সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, July 23, 2018

प्रधानमंत्री सायकल योजनेच्या नावाने विद्यार्थांची फसवनुक

खोट्या बातम्या पसरवीण्याऱ्यांवर कडक
 कारवाई करा- आकाश गजबे
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
वार्ताहर- कोंढाळी,/गजेंद्र डोंगरे
 साईकिल वितरण योज़ना भारत सरकारच्या नावाने फसवुनक करणारे मेसेज व्हाट्सँप व फेसबुक गेल्या काही दिवसापासुन पसरत आहे. या योजने अंतर्गत सर्व ​विद्यार्थी- विद्यार्थीनींना सायकल वाटप १५ आँगस्टला वाटप करण्यात येणार असल्याचे मेसेज मध्ये नमुद आहे. तर मेसेज मध्ये http://Bharat-Sarkar.com/साईकिल/ या सारख्या अनेक बनावटी बेवसाईट नमुद आहे. प्रधानमंत्रीं व भारत सरकारच्या नावाने योजना बनवुन व भारत सरकारचा लोगो व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटोचा अनाधिकृत वापर करुन वैयत्तिक माहीती चोरुन विद्यार्थांची फसवनुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी तिव्र मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष व सोशल मिडिया प्रमुख आकाश गजबे यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आपली वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक फसवणूक केली जात आहे. पंतप्रधान सायकल योजना, हेल्मेट योजना, बॅग योजना, पुस्तक योजना, लोन योजना अशा योजनांची नावे देऊन आपला डाटा जमविला जात आहे. पंतप्रधान सायकल योजनेच्या नावाखाली भारत सरकार डॉट कॉम या साइटवर माहिती एकत्रित केली जात आहे. काहीतरी मोफत मिळतेय म्हणून कोणताही विचार न करता त्या लिंकवर जाऊन नेटिझन्स आपली माहिती भरत आहेत. हा मेसेज खरा आहे की खोटा आहे हे समजून न घेता लोकांनी आमिषाला बळी पडु नये  असेही आव्हान आकाश गजबे यांनी केले.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.