সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 29, 2018

ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगूल वाजला

काटोल तालूक्यातील 53 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर


गजेंद्र डोंगरे/वार्ताहर-कोंढाळी
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी काटोल तालूक्यातील माहे ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ याकालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका २०१८-१९ प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कालावधीत फक्त मुदत संपणार्‍या53 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.


प्रभाग रचना व आरक्षणचा टप्पा-
सोमवार दि. १८ जून पर्यंत तहसीलदार यांनी गुगल मॅपवरचे नकाशे करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे, सोमवार दि. २५ जून पर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे,सीमा निश्चित करणे अनूसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण करणे, शनिवार दि. ३० जून पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे शनिवार ७ जूलै पर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुपप्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे बुधवार दि. ११ जुलैपर्यंत नमुना ब प्रसिध्द करण्यापूर्वी तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने असे प्रस्ताव प्राप्त करुन त्यांची संक्षिप्त प्राथमिक तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दूरुस्त्या करणे, गुरुवार दि. १२ जूलै पर्यंत या दुरुस्त्या अंतभूत करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी.


प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे – शुक्रवार दि. १३ जूलै पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी सूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. शुक्रवार दि.२० जूलै पर्यंत हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक दि. शनिवारदि. २१ जूलै २०१८ रेाजी पर्यत प्राप्त झालेल्या सर्व हरकती वसूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे, मंगळवार दि. ३१ जूलै पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सूनावणी घेणे.


सुनावणींनंतर अभिप्रायसह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे.प्रभाग रचना अंतिम करणे- सोमवार दि. ६ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्तावत पासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे, गुरुवार दि. ९ ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिध्दी देणे. अशी माहिती काटोल चे तहसीलदार निलेश कदम यांनी दिली आहे.
*ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडनूकिचा कार्यक्रम जाहीर होताच काटोल तालूक्यातील राजकिय पक्षाचे कार्यकर्ते आप आपले गट तट मजबूती साठी विव्ह रचनेत लागनारच, मात्र जून -जूलै महिनाभर पेरणी चे कामाला लागले अस आता शेती कामात गुंतलेले काटोल तालूकावासी शेतकरी आता यांना 53 ग्रामपंचायत निवडनूकिला समोर जावे लागनार* तालूक्यात मागिल वर्षिच्या (2017)ऑक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या ,. या वेळी 53ग्रा.प. मधे प्रथमताः थेट मतदारातून सरपंच निवडल्या जाणार आहे.यात अनेक दिग्गजांना या निवडणूकित फेर बदल झाल्याचे दिसून येनार असल्याचे बोलल्या जात आहे.अनेक प्रस्थापितांना आरक्षणा चा फटका बसणार असुन त्यांना आपले राजकारण आपल्याकडेच ठेवायचे असल्यास उप सरपंच या पदावर राहून समाधान मानुन घ्यावे लागनार हे नक्की!आता मुदत संपनार्या गट-ग्रामपंचायत निवडणूका कोणासाठी फायद्याचे किंवा तोट्याच्या ठरतात हे निवडनुक झाल्यावर ठरणार! *जि.प.- पं. स. च्या निवडनुका न्यायालयीन प्रक्रित असल्याने त्या कधी होनार हा प्रश्न ऊभा ठाकला असतांनाच, कोंढाळी ग्राम पंचायतीचा दर्जा वाढ होऊन नगर पंचायत होनार अशी चर्चा होती , या साठी विद्यमान आमदार डाॅ आशिष देशमुख, माजी आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख, काटोल नगर परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सत्ता पक्ष गट नेते चरणसिंह ठाकूर या नेत्यांनी ताकद लाऊन ही कोंढाळी ला न.पंचायतीचा दर्जा वाढ मिळू शकला नाही. हे विषेश!!एकी कडे आमदार समीर मेघे यांचे निर्वाचन क्षेत्रातिल वानाडोंगरी व बुटी बोरी ह्या ग्रा.प.दर्जोन्नत झाल्या पण दोन्ही ग्रा.प. चे आधीची मागणी व त्या मागण्या नुसार सर्व माप दंड पुर्ण करूनही कोंढाळी ला नगर पंचायतीचा दर्जा देण्याच्या उद्घघोषणेत चे प्रसंगी कूठे माशी शिंकली?हे अनुत्तरित आहे. 2018ची ग्रा.प. निवडनूक संपन्न झाल्यावर 2019चे सुरूवातीलाच विधान सभा निवडनुका होणार या प्रसंगी कोंढाळी करांना न.पं. चे दिलेले आश्वासन पुर्ति साठी जर कोंढाळी न.पं. ची घोषणा केल्यास मग!हेऑक्टोबर 2018-चे सरपंच व ग्रा.प. सदस्यांचे काय?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत*

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.