काव्यशिल्प Digital Media: सरकार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सरकार. Show all posts
Showing posts with label सरकार. Show all posts

Sunday, December 10, 2017

 ‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे देऊ

‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे देऊ

नागपूर : एकीकडे विरोधी पक्षांनी ‘हल्लाबोल’ यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात पवित्रा घेतला असताना सत्ताधारीदेखील त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे. ‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील. शेतकºयांच्या स्थितीला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेतच यातून मिळाले आहेत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आघाडीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील कामे आणि आम्ही ३ वर्षांत केलेली कामे यांचा लेखाजोखाच सभागृहात मांडू. विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने होत आहे. या संदर्भात आणखी अनेक जणांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या ‘जीडीपी’ची वाढ इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असून पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने कर्ज घेतले आहे. सरकार विकासकामांना कात्री लावणार नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची काळजी विरोधकांनी करू नये, असा टोलादेखील मुख्यमंत्र्यांनी लगावला.
कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची तालुकानिहाय नावे जाहीर करण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कर्जमाफी पारदर्शक पद्धतीनेच झाली. शेवटच्या पात्र शेतकºयाची कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया चालविण्यात येईल. तसेच पात्र असूनदेखील अर्ज न करू शकलेल्या शेतकºयांनादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून जवळपास ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत  धान, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची आवक वाढली आहे. हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके प्रस्तावित असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 


Monday, November 06, 2017

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका


कोल्हापूर / प्रतिनिधी : ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील आता समजतं नाही.’ अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. *शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असं म्हणत सरकारचं कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.* ‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.