काव्यशिल्प Digital Media: रेल्वे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label रेल्वे. Show all posts
Showing posts with label रेल्वे. Show all posts

Monday, September 24, 2018

बल्लारशाह-चंद्रपूर-दिल्ली रेल्वे मार्ग बंद;प्रवाश्यांचे हाल

बल्लारशाह-चंद्रपूर-दिल्ली रेल्वे मार्ग बंद;प्रवाश्यांचे हाल

  • चंद्रपूर-दिल्ली रेल्वे मार्ग गेल्या सहा तासांपासून बंद 
  • रेल्वे ट्रॅकचा मेंटेनन्स करणाऱ्या ट्रकचा व्हील खराब झाल्याने रेल्वे ट्रॅक झाला बंद 
  • चंद्रपूर जवळील वरोरा गावाजवळील ही घटना घडली आहे. 
  • चेन्नईकडून दिल्लीला जाणाऱ्या दुरोंतोसह अनेक रेल्वे गाड्या ठीक ठिकाणी थांबून
  • गेल्या 6 तासांपासून माश्क्क्त सुरू 
  • प्रवाशांचे हाल 


Image result for duronto railway

Wednesday, July 11, 2018

 देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांचा गौरव 12 जुलै रोजी

देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांचा गौरव 12 जुलै रोजी

12 जुलैला नवी दिल्लीत होणार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आयोजित देशातील स्वच्छ व सुंदर रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानके म्हणून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तसेच पुढाकारातून ही दोन्ही रेल्वे स्थानके नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रकलेतून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव सौंदर्य तसेच वनवैभव आणि जिल्हयातील लोककलेचे वैभव अधोरेखित करत देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानके म्हणून पुरस्कार प्राप्त ठरली आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 12 जुलै रोजी नवी दिल्लीत संपन्न होणार आहे. हे पारितोषिक स्विकारण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि राज्याच्या वनविभागाच्या सचिवांना या सोहळयात आमंत्रित करण्यात आले आहे. 
चंद्रपूर रेल्वे स्टेशन वरुन जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना बल्लारपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशन कायम स्मरणात राहील अशा पद्धतीची सजावट याठिकाणी करण्यात आली असून वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेवर रेल्वे मंत्रालयाची पुरस्काराची मोहोर उमटली आहे.
चंद्रपूर जिल्हयासाठी हा पुरस्कार आनंदाचा व अभिमानाचा असून प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांना आलेल्या यशाची कहाणी सुद्धा आहे. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय झाला. वर्षभरापूर्वी याठिकाणी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामार्फत आदिवासींमध्ये असणाऱ्या लोककला आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांच्या चमू कार्यरत झाल्या. आणि बघता बघता चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी काढण्यात आलेल्या विविध वन्यजीवांचे चित्र आकर्षून घेते. बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे. त्यामुळे बल्लारपूर स्टेशन वर गेलेला कुठलाही प्रवासी या ठिकाणी वाघाच्या समोर उभा राहिलेला सेल्फी काढल्याशिवाय बाहेर पडत नाही. गेल्या वर्षभरात यासाठी प्रयत्न करणारे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रेल्वे स्थानकांचा गौरव केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे यासाठी आभार मानले आहे. नॅशनल ट्रान्सपोर्ट इनहाऊस स्टेशन ब्युटीफिकेशन स्पर्धेमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके प्रथम आली आहे.
वनमंत्री म्हणून आपली छाप सोडणारे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बाग-बगीचे निर्माण केले आहे. नैसर्गिक सौदर्याची आवड असणाऱ्या या मंत्र्यांनी अगदी फुलपाखरांच्या बगीच्यापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक इमारतीमध्ये नैसर्गिक सजावटीवर भर दिली आहे. त्यांचे देखणेपण वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या चमूने या दोन रेल्वे स्टेशनला आकर्षक स्वरूप दिले असून त्याची नोंद या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आहे. या यशाचे खरे श्रेय नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या चमूला जात असून त्यांनी या ठिकाणच्या कलेला आणि या ठिकाणच्या वनवैभवाला चित्रात आणि हस्तकलेत अतिशय योग्य पद्धतीने साकारल्यामुळेच हे रेल्वेस्टेशन देशभरात ओळख घेऊन पुढे आले आहे. चंद्रपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असून यापुढे चंद्रपूरची ओळख देशातले सजावटीचे रेल्वे स्थानक अशी असेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Saturday, June 30, 2018

नागपूर सह सर्व रेल्वेस्थानकावर ‘ हायअलर्ट’ जारी

नागपूर सह सर्व रेल्वेस्थानकावर ‘ हायअलर्ट’ जारी

रेल्वे पोलीस नागपूर साठी इमेज परिणाम
संग्रहित
नागपूर/प्रतिनिधी:
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना अल कायदाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दिल्ली मुख्यालयाकडून सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला आहेनागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १५० च्या वर प्रवासी गाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्या ४० ते ४५ हजारावर आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित मुख्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना अलर्टमध्ये देण्यात आल्या आहेत. ‘रेल्वे सुरक्षा दल नेहमीच सतर्क राहते. परंतु मुख्यालयाकडून पत्र मिळाल्यामुळे रेल्वेस्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर-अजनी स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संवेदनशील तसेच दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय श्वानपथकाद्वारे रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे.अशी माहिती ज्योती कुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,आरपीएफ, नागपूर यांनी दिली.

Tuesday, May 29, 2018

नागपुरात रेल्वेचा तुटला चाक

नागपुरात रेल्वेचा तुटला चाक

गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचे  चाकच तुटले  
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर येथून जवळचा असलेल्या कलमेश्वर येथे गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसचा एसी डब्या खालचा चाक तुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली.गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेस नागपूरजवळील कलमेश्वर येथे आली असता या गाडीच्या एसी डब्याखालून मोठा आवाज आला.हा आवाज ऐकून प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने ही गाडी थांबवण्यात आली. तपासणी केली असता गाडीच्या एसी डब्याखालील चाकाला तडे जाऊन ते तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवून गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली.या  अपघातात १ प्रवासी जखमी झाला असल्याची माहिती आहे. नागपूर येथे या गाडीला नवा एसी डबा जोडून ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वेत प्रत्तेक महिन्यात विविध घटना घडत असतात मात्र त्याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे यावेळी प्रवाश्यांचे म्हणणे आहे,या संपूर्ण प्रकारावरून रेल्वेचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल असून रेल्वेत प्रवाश्यांचा सुरक्षेच प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Tuesday, May 08, 2018

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात घडली आहे. राजुरा तालुक्यातील विरूर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना झाली असून या मध्ये ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर १७ शेळ्यांचे लचके तुटत गंभीर जखमी झाल्या आहे. मंगळवारी  
दुपारच्या दरम्यान शेळ्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना ही दुर्घटना झाली. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून चेन्नई च्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेन ने हा अपघात झाला आहे. दुर्दैवी म्हणजे रेल्वे ट्रॅक च्या दोन्ही बाजूला जाळी लावण्यात असल्यामुळे या शेळ्यांच्या या कळपाला पळून जाता आले नाही आणि त्याचं कारणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेमुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


Thursday, May 03, 2018

रेल्वेच्या चहा-कॉफीत मिसळल रेल्वे टॉयलेटचंच पाणी;बघा विडीओ

रेल्वेच्या चहा-कॉफीत मिसळल रेल्वे टॉयलेटचंच पाणी;बघा विडीओ

railway vendor fined rs 1 lakh after in a viral video people were seen bringing out tea coffee cans from inside a train toilet at secunderabadहैदराबाद:(काव्यशिल्प ऑनलाईन):
रेल्वेगाड्यांमधील अन्नपदार्थांच्या दर्जावरून अनेक तक्रारी येत असताना,एका विक्रेत्यानं चहा-कॉफीच्या कॅनमध्ये एक्स्प्रेसमधील टॉयलेटचं पाणी मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं संबंधित चहाविक्रेत्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिकंदराबाद रेल्वे स्थानकात हैदराबाद-चारमीनार एक्स्प्रेसमध्ये हा किळसवाणा प्रकार घडल्याचे रेल्वेनं सांगितलं. विक्रेत्यानं चहा-कॉफीच्या कॅनमध्ये एक्स्प्रेसमधील टॉयलेटचा पाणी मिसळलं होतं. पाणी मिसळल्यानंतर विक्रेता चहा-कॉफीच्या कॅनसह टॉयलेटमधून बाहेर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी दोषी चहाविक्रेत्याला रेल्वेनं एक लाख रुपयांचा दंड केला आहे.