काव्यशिल्प Digital Media: ज्युबिली

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ज्युबिली. Show all posts
Showing posts with label ज्युबिली. Show all posts

Sunday, April 15, 2018

ज्युबिली हायस्कुल मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

ज्युबिली हायस्कुल मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील ज्युबिली हायस्कुल मध्ये वर्ग चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये चंद्रपूर शहर तसेच सभोवतालच्या गावांतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेला एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
हि स्पर्धा ज्युबिली हायस्कुल चे शिक्षक व ज्युबिली हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये 'माझी सुंदर शाळा', 'स्वच्छता अभियान' व 'वृक्षारोपण' या विषयांवर दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी छान चित्र काढली. यामध्ये स्पर्धेमध्ये मोरवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डॉली सत्येन्द्र यादव ह्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. नगिनाबाग मिशन प्राथमिक शाळेच्या श्रेयस उद्धव चौधरी ने दुसरा क्रमांक पटकावला तर शाहिद भागात सिंग प्राथमिक शाळेच्या अनुष्का अमित भागात ह्या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक प्राप्त केला. प्रोत्साहनपर बक्षीस कु. यास्मिन आसिफ शेख ह्या डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीने पटकावला. 
स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शाळेची बॅग तसेच प्रशस्तिपत्रक देण्यात आले. 
ज्युबिली हाय स्कुल हि शहरातील सर्वात जुनी व सर्वात प्रशस्त परिसर असलेली शाळा काळात दुर्लक्षित झालेली होती. या शाळेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्वच्छता अभियानापासून सुरुवात केली. यापुढेही असे अनेक उपक्रम शाळेत राबविण्याचा मानस संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत मामीडवार यांनी बोलून दाखवला. शाळेच्या इमारत व इतर शैक्षणिक साहित्यासाठी पालक मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी लवकरच भरीव निधी शाळेला प्राप्त होत आहे असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. शासकीय शाळा असल्यामुळे शासनाच्या सर्व उपक्रमासाठी तत्परतेने निधी शाळेला उपलब्ध होतो त्यामुळे इतकी अद्यावत व मोफत शिक्षणाची सोय असलेल्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देऊन या सोयीचं लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष शाळेचे माजी प्राचार्य श्री रामटेके सर यांनीही विद्यार्थ्यांना शाळेबद्दल माहिती दिली. या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांचे मार्गदर्शन केले.शाळेचे सर्व कर्मचारी, शिक्षक व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.