সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 30, 2014

25 हजार लेते निरीक्षक फंसा एसीबी के जाल में

25 हजार लेते निरीक्षक फंसा एसीबी के जाल में

चंद्रपुर एक बिजली ठेकेदार से मनपा के निरीक्षक द्वारा 22 लाख 71 हजार 44 रुपये के बिल पास कराने के एवज में 25 हजार की रिश्वत मांगी गई. इसकी शिकायत के उपरांत निरीक्षक काले को रंगेहाथ गिरफ्तार कर लिया गया. इस कार्यवाही से कुछ पलों के लिए चंद्रपुर मनपा में हड़कम्प मच गया.

चंद्रपूर जिल्हा ३ डिसेंबरपासून दारूबंद

चंद्रपूर जिल्हा ३ डिसेंबरपासून दारूबंद

सुधीर मुनगंटीवार : व्यसनमुक्तीच्या प्रसार प्रसिद्धीसाठी चार कोटींची तरतूद

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ३ डिसेंबरपासून दारूबंद करणे हा समाजाच्या हिताचा निर्णय असून यासाठी सर्व जिल्हावाशियांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यात दारूबंदी सोबतच व्यसनमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे मत अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

Friday, November 28, 2014

अथर्व गिते  अबैकस नेशनल चैम्पियनशिप ट्रॉफी

अथर्व गिते अबैकस नेशनल चैम्पियनशिप ट्रॉफी

चंद्रपुर: सिप अबैकस के तत्वावधान में 23 नवम्बर 2014 को मैनफो कंवेंशन सेंटर बेंगलुरू में आयोजित 14वां नेशनल अबैकस स्पर्धा में अथर्व रवि गिते ने नेशनल चैम्पियनशिप ट्रॉफी जीत ली। विभिन्न राज्य से 6 हजार विद्यार्थियों ने इस स्पर्धा में भाग लिया। स्मार्ट किड्स प्रताप नगर में अबैकस में प्रशिक्षण लेने वाले अथर्व गिते ने स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी जि. नागपुर का 6 ठे क्लास का विद्यार्थी है।
‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन शनिवारी

‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन शनिवारी

नागपूर- पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रुद्र प्रकाशनाच्यावतीने, येत्या २९ नाव्हेंबरला शनिवारी सायंकाळी ६ वाजता, अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्राच्या सभागृहात महाराष्टÑातील विख्यात बांसरीवादक अविनाश पटवर्धन यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या ‘श्रुती दर्पण’ या शोधग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात समाजसेवक डॉ. विकास बाबा आमटे आणि पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे या बंधुद्वयाच्या उपस्थितीत ‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय संगीतात कारुण्याचा ओलावा निर्माण करणाºया ‘बांसरी’ च्या स्वरतंत्राचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. संपूर्ण देशभर पायपीट करून विविध प्रांतातील बांसरी वादकांशी चर्चा करीत, अविनाश पटवर्धन यांनी शास्त्रशुुद्ध बांसरी बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. प्राणातून निघालेला कोणताही स्वर माणसाचे अंत:करण एकदुसºयाशी जोडू शकतो, हा आत्मविश्वास घेऊन अविनाश पटवर्धन गेली अनेक वर्षे बांसरीतून माणूस जोडण्याचे अभियान चालवित आहेत. पद्मविभूषण बाबा आमटे यांच्यासमवेत राष्टÑजागृती अभियानाच्या निमित्ताने देशभर फिरताना, ‘बांसरी’च्या माध्यमातून राष्टÑीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. प्राचीन भारतीय स्वरशास्त्रातील श्रुतींचा सखोल अभ्यास करून मांडलेली तथ्ये भारतीय संगीतशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरावीत. यावर देशातील अनेक मान्यवरांनी दिलेले अभिप्राय याची साक्ष देतात. या कार्यक्रमाकरिता शहरातील संगीतप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन रुद्र प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.
भिसीत आज "दोन घास सुखाचे' नाट्यप्रयोग

भिसीत आज "दोन घास सुखाचे' नाट्यप्रयोग

डॉ. प्रकाश आमटे चित्रपटातील कलावंतांचा सत्कार


भिसी (जि. चंद्रपूर), : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "डॉ. प्रकाश आमटे' चित्रपटातील कलावंतांचा सत्कार सोहळा शाहीर दादाजी भोयर फाउंडेशनच्या वतीने उद्या ता. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता भिसी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर अनिरुद्ध वनकर लिखित, खेमराज भोयर दिग्दर्शित लोकजागृती वडसा निर्मित "दोन घास सुखाचे' या नाटकाचा प्रयोग सादर होईल.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते कादर शेख, अहमद शेख, अनिरुद्ध वनकर, कुणाल गजभारे, नयना सोनवणे, खेमराज भोयर यांचा सत्कार होईल.
भिसी येथील आदर्श जनता विद्यालयाच्या रंगमंचावर होणाऱ्या या नाटकात अनिरुद्ध वनकर, फिल्म आशियाना व डॉ. प्रकाश आमटे चित्रपटातील कुणाल गजभारे, नयना सोनवणे, महेंद्र गोंडाणे, खेमराज भोयर, मा. संजीव, मंगेश मेश्राम, क्राईम पेट्रोलमधील कुणाल कपूर, ज्योती खुणे, कु. दीपाली, सौ. भारती (नागपूर), बालकलावंत शेषराज जिभकाटे, अंजली गोंडाणे यांचा समावेश आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक यशवंत भोयर यांनी दिली.

Thursday, November 27, 2014

गोळी लागून जखमी

गोळी लागून जखमी

हिंगणा: राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ)च्या फायरिंग रेंज मैदानावर सराव करणाऱ्या तुकडीतून एका बंदूकीतून गोळी लागल्याने मुकेश शेषराम शेंडे (वय 25)  जखमी झाला.  सुदैवाने गोळी शरिरातून गेली नाही. ती दाताजवळच थांबल्याने किरकोळ दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी

आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुत गिरणी,च्या सुधारीत

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी


- एकनाथराव खडसे, मंत्री महसुल



मुंबई, दि.२७ :- आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणी ही आठव्या पंचवार्षिक योजना काळातील सहकारी सुत गिरणी असून या सुतगिरणीची आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.
शासनाने दिनांक 30/6/2011 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सहकारी सुत गिरण्याच्या सुधारीत प्रकल्प अहवालाची किंमत रुपये 6174.24 कोटी इतकी निश्चित केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांचेकडून 25,200 चात्यांचा सुधारीत प्रकल्प अहवाल तयार करुन शासनाच्या मंजूरीस सादर केलेला होता. संचालक, वस्त्रोद्योग, म.रा. यांनी सुधारीत प्रकल्प अहवाल दिनांक 15/2/2014 व दिनांक 31/7/2014 अन्वये सुकाणु समितीच्या मंजूरीसाठी शासनाकडे सादर केला.
25 वर्षांनी ग्रामीणला मिळाले "लॅब्राडोर'

25 वर्षांनी ग्रामीणला मिळाले "लॅब्राडोर'

नवे श्‍वानपथक : रॅम्बो, ब्रुनो, सिझर, मायकेल, जॅक्‍शन करणार गुन्ह्यांचा तपास

नागपूर, : ग्रामीण पोलिस मुख्यालयात श्‍वानपथक कार्यरत नव्हते. त्यामुळे श्‍वानपथकाचे कामकाज नागपूर रेल्वे पोलिस दलाच्या मार्फतीने करण्यात येत होते. आता ही उसनवारी बंद होणार आहे. तब्बल 25 वर्षांनी नागपूर ग्रामीणला रॅम्बो, ब्रुनो, सिझर, मायकेल, जॅक्‍शन हे नवे श्‍वान दाखल झाले आहेत.
वननिरिक्षक नोकरी सोडण्याच्या मार्गावर

वननिरिक्षक नोकरी सोडण्याच्या मार्गावर

आठ महिन्यांपासून वेतनच नाही : ताडोबातील 24 कर्मचाऱ्यांवर उपासमारी

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 26 : वाघांच्या शिकारीला प्रतिबंध आणि त्यांच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या गावांतील तरुणांना घेऊन व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. मात्र, सेवेलाआठ महिने उलटूनही या वननिरीक्षकांना (फॉरेस्ट वॉचर्स) एकही वेतन देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे सर्व वननिरिक्षक नोकरी सोडण्याच्या मार्गावर आहेत.
वाघांच्या वाढत्या शिकारींनी प्रतिबंध घालण्यासोबत त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाने गतवर्षी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला. या करारांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही पदांची निर्मितीही करण्यात आली. व्याघ्र प्रकल्पातील तीन वनक्षेत्रपालांच्या तुकडीप्रमाणे 24 वन निरिक्षकांची पदे भरण्यात आली. यात सहा महिलांचाही समावेश आहे.
व्याघ्र संरक्षण दलामध्ये वन निरीक्षकांचे काम जोखमीच असते. त्यामुळे जंगल, वन्यजीवांचा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेले तसेच कोअर व बफर क्षेत्रात राहणाऱ्यांना जंगलाचा चांगला अभ्यास असल्याने स्थानिक तरुणांना सेवेत रूजू करून घेण्यात आले होते. हे सर्व वन निरिक्षक 10 मार्च 2014 रोजी सेवेत रुजू झाले. गरिबीमुळे उसनवारी करून वनप्रशिक्षण घेतले. बेरोजगारीमुळे हतबल झालेल्या या आदिवासी तरुणांना नोकरीमुळे नवी आशा मिळाली होती. मात्र, पहिल्या महिन्यापासूनच वेतनाचा पत्ता नाही. आता आठ महिने होऊनही एकही मासिक वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे. या थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. निवेदन, विनंती अर्ज दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणे सांगून त्यांना आठ महिन्यांपर्यंत विनावेतन ठेवले आहे. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्धार हे वननिरिक्षक करू लागले आहेत.


   वननिरिक्षक पदाचे सर्व कर्मचारी नवीन आहेत. वेतनासाठी त्यांच्या नावाची नोंद बजेट ड्युटीबशन सिस्टममध्ये करण्यात आली आहे. सर्व आठ महिन्यापासूनचे थकीत वेतन शुक्रवारपर्यंत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- श्री. घुरे, सहायक वनसंरक्षक
मंत्रीमंडळ विस्तारात तेली समाजाला प्रतिनिधीत्व

मंत्रीमंडळ विस्तारात तेली समाजाला प्रतिनिधीत्व

बावनकुळे, खोपडेंच्या नावाची चर्चा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. या विस्तारात ५ कॅबिनेट आणि १५ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ सरकारमध्ये मित्र पक्षांनाही स्थान दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे नागपूरचे कृष्णा खोपडे, कामठीचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे, यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. हे दोन्ही आमदार तेली समाजाचे  प्रतिनिधीत्व करतात हे विशेष.
१० वर्षीय बालकास पळविले

१० वर्षीय बालकास पळविले

नागपूर  कळमणा हद्यीत प्लाॅट नं. 113, भगत नगर, भरतवाडा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नंदलाल डोलीचंद बिसेन वय 36 वर्ष यांचा मुलगा विशाल नंदलाल बिसेन वय 10 वर्ष यास कोणीतरी अज्ञात आरोपी इसमाने फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्दशानुसार पोस्टे कळमणा येथे सपोनि ठाकरे यांनी आरोपीविरूध्द कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Tuesday, November 25, 2014

कोयला प्लाॅटोपर कोयले मे भारी मीलावट

कोयला प्लाॅटोपर कोयले मे भारी मीलावट

घुग्घुस : घुग्घुस और चंद्रपुर परीसर के क्षेत्र मे कोयले मे भारी मीलावट करके क्षेत्र को प्रायवेट एवं सरकारी कंपनीयो को बेचा जाने का प्रमाण मील रहा है। इस वजह से परीसर की कंपनीयो को भारी नुकसान हो रहा है।

Sunday, November 23, 2014

महिला अत्याचार विरोधात  सोमवारी  कँडल मार्च

महिला अत्याचार विरोधात सोमवारी कँडल मार्च

जिल्ह्यात  १० महिन्यात बलात्कार ७९, विनयभंग १६८, छेडछाड ६० 


चंद्रपूर - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांवरील होत असलेल्या अत्याचारा विरोधात तसेच याबाबत प्रस्थापित सरकार व स्थानिय पोलिस प्रशासनाला सद्बुध्दी मिळण्याबाबत दि. २४ नोव्हें. ला चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिय गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत सायं. ७ वा. कँडल मार्च काढण्यात येत असल्याची माहिती आज आयोजित पत्रपरिषदेत युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. 
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ३० नोव्हें.ला  ठिया आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ३० नोव्हें.ला ठिया आंदोलन

शेतकरी संघटनेचे आंदोलन

चंद्रपूर - केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापूस, धान व सोयाबिन याला योग्य भाव तसेच कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीची भूमिका मांडली होती. परंतु प्रत्यक्षात केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने ३० नोव्हें. २०१४ ला नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरासमोर सदर मागणीच्या पुर्ततेसाठी दु. १२ वाजेपासून ठिया आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी आम. अ‍ॅड. वामनराव चटप, रवि गोखरे, रमेश नळे, कपिल इद्दे आदींनी दिली.
अमृतकरच्या अध्यक्ष पदाला स्थगिती

अमृतकरच्या अध्यक्ष पदाला स्थगिती

चंद्रपूर -  अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शोभा ओझ यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे यांना चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाला स्थगितीचे आदेश दिले. गेल्या काही  दिवसापूर्वी माजी महापौर संगीता अमृतकर यांची अध्यक्ष पदी निवड झाली होती 
त्याकरीता नविन महिला जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा वनमाला राठोड व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव सिमा भुरे यांनी निरीक्षक म्हणून सोमवार दि.२४ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी २.०० वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे येणार आहे. तरी चंद्रपूर जिल्हा महिला काँगे्रस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ता लव महिला काँग्रेस प्रेमी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान सुनिता वि. लोढीया यांनी केले आहे.

Saturday, November 22, 2014

साहेबांच्या आदेशानंतरही मनसेचा फलकराज

साहेबांच्या आदेशानंतरही मनसेचा फलकराज

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वाढदिवसाचे फलक लावु नका अन्यथा  तर पक्षातून हकालपट्टी करू , असा दम भरला. मात्र, यां आदेशाचे  मनसे कार्यकर्त्यांनी पालन केलेले नाहीं। साहेबांच्या आदेशानंतरही मनसे चा फलकराज चंद्रपुरात सुरु आहे 
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचे फलक शहरात दिवसभर  होते. साहेबांचा आदेश दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. काहींनी आदेश येताच शुभेच्छा फलक हटविलेसुद्धा. मात्र, गायकवाड यांना आपले शुभेच्छा फलक लागेल, याची कल्पना नसावी. त्यामुळे दिवसभर शहरातील मुख्य चौकांत त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले होते. पक्षांतर्गत विरोधकांनी वरिष्ठांकडे या शुभेच्छा फलकांचे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचते केले. 
पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून त्या पक्षातर्फे रिंगणात उतरल्या होत्या. गायकवाड यांना केवळ दोन हजारांच्या आसपास मते मिळाली. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी शहरात त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी पुणे येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यापुढे चमकोगिरी बंद करण्याचा आदेश दिला. विशेषत: चौकाचौकांत लावल्या जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या शुभेच्छा फलकांवर त्यांचा विशेष आक्षेप होता. 
डॉ. प्रकाश आमटेंना "चंद्रपूरभूषण'

डॉ. प्रकाश आमटेंना "चंद्रपूरभूषण'

चंद्रपूर, लोकाग्रणी ऍड. बळवंतराव राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "चंद्रपूरभूषण पुरस्कार' यंदा पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. 30 नोव्हेंबरला आयोजित कार्यक्रमात तो प्रदान केला जाणार आहे. चंद्रपूरभूषण पुरस्काराचे हे बारावे वर्षे आहे. या पुरस्कारात शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख 11 हजार रुपयांचा समावेश आहे.

Wednesday, November 19, 2014

मौद्यात भूखंड घोटाळा

मौद्यात भूखंड घोटाळा

शेकडो बांधकाम अर्ज प्रलंबित : अधिकाऱ्यांकडून कारवाईऐवजी खतपाणी


मौदा, ता. 14 : तालुक्‍यातील संपूर्ण भाग मेट्रो रिजनमध्ये समाविष्ट झाल्यानंतर अवैध व्यवहारांना आळा बसण्याऐवजी ते वाढताना दिसत आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचा जवळपास 16 लाख रुपये प्रतिएकरी विकासशुल्क भरणे शक्‍य नसल्याने अवैध भूखंड विक्रीला उधाण आले आहे. यावर अनेक तक्रारी आल्यानंतरही अधिकाऱ्यांनी कारवाईऐवजी खतपाणी घालण्याचे काम सुरू केले आहे. अनाधिकृत भूखंडांना आळा घालण्यात न आल्याने बांधकाम मंजुरीच्या अनेक अर्जांचा गठ्ठा मौदा नगरपंचायतीमध्ये पडलेले आहेत.
मैफलीत बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत घसरला तोल

मैफलीत बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत घसरला तोल

एक शेत... शेतात ओलितासाठी विहीर... विहिरीच्या तोंडावर बांबूची काठी... काठीवर बगळ्यांची मैफल बसलेली... खेळण्यात रमलेली... पंख फडफडणं... हळूच उडणं - हळूच बसणं... सारं काही ऑल इज वेल... आणि तेवढ्यात एका बेसावध क्षणी... दांड्याच्या काठावरून घसरले... पन्नास-साठाच्या गर्दीने काहींना तोल सावरेना. उडता न येण्याने खोल साठ फूट विहिरीत पडले. ही घटना आहे हरदोली (नाईक) येथील शिवारातल्या शेतातील.
नागपूर जिल्ह्यातील वेलतूर निवासी लालाजी साठवणे, आकाश साठवणे व गोपाल साठवणे यांच्या शेतात सध्या ओलिताची कामे सुरू आहेत. मिरचीला पाणी व गव्हाच्या शेताला पेरणीपूर्वी भिजवून मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा जोर आहे. यादरम्यान शेतात मोठ्या प्रमाणात बगळ्यांची गर्दी होत असते. बगळे ओलिताच्या शेतात आपले अन्न शोधत फिरत असतात. अशा एका क्षणी विहिरीच्या तोंडावर ठेवलेल्या दांडीवर मैफल सजवून बसलेल्या बगळ्यांचा अपघात घडला आणि ते विहिरीत पडले. काही बगळे कसेतरी बाहेर निघाले. पण, एक-दोन नव्हे, तर सोळा बगळे तिथेच अडकले. त्या सोळा बगळ्यांना काही केल्या खोल विहिरीतून बाहेर पडता आले नव्हते.
आनंदवन दौरा

आनंदवन दौरा

ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्ष  21 नोव्हेंबर रोजी आनंदवनात 

चंद्रपूर दि.19- महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष .सुर्यकांत गवळी हे 21 व 22 नोव्हेंबर 2014 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून बाबा आमटे आश्रम आनंदवन वरोरा येथे भेट देणार आहे.
21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे चंद्रपूर जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांसमवेत बैठक. त्यानंतर दुपारी 1 वा.पत्रकार परिषद असून त्यांचा दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील. दुपारी 2.30 ते 3.30 पर्यंत बैठकीसाठी निमंत्रीत अधिकारी व ग्राहक चळवळीत काम करणा-या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 पर्यंत जिल्हा ग्राहक मंचाची प्रत्यक्ष पाहणी, मंचाच्या अडीअडचणी व त्यावर उपाययोजना या संबंधी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.30 ते 5.30 पर्यत राखीव असून सांय.5.30 वा.बाबा आमटे आश्रम वरोराकडे प्रयाण कतील आणि वरोरा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहील.
22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत बाबा आमटे आश्रम आनंदवन वरोरा येथे भेट असून सांयकाळी 6 वाजता वरोरा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Tuesday, November 18, 2014

राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील :  सुधीर मुनगंटीवार

राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील : सुधीर मुनगंटीवार


मुंबई दि. 18: राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील असून विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल वाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

काल वित्तमंत्र्यांनी विक्रीकर विभागाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. मुनगंटीवार यांचा विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर, विशेष विक्रीकर आयुक्त चंद्रशेखर ओक, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारागावकर यांच्यासह विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेचे डॉ. अरूण बिराजदार, डॉ. महेश चंदूरकर, विक्रीकर कर्मचारी संघटनेचे मिलिंद सरदेशमुख, सुबोध किर्लोस्कर, गट ड कर्मचारी संघटनेचे पोपट कांबळे, मुकुंद पवार यांच्याासह विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्रीकर विभागाने सन 2013-14 या आर्थिक वर्षातील 70 हजार कोटी रुपयांच्या महसूल संकलनाचा लक्ष्यांक पूर्ण केल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विभागाने 2014-15 साठीचा 80 हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट तर पूर्ण करावेच पण राज्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी एक लाख कोटीचा टप्पा पूर्ण करावा. राज्याचा आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आपण सर्वजण मिळून निर्धाराने यशस्वी करू असे सांगतांना वित्तमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यासाठी मार्गदर्शनही केले.

कल्याणकारी राज्याच्या उभारणीमध्ये शासनाचे हात मजबूत करणारा हा विभाग असल्याचे सांगतांना त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रास्त व न्याय्य मागण्यांसदर्भात संघटनांबरोबर चर्चा करण्यात येईल व त्यांचे प्रश्न सकारात्मकदृष्टया सोडवले जातील असे त्यांनी सांगितले.

विक्रीकर विभागातील रिक्त पदे आणि पदोन्नत्यासंबंधीचे निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत घेण्यात येतील, असे अपरमुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या महसूल वाढीसाठी विक्रीकर विभागातील रिक्त पदे व पदोन्नत्यासंबंधीचे निर्णय लवकर घेण्यात यावेत असे प्रतिपादन करतांना विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर यांनी गेल्या दोन वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतांनाही कामाचा निपटारा वेगाने करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
19 नोव्हेंबर रोजी  हौशी मराठी नाटय स्पर्धेची सुरुवात

19 नोव्हेंबर रोजी हौशी मराठी नाटय स्पर्धेची सुरुवात

चंद्रपूर दि.18- महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यातर्फे आयोजित 54 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले आहे. या नाटय स्पर्धेचे उदघाटन 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व जेष्ठ कलावंत, लेखक श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहे. या सोहळयानिमित्त लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या 100 विद्यार्थींनी उपस्थित राहून रंगभूमिच्या वाढीसाठी मी रंगकर्मी अशि प्रतिज्ञा उपस्थित रंगकर्मी व प्रेक्षकांना यांना देण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत चालणा-या या नाटय महोत्सवास चंद्रपूरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक सुशिल सहारे यांनी केले आहे.
सुस्तावलेली जिल्हा परिषद रविवारीही कामात

सुस्तावलेली जिल्हा परिषद रविवारीही कामात

जिल्हा परिषदेतील सुस्तावलेले वातावरण अलिकडे अचानकपणे बदललेले जाणवत आहे. कधी नव्हते ते तत्परता आता अधिकार्‍यांमध्ये दिसून यायला लागली आहे. जिल्हा परिषदेत जावे तेव्हा अधिकारी आपल्या टेबलवर काम करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर, केवळ मार्च एंडिगच्या काळात रविवी सुरू राहणारी जिल्हा परिषद अलिकडे रविवारीही सुरू दिसत आहे. अधिकारी आपली पेंडिंग कामे रविवारी उरकून घेताना दिसत आहे. नेमका हा प्रभाव कशाचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांची ततत्परता सर्वांना ज्ञात आहेत. त्यांनी अलिकडे सर्वांनचे कम टोचल्याने आणि दोन मंत्र्यांचीही भर जिल्ह्यात पडल्याने ही तत्परता असावी, असा कयास आहे.


जिल्हा परिषदेमध्ये अनेक अधिकार्‍यांकडे विविध विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी सध्या त्रस्त आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशपांडे यांच्याकडे सामान्य प्रशासनचा कार्यभार आहे. डीआरडीचे अंकुश केदार यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यपालनचा कार्यभार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे रविकांत देशपांडे यांच्याकडे माध्यमिकचा कार्यभार आहे. समाजकल्याणचे वाकुलकर यांच्याकडेही अतिरिक्त भार आहे. यांच्यासह अन्य अधिकार्‍यांवरही पदभार आहे. ज्यामुळे विविध कामावर याचा परिणाम पडत आहे.

Sunday, November 16, 2014

स्वच्छतेची सुरवात घरापासून करा- .हंसराज अहिर

स्वच्छतेची सुरवात घरापासून करा- .हंसराज अहिर

चंद्रपूर दि.16- स्वच्छ भारत अभियान स्वयंस्फूर्तपणे राबवून स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी केले. झरपट नदी स्वच्छ करणे व स्वच्छ भारत विशेष अभियानातंर्गत आज झरपट नदी येथे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने मोहिम राबविण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. 

ना.हंसराज अहिर यांनी झरपट नदीमधील गाळ व गवत काढून झरपट नदी स्वच्छ करण्याच्या महानगरपालिकेच्या योजनेस सुरुवात केली. त्यानंतर नदीचा परिसर झाडूने स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्यामुळे चंद्रपूरकर नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्लॉस्टिकचा वापर टाळावा असा सल्ला देतांना प्लॉस्टीकमुळे नाल्या तुबंतात व सर्वत्र घाण होते. ही बाब नागरिकांनी लक्षात घ्यावी व प्लॉस्टीकमुक्त चंद्रपूर ही संकल्पना राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
हिरवा बांबू मोफत पुरवा

हिरवा बांबू मोफत पुरवा

बांबु कारागीरांची पुर्व विदर्भाची पहीली बांबू परीषद

चंद्रपूर- श्रमिक एल्गारचे वतीने पुर्व विदर्भातील बांबू कारागीरांच्या प्रश्नावर बांबु परीषद चंद्रपूर येथे घेण्यात आली. ‘विदर्भातील लोकांनी जंगल राखला असतांनाही त्यांचेकडुनच टॅक्स घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल परीषदेचे अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी करून बांबू मोफत मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

Friday, November 14, 2014

त्रिमुर्ती इस्पात कंपनीत स्फोट : सात कामगार जखमी

त्रिमुर्ती इस्पात कंपनीत स्फोट : सात कामगार जखमी

कळमेश्‍वर,: येथील औद्योगिक वसाहतीतील त्रीमूर्ती इस्पात कंपनीत मध्यरात्री 12च्या सुमारास फर्निशमध्ये स्क्रप लोखंड टाकताच मोठा स्फोट झाला. गरम लोखंडाचा लाव्हा रस कामगारांवर उडाल्याने सात कामगार जखमी झाले. यातील दोन कामगार गंभीर असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्रिमूर्ती इस्पात कंपनीत 14 ते 15 कामगार काम करतात. केवळ एकाच पाळीमध्ये रात्री सहा ते 10 पर्यंत स्क्रॅप लोखंडापासून अँगल गॉर्ड बनविण्याचे काम चालते. रात्री 12 च्या सुमारास फर्निशमध्ये स्क्रॅप लोखंड टाकताच भयंकर मोठा स्फोट झाला. त्यात लोखंडी लाव्हा रस कामगारांच्या अंगावर उडाला. त्यामुळे इथे उपस्थित कामगार भाजले. यातील दोघाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने भरती करण्यात आले. यात सुशील श्रीधर उपाध्याय (वय 35), कमलाकर शालिक झाडे (वय 35), सूरज विनायक उईके (वय 20) रा. तांदूळवाणी, भादू पांडू भलावी (वय 35, रा. सिंदेवाही, ता. काटोल), ज्ञानेश्‍वर सोनबा गोरले (वय 30 रा. वरोडा), महिंद्र गिरीधर शर्मा (वय 30, ब्राह्मणी), सुखदेव उईके (वय 35), यांचा समावेश आहे.

Wednesday, November 12, 2014

 'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा

'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा

 'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा करीत राज्यपाल  सी. विद्यासागर राव यांनी मराठीतून नव्या सरकारला शुभेच्छा देत  आपल्या भाषणाची सांगता केली.
  • ते म्हणाले, मराहाष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातील जनतेच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देणार, २५० आणि ५०० लोकसंख्या असलेल्या खेड्यांना पंतप्रधान ग्राम सडक योजना लागू करु 
  • २०१५ साली होणा-या कुंभ मेळ्याकरता २२ खाती सज्ज असून योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल - व्याघ्र प्रकल्पाकडे आणि जंगल पर्यटनाकडे आम्ही विशेष लक्ष देऊ -
  •  ई- टेंडरींग अनिवार्यकरण्यावर आमचा भर असेल -  
  • मच्छीमारांच्या विकासासाठी नव्या जेट्टी व हार्बर निर्माण करणार - 
  • उद्योगांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यास आमचे सरकार प्रयत्नशील राहिल  
  •  सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास विशेष तरतूद केली जाणार - 
  •  शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील पुतळा आणि इंदू मिल मध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक बांधणार 
  •  पोलिसांना चांगली निवासस्थाने आणि त्यांच्यामुलांच्या शिक्षणा करता सुविधा 
  • दलित हत्याकांडांतील तपासासाठी विशेष पोलीस पथक 
जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी


चंद्रपूर दि.12- जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आज जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून पाहणी केली. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णसेवा व नवीन इमारत याविषयीची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधला.
जिल्हाधिका-यांनी महिला वार्ड, शिशु वार्ड, सामान्य वार्ड, बर्न वार्ड, नेत्र विभाग, स्वयंपाक गृह, भांडार गृह, सिटी स्कॅन, आयसीयू व नवीन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाकरीता नवीन सिटी स्कॅन मशीन तसेच एक्सरे मशीनची मागणी करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. रुग्णालयातील लिफ्ट त्वरीत कार्यान्वित करावी व स्वच्छतेविषयी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

चंद्रपूर : जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली.
सभापतींच्या खातेवाटपामध्ये देवराव भोंगळे यांना बांधकाम, तसेच शिक्षण खाते मिळाले आहे. ईश्वर मेश्राम यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे. उपाध्यक्ष कल्पना बोरकर कृषी सभापतिपद देण्यात आले आहे. तर नीलकंठ कोरांगे यांना समाजकल्याणचा भार देण्यात आला आहे. सविता कुडे यांना महिला बालकल्याण खाते मिळाले आहे.
समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. माजी पदाधिकाऱ्यांपैकी संदीप गड्डमवार यांची जलव्यवस्थाप समिती सदस्य, संतोष कुमरे यांची अर्थ समिती, गुणवंतराव कारेकर शिक्षण समिती, अमृता सूर यांची बांधकाम समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.
पीक बंदोबस्तासाठी वाघाची विष्ठा

पीक बंदोबस्तासाठी वाघाची विष्ठा

नागपूर   : डुकरांच्या हैदोसापासून आपले पीक व शेत वाचविण्यासाठी व त्याच्या बंदोबस्तासाठी वेलतूर व परिसरातील शेतकरी सध्या वाघाची विष्ठा मिळविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. या विष्टेसाठी शेतकरी जंगल पालथे घालत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.
जंगलातल्या वाघाची विष्ठा आणायची. शेताच्या चारही बाजूला शिवरात ठिकठिकाणी थोडी थोडी टाकायची आणि डुकरांच्या हैदोसापासून मुक्त व्हायचे. हा उपाय केल्यास डुकरे कित्येक दिवस नव्हे, तर महिनोमहिने शेताकडे फिरकत नाहीत, असा अजब सल्ला कुणीतरी शेतकऱ्यांना दिला. तेव्हापासून शेतकऱ्यांनी वाघाच्या विष्ठेचा शोध सुरू केला आहे.
जंगली डुकरांच्या बंदोबस्तासाठी परिसरातील बहुतेक शेतकरी दरवर्षी जिवाचे रान करत असतो. दिवस-रात्र जागल करतात. फटाके फोडणे, धूर करणे, आग लावणे, नाही ते आवाज करणे, विषारी पदार्थ मांडून त्याची फवारणी करणे, कुंपण घालणे, कुंपणातून वीजप्रवाह सोडण्यासारखे जिवघेणे व अमानवीय प्रयोगही केले जातात. परंतु, डुकरे नुकसान करतातच. मात्र, यावर्षी शेत बचावासाठी शेतकऱ्यांनी वेगळाच प्रयोग सुरू केला आहे. परिसर जंगलव्याप्त असून, जंगलात जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघाचेही वास्तव्य असल्याने जंगलात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका होऊ शकतो.
अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक संस्थांची प्रवेशप्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

मुंबई, दि. 11 : राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची प्रवेशप्रक्रिया आणि कारभार आता अधिक पारदर्शक होणार असून यासाठी mddtrust.mahaonline.gov.in या अद्ययावत वेबपोर्टलचा आज मंत्रालयात राज्याचे महसूल तथा अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज श्री. खडसे यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला.

Sunday, November 09, 2014

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

  • हंसराज  अहिर
  • जन्म ११ नोव्हेंबर, १९५४
  • नांदेड, महाराष्ट्र
  • कार्यकाळ
  • इ.स. २००४ – इ.स. २००९
  • मतदारसंघ  - चंद्रपूर
  • राजकीय पक्ष - भारतीय जनता पक्ष
  • पत्नी - लता हंसराज अहिर
  • अपत्ये - २ मुलगे
  • निवास - चंद्रपूर, महाराष्ट्र

  • कोण आहेत …

Saturday, November 08, 2014

नवी उमेद

नवी उमेद

वादळ, अतिवृष्टी, गारपीट निसर्गातील सर्व संकटे झेलत आयुष्य जगणा-या शेतक-याच्या बैल गाडीची चाके मात्र थांबत नाहीत. पुन्हा नवी उमेद घेऊन शेताकडे निघालेली गाडी । छायाचित्र देवानंद साखरकर, चंद्रपूर  

Friday, November 07, 2014

Thursday, November 06, 2014

महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी

महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी

केरळ आणि गुजरातच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी, अशी मागणी पर्यावरण व निसर्ग संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली. संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.

दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्थ झाले. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आपण चर्चेलाही तयार असल्याचे संस्थेने मुख्यमंत्र्यांना कळविले. शिष्टमंडळात सचिव मधुकर सुरवाडे, राजेश सोनटक्के, जितेन वासनिक, विजय मेश्राम, के. टी. तिवाडे, डी. यू. इंदूरकर, प्रदीप हजारे, मनोज फुलपाटील, संजय मानकर आदींचा समावेश होता.
पेट्रोलिंगसाठी दोन गॅंगमन पाठविणार

पेट्रोलिंगसाठी दोन गॅंगमन पाठविणार

रेल रोकोच्या आंदोलनाची घेतली दखल

वरोरा
 - मध्य रेल्वेच्या वरोरा विभागात नाइट पेट्रोलिंगसाठी एक गॅंगमन पाठविणार असल्याचे सांगताच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दोन गॅंगमन पाठविण्याचा निर्णय घेतला. 

Wednesday, November 05, 2014

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर दि.05- केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान प्राधान्याने राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छ भारत विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. ते विविध विभागाच्या खाते प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हाधिकारी दामोधर नान्हे, पंकज चौबळ व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी - 
वनरक्षक पदाकरिता 12 विज्ञान गणीतसह उत्तीर्ण अटीचा विरोध


चंद्रपूरः चंद्रपूर सह इतरही जिल्हयात वनविभागातील वनरक्षक पदाकरिता भरती प्रकीया सुरू आहे. वनरक्षक पदाकरिता शैक्षणीक पात्रता 12 विज्ञान गणीत विषयासह उत्तीर्ण होण्याची अट घातली गेली आहे. ही शैक्षणीक अट मागे घेण्यात यावी व सुरू असलेली भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी राज्याचे वनमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातुन केली आहे.
एक महिन्यात दारूबंदी- सुधीर मुनगंटीवार

एक महिन्यात दारूबंदी- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर-  जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय इथल्या महिलांनी घेतला आहे. 816 ग्रामपंचायतींपैकी 600 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव घेतला आहे. त्यामुळं दारुबंदी करण्याला माझं प्राधान्य राहिल, एक महिन्यात दारूबंदी झालेली दिसेल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र टोलमुक्त करू, अशी निवडणुकीपूर्वी घोषणा करणाऱ्या भाजपनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भूमिका बदलल्याचा आरोप ेकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. या प्रश्‍नावर पत्रकारांनी छेडले असता, मुनगंटीवारांनी केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी राज्यात ठिकठिकाणी टोल उभारण्यात आले आहेत. यात सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे. जे टोल कंत्राटदारांच्या भल्यासाठी उभारलेत, ते निश्‍चितपणे बंद केले जातील, असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Tuesday, November 04, 2014

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

मंबाथो दि. 4 : राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्येरावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी "भारतीयलोकशाही आणि सुशासन" या विषयावर आपले विचार मांडले.
याअधिवेशनाची सुरुवात काल दि. 2 नोव्हेंबर, 2014 रोजी दक्षिण आफ्रिकेच्यावायव्य प्रांताच्या "मंबाथो" येथील विधिमंडळ सभागृहात झाली. यावेळीवायव्य प्रांताच्या विधिमंडळाच्या अध्यक्षा सुसाना रिबेका तसेच विविधराष्ट्रकुल देशांच्या संसद तसेच विधिमंडळातून आलेले युवा संसद तसेचविधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी"भारतीय लोकशाही व सुशासन" या विषयावर आपले विचार मांडतानाजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसद सदस्य तसेच विधिमंडळसदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासदस्यांची निवड प्रक्रिया यावर सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारतासारख्या मोठ्या व खंडप्राय देशामध्ये सुशासनराहण्यासाठी राजकीय व्यवस्था, कार्यकारी व प्रशासकीय व्यवस्था,न्यायपालिका व प्रसिध्दी माध्यमांची भूमिका कशी महत्वाची आहे, याबाबतविस्तृतपणे माहिती दिली. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंध तसेचकायदा करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना संबोधित केले. भारतामध्येपंचायती राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणिग्रामपंचायत या त्रिस्तरीय रचनेमधील राजकीय पक्षांची व प्रशासनाचीभूमिकेचे महत्व विशद केले. भारतातील राजकीय व प्रशासकीयव्यवस्थेमध्ये सुशासन आणण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्यासुधारणांबाबतही आपले मत व्यक्त केले.
rakshatai.jpg प्रदर्शित करत आहे