সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 30, 2015

फाशी

फाशी

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आज (गुरुवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची आपल्या मुलीसोबत बोलण्याची शेवटची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचे आणि मुलीचे संभाषण दूरध्वनीहून घडवून आणण्यात आले. 
पहाटे 5 वाजता याचिका फेटाळल्यानंतर नागपूर तुरुंगात याकूबला नवीन कपडे देण्यात आले.

पहाटे 5.30 वाजता याकूबला प्रार्थना करण्यात सांगितले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सकाळी 6.00 वाजता याकूबला फाशीच्या ठिकाणी नेण्यात आले. फाशी का देण्यात येत आहे, हे त्याला सांगण्यात आले.

सकाळी 6.35 वाजता याकूबला फाशीवर लटकवण्यात आले. त्यावेळी 8-10 जण हजर होते.

Saturday, July 25, 2015

रा. सू.गवई यांचे निधन

रा. सू.गवई यांचे निधन

नागपूर : ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचे  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रा.सू.गवई हे ८६ वर्षांचे होते. रा.सू गवई यांनी शनिवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. 
बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे राज्यपाल पद भूषविले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षातर्फे १९९८ साली ते सर्वप्रथम निवडून गेले होते.रा.सू.गवई यांच्यावर उद्या अमरावतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. सू. गवई यांचे अंतिम दर्शन नागपूरच्या दीक्षा भूमीवर घेता येणार आहे. रा.सू गवई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

Monday, July 20, 2015

एका वर्षासाठी गुटखा बंद

एका वर्षासाठी गुटखा बंद

निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री यावर प्रतिबंध

– एकनाथराव खडसे

मुंबई दि.२० जुलै –गुटखा, पान मसाला, सुगंधी / स्वादिष्ट तंबाखु व सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखु इ. पदार्थांची निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री करण्यावर दिनांक २० जुलै, २०१५ पासून महाराष्ट्र शासनाने एक वर्षाकरीता प्रतिबंध घातला आहे. याबाबतचे निवेदन आज राज्याचे महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत नियम ४६ अन्वये केले.
खडसे यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या शास्त्रीय संशोधनावरुन हे निष्पन्न होते की, गुटखा आणि पानमसाला हे किंवा तत्सम पदार्थांचे स्वातंत्र घटक या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडाचा सबम्युकम फायब्रोसिस, कर्करोग, ॲक्युट हायपर मेग्नेशिया, हृदयरोग, पोटाचा कर्करोग, प्रजनन व्याधी, आतडे, श्वसनाचे रोग होतात. असे पदार्थ सेवन करणाऱ्या राज्यातील जनतेच्या आरोग्यावर आणि विशेषत: तरुण पिढीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम संभवतात. बऱ्याच वैज्ञानिक व सामाजिक संस्थांच्या अहवालांमध्ये सुध्दा तंबाखु व सुपारी सेवनामुळे घातक आजार होतात, हे नमूद केले आहे. त्यामुळे अशा पदार्थांवर बंदी आणणे ही बाब वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजेचे आहे.

गुटखा व पानमसाला यांच्या सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी देशातील २६ राज्यांतील आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत प्रतिबंधित अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिनांक १६ डिसेंबर २०१४ च्या सर्वेक्षणानुसार राज्यांनी घातलेल्या प्रतिबंधामुळे गुटख्याची उपलब्धता आणि सेवन कमी झाल्यामुळे भारतीय युवकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे.

मागील वर्षाच्या (२०१४) आदेशाची मुदत १९ जुलै, २०१५ रोजी संपली असुन त्यामुळे पुढील एक वर्षासाठी नविन आदेश तातडीने काढणे आवश्यक होते. त्यामुळे वरीलप्रमाणे प्रतिबंध घालण्याचा निर्णय झाला आहे, असेही खडसे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
heavy rainfall

heavy rainfall

Nagpur, Jul 20- Following is the combined weather summary for Madhya Pradesh, Chhattisgarh and Vidarbha issued by the Nagpur Regional Meteorological centre here today. Summary:Very light to rather heavy rainfall occurred at most places over west Madhya Pradesh and at many places over east Madhya Pradesh, Chhattisgarh and Vidarbha. Maximum temperatures appreciably fell over Vidarbha and fell over south west Madhya Pradesh and changed little over east Madhya Pradesh, north west Madhya Pradesh....

Sunday, July 19, 2015

ट्रक-ट्रेलर अपघातात दोन ठार

ट्रक-ट्रेलर अपघातात दोन ठार

बुटिबोरी  : नागपूर-वर्धा मार्गावरील बुटीबोरीवरून 5-6 किमी अंतरावर टाकळघाट फाट्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास ट्रक व ट्रेलरच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले.
साखर घेऊन जाणारा ट्रक (क्र. सीजी 04 डीजी 8112) वर्ध्याकडे जात होता. या ट्रकचा टाकळघाट फाट्याजवळ टायर फुटल्याने समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेलर (क्र सीजी 07 सीए 4151)ला जोरदार धडक बसली. ट्रेलरमध्ये 16 लोखंडी खांब बुटीबोरीकडून जबलपूरला नेण्यात येत होते. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा दर्शनी भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेत दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. 

Friday, July 17, 2015

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

१७ जुलै १९४७ चा तो काळाकुट्ट दिवस. रामदास बोटीला याच दिवशी जलसमाधी मिळाली. हे एक कठोर वास्तव, कठोर सत्य आहे. सारा दैवाचा खेळच म्हणावा लागेल. आजही त्या दिवसाची आठवण जरी झाली, तरी अनेकांचा काळजाचा ठोका चुकतो. जवळपास ७५०हून अधिक प्रवाशांना यात जलसमाधी मिळाली. शुक्रवारी या घटनेला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. याआधी अनेक लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण, अलिबागच्या रोहित पाटील या गायक-संगीतकाराने आपल्या सहकार्‍यांची सोबत घेऊन सूरबद्ध केलेल्या गाण्यातून या दुर्घटनेतील प्रवाशांना भावनिक साद घालत श्रद्धांजली वाहिली आहे. हे गाणे शुक्रवारी रिलीज होत आहे.
वैद्यकिय महाविद्यालयाची जिल्हाधिका-याकडून पाहणी

वैद्यकिय महाविद्यालयाची जिल्हाधिका-याकडून पाहणी

चंद्रपूर दि.17- चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय 2015 च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज महाविद्यालयाची पाहणी करुन त्यांना काही त्रृटी दिसून आल्या त्यावर त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. 


अखेर चंद्रपूरला "मेडिकल'

अखेर चंद्रपूरला "मेडिकल'

चंद्रपूर - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे केंद्र सरकारने गुरुवारी (ता. 16) चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील आदेश जारी केला.

Thursday, July 16, 2015

नागपूर कारागृहात २३ जणांना फाशी

नागपूर कारागृहात २३ जणांना फाशी

सन १८६४ मध्ये नागपुरात मध्यवर्ती कारागृहाची स्थापना झाली. राज्यात येरवडा व नागपुरातच फाशी देण्याची व्यवस्‍था असून, १९५० मध्ये पहिल्यांदा पंथेयाऊ नंदाल या कैद्याला नागपुरात फाशी देण्यात आली तर, डिसेंबर १९५२ मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ५८ जणांना फाशी देण्यात आली असून, नागपूर कारागृहात २३ जणांना फाशी देण्यात आल्याची माहिती आहे. 


कारागृहात महिलेसह १६ कैदी 

मध्यवर्ती कारागृहात एका महिलेसह १६ कैदी फाशीची शिक्षा झालेले आहेत. सर्व फाशी यार्डात आहेत. याकूबला फाशी होणार असल्याचे वृत्त बुधवारी आल्याने कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याकूबवरही प्रशासन पाळत ठेऊन आहे. तो असलेल्या यार्डाची दर १५ मिनिटांनी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

याकूबनंतर वसंता 

याकूबला फाशी दिल्यानंतर याच कारागृहात वाडीतील एका बालिकेवरील बलात्कार-खुनातील आरोपी वसंता दुपारे यालाही फिशी दिली जाऊ शकते. या आरोपीचीही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. 

'सर' याकूब 

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला याकूब याला कारागृहातील बंदीवान 'सर' व 'भाई' या नावाने संबोधतात. २००७पासून तो नागपूर कारागृहात आहे. तो अत्यंत नम्रपणे वागतो. गतवर्षी त्याने एम.ए. इंग्रजी विषयात पदवी घेतली. कारागृतील बंदीवानांना तो शिकवतो. अफजल गुरू याला फाशी दिल्यानंतर याकूब काही दिवस शांत होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. एम.ए.सह याकूब याने विधी पदवी संपादित केली असून सी.ए.ची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. 

दृष्टिक्षेपात (दिनांक , फाशी देण्यात आलेले कैदी) 
  1. २ सप्टेंबर १९५० - जकिया नारायण 
  2. २० फेब्रुवारी १९५०- सीपाराम नुहो याला 
  3. २६ जून १९५१- सीताराम परय्या 
  4. ३ ऑगस्ट १९५१- इरामन्न उपयोरसी 
  5. ४ ऑक्टोबर १९५१- भाम्या गोडा 
  6. १२ जानेवारी १९५२- सरदार 
  7. ३ ऑगस्ट १९५२ - नियतो कान्हू 
  8. ५ ऑगस्ट १९५२- अब्दुल रहेमान इम्रानखान 
  9. २ सप्टेंबर १९५२- गणपत सखराम 
  10. २४ सप्टेंबर १९५२- सखराम फोकसू 
  11. १९ मार्च १९५३- विन्सा हरी 
  12. १९ जून १९५३- जागेश्वर मारोती 
  13. ४ जुलै १९५३- प्रेमलाल अमरीश 
  14. १५ सप्टेंबर १९५३- लोटनवाला 
  15. ३ फेब्रुवारी १९५६- , दयाराम बालाजी 
  16. २८ ऑगस्ट १९५९- अब्बासखान वजीरखान 
  17. १५ फेब्रुवारी १९६० - बाजीराव तवान्नो 
  18. ८ जुलै १९७०- श्यामराव पांडुरंग 
  19. १९ जानेवारी १९७३- नाना गंगाजी 
  20. १७ एप्रिल १९७३ - मोरीराम शाद्याजी गोदान 
  21. ५ नोव्हेंबर १९८४- वानखेडे बंधू.
World Youth Skill Day

World Youth Skill Day

“National World Youth Skill Day” celebrate by National Skill Development Corporation(Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India), Garware Institute of Career Education and Development, Mumbai University, Nehru Yuva Kendra, Mumbai and Aquvakraft Pvt. Ltd in Mambai on July 15, 2015.                         
 Shri Sudhir Mungatiwar, Finance Minister(Government of Maharashtra), Dr. Sanjay Desmukha, Vice Chancellor, Mumbai University, Shri Upendra Thakur, Zonal Director, NYKS, Maharashtra & Goa, Smt. Rani Dwivedi, Member, Board of Governor, NYKS(Government of India), Shri Yaswant Mankhedkar, DYC NYKS, Maharashtra & Pune presented at function.

“SWACHH Center of Excellence” at celebration of “National World Youth Skill Day” celebrate by National Skill Development Corporation(Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India), Garware Institute of Career Education and Development, Mumbai University, Nehru Yuva Kendra, Mumbai and Aquvakraft Pvt. Ltd in Mambai on July 15, 2015

Saturday, July 11, 2015

गुरूजी बनणार स्मार्ट

गुरूजी बनणार स्मार्ट

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संकलीत करणे, माहितीचे आदान-प्रदान करून सर्वंकक्ष माहिती एकत्रित करताना शिक्षकांसह कर्मचारी व अधिकार्‍यांची दमछाक आता टळणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी 'सिस्टीमॅटीक अँडमिनिस्टेटीव्ह रिफार्मस अचिव्हिंग लर्नींग फॉर स्टुडंट्स' (सरल) या कार्यप्रणालीचा अवलंब केला आहे.
397 वर महिलांसाठी आरक्षण

397 वर महिलांसाठी आरक्षण

नागपूर : जिल्ह्यातील 772 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात 772 पैकी 397 ग्रामपंचायतींवर "महिला राज‘ आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 22ने जास्त आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गात महिलांचे आरक्षण प्रमाण जास्त आहे. 
सरासरीपेक्षा पाऊस तरीही शेतकरी व्याकूळ

सरासरीपेक्षा पाऊस तरीही शेतकरी व्याकूळ

नागपूर : नागपूर शहरासह सर्व 13 तालुक्‍यांत जूनअखेर 191.46 मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र, 308 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 161 टक्‍के पाऊस झाला. पण, त्या मानाने जिल्ह्यातील जलायशे भरलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी व्याकूळ आहे.

Saturday, July 04, 2015

कोळसा वाहतूक नियमानुसारच : महानिर्मितीचा खुलासा

कोळसा वाहतूक नियमानुसारच : महानिर्मितीचा खुलासा

महानिर्मितीच्या चंद्रपूर आणि कोराडी वीज प्रकल्पाकरिता कोळसा वाहतूकीची एकत्रित निविदा सुधारीत निकषांसह दोन जुलै 2015 रोजी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कुठेही महानिर्मितीतर्फे नियमाचा भंग झालेला नाही, असे महानिर्मितीतर्फे कळविण्यात आले आहे. शुक्रवारी महानिर्मितीच्या कोळसा खरेदीत घोटाळ्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हा खूलासा करण्यात आला. महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज प्रकल्प कार्यालयातर्फे कोळसा वाहतुकीची निविदा काढण्यात आली होती. त्यात पात्रता निकष हे महानिर्मितीच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे होते. वीजदर आटोक्‍यात राहावा, यासाठी वीजनिर्मितीचा खर्च कमी करणे गरजेचे असल्याने महानिर्मिती मुंबई मुख्यालयाने अंतर्गत सुधारणांचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून कोळसासंबंधी सर्व कंत्राटांत रिव्हर्स बिडींग प्रोसेस या अभिनव संकल्पनेचा अवलंब करण्यास सुरूवात झालेली आहे. त्यानुसार सदर निविदा उघडल्यानंतर पुढील निर्देशासाठी महानिर्मितीच्या मुख्यालय मुंबई येथे विचारणा केली असता मुख्यालयाने चंद्रपूर व कोराडी वीज प्रकल्प कल्पांमध्ये एकाच प्रकारचे असे हे काम असल्याने निविदेमध्ये एकसूत्रता आणून त्याची अंमलबजावणी मुख्यालयामार्फत करण्यात येईल असे सांगितले.
बंदिवानांना बंदिवानाकडून इंग्रजीचे धडे

बंदिवानांना बंदिवानाकडून इंग्रजीचे धडे

आयुष्यात माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड
गोविल मेहरकुरे
चंद्रपूर : नकळत हातून चूक झाली; होत्याचे नव्हते झाले. नशिबी बंदिवानाचे जिणे आले. क्रोधातून घडलेल्या कृत्याच्या पश्‍चातापाचे भोग भोगताना पुढील आयुष्यात माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड सुरू आहे. या धडपडीला विधायकतेचा आधार मिळावा, यासाठी कारागृहातील एका बंदिवानाने दुसऱ्या बंदिवानांना इंग्रजीचे धडे देणे सुरू केले आहे.
जिल्हा कारागृहात ए. बी. नक्कलवार सध्या शिक्षा भोगत आहे. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ते 15 वर्षे शिक्षक होते. नक्कलवार यांना एका मुलीच्या विनयभंगाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे. कारागृहात असताना कारागृह निरीक्षक जाधव यांना त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती मिळाली. ते इंग्रजी विषय शाळेत शिकवीत असल्याचे कळले. त्यानंतर बुद्धपौर्णिमेचा दिवस साधून नक्कलवार यांनी इतर कैद्यांना इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली. कैद्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने खूश होत नक्कलवार यांनी स्वत: तीस वह्या आणि पेन बंदिवानांना दिल्या. तब्बल 15 कैदी सध्या इंग्रजीचे धडे गिरवीत आहेत. खून, दरोडा, अत्याचार यासारख्या गुन्ह्यांमधील आरोपींचा यात समावेश आहे. हे सर्व कच्चे कैदी आहेत. रोज सकाळी नऊ वाजता कारागृहातील ग्रंथालयामध्ये इंग्रजीचे वर्ग ते घेतात. त्यांना गृहपाठदेखील देण्यात येतो. कारागृहातील कामे आटोपून कैदी आपला गृहपाठ पूर्ण करतात. इंग्रजी प्रशिक्षणामुळे येथून सुटल्यानंतर समाजात वावरताना आत्मविश्‍वास येईल, असे या कैद्यांना वाटत आहे. अशा उपक्रमामुळे कैद्यांची नकारात्मक मानसिकता दूर होण्यास मदत होते, असे कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी सांगितले. न्यायालयाचे आदेश इंग्रजी भाषेतच निघतात. इंग्रजी भाषेचा उपयोग कच्च्या कैद्यांना त्यांच्यावरील आरोपांची स्थिती समजून घेण्यास सोईस्कर होते, असे कारागृह अधीक्षक जी. के. महल्ले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Wednesday, July 01, 2015

शासन देणार व्याघ्र मित्र पुरस्कार

शासन देणार व्याघ्र मित्र पुरस्कार


राज्य वन्यजीव मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये 29 जुलै हा दिवस जागतीक व्याघ्र दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. यावर्षी मात्र, राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई मंत्रालयात आयोजित करण्याच येणार आहे. वन्यजीव क्षेत्रात चांगली कामगिरी करणा-या व्यक्तीना वृत्तानिहाय व्याघ्र मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. निवडलेल्या व्यक्तींचा अहवाल सात जुलैपर्यंत मुख्यालयात सादर करावयाचा आहे.
वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी स्वामी

वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी स्वामी

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ
उपाध्यक्षपदी रोहिणी खडसे-खेवलकर यांची निवड

मुंबई, दि. 1 जुलै : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इचलकरंजीचे अशोक स्वामी, तर उपाध्यक्षपदी जळगांवच्या रोहिणी खडसे-खेवलकर यांची निवड करण्यात आली. अशोक स्वामी यांचे नांव सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप (तात्या) पाटील यांनी, तर रोहिणी खडसे-खेवलकर यांचे नांव एन.सी.डी.सी. चे माजी संचालक व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सुचविले. या निवडीच्या वेळी वस्त्रोद्योग महासंघाचे नूतन संचालक पृथ्वीराज देशमुख, दिलीप पाटील, रणजित देशमुख, राजशेखर शिवदारे, दिपक पाटील, बाबाराव पाटील, चंद्रकांत देशमुख, अनिल कवाळे, दिलीप मुथा, विश्वनाथ मेटे, धनराज खंडेलवाल, चंद्रकांत बडवे, श्रीमती रेश्मा पवार हे उपस्थित होते.