काव्यशिल्प Digital Media: सट्टा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सट्टा. Show all posts
Showing posts with label सट्टा. Show all posts

Thursday, April 19, 2018

चंद्रपुरात सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड

चंद्रपुरात सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड



ramnagarps-700तीन आरोपींना अटक 
चंद्रपूर /रोषण दुर्योधन: चंद्रपूर  येथील वरोरा नाका परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर चंद्रपूरच्या रामनगर गुन्हे शोध पथकातील शाखेने बुधवारी (दि. १८) रात्री  ११.३० वाजता धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. तेथून ३  जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल १ लाख ७१ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. स्वप्निल देशमुख  (२१), प्रवीण क्षिरसागर (३१), आदित्य चिंतावार (२१) असे आरोपीचे नाव असुन रामनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सध्या देशभर IPL क्रिकेटचा भूत खेळत आहे अस्यातच घरबसल्या किव्हा दलालाच्या मार्फत सट्टा लावल्या जात आहे. अश्यातच रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी धाड टाकत वरोरा नाका परिसरातून ३ आरोपींना अटक केली आहे.या धाडीमुळे शहरातील अनेक बुकींचे व सट्टाबाजाचे धाबे दानानले आहे. 
सदर कारवाई  हि  पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, निलेश वाघमारे यांनी आपल्या चमूसोबत केली या चमूत पोलीस कर्मचारी घनशाम साखरकर,सुनील कामटकर,आनंद परचाके,पुरुषोत्तम चिकाटे,राकेश निमगडे आदीनि पार पाडली,