काव्यशिल्प Digital Media: गुन्हा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गुन्हा. Show all posts
Showing posts with label गुन्हा. Show all posts

Sunday, June 03, 2018

महिलेस विवस्त्र करून गुप्तांगाजवळ मारहाण

महिलेस विवस्त्र करून गुप्तांगाजवळ मारहाण

धक्कादायक बातमी.... वाचतानाही लाज वाटावी, अशी किळसवाणी घटना

श्रमिक एल्गारमुळे दाखल झाला दखलपात्र गुन्हा


लाथा मारून दरवाजा फोडल्या जाते, घरात दडलेल्या महिलेला ओढून रस्यााकवर आडवे पाडले जाते,  महिलेला भर रस्त्यात विवस्त्र केल्या जाते. बैलबंडीच्या उभारीने, तीच्या उघडया अंगावर, गुप्तांगाजवळ टोचून-टोचून मारले जाते, तीची विटंबना चालू असतांनाच, उपस्थितांना आरोपीकडून, ‘हिचा सिनेमा बघा, व्हिडीओ फोटो काढा…’ म्हणत पाणी टाकून परत मारले जाते, महिला बेशुध्द पडल्यानंतर, पोलिस पाटलांच्या मदतीने तीला पोलिस स्टेशनमध्ये नेले जाते, पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिस तीची तक्रार ‘अदखपात्र’ म्हणून नोंद घेतात. तीची घरी रवाणगी करतात.

ही घटना काही सिनेमातील किंवा बिहार-युपीची नाही तर, मूल तालुक्यातील येरगांव या गावात घडलेली आहे. पिडीत महिलेचा नवरा वेडसर असून, आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी पोलिस पाटीलांकडे त्यांनी धाव घेतली असता, त्यालाही जबर मारहाण करण्यात आली. पिडीत महिलेवर सध्या चंद्रपूरात खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

चिड आणणारी आणि अस्वस्थ् करणारी घटना श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा आणि सामाजीक कार्यकर्त्या ॲड. पारोमिता गोस्वामी यांनी उघडकीस आणली व या घटनेची दखल घेत, पोलिस अधिक्षकांना माहिती दिली. स्थानिक पत्रकारांसह येरगाव येथे जावून प्रत्यक्षदर्शीकडून घटनेची खातरजमा केली आणि मूल पोलिस स्टेशनमध्ये जावून, या प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यांची मागणी केल्यानंतर, जागा झालेल्या पोलिसांनी घटनेच्या तब्बल 7 दिवसानंतर आरोपीवर गुन्हे दाखल करून, त्यांना अटक केली.
येरगांव येथील प्रभाकर नागापूरे यांची पत्नी सौ. कुसूम हिचेसोबत पिडीत महिलेचा घरगुती कारणावरून दिनांक 27 मे रोजी भांडण झाले. या भांडणावरून चिडलेल्या प्रभाकरने आपला पुतण्या नवनाथ याला बोलावून पिडीतेच्या घरात दरवाजा तोडून घुसले व तेथूनच तीला विवस्त्र करीत रस्त्यावर आणले आणि हातात असलेल्या बैलबंडीच्या उभारीने तीच्या गुप्तांगाजवळ टोचणे सुरू केले. उपस्थित बघ्यानी तीला कुणी पाणी देवू नये, तीच्या अंगावर कपडा टाकू नये नाहीतर तुमचाही मर्डर करीन अशा धमक्या या आरोपीकडून दिले जात होते. भर उन्हात बेदम मारहाणीने ही महिला बेशुध्द पडली असता, परत आरोपींने तीचे अंगावर पाणी टाकून मारणे सुरू केले. यामुळे तीच्या गुप्तांगाजवळ, मांडीवरील रक्त गोठून मोठ-मोठे काळे डाग पडले. या घटनेची माहिती तीचे पतीने गावचे पोलिस पाटील यांना सांगीतली. पोलिस पाटीलांनी याबाबत मूल पोलिसांना कळवून, नंतर पोलिसांचे गाडीने तीला मूल पोलिस स्टेशनला नेण्यात आले. पोलिसांनी तीची तक्रार घेतली परंतू ती अदखलपात्र नोंदवून मेडिकल केले व घरी परत पाठविले.
गावात आरोपींची ऐवढी दहशत होती कि, कुणीही खुलेआम या घटनेवर बोलायला तयार नव्हते. या गंभीर घटनेची माहिती ॲङ पारोमिता गो्स्वामी यांना समजताच, त्यांनी गावात जावून सत्य परिस्थितीची माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांना देत, मूल पोलिस स्टेशनमध्ये जावून आरोपीवर कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी आरोपी प्रभाकर बंडू नागापूरे, नवनाथ सुधाकर नागापूरे, कुसूम प्रभाकर नागापूरे यांचे विरोधात अपराध क्रमांक 616/१८ कलम 354 (B), 452, 324, 506,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे.

Tuesday, February 13, 2018

आमदार बाळू धानोरकर यांचे सोबत ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल;वीज टॉवर उभारणी प्रकरण

आमदार बाळू धानोरकर यांचे सोबत ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल;वीज टॉवर उभारणी प्रकरण

चंद्रपूर:(ललित लांजेवार):
वीज टॉवर उभारणीचे काम करीत असलेल्या एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण करणारे वरोराचे शिवसेना आमदार बाळू  धानोरकर यांच्यासह ईतर ६ कार्यकर्त्यांवर राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
राजुरा आणि कोरपना तालुक्यात KEC ही कंपनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतात वीज टॉवर उभारत होते,याला शेतकऱ्यांनी कित्तेकदा विरोध केला मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा अशा २ राज्यातून येणा-या भल्या मोठ्या वीज टॉवर लाईन उभारल्या जात आहेत. हे काम करण्यासाठी हजारो हेक्टर उभ्या शेतजमिनीतुन पीक तुडवत काम सुरु आहे. हे काम कोणत्याही शेतक-याच्या मर्जीने कायद्यानुसार होत नाहीये.त्यामुळे चिडलेले शेतकरी यांनी हे वरोराचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे पोहचले.धानोरकर यांनी देखील अनेकदा सांगून न ऐकणाऱ्या कंपनीला हिंगा दाखवत कंपनीच्या एका व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला,कार्यकर्त्याने काठीने मारत आमदार धानोरकर यांनी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाच्या थोबाडीत लावली, या मारहाणीच्या विरोधात कंपनीच्या कर्मचारी अबुजकुमार सिंग रा.गडचांदूर याने राजुरा पोलिस स्टेशन येथे आमदार बाळू धानोरकर यांच्यासह ६ कार्यकर्त्यांन विरोधात कलम १८ ,१४३,१४७,१४८,३२३ अंतर्गत गुम्हा दाखल करण्यात आल आहे .