काव्यशिल्प Digital Media: ब्रह्मपुरी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ब्रह्मपुरी. Show all posts
Showing posts with label ब्रह्मपुरी. Show all posts

Thursday, March 29, 2018

५० शेळ्यांचा मृत्यू

५० शेळ्यांचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे साथीच्या आजाराने जवळपास  ५० शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून मडकी येथे शेळ्यांवर अज्ञात रोगाणे हल्ला चढविला आहे.  एका पाठोपाठ एक अशा आत्तापरीयंत तब्बल ५० शेळ्या मृत्यूमुखी पडल्या  आहे. या प्रकाराची माहिती पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर यांना मिळताच त्यांनी इकडे तिकडे धावाधाव सुरू केली. त्यांनी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. उदय कोराने यांच्यासोबत संपर्क साधला. डॉ. कोराने त्यांनी आपल्या चमूसह मेंडकी गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व औषधोपचार सुरू केला.त्यानंतर तात्काळ मडकी येथे पशूंच्या तपासण्या कारण्याबाबद शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

Monday, February 05, 2018

मालडोंगरी येथे झाडावर अस्वलाचे ठिय्या

मालडोंगरी येथे झाडावर अस्वलाचे ठिय्या

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी: 
Bead bear on the tree at Maldangari | मालडोंगरी येथे झाडावर अस्वलाचे ठाणयेथून जवळच असलेल्या मालडोंगरी येथील अगदी मुख्य रस्त्यावरील एका झाडावर रविवारी अस्वलाने आपल्या पिल्लांसह ठाण मांडला. याची माहिती होताच अस्वलाला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीड तासानंतर अस्वलाला सुरक्षित जंगलात पाठविण्यात आले. 
मालडोंगरी हे गाव ब्रह्मपुरीच्या दक्षिणेस पाच किमी अंतरावर आहे. लागून धामनगाव बिट आहे. या बिटात वनविभागाच्या पाहणीनुसार बिबट, वाघ यांचे वास्तव्य असून अस्वलाचे अस्तित्व नव्हते. मात्र रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मालडोंगरीला लागून झोपला मारोती जवळच्या एका मोठ्या झाडावर अस्वल आपल्या पिल्लांसह दिसून आली.
त्यानंतर तेथेच या अस्वलाने ठाण मांडला. धामनगाव मालडोंगरी रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच ही वार्ता ब्रह्मपुरीपर्यंत पोहचली. अस्वलाला पाहण्याकरिता घटनास्थळी लोकांची गर्दी उसळली. मोटर ाायकल, चारचाकी वाहनांची रिघ लागली. लगेच याबाबत उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी आशा चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दीड तासानंतर त्या झाडावरुन अस्वलाला उतरविण्यात यश आले. तोपर्यंत वन कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यापूर्वी याच गावात मादी बिबटने बस्तान मांडले होते. 

Friday, January 12, 2018

 ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ

ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ

 Start of the Brahmapuri Mahotsav | ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभब्रह्मपुरी/प्रतिनिधी: 
गुरुवारी सकाळी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला. ब्रह्मपुरी शहर नववधुप्रमाणे सजले होते. रॅलीने शहर दुमदुमले. त्यानंतर सायंकाळी सिनेकलावंतांच्या उपस्थित महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिनेकलावंतांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

ब्रह्मपुरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आयोजक विजय वडेट्टीवार, मुख्याधिकारी मंगेश खवले व अभियान प्रमुख मुन्ना रामटेके यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख रस्त्यांची सफाई करण्यात आली. यामध्ये शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, महिला वर्ग आदी बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजता तहसील ग्राऊंडवरून रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली. विविध देखावे लक्ष वेधून घेत होते. बेटी बचाव, व्यसन, सर्वधर्म समभाव, गोंडी नृत्य, घोडे, लेझीम तथा विशिष्ट पोशाखात विद्यार्थी व विद्यार्र्थिनींनी सहभाग घेतला होता. रॅलीत आयोजक आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष बाळू राऊत, विलास विखार, मनोज कावळे, नंदू पिसे, नितीन उराडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रतिभा फुलझेले, अशोक रामटेके, रश्मी पेशने आदी सहभागी झाले होते.

सिनेकलावंतांचे आकर्षण
महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून सिनेअभिनेता सयाजी शिंदे तर अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता असरानी, सिनेअभिनेत्री मुग्धा गोडसे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जि.प. गटनेता डॉ. सतीश वारजुकर, प्रा. राजेश कांबळे, अशोक रामटेके आदी उपस्थित होते. यावेळी असरानी यांनी ब्रह्मपुरी महोत्सवाची प्रशंसा करून आयोजनाला दाद दिली. सिनेकलावंत हे उद्घाटनीय कार्यक्रमाचे आकर्षण होते.