काव्यशिल्प Digital Media: भद्रावती

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label भद्रावती. Show all posts
Showing posts with label भद्रावती. Show all posts

Tuesday, October 23, 2018

Saturday, February 10, 2018

अबब...800 किलो वजनाचा विदर्भातील सर्वात मोठा त्रिशूल

अबब...800 किलो वजनाचा विदर्भातील सर्वात मोठा त्रिशूल

विदर्भातील सर्वात मोठा त्रिशूल 
भद्रावती/प्रतीनिधी:
Image may contain: one or more people and outdoor
   वरोरा येथील नमो फेब्रिकेशनचे  मालक मनोज समर्थ यांनी 40 फूट लांब असलेला त्रिशूल बनविला आहे. त्रिशूलाचे वजन लगबग 800 किलो असून हा त्रिशूल बनविण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला असून साधारण एक लाख रुपयांचा खर्च लागला. ६० ते ७० शिवभक्तांनी त्रिशूल उचलून पारंपरिक पद्धतीने महादेवाचा पोहा म्हणत त्रिशूलाची मिरवनूक काढण्यात आली. सतीश पिंपळकर रहाणार भद्रावती या शिवभक्तांनी हा त्रिशूल तयार करण्यासाठी वरोरा येथे नमो फेब्रिकेशन वरोरा येथे हे काम दिलेले होते. हा त्रिशूल ट्रॅक्टर द्वारे भद्रावती येथे नेण्यात आला. येणाऱ्या १३/२/२०१८ ला शिवरात्रीच्या दिवशी हा त्रिशूल झाडे प्लाट, लंगडा मारुती येथे विधिवत पूजा अर्चना करून  उभारण्यात येणार आहे. यावर्षीचा हा विदर्भातील सगळ्यात वजनी आणि लांब त्रिशूल असून शिवभक्तांमध्ये याची सर्वत्र चर्चा आहे.




Wednesday, February 07, 2018

अस्वलीच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू: तर प्रतीउत्तरात अस्वलीचा मृत्यू

अस्वलीच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू: तर प्रतीउत्तरात अस्वलीचा मृत्यू

भद्रावती/प्रतिनिधी: 
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणी करत असतांना दबा धरून बसलेल्या अस्वलीने बांबू कापणी करणाऱ्या मजुरावर हल्ला चढविला यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन मजूर गंभीर रित्या जखमी झाले आहे.हि घटना बुधवारी दुपारच्या  सुमारास घडली.  यात मजुरांनी अस्वलीपासून स्वरक्षण करतांना प्रतीउत्तारात त्या अस्वलीचा मृत्यू झाला. 
भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणीचे काम सुरु होते त्यासाठी मध्यप्रदेशातून बांबू कापणीसाठी मजूर वर्ग चंद्रपूर जिल्ह्यात आले होते.सकाळच्या सुमारास कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कटाईचे काम सुरु असतांना लपून बसलेल्या अस्वलीने हल्ला केला यात धरमसिंग टेकाम ( रा. बालाघाट ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रेमलाल सयाम आणि संबल सिंग नामक २ मजूर गंभीर जखमी आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मजुरांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात अस्वल ठार झाले.





Saturday, January 20, 2018

भद्रावती पत्रकार संघा तर्फे आंतर महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे आयोजन

भद्रावती पत्रकार संघा तर्फे आंतर महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे आयोजन

भद्रावती/वरोरा ( प्रतिनिधी)  भद्रावती पत्रकार संघ भद्रावती च्या वतीने दि. २२ जानेवारी ला सायंकाळी ६ वाजता सोनल टॉकीज शिंदे महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन सांघिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    या नृत्य स्पर्धेचे उदघाटन आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडेल. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप ठेंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, इंटक चे वेकोली कामगार नेते धनंजय गुंडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, तहसीलदार महेश शितोळे, पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, मुख्यधीकारी विनोद जाधव, डॉ विवेक शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, मराविविकं चे उपविभागीय अभियंता सचिन बदखल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. वाणिज्य भाषा अभ्यासक्रम मंडळ गोंडवाना विद्यापीठातील निवडणुकीत विजय संपादित केल्याबद्दल पत्रकार संघाचे सल्लागार डॉ यशवंत घुमे यांचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर शहरातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांघिक नृत्य स्पर्धा होईल. होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे सचिव सचिव सुनील बीपटे यांनी केले आहे.

Monday, January 15, 2018

तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार:दोन आरोपीना अटक

तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार:दोन आरोपीना अटक

पैश्याचे आमिष दाखवून केला अत्याचार 
भद्रावती/प्रतिनिधी: 
ps-bhadrawati-1000-940x431भद्रावती तालुक्यातील विसापूर येतील तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना  संक्रांतीच्या दिवशी उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
                           भद्रावती तालुक्यातील लालाजी तुकाराम पिंपळे वय (50) व अशोक हनवते अशी आरोपींची नावे असून यांनी गावातील अकरा वर्षीय दोन अल्पवयींन मुलींवर गेल्या चार दिवसापूर्वी अत्याचार केले तर दुसऱ्या  आरोपींनी या दोन अल्पवयीन मुली सोबत पैश्याचे लालच दाखवून आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचे  पीडित मुली आपल्या वडिलांना सांगितली. पालकांनी हा संपूर्ण घडलेला प्रकार पोलिसांना सांगत आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली,  हा संपूर्ण प्रकार पीडित मुलींचे पोट दुखत असल्याने त्यांनी आपल्या पाल्यांना सांगितले, पालकांनी नेमके काय झाले अशी विचारणा मुलीच्या पालकांनी केली असता तिने आपल्यासोबत आणि आपल्या मैत्रिणींसोबत काही लोकांनी मिळून अत्याचार केला असल्याची बाब सांगितली, हा संपूर्ण प्रकार चार दिवस अगोदर घडल्याचे सांगितल्या जात आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांनी दाखल केली असून आरोपींना अटक करत आरोपीं सुरज अशोक हनवते रा. विसापूर याच्यावर अप क्र. ००४५/१८ क ३७६ (२)(I)(J), ५०६ भा.द.वि ६ बाल लैंगिक अ.प्र.का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या प्रकरणातील आरोपी लालाजी तुकाराम पिंपळे यांचेवर पोलिसांनी अप.क्रमांक ००४४/१८ कलम ३७६ (२)(I)(J)५०६ भा.द.वि ६ बा.लै.अ.प्र.का ३ (१)(W)(II),३(२)(V)३ (२)(VA) ३ (२) (५)  अ.जा.ज अ प्र.का २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अप्पर  पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Friday, December 01, 2017

४५ फूट उंच कोळशाचा ढिगारा कोसळला:सहा कामगार गंभीर जखमी

४५ फूट उंच कोळशाचा ढिगारा कोसळला:सहा कामगार गंभीर जखमी

भद्रावती/प्रतिनिधी :
 गेल्या शुक्रवारी वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर चा जागीच मृत्यू झाल्याची घटना  ताजी असतांनाच  माजरी  कुनाडा खुल्या कोळसा खाणीत आणखी आठवडा भरानंतर कोळशाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने सहा कामगार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या ढिगाऱ्यात  8 वोल्वो टिप्पर, 2 ड्रिल मशीन, पीसी मशीन 4 व एक सर्व्हिसिंग गाडी दबली असल्याची माहिती मिळत आहे 
सोबतच जवळपास ६ कामगार  ढिगाऱ्या खाली अडकल्याची शक्यता आहे. शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जवळपास अर्धा किलोमीटर अंतराचा मातीचा ढिगारा कोसळला. या विस्तीर्ण ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक कामगारांपैकी फक्त तिघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्रीच नागपूरला हलविण्यात आले.चार दिवसापूर्वीही तेलवासा खाणीत  अशीच अशीच घटना घडली होती.   यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले.   यानंतर  वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिकाऱ्याना  खाण बंद करण्याचे आदेश दिले होते व ती खान देखील बंद करण्यात आली होती 



Thursday, November 30, 2017

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

*चंद्रपूर-नागपूर महामार्गा बाजूचे सर्विस रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत.

*लवकरच कारवाईला सुरूवात

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :भद्रावती
नगरपरिषद क्षेत्रातील चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या ले-आऊट मधील सर्विस रोडवर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मुख्याधिका-यांनी अतिक्रमणधारकांना नोटिस बजावल्या आहेत. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
                  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये तथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1966 अन्वये सदर नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.
                 सदर नोटिस प्राप्त होताच सात दिवसाचे आंत कच्चे-पक्के अतिक्रमण काढुन सर्व्हिस रोड मोकळा करुन दयावा, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता, नगरपरिषदद्वारा अतिक्रमण काढुन घेण्यात येईल. या कार्यवाहीत झालेल्या नुकसानीची व तुटफुटीची जवाबदारी अतिक्रमणधारकांची असेल, व कारवाईसाठी लागणारा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल, असे नोटिसमधे नमूद केलेले आहे.
                  नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण फार जुने आहे. सदर अतिक्रमण कायमस्वरुपी हटल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल. अपघातांची शक्यता कमी होणार आहे. महामार्गाच्या बाजुच्या संताजी नगर, गुरुनगर, कुणबी सोसायटी, गौतमनगर ही ले-आऊट अतिक्रमणापासून मोकळी होतील. अतिक्रमणामुळे होणारे उपद्रव कमी होतील. पानठेले, खर्रा विक्री केन्द्र, बंद होतील. अवैध दारुविक्रीला आळा बसेल. रोडरोमीओंची संख्या कमी होईल. पैदल चालणा-यांना सुरक्षा मिळेल. महामार्गाशेजारची गर्दी व वर्दळ कमी होईल. शहर महामार्गाला लागुन असल्यामुळे शहराची ओळख बदलून महामार्गाने जाणा-यांचा शहराकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण बदलेल.
                प्रभु गॅरेज ते पंचशील नगर, वांढरे फ्रुट्स स्टॉल ते होटल पैराडाईज, कोंबे यांचे घर ते बस स्टॉप पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड मोकळा होण्यासाठी भद्रावतीकर वाट बघत आहे व नगरपरिषदेकडुन मोठी अपेक्षा लावुन बसले आहे. आता नगरपरिषदेच्या या निर्णयात कोणता अडथळा येवुन, अतिक्रमण हटविण्याचे काम थांबू नये, असे नागरीकांचे म्हणने आहे.
----------------------------------------
नगरपरिषदेने कोणतेही हितसंबंध न जोपासता, लहान-मोठे व्यवसायिक न बघता सगड्या अतिक्रमणधारकांना नोटिस पाठवुन न.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर अतिक्रमण हटवून सर्व्हिस रोड मोकळे करावे. -

मुश्ताक अली, व्यवसायिक, भद्रावती।

Friday, November 24, 2017

वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार

वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार

           नगरपालिका व वनविभागाने घेतली दखल         

पंतप्रधान नरेन्द्र मोदींपर्यंत जाणार माहिती
वरोरा/भद्रावती (प्रतिनीधी) :
             साऊंडसिस्टममधे वाघ व कुत्रा या प्राण्यांचे आवाज वाजवून वन्यजीवांच्या हैदोसापासुन शेतीचे नुकसान टाळण्यासाठी विठ्ठल विधाते यांनी केलेल्या युक्तीची दखल भद्रावती नगरपालीका व वनविभागाने घेतली आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी महेशकर मैडम, क्रुषी अधिकारी ढवस यांनी विठ्ठलाचे कौतुक केले. विठ्ठलच्या या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असतांनाच नगरपरिषद प्रशासन व रोजंदारी कर्मचारी संघटना द्वारा सत्कार करण्यात आला.
             मांगली(रै) येथील विठ्ठल विधाते यांनी त्यांच्या शेतात केलेल्या उपक्रमाची माहिती नुकत्याच जिल्ह्याच्या भेटीवर आलेले जेष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी त्यांची स्तुती केली व शासनाकडे विषय पोहोचवून सदर पॅटर्न कसा राबवता येईल याकरिता पाठ पुरावा करण्याची हमी दिली.
             विठ्ठल विधाते हा मांगली (रै.) या गावचा रहिवासी असून येथील नगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी आहे. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचे उदरभरण करणे कठिण जात असल्यामुळे विठ्ठलने नवरगांव (बिट) येथे चार एकर शेती ठेक्याने घेवुन शेतीव्यवसायाला सुरवात तर केली मात्र हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असल्याने जंगली डुक्कर, रोही, नीलगाय, हरण, कोल्हे, लांडगे, आदि जनावरांच्या हैदोसाचा रात्रीच्या वेळेस त्रास होवु लागला. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी विठ्ठलने घरीच असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग केला. मोबाईलच्या जमान्यात आऊटडेटेड झालेल्या डेकला (साऊंड सिस्टम) पेनड्राईव्ह लावुन शेतात आणले. साऊंडबौक्सला पावसापासुन वाचविण्यासाठी टिनाच्या पिप्यात ठेवले. ईंटरनेटमधुन वाघ व कुत्रा या प्राण्यांचे आवाज डाऊनलोड करून पेनड्राईव्हमधे सेव्ह केले व   रोज रात्री मोठ्या आवाजात वाजवायला सुरवात केली. या आवाजाने भयभीत होवुन जंगली प्राणी शेतात यायला घाबरु लागले व पर्यायाने शेतपीक व वन्यप्राणी दोहोंचे संरक्षण झाले.
       विठ्ठलच्या या युक्तीने शेतक-यांसमोर आदर्श निर्माण झाला. वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी महेशकर व वनविभागाचे अधिकारी तथा अनेकांनी प्रत्यक्षात शेतात जावुन पाहणी केली व विठ्ठलच्या या युक्तीचे कौतुक होवु लागले. विठ्ठलच्या या उपक्रमाची माहिती वनविभाग व नगरपालिका पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचवणार आहे.
           विठ्ठलसारखे शेतकरी गांव व शेतीप्रगतीस चालना देतात, असे गौरवोदगार ना. शरद पवार यांनी काढले.
         माजी आमदार साळुंखे गुरुजी यांनी सदर विषयाचं महत्त्व ना. पवार यांचेपर्यंत आधीच पोहोचविले होते. पवार साहेबांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. व सदर विषयाची दखल घेतली. यावेळी राजेन्द्र वैद्य उपस्थित होते.

Thursday, November 23, 2017

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात  चार जण वनविभागाच्या ताब्यात

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात चार जण वनविभागाच्या ताब्यात


भद्रावती/वरोरा (प्रतिनिधी) :  वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सलोरी येथील कक्ष ९२९ परिसरातून काही इसमानी जंगलात पहाटे दोन च्या सुमराज जाळे लावले होते जाळयात वन्यप्राणी अडकविण्याच्या प्रयत्नात असतांना यावेळी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालीत असतांना हा प्रकार लक्षात आल्याने वन्यप्राण्यांची शिकार झाली नाही पाहिजे या आशेने त्या कक्ष परिसरात कसून शोध घेतला तर जंगलात जाळे लावून चार व्यक्ती बसून असलेले आढळले. यामध्ये विनोद मगरे(२६), निकेश पाटील(२७), शैलेश पाटील(३०), शंकर रंडई(५०) रा. सलोरी असे आरोपींची नावे असून यांच्या कडून भाले, जाळे ताब्यात घेतले . त्यांच्यावर कलम १९७२ भारतीय वन्यजीव अधिनियम ०२ सप्टेंबर १९५१ नुसार कारवाही करून ताब्यात घेतले. ही कारवाही वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार   यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एम. एम. लांडे, वनकर्मचारी एन. एल. सिडाम यांनी केली

इम्रान खान यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

इम्रान खान यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :

भद्रावती शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टिचे युवा नेतृत्त्व इम्रान अफजल रफीक खान यांची भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, वित्त, वने आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे यांनी सदर नियुक्ती केलेली आहे.

Tuesday, November 21, 2017

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी) :  मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणु कीपूर्वी व निवडणूकी नंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षनाची अमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊनही त्यांची अजूनपर्यंत पूर्तता केली नाही. याउलट TISS ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ  सोशल सायन्सेस)  या संस्थेकडून सर्व्हेक्षण करून अहवाल मागविला आहे. त्याची गरज नसून समाजाचा विरोध आहे.  धनगर समाज राज्यातील अनुसूचित जमातीचे यादीत ३६ क्रमांकावर असून देखील धनगर समाजास सवलती पासून वंचित ठेवण्याचे महाराष्ट्र सरकारचे हे कटकारस्थान आहे . असे  नागपूर चेधनगर समाज जिल्हाध्यक्ष रमेश पाटील चंद्रपूर जिल्याच्या दवऱ्या दरम्यान वरोरा - भद्रावती बैठकीत बोलत होते.  करिता महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमलबजावणी समूहिक नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाचे  आयोजन दि. ११ डिसेंबर२०१७ ला ११ वाजता हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.  मोर्चा यशवंत स्टेडियम, नागपूर येथून निघणार असून या मोर्चा ला जिल्यातून जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  माजी आमदार हरिदास भदे, अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवड, पुरुषोत्तम घायवड, देवराव ठमके, गुलाबराव चिडे, रमेश उरकुडे, अमित ठमके, पंढरीनाथ बोधे, श्रीहरी घोटकर, पुंजराम तुरके. यांनी केले.
दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी)
आज दि. २०नोव्हेंबर सायं. ८:30 वाजता वरोरा वणी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी आहे.
दुचाकी एम एच 34 ए क्यू 1860 सुधीर खापणे (३०)रा. चिकनी हा दुचाकी चालक जागीच ठार झाला तर स्वप्नील खापणे (१६) रा. व्होल्टाज कॉलनी वरोरा हा गंभीर जखमी आहे. स्वप्नीलला डोक्याला गंभीर दुखापत असल्याने  त्याला चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Saturday, November 18, 2017

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी

वरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी)
वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील मुख्यकार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सहाय्यक अभियंता अशोक नरडे (५६) रा. दुर्गापूर कॉलनी चंद्रपूर यांनी आत्महत्या केली. नरडे यांना मानसिक त्रासाला कंटाळले असल्याचे कडले. नरडे यांनी  आत्महत्या केल्याचे कळताच उर्जाग्राम परिसरात एकच खळबळ उडाली.

Thursday, November 16, 2017

20 बैलांचा चिरडून मृत्यू

20 बैलांचा चिरडून मृत्यू



  • चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वरोरा शहराजवळ बैल तस्करी करणारा ट्रक उलटला. 
  • वरोरा वरून 3 km अंतरावर हायवे वर चिनोरा गावाजवळ 
  • जवळपास 20 बैलांचा चिरडून मृत्यू
  • चालक घटनास्थळावरुन फरार
  • छायाचित्र - शिरिश उगे, वरोरा- भद्रावती प्रतिनिधी 
  •  



वरोरा : शहरापासून  3 km अंतरावर हायवे वर चिनोरा गावाजवळ देशपांडे पेट्रोल पंप नजीक नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून या अपघातांमध्ये ट्रक मध्ये असणाऱ्या काही जनावरांचा मृत्यू झाला असून काही जनावरे हे गंभीर जखमी आहे प्राप्त माहिती नुसार .या ट्रक मध्ये एकूण २२ गायी व बैलकोंबून नागपुर वरून चंद्रपूरकडे नेत असल्याचे निदर्शनास आले असून या सदर ट्रकच्या झालेल्या अपघातांमध्ये १० ते १५ जनावर ट्रक पलटी झाल्यामुळे मृत झाल्याची शक्यता आहे हा ट्रक जनावरांची अवैध वाहतूक करून ते जनावरे कत्तलखान्यात नेत असताना
हा अपघात झाल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत असून ट्रक चालक हा ट्रक सोडून
पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे . पोलिसांनी जे.सी.बी. च्या माध्यमातून
ट्रकला सरळ केले आहे .पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.