती 

  • पाथरी पोलिसांनी केली १ आरोपीस अटक; 

  • संजय विजय नवघडे वय २८ असे आरोपीचे नाव आहे. 
धनगर समाजाच्या मोर्चात चंद्रपूरातुन हजारो सामिल

धनगर समाजाच्या मोर्चात चंद्रपूरातुन हजारो सामिल

dhangar morcha.jpg प्रदर्शित करत आहे
धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने अधिवेशनादरम्यान काढलेल्या मोर्चात चंद्रपूर जिल्हयातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करावे, चराई क्षेत्र उपलब्ध करून पासेस द्यावे व इतर मागण्यासाठी 19 डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा करीता जिल्हयातील जबाबदारी डाॅ. तुषार मर्लावार व संजय कन्नावार यांचेकडे होती. यांनी मोर्चा यशस्वी करण्याकरीता गावागावातुन मोटार सायकल रॅली काढुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. परीणामी सावली, मूल, सिंदेवाही, नागभीड, गोंडपिपरी,चंद्रपूर तालुक्यातुन 5 हजाराचे वर समाजबांधव मोर्चा सहभागी झाले. मोर्चात सहभागी झाल्यामुळे डाॅ.तुषार मर्लावार व संजय कन्नावार यांनी बांधवांचे आभार मानले आहे.
गृहमंत्र्यांनी दिले पोलिसांच्या दंडुकेशाहीच्या चौकशीचे आदेश

गृहमंत्र्यांनी दिले पोलिसांच्या दंडुकेशाहीच्या चौकशीचे आदेश



१८0 कामगारांनी जामीन नाकारला

चंद्रपूर : कोणतीही चुकी नसताना कामगार नेते प्रमोद मोहोड यांना उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांनी मारहाण केली. यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली असून कर्नाटका एम्टामधील आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत जामीन घेणार नाही, अशी भूमिका अटकेतील ५६ महिला व १२४ कामगारांनी घेतली आहे. याशिवाय मारहाण प्रकरणाची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघाचे केंद्रीय सचिव सी.आर. टेंभरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कंपनीने ४७ कामगारांना कामावरून निलंबित केले व ८४ कामगारांना केवळ तोंडी आदेश देऊन बडतर्फ केले. याविरोधात कामगारांनी राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघाच्या नेतृत्वात कामगार आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन व्यवस्थापनाला बदली करण्यात आलेल्या तीन कामगारांची बदली स्थगित करावी, ८४ कामगारांना कामावर परत घ्यावे व निलंबित कामगारांची चौकशी करावी, असे निर्देश दिले. मात्र व्यवस्थापनेने याची दखल न घेतल्याने राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघाच्या नेतृत्वात १७ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. संपूर्ण आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करीत कामगारांचे अटकसत्र सुरू केले. यादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांनी कामगार नेते प्रमोद मोहोड यांना मारहाण केली. यामुळे कामगारांत संतापाची लाट उसळली असून आंदोलन आणखी तिव्र करण्यात आल्याचे टेंबरे यांनी सांगितले.
कोणताही गुन्हा नसताना मोहोड यांना मारहाण करणार्‍या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही टेंबरे यांनी यावेळी केली.
नक्षलग्रस्त भागात 'शोधयात्रा' मोहीम

नक्षलग्रस्त भागात 'शोधयात्रा' मोहीम

चंद्रपूर- शासनाने गेल्या दोन दशकात नक्षलग्रस्त भागात विकासाच्या नावाखाली प्रचंड पैसा ओतला. त्यानंतरही नक्षलवाद कमी झाला नाही. शासनाचा हा प्रयत्न गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी होता. शासनाच्या या योजनांचे नक्की फलित काय हे जाणून घेण्यासाठी जानेवारी २0१४ मध्ये शोधयात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य व मनपा नगरसेवक संजय वैद्य यांनी दिली. यावेळी आयोजन समितीचे सदस्य प्रा. अरविंद सोवनी यांची उपस्थिती होती. 
वैद्य म्हणाले, आदिवासींच्या विकासासाठी शासन आज प्रयत्नशील आहे. परंतु, हे शहाणपण शासनाला नक्षलवाद्यांची चळवळ सुरू झाल्यानंतर सूचले. तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेतृत्त्वाचे लक्ष गडचिरोली जिल्हय़ातील आदिवासींकडे गेले नाही. नक्षल चळवळ सुरू झाली तेव्हा नक्षल्यांनी अरण्य प्रदेशात राहणार्‍या गरीब, शोषित, निरक्षर व नेतृत्त्वहीन आदिवासींना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. परंतु, हा उद्देश नंतर बदलत गेला. या चळवळीला हिंसक स्वरूप प्राप्त झाले. शासनाने या समस्येशी लढण्यासाठी पोलिस दल तैनात केले. पोलिस आणि नक्षली यांच्या कचाट्यात मात्र निष्पाप आदिवासी भरडल्या गेला. पोलिसांना मदत केल्यास नक्षल्यांचा त्रास तर नक्षल्यांना मदत केल्यास पोलिसांचा त्रास सहन करण्याचे दुर्भाग्य या आदिवासींना मिळाले आणि आदिवासी समाजातील आक्रोश वाढतच गेला. या पार्श्‍वभूमीवर नक्षल प्रभावातील आदिवासी भागाच्या वास्तवाचा शोध घेण्यासाठी शोधयात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
या यात्रेदरम्यान गडचिरोली जिल्हय़ातील कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरीच्या परिसरातील गावांचा अभ्यास करण्यात येणार असून अतिदुर्गम भागातील अतिसामान्य माणसाच्या जीवनातील समस्यांचा शोध, सरकारी विकास योजनांच्या अंमलबजावणीचा शोध, सामान्य माणसाच्या विकासाच्या स्वप्नांचा शोध, हिंसाचाराच्या मार्गाने समस्या निवारण होवून सामाजिक विकास होईल का, याबद्दल सामान्यांच्या भूमिकेचा शोध घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
या शोधयात्रा मोहिमेत लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे शाम पांढरी पांडे, प्राचार्य लक्ष्मीकांत तुळणकर, विजय लापालीकर, प्रा. प्रदीप मेर्शाम, सुशील सहारे, दत्ता शिर्के, प्रा. अशोक बोरकर, प्रा. श्रीकांत भोवते व जितेंद्र श्रीरामे यांनी केले आहे. 

Friday, December 20, 2013

गुप्तधन शोधणार्‍या तिघांना अटक

गुप्तधन शोधणार्‍या तिघांना अटक


मूल : तालुक्यातील लालहेटी (घोसरी) परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या साहित्याचा वापर करून पूजा करणाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा गावकर्‍यांनी पर्दाफाश करून बेंबाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. तीघांना अटक करून पुजेचे साहित्य जप्त केले. तर उर्वरित अकरा आरोपी पसार झाले.
आरोपींमध्ये क्रि ष्णा जोगेंद्र मंडल (३१), रा. कोनसरी (जि. गडचिरोली), रामा भीमराव आत्राम रा. परसोडी, महादेव कैकू आत्राम (६0) रा. मुच्छीमारशी (जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. बुधवारला घोसरी येथे एका नाट्यप्रयोग सादर केला जात होता. गावकरी नाट बघण्यात मग्न असताना सदर गुप्तधन शोधणारी टोळीने घटनास्थळ गाठून खोदकाम करीत होते. ही बाब या गावातील आत्माराम पाल यांच्या लक्षात येताच अख्खे गावकरी घटनास्थळाकडे धावले. आरोपींना पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर बेंबाळ पोलिसाच्या तीघांनाही स्वाधीन केले. पण गावकरी येताच यातील अकरा आरोपी पसार होण्यास यशस्वी झाले. पोलिसानी आरोपींवर गुन्हा दाखल करून पसार आरोपींचा शोध सुरू केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षाक उंदीरवाडे यांनी केली.
झाडीबोली साहित्य पुरस्कारांची घोषणा

झाडीबोली साहित्य पुरस्कारांची घोषणा

झाडीबोली साहित्य मंडळाकडून दरवर्षी दिल्या जाणार्‍या झाडीबोलीतील उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा आसगाव येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर यांनी केली. हे पुरस्कार ११ जानेवारीला प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचा पुरस्कार द. सा. बोरकर स्मृती काव्य पुरस्कार (लोकराम शेंडे, लोकरामायण), गजानन बागडे स्मृती कादंबरी पुरस्कार (हिरामन लांजे, आठवणीतले गावकूस), मनराज पटेल स्मृती कादंबरी पुरस्कार (पांडुरंग कांबळे, पाराकाष्ठा) आणि सुभाष चांदुरकर कथा पुरस्कार (डोमा कापगते, गावगाड्याच्या गोष्टी) यांना मिळणार आहे. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरीशचंद्र बोरकर यांनी या सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पवनीजवळील आसगाव येथे ११ व १२ जानेवारीला होऊ घातलेल्या एकविसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातील जुनोना टावर टेकडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार- झोपडीतून उचलून नेले. १९ डिसेंबर रोजी ची रात्री १० वाजताची घटना - सविता अवराडे वय ७ असे मृतेचे नाव.  २०१३ वर्षातील वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील १४ वा बळी, १२ दिवसातला दुसरा बळी
Photo: चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातील जुनोना परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार -झोपडीतून उचलून नेले मुलीला , २०१३ वर्षातील वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील १४ वा बळी , १२ दिवसातला दुसरा बळी .
वैद्यकीय शिक्षण देणा- डॉक्टरांची तात्पुरत्या सेवेतील पदे नियमित करा

वैद्यकीय शिक्षण देणा- डॉक्टरांची तात्पुरत्या सेवेतील पदे नियमित करा

नागपूर, दि. 20 :- वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य याविभागांमध्ये सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, एम.बी.बी.एस झालेलेवैद्यकीय अधिकारी, दंत चिकित्सा व आयुर्वेदिक संवर्गातील राज्यकामगार योजनेतील अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत.एम.पी.एस.सी.ची जाहिरात 10-10 वर्ष निघत नाही. त्यामुळेसरकारने तात्पुरत्या स्वरुपातील पदे भरली. परंतु वर्षानुवर्षे तेकार्यरत असल्यामुळे ही पदे नियमित करा अशी मागणीविधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी आजविधानसभेत केली. यासंदर्भात आ.गिरीष महाजन यांनीविचारलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.

श्री.खडसे पुढे म्हणाले, मुंबईतील डॉक्टर्स मुंबईबाहेर जायलातयार होत नाहीत. डॉक्टरांच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत. त्याभरण्यासाठी एम.पी.एस.सी. ची अट शिथील करुन मंत्रिमंडळाच्याबैठकीत सरकारने निर्णय घ्यावा व अस्थायी डॉक्टरांनाहीमहिनाभरात कायमस्वरुपी करा अशी मागणी त्यांनी केली. त्यावररिक्त पदे भरण्यासाठी एम.पी.एस.सी.कडे पाठपुरावा करु वपदोन्नतीसंदर्भात एक महिन्याच्या आत निर्णय घेऊ असेआश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले.

**-**
ओबीसी विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्ती द्या ; एकनाथराव खडसे



नागपूर, दि. 20 :- राज्यातील ओ.बी.सी. विद्यार्थ्यांवरसरकार अन्याय करीत आहे. सरकारच्या मनातओबीसींविषयी आकस आहे. या विद्यार्थ्यांना एस.सी., एस.टी.प्रमाणे त्वरीत शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या अशी मागणीविरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेतकेली. आ.विरेंद्र जगताप यांनी अमरावती विभागातीलओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती संदर्भातविचारलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.
लोहार बंधुंच्या बनावट जात प्रमाणपत्रांची चौकशी होणार

लोहार बंधुंच्या बनावट जात प्रमाणपत्रांची चौकशी होणार

नागपूर, दि. 20 :- सुनिल, नितीन व मनोज लोहार या लोहार बंधुंचीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डी.आय.जी.मार्फत चौकशी करण्यात येईलअसे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आज दिले. विधानसभेतील विरोधीपक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेतवादग्रस्त लोहार बंधुंच्या गैरप्रकारासंदर्भात विधानसभा नियम 105 अन्वयेलक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर गृहमंत्र्यांनी हे आदेश दिले.

लक्षवेधीवर बोलतांना श्री.खडसे म्हणाले, तिन्ही लोहार बंधुंची शासनाने1997 ते 2000 मध्ये डी.वाय.एस.पी. या पदावर नियुक्ती केली होती हे तिन्हीलोहार बंधु हे सेवानिवृत्त आय.पी.एस.अधिकारी पी.टी.लोहार यांची मुले असूनत्यांच्या डी.वाय.एस.पी. पदावरील नियुक्तीमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीसआले. एप्रिल 2009 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारीरमेश घडीवले यांनी विशेष न्यायालय, मुंबई येथे अर्ज दाखल करुन लोहारबंधुच्या नियुक्ती प्रकरणी झालेल्या गैरप्रकाराबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेदाखल केलेली फिर्याद बोगस व खोटी ठरवून तीन्ही लोहार बंधुंच्या नियुक्तीतगैरप्रकार झाला नसल्याचे अहवालात नमूद केले व "बी समरी रिपोर्ट" दाखलकरुन विशेष न्यायालयाने या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली.

25 जून 2013 च्या आदेशान्वये विशेष न्यायालयाने ऍ़न्टी करप्शनब्युरोच्या तपासी अधिकाऱ्यांचा 'बी समरी रिपोर्ट' ची विनंती फेटाळून लावली,लोहार बंधुच्या गैरप्रकारासंदर्भातील तक्रार बोगस व खोटी असल्याचेही तपासीअधिकाऱ्यांचे निष्कर्ष फेटाळून लावले, तपासी अधिकाऱ्याने सदर गुन्हाPrevention of Corruption Act. कलम 13 (1) (डी) च्या अंतर्गत दाखल केलाअसून त्या अनुषंगाने आवश्यक तपास केला नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या विशेष न्यायालयाने 25 जून 2013 च्या आदेशात स्पष्टपणे नमूदकेले आहे. तपासी अधिकाऱ्याने योग्य प्रकारे व पूर्णत: तपास न केल्याच्यानिष्कर्षास येऊन विशेष न्यायालयाने तपास अधिकाऱ्याने पुढील तपासकरण्याचे आदेशीत केले आहे.

लोहार बंधूंपैकी मनोज लोहार आजही जळगांव येथील गुन्ह्यासंदर्भातनिलंबित आहेत. या तिन्ही लोहार बंधुंनी ते भटक्या जमाती (ब) प्रवर्गात मोडतअसल्याचे दाखविले, वास्तविक पाहता ते इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत.

श्री.खडसे पुढे म्हणाले की, लोहार बंधुंनी खोटी व बोगस जात प्रमाणपत्रमिळवली असून ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून मिळवली. या तिन्ही बंधुंनी चौकशीहोईपर्यंत त्यांना निलंबित करावे व ऍ़डिशनल डी.जी.च्या अध्यक्षतेखालीएस.आय.टी.स्थापन करुन विशिष्ट कालमर्यादत त्यांची चौकशी पूर्ण करावीअशी मागणी श्री.खडसे यांनी केली.

त्यावर या लोहार बंधुंची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याडी.आय.जी.मार्फत तीन महिन्याच्या आत केली जाईल असे आश्वासनगृहमंत्र्यांनी दिले.

**-**

Thursday, December 19, 2013

22 डिसेंबर रोजी विक्रीकर निरीक्षक पूर्व परिक्षा

22 डिसेंबर रोजी विक्रीकर निरीक्षक पूर्व परिक्षा


चंद्रपूर - 22 डिसेंबर रोजी होणा-या विक्रीकर निरीक्षक पूर्व परिक्षा-2013 दरम्यान केंद्राच्या परिसरात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सदर परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्राअंतर्गत नियिमत व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत परिक्षा दिनी परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्रअंतर्गत झेरॉक्स फॅक्स, ई मेल, मोबाईल फोन आणि इंटरनेट सवलती किंवा अन्य कोणतेही कम्मुनिकेशन सवलतीवर प्रतिबंध राहील.

सदर आदेश डॉ.आंबेडकर कॉलेज तथा कामर्स आणि सायन्स चंद्रपूर, भवानजी भाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय मूल रोड चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमोरिलय हायस्कुल तथा कनिष्ट महाविद्यालय घुटकाळा वार्ड, जनता विद्यालय डॉ.वासलवार यांचे दवाखान्याजवळ, शांताराम पोटदुखे लॉ कॉलेज ताडोबा रोड तुकूम, सेंट मायकल इंग्लिश स्कुल मिशन नगीना बाग, न्यू इंग्लिश हायस्कुल तथा ज्यु कॉलेज जयंत टॉकीज जवळ मेन रोड, जिल्हा परिषद माजी शासकीय ज्युबली हायस्कुल तथा ज्युनिअर कॉलेज चंद्रपूर, श्री साई तंत्रनिकेतन नागपूर रोड चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय गंज वार्ड, हिंदी सिटी हायर सेंकडरी स्कुल कस्तुरंबा रोड व विद्या विहार कॉन्व्हेट हायस्कुल छत्रपती नगर तुकूम चंद्रपूर या ठीकाणी लागू राहील.
अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

चंद्रपूर : एका अल्पवयीन मुलीचे शाळेसमोरून चार अज्ञात व्यक्तींनी एका मारोती व्हॅनमधून अपहरण केले. त्यानंतर तिला भद्रावतीकडे नेण्यात आले. चंद्रपूर-भद्रावती मार्गावरील कर्नाटका एम्टा कंपनीसमोर मुलीला फेकून देण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पीडित मुलगी १७ वर्षांची असून कस्तुरबा मार्गावरील एका शाळेतील नववीची विद्यार्थिनी आहे. बुधवारी चार जणांनी तिच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा रुमाल ठेवला. त्यानंतर तिला एका मारोती व्हॅनमध्ये बळजबरीने बसविण्यात आले. ही व्हॅन भद्रावती मार्गाने निघाली. यादरम्यान चंद्रपूर-भद्रावती मार्गावर तिच्यावर अत्याचार केल्याचे समजते. परंतु, अत्याचार झाला कि, नाही हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल.

उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांनी पीडित मुलीला चंद्रपूर येथे आणले. याबाबत शहर ठाण्यात अत्याचाराची तक्रार दाखल आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी पीडित मुलीची भेट घेतली. पीडित मुलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामला जन्मठेप

माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामला जन्मठेप

डॉ. विजय वडस्कर खूनप्रकरण - २८ एप्रिल २00६ ची काळरात्र 

चंद्रपूर- एप्रिल २00६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वतरुळात खळबळ उडविणार्‍या नगरसेवक डॉ. विजय वडस्कर खूनप्रकरणी बल्लारपूर येथील काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग- १ तथा विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर तिचा पुतण्या खजांजी आत्राम याला खुनाच्या प्रकरणातून मुक्त करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
२८ एप्रिल २00६ ची रात्र बल्लारपूर नगरपालिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. विजय वडस्करसाठी काळरात्र ठरली. बल्लारपूरच्या माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामच्या घरी विजय वडस्करचा संशयास्पद मृतदेह आढळला. अतिमद्यप्राशनामुळे डॉ. वडस्करचा मृत्यू झाल्याची तक्रार स्वत: सुनंदा आत्रामने पोलीस ठाण्यात केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये विजय वडस्करचा मृत्यू गुदमरून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि भादंवि ३0२ चा गुन्हा दाखल करून सुनंदा आत्राम आणि तिचा पुतण्या खजांजी आत्रामला अटक केली. सुनंदा आत्रामचे डॉ. वडस्करशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सुनंदा आत्राम नगराध्यक्ष झाल्यानंतर आर्थिक देवाणघेवाणीतून या दोघांतील संबंध ताणले गेले. सुनंदा आत्राम पदावरून गेल्यानंतर प्रेमसंबंधात मोठी दरी निर्माण झाली. आणि त्यातूनच विजय वडस्करचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सरकार पक्षाने १५ जणांची साक्ष नोंदविली. यात सुनंदा आत्रामवर खुनाचा गुन्हा निश्‍चित झाल्याने विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर तिचा साथीदार पुतण्या खजांजी आत्राम याला खुनाच्या गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले असले तरी पुरावे नष्ट केल्याप्रकरणी भादंवि २0१ अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अँड़ जयंत साळवे यांनी बाजू मांडली, तर सुनंदा आत्राम आणि खजांजी आत्रामतर्फे अँड़ संजय शिरपूरकर व अँड़ बुरिले यांनी बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय येताच सुनंदा आत्राम आणि खजांजी आत्रामला बल्लारपूर पोलिसांनी तत्काळ अटक केली. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयाचा निर्णय येताच काँग्रेसच्या वतरुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Wednesday, December 18, 2013

चंद्रपूर जिल्ह्याची सुपुत्री देवयानी खोब्रागडे

चंद्रपूर जिल्ह्याची सुपुत्री देवयानी खोब्रागडे

जाणून घ्या कोण आहेत देवयानी खोब्रागडे, पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंतचा प्रवासदेवयानी यांची संयुक्त राष्ट्र महासंघात बदली


अमेरिकेतील भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक झाली. त्यांच्या अटकेचे पडसाद भारतासह जगभरात उमटत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची सुपुत्री देवयानी खोब्रागडे हि ओळख अनेकांना ठाऊक नाही. मात्र, देवयानी हि महाराष्ट्र कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत.  उत्तम खोब्रागडे हे मूळचे मुल येथील रहिवाशी आहेत. 
1999च्या बॅचच्या आयएफएस (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) अधिकारी आहेत. सध्यात्यांची नियुक्ती न्यूयॉर्कमध्ये भारतीय उच्चायुक्तालयातील उपउच्चायुक्त म्हणून आहे. याआधी त्या पाकिस्तान, इटली आणि जर्मनी येथे कार्यरत होत्या. 
देवयानी यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, जळगाव येथे झाले. त्यानंतर मुंबईत माउंट कॉर्मेल स्कूल आणि सेठ जी.एस. मेडीकल कॉलेज आणि केईएममधून एमबीबीएस पूर्ण केले.   2012 मध्ये रोल्स रॉइस सायन्स अँड इनोव्हेशन लिडरशिप प्रोग्रामसाठी त्यांची निवड झाली. येथे त्यांनी त्यांचे ज्ञान आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांचे पती तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. देवयानी यांना दोन मुली असून मोठी मुलगी सहा वर्षांची तर छोटी तीन वर्षांची आहे. देवयानी यांना प्रवास, संगीत, नृत्य, योगा यांची विशेष आवड आहे.
अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा पुरस्कार

अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा पुरस्कार

चंद्रपूर - येथील कादंबरीकार अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा ललित ग्रंथ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ११ जानेवारी रोजी पुणे येथे गीतकार गुलजार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाईल.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेचे यंदाचे 11 पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले.  ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सामाजिक कार्यासाठीचा जीवनगौरव रयत शिक्षण संस्थेला जाहीर झाला. वरील दोन्ही पुरस्कार प्रत्येकी दोन लाखांचे आहेत. पत्रकार संध्या नरे पवार, अमिता नायडू, अशोक पवार यांना साहित्य, तर सामाजिक कार्यासाठी गजानन खातू, डॉ. अशोक बेलखोडे (नांदेड) व धनाजी गुरव यांना पुरस्कार जाहीर झाले. जालना येथील राजकुमार तांगडे यांना ‘शिवाजी अंडरग्राऊंड.’ नाटकासाठी पुरस्कार मिळाला. यंदापासून सुरू झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराचे मानकरी संगणकतज्ज्ञ विवेक सावंत ठरले.

सामाजिक कार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार या वर्षी व्यक्तीला न देता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला (सातारा) जाहीर झाला. साहित्य जीवनगौरव आणि सामाजिक जीवनगौरव हे दोन्ही पुरस्कार प्रत्येकी दोन लाख रुपयांचे आहेत.

साहित्य विभागात पत्रकार संध्या नरे-पवार (मुंबई) यांच्या ‘डाकीण’ या पुस्तकाला वैचारिक ग्रंथ पुरस्कार, अमिता नायडू यांच्या ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ या पुस्तकाला आपारंपरिक ग्रंथ पुरस्कार तर अशोक पवार यांच्या ‘पडझड’ या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहे. हे तीनही पुरस्कार प्रत्येकी 25 हजार रुपये रकमेचे आहेत.

सामाजिक कार्य विभागात व्यक्तींना कार्यकर्ता पुरस्कार दिले जातात. त्यात प्रबोधन कार्यासाठी गजानन खातू (मुंबई), ‘सामाजिक प्रश्न’ विभागासाठी डॉ. अशोक बेलखोडे (नांदेड) आणि ‘असंघटीत कष्टकरी’ विभागासाठी धनाजी गुरव (निपाणी) यांना निवडण्यात आले आहे. हे तीनही पुरस्कार प्रत्येकी 50 हजार रकमेचे आहेत.

नाट्य विभागात राजकुमार तांगडे (जालना) यांना ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकासाठी 25 हजार रुपये रकमेचा तर मकरंद साठे (पुणे) यांना ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री‘ या त्रिखंडात्मक ग्रंथासाठी 50 हजार रुपये रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतातील निवड समित्यांनी प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावांची शिफारस केली होती. अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनच्या निवड समित्यांनी त्या तीनमधून एक नाव निश्चित केले. या पुरस्कारासाठी अर्ज करावे लागत नाहीत. निवड समितीचे लोक स्वत:हून पुरस्कारयोग्य व्यक्तींचा शोध घेत असतात. महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने 1994 पासून साहित्य व सामाजिक कार्यासाठी पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्टच्या वतीने केले जाते.

यंदापासून दाभोलकर पुरस्कार : या वर्षीपासून एक लाख रुपये रकमेचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार ‘एमकेसीएल’चे संस्थापक संगणतज्ज्ञ विवेक सावंत (पुणे) यांना देण्यात येणार असून हा पुरस्कार एक लाख रुपये रकमेचा आहे.

Tuesday, December 17, 2013

राज्यातील नद्यांना प्रदुषणमुक्त करा

राज्यातील नद्यांना प्रदुषणमुक्त करा

-एकनाथराव खडसे

आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर, दि. 17 :- राज्यातील औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या गोदावरी,तापी, मुळा, मुठा, पंचगंगा यासारख्या मोठया नद्यांच्या परिसरात प्रदुषण वाढतअसल्याचा अहवाल राज्य व केंद्र शासनाकडे आलेला आहे. नद्या प्रदुषणमुक्तकरण्यासाठी केंद्र सरकारने धोरण जाहीर केले आहे. या नद्यांचे प्रदुषणरोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीविधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेतकेली. आ.राजेश क्षिरसागर यांनी कोल्हापूर येथील पंचगंगा नदीजवळीलनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासातविचारलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

श्री.खडसे पुढे म्हणाले, या नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारराज्य शासनाला निधी देणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊनयासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावयाचा आहे. या कामासाठी राज्यशासनाने एक समितीसुध्दा नेमलेली असून त्या समितीकडे असे किती प्रस्तावप्रलंबित आहेत असा सवाल त्यांनी केला. इचलकरंजीच्या संदर्भात 450 कोटीचीयोजना घेण्याचे ठरविले आहे. सातारा व सांगली येथे ज्याप्रमाणे शासनाने अशीयोजना सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच धर्तीवर इचलकरंजीलासुध्दाही योजना तातडीने सुरु करावी. याच धर्तीवर शासनाने विशेष बाब म्हणून ज्याज्या ठिकाणी नद्यांमधून प्रदुषणयुक्त पाणी वाहते त्या क्षेत्रातीललोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तसेच योजनेसाठी देय असलेला राज्यशासनाचा वाटा भरुन केंद्र शासनाकडून या योजनेसाठी लागणारा निधी उपलब्धकरुन घ्यावा अशी मागणी श्री.खडसे यांनी केली.

राज्य शासनाने या कामासाठी केंद्र शासनाकडेसुध्दा पुढाकार घ्यावातसेच इचलकरंजीला जी योजना प्रस्तावित आहे ती योजना सातारा वकोल्हापूरच्या धर्तीवर तातडीने मंजुरी देऊन त्या प्रस्तावाला निधी उपलब्धकरुन द्यावा अशी मागणीही श्री.खडसे यांनी शेवटी केली.

त्यावर नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांची माहिती घेऊनसभागृहाला दिली जाईल व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेआश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Monday, December 16, 2013

शेतकरीहिताचा आत्मा इंग्रजीत

शेतकरीहिताचा आत्मा इंग्रजीत

देवनाथ गंडाटे
चंद्रपूर  : सात महिन्यांपूर्वी १२ हजार रुपये खर्चून सुरू करण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संकेतस्थळाचे नियमित अपडेशन झाले नाही. शिवाय शेतक-यांना न समजणा-या इंग्रजी माहितीमुळे या संकेतस्थळाचा आत्माच हरविला आहे.

हे संकेतस्थळ बघण्यासाठी 


कृषी उत्पादन वाढ आणि शेतक-यांचे उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्न वाढ, कृषी संशोधन, तंत्रज्ञान निर्मिती यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून कृषी विस्तार विभाग, कृषी विद्यापीठे, कृषीशी संलग्न इतर विभाग, शासकीय यंत्रणा, खासगी यंत्रणा, सेवाभावी संस्था यांच्या कृतिशील सहभागातून कृषी विस्तार सहाय्य अधिक प्रभावी गतीमान करण्याचा उद्देश होता. २०१०-११ पासून ही योजना सुधारित आत्मा म्हणून जिल्हास्तरावर सुरू करण्यात आली. जिल्हास्तरावर अधीक्षक कृषी अधिकारी पदाचे प्रकल्प संचालक, प्रकल्प उपसंचालक, लेखा नि लिपिक, ही महत्वाची पदे भरण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून आत्माचे कार्यालय वडगाव येथे स्वतंत्र इमारतीत गेले. आत्माने एक पाऊल पुढे टाकत मे २०१३ मध्ये जिल्ह्याचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले. मआत्मा चंद्रपूरङ्क या संकेतस्थळाचे उद्घाटन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. या संकेतस्थळामुळे शेतक-यांपर्यंत माहिती-तंत्रज्ञान पोहोचल, असे सर्वांनाच वाटले. मात्र, यातील सर्व माहिती इंग्रजीत असल्याने सामान्य शेतक-यांना काहीही एक ङ्कायदा झालेला नाही. संकेतस्थळाच्या मुखपृष्टावर आंबा आणि धानाचे चित्र आहे. शिवाय जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांचे छायाचित्र दिसते. गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या संकेतस्थळावर केवळ जिल्हाधिका-यांचे छायाचित्र आणि काही कार्यक्रमांचे छायाचित्र प्रकाशित करण्यापलिकडे कोणतेही नवे अपडेशन झाले नाही. नागपूर येथील खासगी वेबडिझाइनरकडून हे संकेतस्थळ बनविण्यात आले असून, निर्मिती आणि वर्षभराच्या देखभालीसाठी १२ हजार रुपये देण्यात आले.
आत्मा योजनेचे प्रमुख उद्देश शेतकरी हिताचे आहेत. मात्र, संकेतस्थळावरील माहिती इंग्रजीत असल्याने शेतक-यांना त्याचा लाभ घेणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतक्या शेतक-यांना मराठी लिहिता-वाचता येते. त्यात इंटरनेट ही सुविधा दूरच राहिली आहे.

  • काय हवे?
  • जिल्हा नियामक मंडळाची यादी व कार्य
  • आत्मा व्यवस्थापन समितीची यादी व कार्य
  • आत्माला दुवा साधणा-यांची माहिती
  • आत्माचा उद्देश आणि कार्य
  • विविध उपक्रम आणि यशोगाथा
  • आर्थिक मदतीची माहिती आणि नियोजन
  • वार्षिक कृती आराखडा, कृषी सल्ला
  • किसान एसएमए सेवा
  • जिल्ह्याची कृषीविषयक सांख्यिकी माहिती


मंजुरीअभावी दोन लाच प्रकरणे प्रलंबित

मंजुरीअभावी दोन लाच प्रकरणे प्रलंबित

डॉ. रमेश बांडेबुचे, चिमूरच्या भूकर मापक कर्मचा-यांचे प्रकरण

चंद्रपूर : लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शासनाकडे मंजुरी आदेशासाठी पाठविलेले जिल्ह्यातील दोन लाच प्रकरणे ३१ नोव्हेंबर २०१३ पर्यंत शासनाकडे ९० दिवसांपेक्षा जास्त काळ होऊनही प्रलंबित आहेत. यात चिमुरातील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि बहुचर्चित डॉ. रमेश बांडेबुचे लाचप्रकरणाचा समावेश आहे.
वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी शिक्षकाकडून दोन हजार ८०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहा जानेवारी २०११ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शिपाई श्रीधर मेमन याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही लाच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रमेश बांडेबुचे यांच्या सूचनेवरून स्वीकारल्याचे मेननने मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी जिल्हा शल्यचिकित्सक बांडेबुचे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र, कायद्यानुसार ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता जिल्हा शल्यचिकित्सक सेवेतून निवृत्त झाले आहेत.
दुस-या एका प्रकरणात ४ डिसेंबर २०१२ रोजी ३५ वर्षांपूर्वी घेतलेली कृषक शेतजमीन अकृषक करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक देवेंद्रकुमार प्रभानंद कटरे, संजय महादेव कोरे यांना अटक करण्यात आली. हे प्रकरणसुद्धा शासनाकडे मंजुरी आदेशासाठी प्रलंबित आहे. राज्यात एकूण ५१ प्रकरणे प्रलंबित असून, २०११ मधील १, २०१२ मधील ५ आणि २०१३ मधील ४५ प्रकरणांचा समावेश आहे. उघड चौकशीकरिता मंजुरी आदेशासाठी राज्यात एकूण आठ प्रकरणे प्रलंबित आहेत.

१३९ प्रकरणे विशेष न्यायालयात प्रलंबित
१९८६ ते २०१३ पर्यंत विशेष न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या राज्यात २२५१ इतकी आहे. यात नागपूर विभागातील ४५४ प्रकरणांचा समावेश असून, चंद्रपूर विशेष न्यायालयात १२१, तर वरोरा येथे १८ प्रकरणे प्रलंबित आहेत.

Sunday, December 15, 2013

ताडाळी औद्योगिक भूखंडप्रकरणी भ्रष्टाचार नाही

ताडाळी औद्योगिक भूखंडप्रकरणी भ्रष्टाचार नाही

ताडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडाप्रकरणी एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसून कोळशाच्या पावडरीमुळे चंद्रपूर शहरात पर्यावरणाचा प्रश्न उभा राहिल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिका-यांच्या सांगण्यावरून ताडाळी परिसरात उद्योजकांना हा भूखंड उपलब्ध करून देण्यात आला होता, अशी बाब आता पुढे आली आहे. 

मुंबई- चंद्रपूर शहराजवळील ताडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडप्रकरणी एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसून कोळशाच्या पावडरीमुळे चंद्रपूर शहरात पर्यावरणाचा प्रश्न उभा राहिल्यामुळेतत्कालीन जिल्हाधिका-यांच्या सांगण्यावरून ताडाळी परिसरात उद्योजकांना हा भूखंड उपलब्ध करून देण्यात आला होता, अशी बाब आता पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आपल्याला कोणतीही नोटिस बजावलेली नसल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे. याबाबत आजवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील आवेदकांनी सादर केलेले उद्योग प्रमाणपत्र कोल पावडरच्या उत्पादनाकरता होते. तशाच प्रकारची नोंद वाटपपत्र आणि प्राथमिक करारनामा यांमध्ये असल्यामुळे या प्रकरणात जागेचे वाटप कोळसा पावडर या उद्योगाकरता करण्यात आले. विशेष म्हणजे या भूखंडाचे वाटप उद्योग प्रयोजनातून व औद्योगिक दरानेच करण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाला चार कोटी ९२ लाख रुपयांचा तोटा झाला, असा प्रचार करणे चुकीचे आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी, चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण व त्यामुळे स्थानिक २० लाख नागरिकांच्या जीविताला होणारा संभाव्य धोका तसेच या उद्योगाशी संबंधित असलेल्या उद्योगांमधील ५ हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन चंद्रपूर शहरातील कोळसा व्यावसायिकांना शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडाळी औद्योगिक क्षेत्रात भूखंड देण्याचा निर्णय घेतला. एका स्थानिक खासदाराने या व्यापा-यांना त्रास देण्यासाठी हा सगळा बनाव रचला असल्याचे सूत्रांकडून समजले.
चंद्रपूरच्या तत्कालीन जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल २०१२ मध्ये आयोजित सभेत ताडाळी औद्योगिक क्षेत्रात वाटपाकरता जागा शिल्लक आहे का, अशी विचारणा केली असता ताडाळी औद्योगिक क्षेत्रात १०० ते १२५ एकर जागा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले होते. या जागेचे वाटप महामंडळाने कोल डेपोसाठी करावे, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी त्यावेळी दिले होते. या सभेत कोळसा व्यावसायिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हा उपकेंद्राचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांचे प्रादेशिक अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील कोल डेपो बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे संबंधित कोळसा व्यावसायिकांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे व्यवसायाकरता ताडाळी औद्योगिक क्षेत्रात जागा मिळण्याबाबत १ ऑक्टोबर, २०१२ रोजी लेखी पत्रव्यवहार केला होता.
या प्रकरणी अर्जदारांना पत्र देऊन प्रस्तावित उद्योगाकरता महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याबाबत कळवण्यात आले असता, त्यांनी ही जागा वाटप केल्यानंतरच संबंधित ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे निवेदन सादर केले. या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेऊन मुख्यालयाकडून पुढील कार्यवाही व निर्णयाकरता हे प्रकरण उद्योगमंत्र्यांकडे पाठवण्यात आले होते.

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
चंद्रपुर में शुरू होगा देश का चौथा सिकलसेल रिसर्च सेंटर

चंद्रपुर में शुरू होगा देश का चौथा सिकलसेल रिसर्च सेंटर



चंद्रपुर। सिकलसेल रोग का अध्ययन व उपचार करने के लिए देश का चौथा सिकलसेल रिसर्च सेंटर चंद्रपुर में स्थापित किए जाने का जानकारी सांसद हंसराज अहीर ने पत्रकार परिषद में दी.
चंद्रपुर, गढ.चिरोली, वर्धा, यवतमाल, नागपुर शहरों में सिकलसेल रोगी बडे. प्रमाण में हैं. यह रोग असाध्य माना जाता है. इन रोगियों के उपचार के लिए अब तक देश में तीन सेंटर शुरू किए गए हैं. चौथा सेंटर चंद्रपुर में बनाया जाएगा, जिसमें इन रोगियों का अध्ययन करके उन पर उपचार किया जाएगा.
चंद्रपुर के म्हाडा कालोनी में चार एकड. भूमि में यह अस्पताल बनेगा. बहरहाल यहां के क्षयरोग अस्पताल में एक महीने के भीतर इस अस्पताल को आरंभ कर दिया जाएगा. चंद्रपुर जैसे क्षेत्र में देश का चौथा तथा महाराष्ट्र का पहला अस्पताल यहां खुलने से इसका काफी फायदा क्षेत्र के सिकलसेल रोगियों को होने का विश्‍वास सांसद हंसराज अहीर ने व्यक्त किया. अहीर ने बताया कि इस सिकलसेल अस्पताल का भूमिपूजन व क्षयरोग अस्पताल में प्राथमिक स्तर पर उद््घाटन 24 दिसंबर को होगा. रिसर्च सेंटर में 25 बिस्तरों की सुविधा की जाएगी. भूमिपूजन के दिन देश के 10 नामी वैद्यकीय अधिकारी पहली बार यहां उपस्थित होंगे. सिकलसेल रोगियों के लिए 150 करोड. रूपए खर्च अपेक्षित है. पहले सिकलसेल को रोगियों को दी जानेवाली हायट्रोसिल गोली 32 रु. की थी. किन्तु उनके प्रयासों से इस गोली को अब नि:शुल्क उपलब्ध कराया जा रहा है. अस्पताल के बनने से रक्तजनित बिमारियों के संबंध में यहां पर अनुसंधान हो सकेगा.
इसी प्रकार इसके रोगियों को अपाहिजों की श्रेणी में शामिल किया गया है. इस पत्रकार परिषद में डा. खान, डा. मंगेश गुलवाडे., डा. धोटे, इको-प्रो के बंडू धोतरे, ग्रीन प्लैनेट के सुरेश चोपणे आदि उपस्थित थे. 

Saturday, December 14, 2013

गळा आवळून खून

गळा आवळून खून

चिमूर- तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशन हद्दीतील जांभूळघाट पासून २ कि. मी. अंतरावरील मेटेपार येथील निवासी पुष्पा भोजराज गुरुनुले या ४0 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. हा खून अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नातून झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महिलेच्या शरीरावरील सोन्याचे दागिने गायब असून, गळय़ावर जखमा आढळल्या. ही घटना काल शुक्रवार(१३ डिसेंबर) च्या रात्री घडली. 
मेटेपार निवासी पुष्पा भोजराज गुरुनुले या महिलेची घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे चिमूरला आठवडी बाजारासाठी घरचे तांदूळ विकण्यासाठी आली होती. बाजार झाल्यानंतर रात्रीच्या दरम्यान चिमूर-ब्रम्हपुरी बसने जांभूळघाट येथे उतरून आपल्या स्वगावी पायदळी जात असताना जांभूळघाट पासून २ कि. मी. अंतरावर शेतशिवारात काही इसमांनी गाठले. एकटी असल्याची संधी साधून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तीने आरडाओरड केल्याने अज्ञातांनी तिचा गळा दाबून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत काही अंतरावरील शेतशिवारात नेवून ठेवल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
महिलेची हत्या करून मंगळसुत्र तोडून ते पसार झाले तर तिच्या पायातील पादत्राणे व पिशवीत ४५0 रुपये व भाजीपाला घटनास्थळी मिळाला. महिलेने मारेकर्‍यांचा प्रतिकार केल्याचा प्रयत्न घटनास्थळावरील पायाचे ठसे व शरीरावर असलेल्या जखमावरून आढळून येते. परंतु, आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी भीतीपोटी मारेकर्‍यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त क रण्यात येत आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी भादंवी ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपुरात निघाली प्रदूषणविरोधी महारॅली

चंद्रपुरात निघाली प्रदूषणविरोधी महारॅली

चंद्रपूर, १४ डिसेंबर

अनेक वर्षापासून चंद्रपूरकर प्रदूषणामुळे त्रस्त आहे. चंद्रपूर शहर प्रदूषणात महाराष्ट्रात प्रथम व भारतात दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने ‘प्रदूषण हटाव-चंद्रपूर बचाव’ या मागणीसाठी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता येथील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली निघाली. 

हवेत १६० मायक्रोग्रॅम दूषित कण राहू शकतात. परंतु, चंद्रपुरात १००० ते १५०० मायक्रोग्रॅम दूषित कण आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांमध्ये दमा, श्‍वासाचे आजार, हदयरोग, चर्मरोग, क्षयरोग, कर्करोग आदी आजाराचे प्रमाण वाढले आहे. आंतराष्ट्रीय हदयरोग तज्ज्ञ डॉ. नरेश त्रेहाणच्या अहवाला प्रमाणे जिथे प्रदूषण अधिक असते, तिथे हदयरोगाचे प्रमाणही अधिक असते. सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी २००८-२०१० व २०१० ते २०१२ साठी ऍक्शन प्लॉन बनविला. केंद्र सरकारने केंद्रीय प्रदूषण मंडळाचे अतिरिक्त संचालक डॉ. बाला यांना पाठविले. मात्र, त्यांनी केलेली सूचना व ऍक्शन प्लॉनसुध्दा राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे अमलात येवू शकला नाही आणि चंद्रपूरचे प्रदूषण कमी झाले नाही. सर्व डोळ्याने दिसत असताना आता सरकारने नीरी व आयआयटी संस्थेला अहवाल द्यायला सांगितले आहे. त्यामुळे महाऔष्णिक वीज केंद्रातील ४ संचातून निघणार धूर बंद करण्यात यावा, वेकोलिमुळे व अन्य कारणामुळे होणारे प्रदूषण त्वरित थांबवावे या मागणीसाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले.

या महारॅलीत चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, ग्रीन प्लॅनेट, इको प्रो, रोटरी क्लब, आयएमए, बार असोसिएशन, वृक्षाई, ज्येष्ठ नागरिक संघ, चेंबर ऑफ कॉमर्स, पृथ्वीमित्र संस्था, प्रहार, विविध राज्य कर्मचारी संघटना, आंगनवाडी कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रीन मिशन सीटी, व्यापारी महासंघ सहभागी झाले होते.