लाखो रूपयांचा बाजार सेस बुडाला

रामटेक/प्रतिनिधी- रामटेक तालुका बाजार समीतीच्या शितलवाडी,रामटेकच्या बाजार आवारांत धान व कापूस या पीकाची अत्यल्प आवक असून प्राप्त माहीतीनुसार शेतकरी आपला माल बाजार समीतीच्या आवारांत न आणंता थेट व्यापा-याला विक्री करीत असल्याचे वृत्त आहे.बाजार समीतीचे प्रशासन या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याने बाजार समीती रामटेकच्या शीतलवाडी आवारांत शेतमालाची आवक अतिशय कमी झाली आहे.जो माल ईथे आला आहे त्याला उठाव नाही असा दुर्दैवी प्रकार घडत असून बाजार समीतीचा लाखो रूपयांचा बाजारसेसही बुडत असल्याचे समजते.