काव्यशिल्प Digital Media: सांस्कृतिक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सांस्कृतिक. Show all posts
Showing posts with label सांस्कृतिक. Show all posts

Saturday, November 11, 2017

 उद्या जिल्हास्तरीय समूह रेला नृत्य स्पर्धा

उद्या जिल्हास्तरीय समूह रेला नृत्य स्पर्धा

गडचिरोली प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल असून, आदिवासींची स्वतंत्र संस्कृती आहे. या संस्कृतीला उभारी देऊन आदिवासींच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी पोलिस विभागामार्फत जिल्हा वर्धापन दिनापासून पारंपरिक समूह नृत्य(रेला) व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत रेला समूह नृत्य स्पर्धेची जिल्हास्तरीय अंतिम फेरी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आदिवासी नृत्याची मोठी परंपरा आहे. यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याविष्कार होतात. परंतु त्यांना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ मिळत नाही. आदिवासींना चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन पारंपरिक नृत्यप्रकार समृद्ध व्हावा, या हेतूने गडचिरोली पोलिस दलातर्फे यावर्षीपासून नृत्य व क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत पोलिस ठाणे/उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्र स्तर व उपविभाग स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. आता जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धा होणार आहे.
उपविभाग स्तरावर विजेत्या ठरलेल्या संघालाच जिल्हास्तरीय स्पर्धेत संधी मिळणार आहे. ही अंतिम फेरी रविवारी १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय अंतिम फेरीतील प्रथम विजेत्यास संघास २५ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास २० हजार रुपये व तृतीय बक्षीस १५ हजार रुपये देण्यात येणार आहे. नियोजित वेळी पात्र संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच नागरिकांनी समूह नृत्य स्पर्धेच्या मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.