काव्यशिल्प Digital Media: Chandrapur

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label Chandrapur. Show all posts
Showing posts with label Chandrapur. Show all posts

Tuesday, December 11, 2018

तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकणे म्हणजे मोदींचा परतीच्या प्रवासाला सुरुवात:वडेट्टीवार

तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकणे म्हणजे मोदींचा परतीच्या प्रवासाला सुरुवात:वडेट्टीवार

नागपूर/प्रतिनिधी:

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यातील तिन राज्यांमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. या वेळी विरोधी पक्षांकडून भाजप पक्षावर सर्वत्र टीका सुरू आहे.अश्यातच ब्रह्मपुरी नगर परिषद वर काँग्रेसचा झेंडा फडकावणारे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींवर व भाजप सरकारवर टीका करत सच्चाई का बोलबाला झुटे कामुक आला म्हणत टिकास्‍त्र डागले आहे.

ते पुढे म्हणाले तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकणे म्हणजे मोदींच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची सरकार येणार असून राहुल गांधींची पंतप्रधान पदाकडे वाटचाल करण्याचे संकेत आहेत.

राज्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तिन्ही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत जनतेनी दिला ही राहुल गांधी यांनी केलेली प्रचंड मेहनत आहे. राहुल गांधी अध्यक्ष होऊन १ वर्ष पूर्ण झाला आणी काँग्रेसनी अनेक वर्षाच्या भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावला.याचाच अर्थ असा की, देशात मोदीचा करिश्मा संपला असून सच्चाई का बोलबाला झुटे का मूह काला याच म्हणीप्रमाणे केवळ खोट बोलून जनतेची दिशाभुल करून जनतेला ऐक वेळा फसवता येईल, पण वारंवार जनतेला फसवू शकत नाही, हे यावरून सिद्ध झाले आहे. देशातील जनता सत्तेचा माज, व उर्मट भाषेला बदलण्याचा राजकारणाला कदापीही सहन करत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे. असे आमदार विजय वडेट्टीवार विजय उत्सव साजरा करतांना म्हणाले यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा देत सर्व कार्यकर्ता पदाधिकारी व जनतेचे आभार मानले.

           
बिबट्याच्या हल्ल्यात बौद्ध भिक्खू जागीच ठार

बिबट्याच्या हल्ल्यात बौद्ध भिक्खू जागीच ठार

ललित लांजेवार /नागपुर:

चंद्रपुरात वन्य प्राण्यांचे हल्ले थांबण्याचं काही नाव घेत नाहीये 24 तास उलटले नाही त्यातच पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथून नजीकच असलेल्या संघरामगिरी-रामदेगी ला सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने साधना करत बसलेल्या बौद्ध भिक्खू वर हल्ला चढवला. यात बौद्ध भिख्खू राहुलबोधी यांना बिबट्याने फरफटत नेऊन ठार केले. दररोज प्रमाणे सकाळी तीन बौद्ध भिक्खू साधने करिता परिसरात बसले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने बौद्ध भिक्कूवर वर हल्ला चढविला. हल्ल्यात त्यांना जागीच जीव गमवावा लागला
घटनेची माहिती होतं परिसरात चांगलीच गोंधळ उडाला व दररोज घडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या माणसांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त करत व परिसरात वावरणाऱ्या प्राण्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा:डॉ कुणाल खेमनार

सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा:डॉ कुणाल खेमनार

सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
मानवाधिकाराचा उपयोग व्हावा : जिल्हाधिकारी
मानवाधिकाराच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांची  रॅली

 चंद्रपूर /प्रतिनिधी:
सामान्य माणसांविरुध होणारा अन्याय व या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यासोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. या मानवाधिकार आयोगाच्या कार्याबद्दल जनमानसामध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.

दरवर्षी 10 डिसेंबरला मानवाधिकार दिन साजरा केला जातो. मानवाधिकार दिनानिमित्त चंद्रपूर येथील जुबिली हायस्कूलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या आयोजनानंतर जुबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातील गांधी चौक पर्यंत रॅली काढून सामान्य जनतेला मानवाधिकार बद्दल माहिती दिली. एक विशेष रॅली काढली. या रॅलीमध्ये मानवाधिकाराच्या संदर्भातील नारे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मानवाधिकाराच्या संदर्भातील माहिती देणारे फलक आपल्या हातामध्ये घेतले होते. तसेच यासंदर्भातील माहिती देणा देणारे बॅचेस आपल्या गणवेषावर लावले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तत्पूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद मानवाधिकार आयोगामध्ये आहे. आपल्या देशामध्ये मानवाधिकाराचा प्रचंड आदर केला जातो. सगळ्या यंत्रणांमार्फत मानवाधिकार भंग होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाते. तथापि,कोणत्याही परिस्थितीत सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेबाबत माहिती दिली. 10 दिसेंबर 1948 रोजी मानवी अधिकार यांची घोषणा संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये करण्यात आली. सयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर संपूर्ण मानव जातीला चांगले आणि शांततामय जीवन जगता यावे, यासाठी 58 देशांनी मानवी हक्क प्रस्तावाला मान्यता दिली होती. भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा संमत होऊन 1993 रोजी मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. महाराष्ट्रात 6 मार्च 2001 मध्ये मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये जुबिली हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी मयुरी आलम हिने देखील मानवाधिकार संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मयुरी आलम व गौरव गोगे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. रॅलीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री दोरलीकर यांच्या नेतृत्वात जुबिली हायस्कूलचे व्ही एम तोडासे. श्रीमती खान, श्रीमती एस पी वाघमारे, एम. आर. भारसाकडे ,पी.सी कोटेवार, एम. डी. मोरे, एस .टी. बर्डे, ए. पी.सुरपाम,एच.पी. धनेवार,एस .डी. बोंडे,एस. यु. उरकुडे,पी.पी मुडेवार, कोमल वारदे, वैशाली परसोडकर, अभिजीत कृष्णापूरकर, गोविंद प्रसाद बनवाल आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन एम.आर. बारसाकडे यांनी केले.

Monday, December 10, 2018

चंद्रपुरात आमदार चषक दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 50 प्रेक्षक जखमी

चंद्रपुरात आमदार चषक दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 50 प्रेक्षक जखमी

ललित लांजेवार /नागपुर:

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आमदार चषक  दरम्यान  कबड्डी सामना सुरू असताना  लोखंडी कठडा  कोसळला व 50 हून अधिक प्रेक्षक या घटनेत जखमी झाले.जखमींवर राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.  याच दरम्यान संपूर्ण परिसरातील बत्ती गुल झाली.







<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/zx-RzTD4cNw" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe> 

Sunday, December 09, 2018

एचडीएफसी बॅंक शाखा बल्लारपूरच्या वतीने रक्तदान शिबीर

एचडीएफसी बॅंक शाखा बल्लारपूरच्या वतीने रक्तदान शिबीर



बल्लारपूर/अमोल जगताप:

 चंदनसिंह चंदेल अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची आज दि.७/१२/२०१८ रोज शुक्रवार ला तहसील कार्यालय बल्लारपुर व एचडीएफसी बैंक बल्लारपुर च्या संयुक्त वतीने आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमास अध्यक्षीय उपस्थिती लाभली.या प्रसंगी आदरणीय बाबुजी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलित करून शुभारंभ  केला मार्गदर्शन करतांना बाबुजी यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे.प्रत्येक मनुष्याने आपल्या जिवनात रक्तदान केले पाहिजे.रक्तदानाने कोणत्याही गरजुन्ना मदत होऊन तर लाभ होतो परंतु आपल्याला देखील आरोग्यात मोठा लाभ होतो. रक्तदान करण्यासाठी समाजातील प्रत्येक वरगांनी समोर येऊन यावर मोठी जनजागृती करत युवा पिढ़ीने वर्षातुन किमान दोन दा रक्तदान करावे असे मत व्यक्त केले.या प्रसंगी तहसीलदार श्री विकास अहिर व बैंक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Friday, December 07, 2018

चंद्रपुरात कॉंग्रेसला आठवले राम;चंद्रपूरच्या मंत्र्यांना सदबुद्धी देवो प्रभू श्रीराम

चंद्रपुरात कॉंग्रेसला आठवले राम;चंद्रपूरच्या मंत्र्यांना सदबुद्धी देवो प्रभू श्रीराम

चंद्रपूरचे आमदार झाले WANTED
नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूरात शहर कॉंग्रेस कमिटीने चंद्रपुरातील दोन मंत्र्यांना टार्गेट करत शुक्रवारी  १ दिवसीय सदबुद्धी देवो आंदोलन केले.शहरातील शासकीय रुग्णालय तथा महाविद्यालय समोर हे आंदोलन करण्यात आले. ज्यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना प्रभूश्रीराम सदबुद्धी देवो,अशी मागणी करण्यात आली ,या आंदोलन मंडपात प्रभू श्रीरामाचे मोठे फोटो लावण्यात आले होते.
कॉंग्रेसने मंत्र्यांना तर बुद्धीची माग्नित्र केलीच मात्र चंद्रपूरच्या आमदारालाही धारेवर घेतले,चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांना शहरातून WANTED  करत मोठा फोटा लावला.आपण यांना पाहिलत का ? अश्या आशयाचा  आमदार शामकुळे यांचा फोटो या कार्यक्रमाप्रसंगी लावण्यात आला.
चंद्रपूर शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाते. आता शहरात अमृत योजनेमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चंद्रपूरचे आमदार शहरात दिसतस नाही,मागील ०६ महिन्यापासून १५० नवजात बालकांचा मृत्यू  झाला याला जबाबदार कोण ? रुग्णांना मोफत औषधी मिळत नाही,याला जबाबदार कोण ? हफकिण नावाची कंपनी मर्यादा संपलेल्या औषधीचा पुरवठा करीत आहे. यावर कारवाई का नाही?  रुग्णालयात बेडचा तुटवडा आहे , डॉ. बी. डी. नाखले हे अधीक्षक आहे ते कायम स्वरूपी नाह, कंत्राटी कामगारांना मागील ०६ महिन्यापासून वेतन नाही, आ. सी. यू. मशीनची अवस्था बिकट आहे , डॉक्टरांचा तुटवडा, पुरेसा स्टाफ नाही. रुग्णांना फी चे दर जास्तीचे आकरण्यात येत आहे, त्याचा जबाबदार कोण? शासकीय रुग्णालयातले रुग्ण खासगी रुग्णालयात पाठवीत आहे, याचे दोषी कोण ? सी. टी. स्कॅन, एक्स – रे, सोनोग्राफी, चे दर सन २०१४ पेक्षा जास्ती आकरण्यात येत आहे. शासकीय महाविद्यालयाचे बांधकाम कधी सुरू होईल? जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या बांधकामात अनियमितता, भ्रष्ट्राचार, निकृष्ट दर्जाचे आहे. शस्त्रक्रियेची सामुग्री निकृष्ट दर्जाची आहे. जैनेरीक मेडिकल मध्ये आवश्यकते नुसार औषधीसाठा नाही. पार्किंग ची व्यवस्था नाही. खासगी रुग्ण वाहिकेच्या नावावर लूबाडणूक होत आहे. कुशल व अकुशल कंत्राटी कामगारांची निविदा झाल्यानंतरही कार्यवाही नाही. स्वच्छता नाही. भोजनाचा दर्जा बरोबर नाही. वार्डन पेशंट कडून पैसे  उखडल्या
जाते,  यावर कुणाचा अंकुश नाही.अश्या समस्यांचा पाढा ठेवत हे आंदोलन करण्यात आले होते.


या आंदोलनादरम्यान अनेक रुग्ण पेंडाल मध्ये येवून स्वताची आप बिती सांगत होते. वरील सर्व सुविधा त्वरित सुरू करण्यात आल्या नाही तर चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी तालाठोको आंदोलन करणार आहे.
यावेळी चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कामेटी अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढिया, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अँड. मलक शाकिर, देवराव पाटील धोटे, महिला शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल, असंघटित कामगार विभाग जिल्हा सरचिटणीस हरीदास लांडे, फारूक सिद्धक्की, शलिनी भगत, वंदना भागवत, बळीराज धोटे, संजय बुटले, शंकर बावणे, दीपक कटकोजवार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, मोहन डोंगरे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका संगीता भोयर, देवराव पाटील धोटे, घनश्याम वासेकर, राजू दास, विनायक साकरकर, राजू अवघडे, संजय गंपावार, विनोद नालमवार, हरीदास डाखरे, सुरेश आत्राम, मंगला मडावी, बंडोपंत तातावार, श्याम राजूरकर, राजा काझी, राजेंद्र आत्राम, विकास टिकेदार, कुमारस्वामी पोतलवार, रुचित दवे, नितिन नंदीग्रामवार, सुरेश दुर्षेलवार, अजय बल्की, गौतम गेडाम, पुंडलिक लांबट, विजय ठोबरे, वैभव बानकर, शशाकर हलदार, अजय खनके, युवराज दास, अरबाज खान, चन्दन अधिकारी, संजय राऊत, विशाल दास, मंगेश धोटे, ज्योशना रॉय, भारती दास, कविता मानेकर, संगीता मुळे, विना वांढरे, प्रीती कोठारकर, उज्वला रामटेके, रिंकू कोंडागुर्ला, रेणुका मंडल, वैशाली तडसे, शांता टेकाम, संगीता पेंदाम, चेतना भगत, उज्वला रमटेके, मंजूषा पाल, हेमंत अधिकारी, नावेद काझी, मुकेश सोनी, राणा पवार, वसंतराव रायपुरे आदि कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपुरात अस्वलीचा तांडव;आणखी एकावर हल्ला

चंद्रपुरात अस्वलीचा तांडव;आणखी एकावर हल्ला

चंद्रपूर/अमोल जगताप :                                           
                                                         
    हरवलेला बैल शोधण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीवर अस्वलीने पुन्हा एकदा हल्ला चढवीत गंभीर जखमी केले.आनंदराव इंदरशाई कुमरे वय ४५  मु.आंबेधानोरा जि.चंद्रपुर असे या जखमी इसमाचे नाव आहे.
आनंदराव कुमरे हे आपला हरवलेला बैल शोधण्यासाठी डोंगर हळदीच्या कंपार्टमेंट नं 516 मध्ये गेले होते. तितक्यात अस्वलीने त्यांचेवर हल्ला चढवला ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात येताच ते लागलीच मदतीला धावले. आणि भाऊरावांची हल्ल्याततुन सुटका केली.जखमीला गावकऱ्यांनी लगेचच रुग्ण वाहिकेने शासकीय रुग्णालयात चंद्रपूर येथे पाठवून करून जखमीवर त्वरीत उपचार सुरू केले आहेत.

मंगळवारी देखील सरपण गोळा करायला गेलेल्या गावकऱ्यावर जंगलात असलेल्या अस्वलीने हल्ला चढविला,या हल्ल्यात भाऊराव लक्ष्मण सामुसागडे मु.नवरगाव ता.सिंदेवाही जि.चंद्रपुर ह्या इसम गंभीररीत्या जखमी झाला.दिवसेंदिवस मानव व वन्यजीव संघर्ष वाढत जात आहे.पुढील कार्यवाही वनविभागाचे अधिकारी करीत आहे.

परसोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

परसोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

 चंद्रपुर/प्रतिनिधी:

 गोंडपिपरी तालुक्यातील येत असलेल्या परसोडी येथील अरिहंत बुद्ध विहार परसोडीच्या वतिने भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला आदरांजली वाहण्यात आली.
     सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बौद्ध समाज परसोडी चे अध्यक्ष विलास रायपुरे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बौद्ध उपासक व उपासिका यांचा विशेष सहभाग होता. उपस्थित लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सोनू चांदेकर ' वसंत चांदेकर ' रमेश गव्हारे ' बंडु मेश्राम ' धनपाल ताडे ' दत्तुजी रामटेक्के ' संजय नारनवरे' प्रशिक माऊलिकर' सिद्धार्थ मेश्राम' अरुण माऊलिकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्रिशरण-पंचशिल ग्रहण करुन सायंकाळी भीम ज्योत मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणुक अरिहंत बुद्ध विहारापासुण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा परसोडी इथपर्यंत काढण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे' अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी महिला वर्गानी गीत गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ह्यात सलोनी नारनवरे ' जयश्री रायपुरे ' दीक्षा गव्हारे ' मीनाक्शी अलोने ' चंद्रकला चांदेकर ' वैजंती ताडे ' पुश्पा मेश्राम यांची सहभाग होता. अतिशय शांततेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त आदरांजली कार्यक्रम पार पाडला.

दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारपूर द्वारा विविध ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न

दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारपूर द्वारा विविध ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न

चंद्रपुर/प्रतिनिधी:

लोककल्याण समाज सेवा केंद्र बल्लारपूर व दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद बल्लारपूर व पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या परवानगीने म्युझिकल डॉन्स व मॅसेज जाग्रुत कार्यक्रम सरकारी दवाखाना ' जुना बस स्टॅण्ड ' राजूरा बस स्टॉप' तीन नंबर नाका येथे कार्यक्रम सादर करण्यात आले. 
हा कार्यक्रम यशस्वी घडवून आणण्याकरिता फादर जोबिन (संचालक) लोक सम्राट संस्था बल्लारपूर सिस्टर्स जया संचालिका दिलासाग्राम सोबतच इतर कर्मचारी तसेच कलाभवन येथील विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नवीन उपक्रमाच्या माध्यमाने एच. आय. व्ही. एड्स बाबत जनजाग्रुती केली. या कार्यक्रमाला लोकांनी सुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच दिलासाग्राम संस्थेमार्फत राजूरा तालुक्यातील चुनाळा ' अहेरी येथे पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करण्यात आले. तसेच बल्लारपूर व पोंभुर्ना तालुक्यातील मानोरा ' आंबेधानोरा ' बोर्डा झूलूरवार ' दहेली येथे शालेय विद्यार्थी तसेच शिक्षकव्रुँद यांच्या सहकार्याने गावात एच.आय.व्ही. एड्स प्रतिबंध जाग्रुत रॉली काढून लोकांमध्ये जाग्रुता घडवून आणण्याचे कार्य केले.

सकल मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी

सकल मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी

तहसिलदार यांना निवेदन जिवती 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 आंदोलन सकल मुस्लिम समाज आरक्षण समिती जिवतीच्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी  तहसिलदर यांना निवेदन देण्यात आले आहे.5 डिसेंबरला जिवती भारतीय मुस्लिम आरक्षण समितिचे तालुका अध्यक्ष  जमालुद्दीन शेख यांचा नेतृत्व मध्ये मा.तहसिलदार मार्फत मा.मुख्यामंत्री साहेब (म.रा) निवेदन देण्यात आली .मुस्लिम समाजाला आरक्षण  मिळाली पाहिजे.आणि या मागन्याची दखल ना घेतल्यास  अन्यता तीव्र आंदोलन करण्यात  येईल असे  राज्य सरकार ला इशारा करण्यात येत आहे.

     देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत मुस्लिम समाज हा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला असून या समाजाची परिस्थिती दिवसेदिवस बिकट होत चालली आहे. मुस्लिमांची परिस्थिती बदलण्यासाठी व यातून पुढे आणण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक तसेच आथिर्क क्षेत्रात ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
 यावेळी उपस्थित,शब्बीर सैय्यद शेणगाव,महेबुब भाई शेख जिवती, आजगर भाई,रशीद भाई शेणगाव,हाकानी शेख शेणगाव,रशिद आली (नगरसेवक.न.प.जिवती)मुजाहीद भाई देशमुख,सलीम सैय्यद जिवती, सत्तार शेख जिवती ,शमसोद्दीन शेख,नजीर शेख,गफ्फार शेख,मुस्ताक शेख,जाफर कुरेशी दमपुंरमोहदा,जब्बार कुरेशी अकबर पठान,मतीन शेख,रहीम सैय्यद,नवाज शेख,शाहीद शेख,रफीक पठाण,छोटु शेख,मुन्ना शेख फारुक शेख तुळशीदास जाधव,रफीक कुरेशी ईस्माल कुरेशी वाहाब कुरेशी जैनुद्दीन कुरेशी वासीद कुरेशी,मीथुन बावगे,खाजा शेख आकबर शेख नीसार कुरेशी चाँद कुरेशी ताहेर कुरेशी जमील शेख शेणगाव मोठ्या सख्यांनी मुस्लिम  समाजबंधाव उपस्थित होते.

Thursday, December 06, 2018

चंद्रपुरात चारचाकी वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

चंद्रपुरात चारचाकी वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

ललित लांजेवार/

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंगाली कॅम्प बायपास बल्लारशाह मार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला चारचाकीची धडक बसताच  एका दहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली.
  अल्फिया फिरोज पठाण वय 10 वर्ष असे या मुलीचे नाव असून आई वडील एक बहीण आणि मृत अल्फिया हे एका नातेवाईकाच्या घरून परत घरी जात
असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाची धडक या दुचाकीला बसली, व त्याचा जागीच मृत्यू झाला.
चारचाकी वाहनाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वेग नियंत्रित होऊ शकला नाही व त्या गाडीला धडक बसली. यात पठाण परिवारातील तीन सदस्य हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन करीत आहे.

गोंडपिपरी C.M.चषक खो-खो स्पर्धेत सोनापूर देशपांडे संघ उपविजेता

गोंडपिपरी C.M.चषक खो-खो स्पर्धेत सोनापूर देशपांडे संघ उपविजेता

भविष्यात सोनापूर देशपांडे मध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण करु.- दिपक सातपुते सभापती पं.स.गोंडपिपरी
चुरशीच्या सामन्यात खराळपेठ संघाला विजेतेपद

चंद्रपूर/प्रतिनिधी :
राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी तालुक्यात आयोजित तीन दिवसीय C.M.चषक खो-खो स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या सोनापूर देशपांडे आणी खराळपेठ संघाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करीत खराळपेठ संघ विजेता तर सोनापूर देशपांडे उपविजेता ठरला.

गोंडपिपरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सोनापूर देशपांडे आणी खराळपेठ या दोन्ही गावांनी खो-खो स्पर्धेत दबदबा निर्माण केला असून चांगले खेळाडू निर्माण केले आहेत परंतु खेळाडूंची आर्थिक परिस्थिती,साहित्य,चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे कुठेतरी हे गावे देशासाठी दर्जेदार खेळाडू देण्यास अपयशी ठरत आहेत.परंतु C.M.चषकच्या आयोजनाचे क्रीडा क्षेत्रात आपलं करियर घडविण्याची संधी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील खेळाडूंना निर्माण झालेली आहे आणी येत्या काही वर्षात नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करेल यात काही शंका नाही.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात राजुरा विधानसभा ही C.M.चषक स्पर्धेत रेकार्डब्रेक खेळाडूंची नोंद करीत तब्बल चौथ्या क्रमांकवर पोहचली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 डिसेंबरला विराट मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 डिसेंबरला विराट मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक 7 डिसेबंर 2018 शुक्रवारला होणार्या शेतकर्यांचा विराट मोर्चा कोठारी पासुन  म.रा.वि.मं.कार्यालय बापूपेठ ,चंद्रपूर सकाळी 10 वाजतापासुन पैदल मार्च निघणार आहे.

     या मोर्चाच्या प्रमुख मांगण्या शेतीसाठी चोविस तास विद्युत मिळालीच पाहीजे .लोडशेडींग व अवाढव्य विद्युत दर कमी झालेच पाहीजे .क्रुषीपंपाना मोफत विद्युत मिळालीच पाहीजे.' चंद्रपूर जिल्हा लोडशेडींग मुक्त करण्यात यावा. 'बल्लारपूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा. 'शेतीयंत्र व शेतीसाधणांवरिल G. S. T.  कर त्वरीत रद्द करावा
    तसेच शेतकर्यांच्या विविध मुलभुत मांगण्याना घेऊन शेतकरी बांधवाचा विराट पैदल मार्च बिआरएसपी विदर्भ प्रदेश महासचिव राजुभाऊ झोडे यांच्या नेत्रुत्वात दि.7 डिसेबंर 2018 ला सकाळी 10 .00 वाजता कोठारीपासुन चंद्रपूर पर्यंत निघणार आहे .तरि सदर मोर्चास मोठ्या संख्येनी सामील होण्याचे आवाहन राजुभाऊ झोडेे यांनी शेतकरी बांधवाना केले आहे.
आदिवासी वसतिगृहात महापरिनिर्वाण दिवस साजरा

आदिवासी वसतिगृहात महापरिनिर्वाण दिवस साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 भारतरत्न  बाबासाहेब डॉ. बी आर आंबेडकर का 63 वा  महापरिनिर्वाण दिवस आज सर्वत्र जगात साजरा केला जात आहे..बाबासाहेबांचा निधन 6 डिसेम्बर 1956 मध्ये झाला। त्यांना वर्ष 1990 ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. बाबासाहेबांचा कार्य  न भूतो न भविष्यती असाच आहे  म्हणजे बाबासाहेबां सारखे कार्य करणारे व्यक्तिमत्व मूर्तिमंत प्रतिमा या जगात फक्त एकच महामानव भीमराव आंबेडकर..
 " माणुस मरण पावला तरी त्यांचे विचार जीवंत असला पाहिजे "
"मि सर्वात पहिले आणि सर्वात शेवटी भारतीय आहे "
देशाप्रति त्यांच योगदान बहुमूल्‍य आणि उल्‍लेखनीय आहे . बाबासाहेब असे व्‍यक्‍ति होते जो कि वेळेला महत्व देऊन वेळेचे पहिले चालत होते । सामाजिक समस्याना दूर करुन
 "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" त्यांचा द्वारे दिलेल्या शिक्षनाचा विचाराला आम्ही  स्मरण करतो।
त्यांचे प्रेणादायक विचारसरणी  व समानतेचा आधारित समाज व  विद्यार्थी निर्माण केल्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमी ऋणी आहोत .
आजचे दीवसाची ओचित्य साधुन माणसाला माणुसपन दखविणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉ भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेम्बर 2018 रोजी आदिवासी मुलांचे शास वस्तिगृह क्र 1 बालाजी वार्ड चंद्रपूर येथे  याविद्यार्थी प्रतिनिधि कंटू कोटनाके , सूरज निमसरकार, पकंज सिडाम पवारजी तसेच वस्तिगृहातिल सर्व विद्यार्थ्यांचा समवेत  महामानव बाबासाहेबानां 2 मिनटे मौन बाळगुण विनम्र अभिवादन देण्यात आला.

Saturday, December 01, 2018

 मागासवर्गीय युवकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा

मागासवर्गीय युवकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा

Image result for मागासवर्गीय युवकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठाचंद्रपूर/प्रतिनिधी:
इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील युवकांना मोठया प्रमाणात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्यात यावा म्हणून 25 हजार रुपयापर्यंत 2 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओ.बी.सी.प्रवर्गातील युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतुक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय, तांत्रीक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून 20 टक्के बिज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा मिळवून देण्यात येणार आहे. 

तसेच किरकोळ व्यवसाय अथवा अन्य तांत्रीक लघु सेवा उद्योग सुरु करण्यासाठी महामंडळामार्फत 25 हजार रुपयापर्यंत 2 टक्के व्याज दराने थेट कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 3 वर्षपर्यंत असणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक व युवतींनी मोठया संख्येने घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
पर्यावरणाच्या संतुलनासाठी शेतकऱ्यांना ८ तास वीज : विश्वास पाठक

पर्यावरणाच्या संतुलनासाठी शेतकऱ्यांना ८ तास वीज : विश्वास पाठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू असला तरी शेतकऱ्यांना कृषी पंपाना 8 तास वीज पुरवठा केला जातो, याचा अर्थ 16 तास भारनियमन नाही. 16 तास भारनियमन आहे हा गैरसमज पसरविण्यात येत आहे, अशी माहिती मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री विश्वास पाठक यांनी चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. श्री पाठक यांची ही 27 वी पत्रपरिषद होती. सध्या त्यांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे.

याप्रसंगी बोलताना श्री पाठक म्हणाले- मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागाला 4 वर्षे पूर्णे झाली आहेत. या चार वर्षात ऊर्जा विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती पत्रकारांसमोर ठेवताRना पाठक म्हणाले-वीज ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा कशा करता येतील, ऊर्जा विभागाच्या कामे आणि योजनाची वस्तुस्थिती ग्राहकांसमोर ठेवणे हा या संवादाचा उद्देश आहे.

विजेच्या सर्व समस्या सुटल्या असा कोणताच आमचा दावा नाही. अजूनही बरीच कामे आणि सुधारणा करण्यास वाव आहे. पण 4 वर्षात झालेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवणे आवश्यक होते.

राज्यात भारनियमन नाही असा दावा करताना श्री पाठक म्हणाले- ज्या ठिकाणी वीज खंडित असेल ते भारनियमन नाही, तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित असतो, याकडेही पाठक यांनी लक्ष वेधले.

या संवादा दरम्यान श्री पाठक यांनी HVDS, मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी, कोळसा पुरवठा, पारेषणचे जाळे, शेतकऱ्यांना 4 वर्षात 5 लाख कृषीपंपाना कनेक्शन, भूमिगत वाहिन्या आदी विषयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.22 ऑक्टोबर रोजी 24962 मेगावॅट इतकी उच्च मागणी असताना, सक्षम व मजबूत पारेषन जाळ्यामुळे व करण्यात आलेल्या विविध संचलन व सुव्यवस्थेच्या कामामुळे व आधुनिकीकरणामुळे , या दिवशी 20हजार 630 मेगावॅट वीज पुरवठा विना व्यत्यय करता आला असे ते या प्रसंगी म्हणाले.
बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट साठी 25 सीटर बस होणार उपलब्‍ध

बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट साठी 25 सीटर बस होणार उपलब्‍ध

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभारंभ सोहळयात दिलेला शब्‍द केला पूर्ण
Image result for 25 seaters busचंद्रपूर/प्रतिनिधी:
बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट या संस्‍थेच्‍या उदघाटन समारंभात अर्थ व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर युनिटला भेट देण्‍यास येणा-या लोकांसाठी, संशोधकांच्‍या प्रवासासाठी तसेच महिला कामगारांची ने-आण करण्‍यासाठी 25 सीटर बस बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्‍ली या संस्‍थेला उपलब्‍ध करून देण्‍याचे आश्‍वासन दिले होते.
सदर आश्‍वासनाची पूर्तता झालेली असून बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्‍ली या संस्‍थेला आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 25 सीटर बस उपलब्‍ध करण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून मान्‍यता देण्‍यात आली आहे. नियोजन विभागाने दिनांक 29 नोव्‍हेंबर 2018 रोजी च्‍या पत्रान्‍वये जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांना तत्‍संबंधाने सुचना दिल्‍या आहेत. दिनांक 14 सप्‍टेंबर 2018 रोजी विसापूर येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट चा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला होता. या शुभारंभ सोहळयात वनमंत्र्यांनी दिलेल्‍या आश्‍वासनाची पूर्तता झाली असून विशेषतः महिला कारागीरांमध्‍ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Friday, November 30, 2018

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये: मुरलीधरजी महाराज

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये: मुरलीधरजी महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये .एकदा रागाच्या भरात माणसाचा मनावरचा संयम सुटला तर त्यामुळे खूप दुष्परिणाम भोगावे लागतात. क्रोध जेव्हा येतो माणसाला त्यावेळेस शांत राहून काम केल्यास ते काम यशस्वी होऊ शकते. क्रोधात केलेले काम कधीही यशस्वी होत नाही. असे प्रतिपादन श्री राम कथा वाचक मुरलीधर जी महाराज यांनी चांदा क्लब येथे आयोजित श्री रामकथा महोत्सवाच्या सातव्या दिवशी केले.

पूज्य मुरलीधर जी महाराज यांच्या हस्ते महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, निर्दोष बाबू पुगलिया विश्व हिंदू परिषदचे रमेशजी बागला, सचिन तिवारी,ललित व्यास,अनुप काबरा, यांचा सन्मान करण्यात आला.

Thursday, November 29, 2018

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

 वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील:सुधीर मुनगंटीवार

            मुंबई/प्रातिनिधी:
वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


            अलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने        13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तीला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात‍ आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वा‍घिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही.

त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली.

            वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत. असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीमती यशोमती ठाकूर,  प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला
मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे:मुरलीधरजी महाराज

मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे:मुरलीधरजी महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:

हातातील अंगठीच्या खड्यावर अवलंबून न राहता आपल्या हाताने केलेल्या कर्माच्या भरोवश्यावर मनुष्य आपले  भविष्य बदलू शकते.मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्मावर अवलंबुन आहे. पण काही लोक त्यास रंगीत खड्यात शोधतात.राम कथेच्या पाचव्या दिवसाच्या प्रवचन पुष्प गुंफतांना पूज्य मुरलीधरजी महाराजांनी सांगितले.
रामकथेच्या पाचव्या दिवशी सत्यनारायण तिवारी परीवार तर्फे श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पुजन कऱण्यात आले
श्री मुरलीधर जी महाराज पुढे म्हणाले की, या जगात भजन करणे जरुरी आहे,भजना द्वारे वैराग्य मिळवता येते.या प्रसंगी CA दामोदर सारडा,मधुसूदन रुंगठा, रमेश मुंदडा, विनोद उपाध्याय, सुरेश शर्मा,जुगलकिशोर राठी, काजु जोशी,गोपिकीशन पोद्दार, नितीन सोमाणी, सुभाष जैन,इंदर बियाणी, यांचा महाराजांनी सम्मान केला.
रामकथेच्या यशस्वीतेसाठी वेगवेगळ्या समितीचे गठन करण्यात आले आहे,अशी माहिती सुरेश राठी यांनीं दिली.

आज सामुहिक सुंदर कांड पठण
चांदा क्लब ग्राउंड वर स्थापीत अयोध्या धाम येथे गुरुवारी रात्री 9 वाजता सामुहिक सुंदर कांड पठण चे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम चरित्र मानस प्रेमी तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.