काव्यशिल्प Digital Media: अपघात

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अपघात. Show all posts
Showing posts with label अपघात. Show all posts

Monday, November 26, 2018

उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू

उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू


उमेश तिवारी/कारंजा (घा):


 नागपूर वरून अमरावतीकडे जात असताना उभ्या  ट्रेलरला धडक बसल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. हि घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजत्याच्या दरम्यान कारंजा (घाडगे) वरून ९ किलोमीटर दूर राष्ट्रीय महामार्गवर काटोल फाट्याजवळ घडली.  सागर पुरुषोत्तम ढोले वय २९ वर्ष राहणार बोरगाव जिल्हा वर्धा असे या मृत्यू मुखी पडलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.  ट्रेलर क्र. CG.04.HT.9912 रस्त्यावर उभा होता. दुचाकी स्वार सागर पुरुषोत्तम ढोले   दुचाकी क्र. MH.32.AA.0356 नागपूर वरून गावाला जात असतांना ट्रेलरच्या मागे येऊन धडकला.आणि तो खाली पडला.  या नंतर तत्काळ कारंजा येथून रुग्णवाहिका बोलवण्यात आली व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करिता आणले असता रुग्णालयातच सागर ढोले याचा मृत्यू झाला.

Tuesday, October 09, 2018

 चंद्रपूर-उमरेड-नागपूर मार्गावर भीषण अपघात

चंद्रपूर-उमरेड-नागपूर मार्गावर भीषण अपघात

उमरेड जवळ उदासा येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि 
ट्रकमध्ये भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू 

नागपूर ते सिंदेवाही जात असतांना उमरेड तालुक्यातील उदासा शिवारातील घटना 

ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला  जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू 

 झाला तर चार गंभीर जखमी 
  व उमरेड ग्रामीण रुग्णालयात ३० प्रवाश्यांवर उपचार सुरू आहे 

आज मंगळवारी रात्री ८  वाजताची घटना 

राहुल ट्रॅव्हल्सचा अपघात

उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रक चाक पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली.  


उमरेड मार्गावरील उदासा शिवारात मंगळवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान ट्रॅव्हल्स उभ्या टिप्परवर धडकली. यात पाच ठार तर दहा प्रवासी जखमी झाले.नागपूरवरून वडसा येथे जाण्यासाठी राहुल ट्रॅव्हल्सची एमएच ३४-ए-८४७५ या क्रमांकाची बस सायंकाळच्या सुमारास निघाली. उदासा शिवारात येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या एमएच-४०-एके-२३४४ क्रमांकाच्या गिट्टी भरलेल्या टिप्परवर धडकली. बसचा समोरील भाग चक्काचूर होऊन पाच प्रवासी जागीच ठार झाले. जखमी जिवाच्या आकांताने मदतीसाठी धावा करीत होते. या मार्गावरून जाणारे प्रवासी आणि गावकरी धावून आले. जखमींना तातडीने उमरेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलिवण्यात आले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या जमावाने टिप्पर पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
5 Died in Travel and Tipper Major Accident o Nagpur Umred Highwayमृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये लक्ष्मीकांत वामन लोढे (२९, रा. रत्नापूर), गीता के. झोडे (३५, रा. मकरधोकडा), विनोद मारोती ढोक (३७, रा. रत्नापूर), रागिनी व्ही. चहांदे (१९, रा. तुकूम), सुनील एस. डेकाटे (४५, रा. रत्नापूर), परसराम जे. पराते (४०, रा. भिवापूर), शैलेश बी. विजयकर, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, राहुल एस. तायडे (२६, रा. सिंदेवाही), शुभांगी देवीदास राऊत (२४, रा. तुकूम), आकाश ठवकर (२६), लक्ष्मण चहांदे (३०), जयप्रकाश सायरे (३५, रा. कामठी), चंद्रा तिकारे (२५, रा. अंतरगाव), गायत्री तिकारे (२३, रा. अंतरगाव), अमर मांढरे (६५, रा. सावरगाव), प्रियंका बनवारे (२३, रा. रमावा) यांच्यासह अन्य तिघांचा समावेश असल्याचे समजते आहे.                                           

नागपुर वरून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही 

तालुक्यातील नवरगाव येथे जात होती ट्रॅव्हल्स


स्रोत:abp 



-----------------------------------------------------
kavyshilp partner 
advertisement


Sunday, July 15, 2018

 चंद्रपुरात खड्ड्यांनी घेतला आणखी दोन भावंडांचा बळी

चंद्रपुरात खड्ड्यांनी घेतला आणखी दोन भावंडांचा बळी

खड्ड्यांची श्रृंखला किती घेणार जीव ?
चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ५ दिवसात २ जणांचा जीव जाण्याची घटना ताजी असतांना जिल्ह्यातील राजुरा येथे खड्डे चुकविण्याच्या नादाद आणखी दोन भावांना आपला जीव गमवावा लागला आहे.प्रमोद मालखेडे (वय 32 वर्ष) व विनोद मालखेडे (वय 32 वर्ष) या भावंडांचे नाव आहे.शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही बाईकनं राजुराहून वरुर रोडच्या दिशेनं प्रवास करत असताना तुलाना गावाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा रुग्णालया मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान राजुरा- लक्कडकोट या मार्गावरील खड्ड्यांमुळे या दोघांचा जीव गेल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे.चंद्रपूर शहरासोबतच जिल्ह्यात चंद्रपूर-मूल-सिंदेवाही ,सिंदेवाही-नवरगाव-चिमूर, कोरपना,गडचांदूर, या सोबत जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी राज्य मार्गावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच पाण्यात जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याच्या दर्जाचे पितळ उघळे पडले आहे,त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व संबंधित विभागाने तात्काळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी ना
गरिक करत आहे.
काव्यशिल्पच्या बातमीची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल 
५ दिवसात २ महिलांचा खड्डे वाचविन्याच्या नादात मृत्यू झाल्याच्या मथळ्याखाली काव्यशिल्प डिजिटल मीडियाने बातमी प्रकाशित केली होती. या दोन्ही अपघातात हेल्मेट असता तर जीव वाचला असता असे काव्यशिल्पच्या देखरेखीत निष्पन्न झाले, याच बातमीची दखल घेत शुक्रवारी चंद्रपूर पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दुपारी ४ वाजता पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट विषयी जनजागृती व दंड आकारणे मोहीम सुरु केली.वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेत हो मोहीम अहिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी काव्यशिल्पशी बोलतांना सांगितले.  येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्त्तेक दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट बांधणकारक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट लावणे आवश्यक
दररोज वर्तमानपत्रे उघडली, वृत्तवाहिन्यांचे चॅनेल्स लावली अथवा आकाशवाणीवरील बातम्या ऐकल्या तरी देशात कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आणि त्यात कोणीतरी जीव गमावल्याचे वृत्त असतेच . मात्र, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्याने अथवा चारचाकी गाडीत बसल्यानंतर सीटबेल्ट न लावल्याने मृत्युमुखी पडणार्‍या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे,त्यामुळे  शहर वगळता शहराबाहेर निघणारे राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर  हेल्मेट लावणे आता गरजेचे झाले आहे ,चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हेल्मेट विषयाची जनजागृती सुरु असून जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सख्तीचे होणार आहे.



Friday, July 13, 2018

 चंद्रपुरात खड्डे चुकविण्याच्या नादात १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

चंद्रपुरात खड्डे चुकविण्याच्या नादात १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

हेल्मेट असता तर वाचला असता जीव 
नागपूर/ललित लांजेवार:
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात चंद्रपूर येथील एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात घडली,काजळ उत्तम पॉल राहणार शामनगर चंद्रपूर असे या मृत्त निर्दोष तरुणीचे नाव आहे, ट्रक क्रमांक MH.34. 7324 kgn ट्रान्सपोर्ट बाल्लारशाह वरून सावरकर चौक येत असतांना मृत्यू तरुणी आपल्या गाडीने क्रमांक.MH. 34.AW.1522 गाडी ने बंगाली कॅम्पकडे जात असतांना रस्त्यावरील खड्डे चुक्वितांना हा अपघात घडला . चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पहिल्याच पावसात मोठ मोठे खड्डे पडले अश्यातच ९ जुलै रोजी चंद्रपूर येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर वडगाव येथील रहिवासी नंदा बेहराम या शिक्षिकेचा खड्डे चुकविण्याच्या नादाच मृत्यू झाला होता. हि घटना ताजी असतांनाच बंगाली कॅम्प येथे आणखी एका निर्दोष १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला,या अपघातानंतर ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून परिसरातील काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 




चंद्रपुरात दरवर्षी खड्डे चुकविण्याच्या नादात दरवर्षी अनेक निर्दोष नागरिकांचा बळी जातो. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व आमदार खासदार मंत्री महोदय व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने बघत नाही, तसेच वर्ष भाराअगोदर बनलेला रस्ता एका पावसात फुटल्या जातो.त्यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न देखील या अपघाताला कारणीभूत आहेत.सत्ताधारी विकास कामांकडे करोडो रुपये खर्च करीत आहेत मात्र शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी जात आहे.

चंद्रपूर शहरात प्रवेश करण्यासाठीचा आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी वापरावा लागणार एकमेव मार्ग म्हणजे मूल मार्ग. या मार्गावर असलेला सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक. याच चौकात लावलेले बाहुबली हेल्मेटण घालून असलेले हे पोस्टर गेल्या काही दिवसा अगोदर शहरभरात चर्चेचा विषय ठरला होता .‘जेव्हा बाहुबली हेल्मेट घालू शकतो तर आपण का लाजता’.असा मजकूर देखील यावर लिहिला होता, चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने अत्यंत नेमक्या जागी योग्य विषयाला हात घातलेले हे पोस्टर लावल्याने या चौकातील प्रत्येकाच्या नजरा यावर खिळून राहत आहेत. चंद्रपूर शहरात हेल्मेटची फारशी सक्ती नाही मात्र अंतर्गत मार्ग महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा राज्य महामार्गाचा भाग आहे. म्हणूनच या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील अधिक आहे. हे टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने लढविलेली शक्कल चर्चेचा विषय ठरली होती. मात्र परिवहन विभाग नुसते पोस्टर लाऊन गप्प बसले अन प्रत्यक्षात जनजागृती करण्यासाठी विसरले असे या पोस्टरबाजी व आजच्या अपघातावरून लक्षात येते.
हेल्मेट असता तर वाचला असता जीव
शहरातील या दोन्ही अपघात हेल्मेट असता तर कदाचित जीव वाचला असता अशी चर्चा सुरु आहे,गेल्या कधी दिवसान अगोदर चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत जनजागृतीसाठी बाहुबलीचे लावलेले हेल्मेट घातलेले पोस्टर शहरातील विविध ठिकाणी लावले होते मात्र नुसते पोस्टर लाऊन विभागाने आमचे काम सुरु असल्याचे दाखवून दिले मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही. 
Niyati Thaker साठी इमेज परिणामआजपासून जनजागृती अभियानाचा वेग वाढणार 
या अपघातानंतर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस विभागाला हेल्मेट विषयी जनजागृती करण्याची मोहिम वेगाने राबविण्याचे आदेश दिले आहे.गेल्या ६ महिन्या अगोदरच हि जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती मात्र शहरात घडलेल्या दोन अपघातानंतर या मोहिमेला पोलीस विभाग आणखी वेग देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी काव्यशिल्पशी बातचीत करतांना सांगितले.
लोकांना सवय नसल्याने व जनजागृती करण्यात बराच कालावधी लागत असल्याने येत्या कधी दिवसात अपघात रोकण्यासाठी लवकरच जिल्हात हेल्मेट सक्ती होणार आहे.



Sunday, July 01, 2018

अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात तर 4 जण गंभीर जखमी 
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर- शहरातील नेहरूनगर येथील मित्तलवार कुटुंबीय आपल्या सुझुकी बोलेनो या चारचाकी वाहनाने तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होते. याच वेळी सिरोंचावरुन मोहुर्ले कुटुंबीय घरचे सामान घेऊन काळीपिवळी टॅक्सी ने मुरखेडाकडे येत होते. मात्र अचानक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.व या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह सात लोकांचा मृत्यू झाला. कमल मारोती मित्तलवार, मारोती केशवराव मित्तलवार , लता मारोती मित्तलवार , पाच महिन्यांची श्रीनीता कमल मित्तलवार, व दीड वर्षीय सरस संदीप मित्तलवार या एकाच परिवारातील पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच गडचिरोली जवळील मुरखेडाचे रहिवासी असलेले काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले आणि चालक संदीप आनंदराव गडप यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. याशिवाय सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले हे जखमी असून त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

Sunday, June 03, 2018

नागपूर-उमरेड मार्गावर अपघात;एक ठार

नागपूर-उमरेड मार्गावर अपघात;एक ठार

नागपूर -उमरेड  राज्यमार्ग ठरत आहे मृत्यू मार्ग
उमरेड/प्रतीनिधी:
नागपूर ते उमरेड हा राज्यमार्ग असून हा मृत्यूचामार्ग प्रचलित होतं आहे .उजाड्लेल्या प्रतेक दिवस हा कोणाच्या तरी अपघातात मृत्यू बातमी घेऊन धडकतो .असा हा मार्ग मृत्यूचा मार्ग म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर शहराला लागून उमरेड मार्ग मृत्यू मार्ग बनत  
  चाललाय हा मार्ग विकासपासून कोसोदूर असून याच मार्गावरील केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे दत्तक घेतलेले गाव पाचगाव या मार्गावर असून रस्ते वाहतूक खाते ज्यांच्याकडे आहे त्यांचेसुध्दा या मार्गावर दुर्लक्षच असल्याचे दिसते .महाराष्ट्रात सम्रुधी महामार्गाचे सोनेरी स्वप्न पाहणाऱ्यानी उमरेड नागपूर या मृत्यू मार्गाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते आहे.या मार्गावर प्रवास करतांना काळजी बाळगावी हा मार्ग मृत्यू असल्याने या मार्गावरून बस ट्रक यांच्या रेसमध्ये बस आणि ट्रक यांच्या वेगाने एखद्या दुचाकीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा शेवट असू शकतो. या मार्गावर अशीच एक घटना आज घडली रामटेक ला नातेवाईकांच्या भेटीसाठी निघालेल्या संतोष व त्यांची पत्नी किरण हे दोघेही चांपा वरून रामटेक ला जात असतांना काही कारणास्तव चांपा या गावांत उमरेड ते नागपूर रोडवर आज ट्रक आणि ट्रव्हल्स् यांच्या भरधाव वेगाने दुचाकी क्र .MH.49.9649 च्या धडकेत धर्मा संतोष फुले यांचा घटनास्थळीच़ जागीच मृत्यू झाला सोबत त्यांच्या पत्नी किरण धर्मा फुले यांना ही किरकोळ जखम झाली असून ही घटना आज सकाळी १०:३० सुमारास घडली असून अज्ञात ट्रक व ट्रव्हल्स घटनास्थळवरून पसार झाली असून पोलिसाना घटनेची महिती मिळताच घटनास्थळी पोहचून खोडंबलेली वाहतूक सुरळीत केली.व किरण व धर्मा यांना शासकीय रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले असून दोघे ही रामटेक येथे नातेवाईकाच्या घरी जात असतांना घटना घडली चांपा येथील रहिवासी संतोष व त्यांच्या पत्नी सोबत होत्या.उमरेड नागपूर हा मृत्यू प्रतेक दिवशी कोणाचातरी मृत्यू घेऊन येतोय २०१२ ला नागपूर उमरेड गडचिरोली या मार्गाचे चौपदरीकरनाचे काम मंजूर झाले असून निविदा निघाल्या बांधा,वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर मार्ग बनविण्याचे ठरले .सरकार बदलले त्या सोबतंच या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्यांचे नशीबही बदलले .आतपर्यंत या रस्त्यावरील अपघातात मृत्यू झालेल्याचा आकडा भयावह निघेल .२०१२ पासून एकही राज्यकर्त्यांचा किंवा प्रशासनाला या मार्गाचा प्रश्न निकली काढावासा वाटलं नाही लोकसंख्या वाढली वाहतूकही वाढली वाहनांची संख्या दहा पट्टीने वाढली असून या मार्गावरून बस ट्रक व खाजगी बस यांच्या शर्यतीत अनेकांचा मृत्यू झाला आहे, .बदलणाऱ्या काळासोबत विकास हा आवश्यक असतो, सततच्या अपघाताने नागपूर उमरेड हा मार्ग २०१२ पासून प्रलंबित असून मार्ग कधी बनणार असा प्रश्न चांपा येथील ग्रामस्थांनी केला आहे. अजून किती बळी द्यायचे या मार्गाला मृत्यू मार्गाला शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे.
                                             -------------------------------------------------------   
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा: 9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



Saturday, June 02, 2018

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यु

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यु


रामटेक(तालूका प्रतिनिधी):
नागपुर - जबलपुर महामार्गावर खुमारी शिवारात गुरुवारी राञी नऊ वाजताच्यां सुमारास स्कुटी दुचाकी अज्ञात वाहनांने धडक देत. घटना स्थळावरुन पसार झाला. पोलीसांनी दिलेल्या  सविस्तर माहीती नुसार मृत्यक दिनेश शंकर डोले वय ३३ वर्षे वत्यांचा मिञ अजाबराव राजेराम तुरनकर वय ५२ वर्षे हे दोघेही मिञ कामानिमित्त मरारवाडी येथे गेले होते .व काम आटपवुन स्कुटी दुचाकी क्रमांक MH 40AL 8180 ने परत येत असतांनी मागुन येत असलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकी चालक दिनेश डोले रा. भिलेवाडा हा जागीच मरण पावला तर मिञ अजाबराव तुरनकर रा. भिलेवाडा हा गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचाराकरीता नागपुर मेयो येथे भरती करण्यात आले .सदर घटनेची माहीती मिळताच रामटेक पोलीसांनी घटना स्थळी दाखल होऊन कारवाई केली . फिर्यादी मृत्यकांचे काका सुरेश डोले यांच्या तक्रारी वरुन अज्ञात वाहन विरोध कलम 279 ,337 ,338, 304 अन्वेय गुन्हा दाखल करुन पोलीस पुढिल तपास करीत अाहे .                                  

जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Tuesday, May 29, 2018

नागपुरात रेल्वेचा तुटला चाक

नागपुरात रेल्वेचा तुटला चाक

गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचे  चाकच तुटले  
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर येथून जवळचा असलेल्या कलमेश्वर येथे गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचा एसी डब्या खालचा चाक तुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली.गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेस नागपूरजवळील कलमेश्वर येथे आली असता या गाडीच्या एसी डब्याखालून मोठा आवाज आला.हा आवाज ऐकून प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने ही गाडी थांबवण्यात आली. तपासणी केली असता गाडीच्या एसी डब्याखालील चाकाला तडे जाऊन ते तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवून गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली.या  अपघातात १ प्रवासी जखमी झाला असल्याची माहिती आहे. नागपूर येथे या गाडीला नवा एसी डबा जोडून ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वेत प्रत्तेक महिन्यात विविध घटना घडत असतात मात्र त्याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे यावेळी प्रवाश्यांचे म्हणणे आहे,या संपूर्ण प्रकारावरून रेल्वेचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल असून रेल्वेत प्रवाश्यांचा सुरक्षेच प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Friday, April 20, 2018

भरधाव वेगाने दुचाकी चालवणं बेतलं जीवावर

भरधाव वेगाने दुचाकी चालवणं बेतलं जीवावर

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
भरधाव वेगाने दुचाकी चालवणं चंद्रपुरात तरुणाच्या जीवावर बेतलं,गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास  शहरालगतच्या बल्लारपूर महामार्गावर सैनिक शाळेजवळ अपघात झाला,आणि महागडी केटीएम दुचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यात  पियुष शुक्ला वय 17 वर्षे  या दुचाकीमालक चालकाचा जागेवर मृत्यू झाला तर मागे बसलेल्या पियुष बैंसचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आहे. शुक्ला याने पालकांना जिद्द करून काही दिवसांपूर्वीच दीड लाख रुपये खर्चून दुचाकी घेऊन मागितली होती.अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केले असता संपर्क होऊ शकला नाही.




Monday, April 09, 2018

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अपघात;पाच गंभीर जखमी

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अपघात;पाच गंभीर जखमी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर वरून सावनेर जात असतांना टाकळी ते नंदोरी दरम्यान ट्रक आणि स्कारपीओ क्र. MH.34.AM.6867 यांच्यात जबर अपघात झाला,हि घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात स्कारपीओतील पाच जण जखमी झाले आहेत. या पाचही जखमीना चंद्रपूर येथे तात्काळ हलवन्यात आले असून दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. ही स्कारपीओ गाडी चंद्रपूर वरुन सावनेर कडे जात असताना टाकळी ते नंदोरी दरम्यान हा अपघात झाला.मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून गाडीत बसलेले प्रवासी हे कोलमाईन्स मध्ये कार्यरत असल्याचे वृत्त आहे. ट्रक क्र MH.32.Q.5625  ला वोव्हरटेक करत असतात हा अपघात झाला असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात येथे गितेश निमजे वय २३, सुवर्णा निमज वय ४८े ,  शिवशंकर निमजे वय ५२, मोहन निमजे वय ४८ , विजय तिमजी हूके वय ३२ राहणार चंद्रपूर यांना तात्काळ हलवण्यात आले होते. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.

Friday, April 06, 2018

दुचाकी अपघातात चार गंभीर जखमी

दुचाकी अपघातात चार गंभीर जखमी


चंद्रपूर/प्रतीनिधी:
चंद्रपूर शहरातील बी.एन.आर चौक ते राजीव गांधी इंजीनिअरिंग कॉलेज बाल्लारशाह  रोड येथे  विरुद्ध दिशेने येणाऱ्या  दोन दुचाकीची  समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीवरील ४ जन गंभीर जखमी झाले. हि घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास  राजीव गांधी इंजीनिअरिंग कॉलेज बाल्लारशाह  रोड येथे घडली,
                    या अपघातातील जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे वृत्त आहे .प्राप्त माहिती अनुसार बी.एन.आर चौक, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर विरुद्ध दिशेने  2 बाईकस्वार येत होते. व संतुलन बिघडल्याने समोरासमोर धडक झाली जखमीनमध्ये संजय गेडाम वय 43, सिद्धांत कांबळे वय 23, अशोक वय 40, सचिन वय 25 असे नाव असल्याचे समजते अशोक व सचिन यांचे नाव वृत्त लिहेपारीयंत समजले नव्हते. या संदर्भातील पुढील तपास शहर पोलीस करत आहे  




Monday, February 26, 2018

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी

गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील दर्शनीजवळील घटना
गडचिरोली - अहेरीवरून गडचिरोलीकडे येणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात चालक-वाहकासह २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल रात्री ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील दर्शनी गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची अहेरी आगाराची एमएच-४० एक्यू- ६१११ या क्रमांकाची बस अहेरीवरून गडचिरोलीकडे येत होती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास दर्शनी गावालगत असलेल्या वळणाजवळील नाल्यावर येताच बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात सुदैवाने २२ प्रवासी बचावले असले तरी ते किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. बस नाल्यात कोसळल्याची माहिती मिळताच दर्शनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले.

Friday, February 16, 2018

दुचाकीला धडक देत अंड्याचा ट्रक पलटला नाल्यात

दुचाकीला धडक देत अंड्याचा ट्रक पलटला नाल्यात


चंद्रपूर/प्रतिनिधी:
शोरूम मधून नवी कोरी गाडी घेऊन जात असलेल्या एका दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली,त्यात भरधाव ट्रक हा जवळच असेलल्या भिवकुंड नाल्यात पलटला.हि घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान चंद्रपूर कडून बल्लारशाह मार्गावरील निर्मल धाब्याजावळील भिवकुंड नाल्यासमोर घडली.
शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कांदा व अंडे घेऊन जात असलेल्या AP.15 - TC.0288 क्रमांकाचा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.  चंद्रपूर येथील शोरूम मधून दुचाकीस्वार राजेश वनकर  व उदय कुंभारे रा.चंद्रपूर हे  राजुरा येथे घेऊन जात असतांना  बाल्लारशाह मार्गावरील भिव्कून नाल्यावर हा अपघात घडला.  
 या अपघातात दुचाकीस्वार राजेश वनकर  व उदय कुंभारे रा.चंद्रपूर हे दोघेही गंभीर जखमी झाले  असून ट्रक चाल मुरली व  त्याचा सोबती हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना बल्लारशाह येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर महामर्गावर चांगलीच गर्दी बघायला मिळाली.तर ट्रकमध्ये अंडे व कांदे असल्याने संपूर्ण अंडे फुटून कांदे सर्वत्र पसरल्या गेले   







Saturday, December 30, 2017

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार. 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक श्री अमोल कोंडबत्तूनवार यांचे चंद्रपूर नागभीड-नागपूर मार्गावरील भुयार येथे अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले.सावली मार्गे आपल्या तीन मित्रांसोबत अमोल चारचाकी गाडीने जात होते मात्र भुयार येथे रस्त्यावर एक बर्फाची लादी पडली होती. या लादीला  कट मारून जाण्याच्या गडबडीत समोरूनयेणाऱ्या ट्रक ला जोरदार धडक बसली. यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. 

भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .
आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Friday, December 29, 2017

गोंडखैरी परिसरात दोन अपघात..!
 जिवीतहानी नाही....!

गोंडखैरी परिसरात दोन अपघात..! जिवीतहानी नाही....!


बाजारगाव
- राष्ट्रीय अमरावती-नागपूर महामार्गावर टोलटँक्स येथे महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाची गणेशपेठ डेपोची शिवशाही बस-ट्रक अपघात.तसेच  येथून जवळच  असलेल्या कळमेश्वर वळन रस्त्यावर दोन ट्रेलर-ट्रक चा अपघात.
          येथून जवळच गोंडखैरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या  अपघातात तिन ट्रक व एक शिवशाही बसची मोठी हानी झाली. पहिला अपघात गोंडखैरी ते कळमेश्वर वळन रस्त्यावर गुरुवार (दि.२८/डिसेंबर सकाळी  साडे नऊ) च्या सुमारास टिनूप लाँजिस्टीक पार्क सामोर सिताराम रोडलाईन्सचा ट्रक क्रंमाक एमएच-३१-एपी-२१४० तर लोखंडी पाईप भरलेला ट्रेलर क्रंमाक जिजे-१६-डब्ल्यु-१२५० यांची अमोरासमोर जोरदार धडक झाली असता कोणतिही जिवीतहानी न होता अपघात घडला.या अपघातात ट्रेलरचा  चालक-मालक ईच्छापुर सुरत निवासी अब्दुल गफ्फार शहा वय ३४ वर्षे तसेच ट्रक चालक हसनबाग नागपुर निवासी अली मिर मोहम्मद हसन वय ५१ वर्षे दोघेही किरकोळ जखमी झाले.
      दुसऱ्या अपघातात गोंडखैरीच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर नागपुर वरुन अमरावतीला जात   असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्रंमाक एमएच-०९-ईएम-१४७८ ला ट्रक क्रंमाक केए-४०-ए-११८१ ने  धडक दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर ट्रकला हैद्राबादकडे जायचे होते.तो रस्ता चुकून अमरावती  महामार्गानी निघाला असता  टोलनाक्यावर रांगेत लागल्यावर त्याने हैद्राबाद रस्त्याची विचारणा केली असता माघारी फिरण्यास  सांगण्यात आले.ट्रक चालक महेश ने ट्रक रांगेतूनच मागे घेण्याचा प्रयत्न करतांना मागाहून रांगेत येत असलेल्या बसला धडक बसली.त्यात बसच्या काचा फुटल्या सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही.
    कळमेश्वर पोलीसांनी घटनेची नोंद करुन पिएसआय सुनिल कामडी एनपिसी गणेश मूतमाळी यांचेसह पुढील तपास सुरु केला आहे.

Tuesday, November 28, 2017

अपघातात सात ठार

अपघातात सात ठार

लातूर : क्लूजर वाहनाने रस्त्यावर उभारलेल्या आयशर टेम्पोसह समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्लूजर वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार तर तेराजण जखमी झाले आहेत.

लातूर - नांदेड रस्त्यावर लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा (ता. लातूर) गावाजवळील एका पुलाच्या कडेला आज (मंगळवारी) पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला. जखमींवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Wednesday, November 15, 2017

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

  नागपूर /प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतःहून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले.शरद पवार सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत ,शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला जात असताना कार आणि टिप्परचा अपघात झाला त्यात चारजण अडकली होती . हा अपघात बघून पवारांनी त्यांची गाडी थांबवली आणि ते स्वत: अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

अपघातग्रस्त कारचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. यावेळी स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले

Sunday, November 12, 2017

चिमूर-वरोरा मार्गावर भीषण अपघात, तीन ठार ;तीन गंभीर जखमी

चिमूर-वरोरा मार्गावर भीषण अपघात, तीन ठार ;तीन गंभीर जखमी

 चिमूर/ प्रतिनिधी
 शेगाव वरुण वरोरा येथे भाजीपाला आणण्यासाठी शेगाव- वरोरा मार्गाने जाणाऱ्या एका मिनी ट्रकला भीषण अपघात झाला आहे.ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक त्या मार्गावरील झाडावर आदळला.व हा अपघात घडला.MH.34.AB.5620 या टाटा म्याजिक(छोटा हत्ती)त बसलेल्या 3 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन लोक गंभीर जखमी आहेत. या जखमींना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेले आहे

आज सकाळी शेगाव वरुण वरोरा भाजी मंडित  भाजीपाला खरेदी करण्यासाठी मिनी ट्रक घेवून शेगाव येथील भाजी विक्रेते शेखर शेंडे , सुनील गोटाफोड़े , सचिन धाबेकर हे आपल्या सहकारया सह निघाले होते. दरम्यान वरोऱ्या पासून तीन किलोमीटर अगोदर असलेल्या आंनदवन पोल फैक्ट्री  जवळ मिनी ट्रक च्या चालकाचा स्टेरिंग वरुण ताबा सुटला व मिनी ट्रक झाडावर आदळल्याचे सांगण्यात येत आहे . या मध्ये शेखर शेंडे,सुनील गोटाफोड़े, सचिन धाबेकर यांचा मृत्यु झाला. तर सोबत असलेले तीन जन गंभीर जखमी आहे. त्याना उपचारा करीता वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tuesday, November 07, 2017

नांदेड-नागपूर महामार्गावर कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नांदेड-नागपूर महामार्गावर कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नांदेड- बामणी फाट्याजवळ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 2 खासगी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेडहून येणारी टाटा इंडिका आणि नांदेडच्या दिशेने जाणारी क्रुझर यांची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक नवनाथ नारायण घुगे (वय 44, रा. राशनवाडी ता. चाकूर जि. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इंडिका कारमधील सुरेंद्र शिवाजीराव जवळकर (वय 55, रा. पावडेवाडी, नांदेड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातामध्ये अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Sunday, November 05, 2017

९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात

९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात

८३२ नागरिकांचा मृत्यू
नागपूर - महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १४०० हून अधिक अपघात झाले. यात ८२५ हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला ५ अपघात झाले असून यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१७ मध्ये विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले , किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, या पोलिसांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत महामार्गांवर १४४१ अपघात झाले. यात ८३२ नागरिकांचा मृत्यू झाला तर १०१५ जण जखमी झाले. बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले. या अपघातांत ११ पोलीस कर्मचाºयांचादेखील मृत्यू झाला.
‘ट्रक’ सर्वात धोकादायक
महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात ट्रकचे झाले आहेत. ९ महिन्यांच्या कालावधीत ट्रक्सचे ३५१ अपघात झाले. बसमुळे झालेल्या अपघातांची संख्या ५७ तर कारच्या अपघातांची संख्या १५१ इतकी आहे. या तिन्ही वाहनांच्या अपघातांमध्ये ३६९ जणांचा बळी गेला.
‘एपीआय’, ‘पीएसआय’च्या ८१ टक्के जागा रिक्त
नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत ‘एपीआय’ व ‘पीएसआय’ची एकूण ४८ मंजूर पदे आहेत. यापैकी केवळ ६ ‘एपीआय’ व ३ ‘पीएसआय’ नियुक्त असून ३९ जागा रिक्त आहेत.

प्रमुख मार्गांवर झालेले अपघात
  1. मार्ग                अपघात        मृत्यू        जखमी
  2. नागपूर-अमरावती    ४१            १८        २८
  3. नागपूर-चंद्रपूर        २८०            १६०        १६७
  4. नागपूर-यवतमाळ    २५            २५        २५
  5. नागपूर अकोला        ९३            ४२        १२९