काव्यशिल्प Digital Media: केळवद

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label केळवद. Show all posts
Showing posts with label केळवद. Show all posts

Saturday, November 04, 2017

खुरजगाव फाट्यावर पाउने दोन लाख लुटले

खुरजगाव फाट्यावर पाउने दोन लाख लुटले


नागपूर/प्रतिनिधी
केळवद येथिल पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या नागपुर —छिंदवाडा राष्ट्रिय महामार्गावरील खुरजगाव फाट्यावर ता.३रात्री अकरा वाजताच्या दरम्यान  दिघोरी ,नागपुर येथिल रहीवाशी मोहम्मद जाकीर खान हे मध्यप्रदेशातिल सागर येथुन स्वताच्या महीद्रां पिकअप वाहन क्र.एम .एच ४९डी.२१०९ने कोबंड्या विकुन नागपुर ला जात असतांना खुरजगाव फाट्यावर तिन दुचाकी वाहनाने सहा अज्ञात चोरट्यांनी गाडीला थांबुन चाकुचा धाक दाखवत ,डोळ्यात मिरची पावडर झोकले व मोहम्मद जाकीरखान यांच्या कडील मोबाईल तसेच नगदी स्वरुपातील १लाख ,६५हजार ,दोनशे चाळीस रुपये हीसकावुन चोरटे पळुन गेले.सदर घटनेची तक्रार केळवद पोलीसांना केली असुन,केळवद पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कलम३९५दाखल केली असुन,पुढील तपास केळवद पोलीस करीत आहे.