Saturday, February 09, 2019
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणार
• ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन
• राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन
• खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत
नागपूर, दि. 9 : राज्यात खनिजउद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते तेथेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
उद्योग आणि खनिकर्म विभाग, ‘एमएसएमसी’, विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) यांच्या सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई, व्यवस्थापकीय संचालक एस. राममुर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालिवाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समुहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. ‘महासँड’ आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनीचित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, वनसंपदा आणि खनिज संपदेच्या बाबतीत विदर्भ समृध्द प्रदेश आहे. खनिजउद्योग क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून या परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधींसंदर्भात साकल्याने विचारमंथन होईल. खनिजपदार्थ उत्त्खननातून शासनाला महसूल प्राप्त होतो. महत्वाच्या खनिजातून मिळणाऱ्या महसूलात वाढ होण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक आणि संवर्धक असे खनिज उद्योग वाढले पाहिजेत यावर भर देण्यात येत आहेत. वनसंपदेला धोका पोहचू न देता खनिज उत्त्खनन करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उद्योगांसाठी कोळसा उपलब्ध करुन देवून यावर आधारित उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात आली असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टरलाही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीचे आव्हान पेलतांना खनिज क्षेत्रातील उद्योग यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतील. खनिज क्षेत्रातील उद्योगांनाही भरीव सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी सूचना द्याव्यात. त्यांचा नक्कीच सकारात्मतेने विचार करण्यात येईल. राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन करण्यात आले असून महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विदर्भात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य आहे. वन आधारित आणि खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष धोरण व सवलती देण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व भागांचा समतोल विकास साधण्याची आवश्यकता असून विदर्भात मॅगनिजवर आधारित उद्योग वाढीस मोठी संधी आहे. विदर्भातील बंद पडलेल्या कोळसा खाणी सुरु करुन तेथे कोळशापासून युरिया तसेच मिथेनॉल अशी इतर उत्पादने निर्मिती करण्याचे उद्योग उभारणीवर भर देण्याची आवश्यकता आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात सुरु करण्यात येणार आहेत. विदर्भातील कोळशाला त्याच्या दर्जानुसार भाव मिळाला पाहिजे, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासंदर्भात श्री. गडकरी म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे राज्याच्या वनक्षेत्रात वाढ झाली आहे. नालाखोलीकरणाच्या कामातून निघणारी माती व मुरुम यांचा उपयोग रस्ते उभारणीसाठी करण्यात येत आहे. बायोडिझेलवर विमानांचे उड्डाण यशस्वी करण्यात येत आहे. बांबूपासून इंधन निर्मितीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. विदर्भ हे आगामी काळात जैवइंधनाचे ‘हब’ म्हणून विकसित होवू शकते. उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत असून यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भातील खनिजक्षेत्रात उद्योग उभारणीची मोठी संधी असून विदर्भ खनिज समृध्द प्रदेश आहे. राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील उद्योग क्षेत्रात वाढ होत असल्याचेच हे सकारात्मक चिन्ह आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही क्रांतीकारक बदल होत आहे. फ्लायॲश संदर्भात स्वतंत्र धोरण असून फ्लायॲश क्लस्टरची उभारणी नागपूर व चंद्रपूर येथे होत आहे. कोळसा उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत असून खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे मुबलक वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिजसंपदा ही विदर्भाची बलस्थाने असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न कण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना आता अधिक सुविधा व सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मुल्यवर्धीत उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोळशाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्हयाच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण त्या जिल्हयांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असून विदर्भाचे या क्षेत्रात मोठे योगदान आहे. अर्थव्यवस्थेला आणि उद्योगक्षेत्राला चालना देणे गरजेचे आहेच परंतु त्याबरोबरच पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी असून खनिज उत्त्खननाबरोबरच पर्यावरणाचे जतन व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येत असल्याचे श्री. गवई यांनी सांगितले.
देवेंद्र पारेख म्हणाले, आपला देश विविध खनिज संपत्तीचे विपुल भांडार असून या क्षेत्रातील उद्योगांमध्ये वाढीच्या आणि विकासाच्या संधी आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मुल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेच आहे. ‘मिनकॉन’ कॉनक्लेव्हद्वारे खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांगिण विचारमंथन होईल, असेही श्री. पारेख यांनी सांगितले.
रिना सिन्हा, अतुल ताजपुरिया यांनी सुत्रसंचालन केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.
· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक
- - व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता - अश्विन मुदगल
- - उच्च न्यायालय येथे व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक
नागपूर, दि. 8 : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रासह प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून, मतदान करताना झालेल्या मतदानासंदर्भातील माहिती सात सेकंदापर्यंत प्रत्यक्ष पाहता येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून, केलेले मतदान सुरक्षित असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील सभागृहात मतदार जागृती अभियानांतर्गंत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीचे सादरीकरण व प्रात्यक्षिक बार असोशिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हायकोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲङ अनिल किलोर, तसेच बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन, प्रफुल्ल कुबाळकर, जयदीप चांदूरकर, मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, पुरुषोत्तम पाटील तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा तसेच बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.
निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर प्रारंभी केरळ राज्यातील पारावूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. त्याच्या उपयुक्ततेमुळे भारत निवडणूक आयोगाने ‘भेल’ व ‘इसीआयएल’ या शासनाच्या कंपन्यांमार्फत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या निर्मितीला सुरुवात केली असून, 15 मार्च 1989 पासून संपूर्ण राज्यात निवडणुकांमध्ये या यंत्रांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात या यंत्रासोबतच प्रथमच व्हीव्हीपॅटचासुद्धा वापर करण्यात येत आहे. ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत सुरक्षित असून, मतदानापूर्वी सर्व मशीनची तपासणी व मॉक पोल नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
मतदानासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन मतदानाच्या ४८ तासापूर्वी रॅडमायझेशन करुन पाठविण्यात येत असल्यामुळे मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मशीनची पूर्वकल्पना कुणालाही असूच शकत नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मॉक पोल घेण्यात येत असल्यामुळे आपले मतदान सुरक्षित आहे, याची ग्वाही या संपूर्ण प्रक्रियेमार्फत देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडल्या जाते. प्रत्यक्ष निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिंग एजंट, मायक्रो ऑब्झर्व्हर, वेब कॉस्टींग, सीसीटीव्ही, सेक्टर ऑफिसर तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रियेनंतर अत्यंत सुरक्षिततेतर्गंत स्ट्राँगरुममध्ये मतमोजणीपर्यंत सर्व मशीन ठेवण्यात येतात.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व शंकांचे समाधान केले असून, आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयात 37 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 30 याचिकांचा निकाल हा भारतीय निवडणूक आयोगाच्या बाजूने लागला आहे. तर 7 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राद्वारे होणारे मतदान अत्यंत सुरक्षित असल्यामुळेच संपूर्ण देशात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेबद्दल संभ्रम असल्यास तात्काळ आपले मत नोंदविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.
गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, आणि कर्नाटक या राज्यात झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा यशस्वी वापर करण्यात आला असून, देशभरात 5हजार 626 कोटी रुपये किमतीच्या 40 लाख युनिटचा वापर करण्यात आला आहे.
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे जनतेला मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 832 मतदान केंद्र असून, सर्वच मतदान केंद्रांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गंत जिल्ह्यातील आतापर्यंत 1 लाख 56 हजार 696 नागरिकांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदानाची माहिती घेतली आहे. ही जनजागृती मोहिमेतर्गंत चित्ररथासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी हायकोर्ट बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. तर ॲङ पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन झालेल्या मतदानाची माहिती यावेळी सर्व उपस्थितांनी घेतली.
आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात
नागपूर/प्रतिनिधी:
आदिवासी समाजाला पुरातन संस्कृतीसह शौर्याचा इतिहास लाभला आहे. बदलत्या युगात आदिवासी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र प्रगतीचे शिखर गाठताना आपल्या पुरातन संस्कृतीचे जतन होणेही आवश्यक आहे. आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्रयांना हा इतिहास अवगत व्हावा यासाठी आदिवासी महोत्सवाद्वारे संधी उपलब्ध करण्यात आली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार (ता. ८) आयोजित आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. मंचावर महोत्सवाचे उद्घाटक राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, महोत्सवाच्या आयोजक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आयोगाचे सदस्य हरीकृष्ण दामोद, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका रूतिका मसराम, गोंड राजमाता राजश्रीदेवी उईके, शिवाणी दाणी, दिगंबर चौहाण, श्री. पंजवानी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज आदिवासी समाजातील प्रतिभावंतांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केले आहे. या समाजाने इतिहासात केलेल्या शौर्याची महतीही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन महत्वाचे ठरते. प्रत्येक समाजबांधवाने आपली संस्कृती न विसरता या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय म्हणाले, देशासाठी बलिदानात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी आपले शौर्य पणाला लावणाऱ्या या महावीरांच्या कार्याला हवा तो सन्मान मिळू शकला नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना योग्य सन्मान मिळावा, लुप्त पडलेल्या इतिहासाचा अध्याय पुन्हा लिहीला जावा यासाठी राष्ट्रीय जनजाति आयोगाद्वारा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या व महोत्सवाच्या आयोजक माया इवनाते यांनी केले.
‘नागपुर का राजा’चे सादरीकरण शनिवारी
महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ५.३० वाजता ‘नागपुर का राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील.
Friday, February 08, 2019
मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला
Thursday, February 07, 2019
राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल
🔵 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची दखल
🔵 जुनी पेन्शन व शिक्षण हितार्थ एकीने लढण्याचे मिलिंद वानखेडे यांचे आवाहन
नागपूर - देशभरात जुन्या पेन्शनच्या मागणीचा आवाज सर्वदूर घुमत आहे. हा आवाज विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरने थेट राष्ट्रपतीं पर्यंत पोहोचविला. राष्ट्रपतींनी या निवेदनाची दखल घेतली असून संबंधित कार्यालयांना यात लक्ष घालण्याचे कळविले असल्याचे पत्र संघटनेला पाठविले आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपसी मतभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे संस्थापक मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.
राज्य सरकारने एक नोव्हेंबर 2005 पासून लागलेल्या कर्मचार्यांना 1982-84 ची पेन्शन योजना बंद केली. त्याऐवजी खासगी कंपनीच्या धोरणावर अवलंबून असलेली फसवी नवीन अंशदाय पेंशन योजना (DCPS /NPS) लागू केली आहे. या योजनेत कर्मचार्यांचे कुठलेही संरक्षण नसल्याने मृत्यू पश्चात किंवा निवृत्ती नंतर कुटुंबाची वाताहत करणारी हि योजना आहे. राज्यात आजमितीस 3500 कुटुंबावर हा डोंगर कोसळला असून त्यातून गोंडस पेन्शन योजनेचे दुष्परिणाम दिसून येत आहे. राज्यात अत्यंत आक्रमक पध्दतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मोठे आंदोलन सुरू आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे 27 सप्टेंबर 2018 रोजी थेट राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड व 80 पानाचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आले होते. या आंदोलनाची राष्ट्रपतींनी दखल घेतली असून या विषयावर गांभीर्यपूर्वक निर्णय घेण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजमितीस संपूर्ण देश एकवटला आहे. नवी दिल्ली येथे NMOPS च्या माध्यमातून अटेवा बंधू यांनी पाच लाख कर्मचार्यांच्या उपस्थित शंखनाद फुंकला आहे.
कर्मचारीवर्गाच्या हितार्थ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धाडस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखविले. मात्र राज्यातील राज्यकर्ते आताही केवळ अभ्यास करीत असल्याच्या थापा मारून कर्मचार्यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे No Pension - No Vote चा बिगुल फुंकला असून जुन्या पेन्शनसाठी वेगवेगळ्या मंचावर लढाई लढणा-या सर्व शासकीय कर्मचारी संघटनेने एकजुटीनं जुनी पेन्शनचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे माजी शिक्षण मंडळ सदस्य व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.
राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड पाठविण्याच्या आंदोलनात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र खंडाईत, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, गणेश उघडे, रविकांत गेडाम, समीर काळे, भिमराव शिंदेमेश्राम, संजय धरममाळी, सुरेश धारणे, राजु हारगुडे, गोंदिया जिल्हा संघटक बालकृष्ण बालपांडे, प्रणाली रंगारी, रिना टाले, आत्माराम बावनकुळे, राजु भस्मे, गौरीशंकर साठवणे, अरविंद घोडमारे, आशा कास्त्री,सारिका पैडलवार यांच्यासह शिक्षक, वनविभाग, ग्रामसेवक, टपालसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Wednesday, February 06, 2019
नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन
वाडीत सापडला युवकाचा मृतदेह
अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या ६ पोलिसांचे निलंबन
Tuesday, February 05, 2019
पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
नागपूर/प्रतिनिधी:
पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद;२८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
Monday, February 04, 2019
ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ७ फेब्रुवारीपासून
नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सप्तरंग क्रीडा मंडळ अव्वल
वाडी नगर परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धा अंतर्गत नागपूर जिल्हास्तरीय पुरुष गटातील कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागपूरातील नदंनवन मधील सप्तरंग क्रीडा मंडळाने अव्वल स्थान पटकावले .
स्पर्धेचे पंच म्हणून सचिन सूर्यवंशी,धनंजय चवळे,राजेश बालपांडे,अक्षय ठवकर,विजय- मसराम,नितीन खरे,राजू विश्वकर्मा यांनी जबाबदारी सांभाळली त्यांचाही सत्कार करण्यात आला .
प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत,संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे, आभारप्रदर्शन नगरसेवक केशव बांदरे यांनी केले.आयोजनासाठी जय क्रीडा मंडळ सोनेगाव व वाडी नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .
2 Attachments
ReplyForward
गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार
कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद
कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण
ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण करताना ना. बावनकुळे |
प्रत्येक खेळाडूंनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी
स्पर्धेचे पंच म्हणून सचिन सूर्यवंशी,धनंजय चवळे,राजेश बालपांडे,अक्षय ठवकर,विजय मसराम,नितीन खरे,राजू विश्वकर्मा हे जबाबदारी सांभाळत आहे.जिल्ह्यातील २६ संघांनी आजपर्यंत नोंदणी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत,संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे,तर आभार प्रदर्शन संदीप अढाऊ यांनी केले.