काव्यशिल्प Digital Media: उपराष्ट्रपती

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label उपराष्ट्रपती. Show all posts
Showing posts with label उपराष्ट्रपती. Show all posts

Sunday, November 26, 2017

 राजकारणात व्यक्तिपूजा अध:पतनाचा हमखास मार्ग -हमीद अंसारी

राजकारणात व्यक्तिपूजा अध:पतनाचा हमखास मार्ग -हमीद अंसारी

नागपूर : नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा हमखास मार्ग असून ती नंतर हुकुमशाहीकडे वाटचाल असते, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच दिला असून ही गोष्ट पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी येथे केले.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित  सामाजिक व आर्थिक समता संघाने तयार केलेल्या महाराष्ट्रातील गरीबी, असमानता व भेदभाव, अस्पृष्यता आणि अत्याचारांवरील अहवाल प्रकाशनाचे आणि परिषदेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता संघाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. र्हदीप कांबळे, उपस्थित होते.

 

Friday, November 10, 2017

शेतीसारख्‍या असंघटीत क्षेत्रावर उदयोग-क्षेत्राइतकाच भर देणे काळाची गरज

शेतीसारख्‍या असंघटीत क्षेत्रावर उदयोग-क्षेत्राइतकाच भर देणे काळाची गरज

  •  उपराष्ट्रपती श्री. वैकेंया नायडू यांचे प्रतिपादन
  •  9 व्या ‘ अॅग्रोव्हिजन – 2017 ‘ कृषीप्रदर्शनीचे उपराष्ट्रपतींच्या हस्‍ते उद्घाटन
  •  10 ते 13 दरम्यान कृषी प्रदर्शनीचे आयोजन

नागपूर/ प्रतिनिधी - ‘बेसिक कल्‍चर’ ऑफ इंडिया इज ‘अॅग्रीकल्‍चर’ असे सांगून शेतीसारख्‍या असंघटित क्षेत्राला उदयोग क्षेत्राइतकेच महत्‍व देऊन त्‍यावर लक्ष केंद्रीत करण्‍याची गरज आज आहे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती श्री. वैकेंया नायडू यांनी आज नागपूरात केले. स्‍थानिक रे‍शीमबाग मैदान येथे 10 नोव्‍हेंबर ते 13 नोव्‍हेंबर 2017 दरम्यान अॅग्रोव्हिजन संस्थान, एम.एम.एक्टिव्ह‍ , विदर्भ इॅकॉनॉमिक डेव्हवलपमेंट काउसींल (वेद), पूर्ति उद्योग समूह व महाराष्ट्र उद्यमशिलता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शन ‘ अॅग्रोव्हिजन – 2017 ‘ चे उद्घाटन आज त्‍यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्‍याचे कृषी मंत्री श्री. पाडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री श्री. गिरीष महाजन, राज्यांचे उर्जा मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे , पशुसंवर्धन मंत्री श्री. महादेव जानकर, अॅग्रोव्हिजन सललागार समितीचे अध्‍यक्ष डॉ. सी.डी. मायी प्रामुख्‍याने उपस्थित होते.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू @नागपूर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू @नागपूर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

शेतीसाठी सरकार, बँका, उद्योग, संशोधकांनी सर्वसमावेशक पुढाकार घेणे गरजेचे - उपराष्ट्रपती

प्रधानमंत्री म्हणतात, विकास, विकास विकास...मी त्यापुढे जावून म्हणेल... विकास खूप आवश्यक आहे, पण त्यात शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक स्थान देणे अधिक महत्वाचे आहे :

Monday, November 06, 2017

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी शहरात

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी शहरात

 नागपूर  : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी शहरात येणार असून, दुपारी चार वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित नवव्या अग्रोव्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय प्रदर्शन आणि कॉन्फरन्सचे उद्‌घाटन करणार आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दौऱ्यासंदर्भात व्यवस्थेचा आढावा घेतला. उपराष्ट्रपती यांचे आगमन तसेच रेशीमबाग येथील अग्रोव्हिजन प्रदर्शन उद्‌घाटन कार्यक्रमा संदर्भात आयोजन समिती, पोलिस, महसूल, विमानतळ प्राधिकरण, मिहान, आरोग्य, अन्न व औषधीद्रव्य, माहिती व जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, स्वागत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक हेमंत निंबाळकर, अग्रोव्हिजनचे रमेश मानकर, एअर इंडियाचे वसंत घोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रवींद्र खजांजी, राजभवनचे वरिष्ठ अधिकारी रमेश येवले होते.