१२ वी नापास अन डॉक्टर
चंद्रपूर/प्रतिनिधी:


खुशाल रामदास खेरा असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. मनपाला प्राप्त झाल्या तक्रारीची दखल घेत मनपाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकासह शहरात धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी खेरा हॉस्पिटल श्यामनगर, बंगाली कॅम्प येथे सायंकाळी भेट दिली. तेथे खुशाल रामदास खेरा नावाचा व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना दिसून आला.दवाखान्याच्या बाहेर बोर्डवर डॉ. के. आर. खेरा, (बि.ए.एम.एस. (एमडी) ), मुंबई या पदव्यांचा उल्लेख आढळून आला.
महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांकडे वैद्यकीय व्यावसायिकाने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.मात्र दवाखान्यात चौकशी केली असता व्यावसायिक जागेत आयुर्वेदिक औषधीचा वापर तसेच रुग्णांची तपासणी करीत असताना हा डॉक्टर आढळून आला. मात्र त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी वा नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले नाही. सदर कारवाई मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अंजली आंबटकर, डॉ. जयश्री वाडे, सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, औषधी निरीक्षक श्रीकांत फुले यांनी केली.
विशेष म्हणजे सदर बोगस डॉक्टर हा १२ वी पास नसल्याचे आढळून आले.चौकशी दरम्यान सदर व्यवसायिक आयुर्वेदिक औषधीचा वैद्यकीय व्यवसाय करतो, असे आढळून आले. चौकशीत दवाखान्यात आयुर्वेदिक औषधेही आढळून आली. रामनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून खेरा याला अटक करण्यात आली होती.
