काव्यशिल्प Digital Media: नाना पटोले

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नाना पटोले. Show all posts
Showing posts with label नाना पटोले. Show all posts

Saturday, December 09, 2017

नाना पटोले यांचे विमानतळावर  स्वागत

नाना पटोले यांचे विमानतळावर स्वागत


 नागपूर - नुकतेच राजीनामा दिलेले खासदार नाना पटोले यांनी खासदार व भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यावर नागपूर आगमन प्रसंगी नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व शेकडो युवक कांग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटनारे नाना पटोले भाजपाच्या व प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी च्या हुक़ूमशाही व शेतकरी बहुजन विरोधी धोरणाला कंटाळून त्यांनी खासदार की चा राजीनामा लोकसभा अध्यक्षा कडे दिला व भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी दिली.या प्रसंगी नागपूर लोकसभा युवक काँग्रेस द्वारा जनचेतना यात्रा बाईक रैली च्या माध्यमातून गंगाजल आणले ते गंगाजल नाना पटोले यांना दिले व स्वगृही परतन्याची विंनती नागपूर लोकसभा युवक काँग्रेस ने केली.तेव्हा नाना पटोले यांनी जनचेतना यात्रा बाईक रैली काढल्या बद्दल बंटी शेळके व त्यांच्या युवक काँग्रेस सहकार्याचे कौतुक केले.व म्हणाले की अनेक खासदार भाजपाच्या धोरणाला कंटाळले आहेत.अनेक जण पक्ष सोडन्याचा विचारात असून पक्ष सोडन्यासाठी कुपनावर बसले आहे.युवक काँग्रेसने केलेल्या विनंतीचा मी नक्कीच विचार करील प्रथमच मी गुजरातला जाऊन भाजपा सरकारच्या विरोधात प्रचाराला जात आहे व भाजपाला हरविन्यासाठी प्रयत्नशील राहिल. नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांनी महा गंगा जल भेट दिले आता मी शुद्ध झालो माझे झालेले शुद्धिकरण देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारतीय पक्षाच्या राजवटीत प्रचंड प्रमाणात वाढल्या आहे.देशातील शेतकऱ्यासाठी मी सदैव आहे असे नाना पटोले म्हणाले याप्रसंगी विमानतळावर युवक काँग्रेसचे राजेंद्र ठाकरे ,अक्षय घाटोळे,स्वप्निल बावनकर,हेमंत कातूरे,आशीष लोनारकर,सौरभ शेळके, अतुल मेश्राम,राहुल मोहाडे,नितिन गुरव,स्वप्निल ढोके, नितिन सुरुशे,फरदीन खान,इशांत शनगांवर कार्यकर्ते स्वागतला उपस्तिथ होते

Friday, December 08, 2017

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा


नवी दिल्ली -गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका करणारे भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहेलोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवला आहे. दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाबाबत माहिती देणार आहेत.

Thursday, November 09, 2017

राहुल गांधींना पटोले भेटणार

राहुल गांधींना पटोले भेटणार

नागपूर :  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून पक्ष प्रवेशाच्या आॅफर आहेत. पण भाजपाला माझे महत्व समजत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपल्याला चर्चेसाठी फोन केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आपण दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी राबवायच्या धोरणांबाबत त्यांची चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

आपण पक्षाच्या व्यासपीठावर तसेच पक्ष नेत्यांकडे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जनतेसाठी भांडणे ही माझी आदत आहे. ती मला मान्य आहे. माझ्या वैयक्तिक भानगडित पडू नका. माझ्या वाट्याला जावू नका. अंगावर याल तर शिंगावर घेईल, असा इशारा भाजपाचे नाराज खासदार नाना पटोले यांनी भाजपाला दिला.
पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष करीत आहेत. आता भाजपनेही त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत घेत पटोले हे ‘आदत से मजबूर’ असल्याची टीका करीत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर म्हणणे मांडावे, असा सल्ला दिला होता. त्यावर पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पटोले म्हणाले, पक्षाच्या पुणे येथील कार्यकारिणीच्या बैठकीत मी शेतकºयांचे प्रश्न उघडपणे मांडले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीतही तेच मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वळोवेळी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे भंडारी यांनी मला नाहक सल्ले देऊ नयेत. भंडारी यांची स्वत:ची अवस्था बिकट आहे. विधान परिषदेत संधी न मिळाल्याने मधल्या काळात ते गायब होते, असा चिमटा त्यांनी काढला. माझे घर काचेचे नाही. पण कुणाची घरे काचेची आहेत हे मला माहीत आहे. तुम्ही प्रामाणिकपणा पाळा. शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन नंतर परत घेतले. हे तुमच्या अप्रामाणिकपणाचे प्रमाणपत्रच असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली.
भंडाऱ्याच भाजपचा पत्ता साफ होता, त्या काळात आपण पक्ष उभा केला. मला जनतेने निवडून दिले आहे. मी पक्षाच्या किंवा नेत्यांच्या भरवशावर नाही. फेब्रुवारीनंतर राजकीय दिशा स्पष्ट करीत, असे त्यांनी एकाप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नोटाबंदीनंतर किती काळे धन परत आले, किती नकली नोटा जमा झाल्या ते आधी जाहीर करा. लाखो लोकांना त्रास झाला. तीनशे नागरिकांचा बँकेच्या रांगेत मृत्य झाला. आपण कशाचा जल्लोष साजरा करीत आहोत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.



यशवंत व शत्रुघ्न सिन्हांसोबत अकोल्यात एका मंचावर
- १ डिसेंबर रोजी अकोला येथे सोयाबीन, कापूस व धान परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत आपण उपस्थित राहणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. यापूर्वी पटोले यांनी यशवंत सिन्हा यांची नागपूर विमानतळावर भेट घेतली होती.

Monday, November 06, 2017

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका


कोल्हापूर / प्रतिनिधी : ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील आता समजतं नाही.’ अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. *शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असं म्हणत सरकारचं कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.* ‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.