Tuesday, June 19, 2018
Tuesday, February 06, 2018
महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा
दिलीप टॉकीज समोरील मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या जीवावर उठले. शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका ग्रामीण अध्यक्ष सुनूल बावणे, डॉ. रजनी हजारे, नरेश मुंदडा, देवेंद्र आर्य, विनोद बुटले, कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, किन्ही येथील उपसरपंच वासुदेव येरगुडे, धीरज निरंजने, शांता बहुरिया, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नांदगाव (पोडे) येथील माजी सरपंच मधुकर पोडे, शिवा राव, राजू बहुरिया, निशांत आत्राम, सचिन जाधव, अमीत पाझारे आणि शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
Friday, January 26, 2018
गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना
Friday, November 10, 2017

रामू तिवारींची घरवापसी होणार?
चंद्रपूर - महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रामू उर्फ रितेश तिवारी भाजप सोडून पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असून यासाठी ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याची खात्रीजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉग्रेस मध्ये असतांना शहरातील काँग्रेस पक्षाच्या बळकटी देत कार्यकर्त्यांचा मोठा फोज फाटा तयार करणारे रामू तिवारी यंदाच्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज होहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. मात्र मतदारसंघ नवा असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्येच काम केले. सध्याही ते भारतीय जनता पार्टीतच सक्रिय आहे. मात्र आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या संबंधाने त्यांनी नुकतीच नागपूर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचीही खात्रीजनक माहिती आहे.
Wednesday, November 08, 2017

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जनआक्रोश आज
नागपूर - ८ नोव्हे.२०१७ रोजी नोटबंदी ला १ वर्ष पूर्ण होत असून देशभरात काँग्रेस पक्षातर्फे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे . भाजप प्रणित केंद्र व राज्यात सत्तेत असलेले शासन जनतेविरुद्ध अनेक निर्णय घेत आहे. याचा फटका समाजातील सर्व घटकांना बसला असून या शासन विरुद्ध बुधवार ८ नोव्हे.२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता टेलीफोन एक्सचेंज चौक,नागपूर येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले आहे.
Monday, November 06, 2017
जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली
चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन
एकाच दिवशी वड्डेटीवार- पुगलिया गटाचे वेगवेगळे मेळावे
चंद्रपूर/ प्रतिनिधी : (ललित लांजेवार)
काँग्रेसचा नागपूर विभागीय जनआक्रोश मेळावा आज चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याचवेळी कांग्रेसचे जेष्ट नेते माजी खासदार नरेश पुगलियांनी त्याच शहरात दुसरा समांतर मेळावा आणि रॅली आयोजित केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली मांडून चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन करण्यात आले.
