काव्यशिल्प Digital Media: हाणामारी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label हाणामारी. Show all posts
Showing posts with label हाणामारी. Show all posts

Sunday, February 11, 2018

 शंकरदेव यात्रेत हाणामारी

शंकरदेव यात्रेत हाणामारी


गडचांदूर/प्रतिनिधी: 
गडचांदूर येथील अमलनाला जवळील नौकारी खुर्द येथे शंकरदेव यात्रा येथे शिवरात्री पाळणा निमित्त 3 ते 4 दिवसीय यात्रा भरते यावर्षी सुद्धा येथे मोठ्या उत्साहात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या यात्रेत काही अज्ञात हल्ले खोरांनी यात्रेकरूवर प्राण घातक हल्ला केला येत देवस्थान समितीचे अध्यक्ष मोतीलाल शांताराम बतकी.वय ४८ वर्षे हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  हल्ला करून  ते हल्लेखोर फारार झाले असून या हल्लेखोराच्या विरोधात नोकरी(खु) येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे भव्य मोर्चा काढत पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद रोकडे यांना सदर प्रकरणाचे निवेदन देऊन हल्ले खोरांना त्वरित अटक करून त्यावर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली. यावेळी ठाणेदार विनोद रोकडे यांनी हल्लेखोराना पकडण्या चे आश्वासन दिले नंतर मोर्चेकरी फॉरेस्टऑफिस वर धडकले तिथे सुद्धा सदर प्रकारणाचे निवेदन देण्यात आले.यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्याने नागरिक उपस्तिथ होते वृत्त लिहिपर्यंत हल्लेखोर हे फरारच होते.