काव्यशिल्प Digital Media: मंदिरात

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मंदिरात. Show all posts
Showing posts with label मंदिरात. Show all posts

Sunday, January 07, 2018

मंदिरात गुप्तधन शोधणाऱ्या एकाला अटक;5 आरोपी पडून जाण्यास यशस्वी

मंदिरात गुप्तधन शोधणाऱ्या एकाला अटक;5 आरोपी पडून जाण्यास यशस्वी

५ आरोपी पडून जाण्यास यशस्वी 
नागभीड/प्रतिनिधी: 


नागभीड तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली झाली असल्याचे दिसून आले आहे . तालुक्यातील कोथूळणा येथील हुनमान मंदिरात शुक्रवारी रात्री जवळपास ६ ते ७ लोक खोदकाम करीत असल्याची माहिती मिळाली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे टोळीतील ५ आरोपी पसार होण्यास यश्ववी ठरले ठरले. मात्र एक आरोपी गावकऱ्याच्या हाती लागला. व गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. राजेश किसन सावरकर रा.बंगाली कॅम्प चंद्रपूर असे या आरोपीचे नाव आहे.

                  हा संपूर्ण संपूर्ण प्रकार तेव्हा समोर जेव्हा मंदिराशेजारी राहत असलेल्या मंदा प्रमोद जांभुळे या रात्री शौचास गेले असता त्यांना मंदिराच्या आत ६ ते ७ लोकांची संशयित रित्या हालचाल दिसून आली,त्यांनी या बाबादची माहिती आजूबाजू राहत असलेल्या लोकांना दिली व लोकांचा मोर्चा थेट मंदिराकडे आला,गावातील लोकमंदिराकडे येत असल्याचे दिसून येताच काही लोक ६ लोक घटनास्थळावरून पसार झाले मात्र पसार होत असतांनाच टोळीतील आरोपी राजेश किसन सावरकर हा एका खड्यात पडला.व किरकोळरीत्या जखमी देखील झाला. खड्ड्यात पडलेल्या या आरोपीला गावकऱ्यांनी बाहेर काढून घडलेल्या प्रकारची माहिती हि नागभीड पोलिसांना दिली. नागभीड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपाला अटक केली. 
                                                                                      मंदिराच्या बाहेर ६ चपलांचे जोड होते त्यावरून आरोपी हे ६ किव्हा त्यापेक्षा जास्त असावेत असा अंदाज लावला जात आहे.यात लोखंडी साहित्याने खोदकाम करीत असतांना पावळा , घमेला, सिमेंट,पेंट, आदी साहित्य त्याठिकाणी आढळून आले. दादाजी काशिराम वंजारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी राजेश किसन सावरकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सध्या आरोपीला न्यायालयात आणण्यात आले अससल्याचे वृत्त आहे ,अधिक तपास नागभीड पोलिस स्टेशनचे ठाणेदार शेवाळे शेवाळे करीत आहेत.