काव्यशिल्प Digital Media: wadi

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label wadi. Show all posts
Showing posts with label wadi. Show all posts

Monday, December 10, 2018

वाहतूक शाखेतर्फे नो हॉर्न जागरुकता अभियान

वाहतूक शाखेतर्फे नो हॉर्न जागरुकता अभियान

 अरूण कराळे /नागपूर:

नागपूर शहराला अपघात मुक्त करण्यासाठी प्रत्येक शहरवासीयांनी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करून पोलीस विभागाला सहकार्य  करण्याचे आव्हान वाहतूक पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी याप्रसंगी केले. नो हॉर्न जागरुकता अभियान कार्यक्रमांतर्गत वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनात एम आय डी सी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या कमांडर ज्योती कुमार सतिजा यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही विभागाच्या  संयुक्त विद्यमानाने नुकताच संविधान चौकात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाअंतर्गत वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करताना हेल्मेटचा,सीटबेल्ट,झेब्रा क्रॉसिंग,स्टॉप लाईनवर वाहन थांबवू नये,व इतर वाहतुक नियमाचे विस्तृत मार्गदर्शन करीत संपूर्ण नागपूर शहरातील वाहतूक सिग्नलवर ३६००  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यातआले असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच चालन मिळणार असल्याने वाहनचालकांनी याबाबत खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या हॉर्न न वाजविण्याची सूचना फलक हातात घेऊन ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आव्हान केले.तसेच अधिकाऱ्यांनी याप्रसंगी मेगाफोन द्वारे मार्गदर्शन केले.
नागपूर पंचायत समितीच्या तेरा गावात होणार स्वच्छता अभियान सर्वे

नागपूर पंचायत समितीच्या तेरा गावात होणार स्वच्छता अभियान सर्वे

अरुण कराळे/नागपूर:

नागपूर पंचायत समितीच्या तेरा गावात होणार स्वच्छता अभियान सर्वे 
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत  नागपूर पंचायत समितीमधील तेरा गावातील  स्वच्छता अभियान सर्वेसाठी नागपूर पंचायत समितीच्या सभापती नम्रता राऊत व उपसभापती सुजित नितनवरे  यांनी शनिवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९  वाजता हिरवी झेंडी दाखवून स्वच्छता अभियान सर्वेला सुरुवात करण्यात आली . ही स्वच्छता दिंडी विहीरगाव, उमरगाव, कळमना, पिपळा,चीकना,गोधनी ( रेल्वे ) चिचोली, खडगाव, पेठ ,शिरपूर,सातनवरी या गावातील स्वच्छतेचा सर्वे करणार आहे . स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर एलईडी व्हेन द्वारे संदेश प्रारंभ करण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरच्या निवड झालेल्या ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे महत्व समजावून  सर्व जनतेला गाव व स्वतः स्वच्छ राहण्याचा संदेश यामध्ये देण्यात आला . दिडींत गाव स्वच्छ ठेवू ,स्पर्धेत भाग घेऊ , गाडगेबाबांचा एकच मंत्र ,स्वच्छतेचे जाणा तंत्र, आता आपला एकच विचार , शाश्वत स्वच्छतेचा करू या निर्धार , वैयक्तीक स्वच्छतेची महती , रोगापासून मिळेल मुक्ती आदीची माहीती देण्यात आली .याप्रसंगी खंडविकास अधिकारी किरण कोवे, शेषराव चव्हाण, शाखा अभियंता गुणवंत पंखराज, विलास भाजीपाले ,प्रमोद राऊत, गोविंद गडदे ,दीपक गणवीर ,रमेश कावडे, प्रशांत तुमसरे आदी प्रामुख्याने उपस्थित होती .

Sunday, December 09, 2018

दवलामेटीत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

दवलामेटीत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे 

मेडिट्रिना मल्टीस्पेशालिटी सिटी लाईन हॉस्पीटल येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत आरोग्य शिबिरात दवलामेटीवासियांनी गर्दी केली होती. याप्रसंगी सरपंच आनंदाताई कंपनीचोर, उपसरपंच गजानन रामेकर, ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे तसेच ग्रा. पं. सदस्य प्रभा थोरात ,प्रशांत केवटे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मेणबत्ती अगरबत्ती लावून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. आरोग्य शिबिरात हृदय रोग तपासणी व मार्गदर्शन, रक्त तपासणी, शुगर, डायबीटीज, स्त्रि रोग तज्ज्ञांकडून स्त्रीयांना मार्गदर्शन व सल्ला तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे यांनी रक्तदानाला सुरुवात केली. राज शेंडे, राम घडोले अशा १०२ लोकांनी रक्तदान केले आहे. याप्रसंगी माजी सरपंच संजय कपनीचोर, भीमराव मोटघरे, यादव गडपाल, प्रमोद केवटे, डॉ. उपेन्द्र कुमार, डॉ .समीर पालतेवार, डॉ .शिरीष जोशी तसेच परिचारिका उपस्थित होत्या.
नागपुरात ट्रेलर-स्कुल बसची धडक:५० विद्यार्थी किरकोळ जखमी 

नागपुरात ट्रेलर-स्कुल बसची धडक:५० विद्यार्थी किरकोळ जखमी 

 ट्रेलर चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

अरुण कराळे/वाडी (नागपूर) : - 
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या वडधामना येथील  भारत गर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर स्कुल-बस व ट्रेलर मध्ये जोरदार  धडक झाली असता ट्रेलर चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळून ५० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

प्राप्त माहितीनुसार काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथील  स्कुल ऑफ स्कॉलर शाळेची शैक्षणिक सहल वडधामना येथील  हायलँड पार्क येथे स्वतःच्या चार बसेस मध्ये एकूण १७०  विद्यार्थी व २४ शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यासह ठरल्याप्रमाणे निघाली असता तीन बसेस समोर निघून सहलीच्या नियोजित स्थळी पोहचल्या परंतु बस क्रमांक  एम . एच .३१ एफ सी ०६९५  मागे होती बस चालक सुरेंद्र महादेव टेकाडे वय ५२ राहणार , सदमा नगर , काटोल याला सहलीचे नेमके स्थळ माहीत नसल्याने तो वडधामना ओलांडून समोर आल्याचे लक्षात येताच रस्ता दुभाजकाच्या गॅपमधून विरुद्ध बाजूने( राँग साईड)बस वळवीत असतांनायाच सुमारास अमरावती कडून नागपूरकडे येणाऱ्या ट्रेलर क्रंमांक एन . एल .०२ एल २६७४ भारी मेट्रोच्या कामाचे गर्डर क्र.एस २ / १o घेऊन नागपूरच्या दिशेने येत असतांना बस विरुद्ध दिशेनी येत असल्याचे ट्रेलर चालक सुखसिंग घरदेवसिंग वय ३३ राहणार  फिरोजपुर (पंजाब ) यांच्या लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य क्षणात लक्षात घेऊन स्कुल बस सोबत होणारी धडक वाचविण्याकरिता रस्त्याच्या बाजूला असलेल्या गायत्री ट्रेडर्सच्या दुकानाकडे ट्रेलर वळवून होणारा मोठा अनर्थ प्रसंगावधाने टाळला.

बसमध्ये ५o विद्यार्थ्यासह ६ शिक्षक सहभागी होते. ट्रेलरचे कॅबीन पूर्णपणे तूटल्या गेली असून गायत्री ट्रेडर्सची सरंक्षण भिंत तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .तर बसमधील अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.नियमाप्रमाणे शाळेची सहल काढतांना शिक्षण विभागाची तसेच आवश्यक बाबीची पूर्तता केली काय?यासंदर्भात माहिती घेतली असता परवानगी घेतली असे फोनवर सांगितले तर सहलप्रमुख रवींद्र भामकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी समाधान कारक व्यवस्थित माहिती सांगीतली नाही.
वाडी पोलिसांनी बस चालकांवर गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील  तपास करीत आहे.

Friday, December 07, 2018

नागपुरात नगरसेवकाने स्वखर्चाने बोअरवेल करून चार वार्डाची भागविली तहान

नागपुरात नगरसेवकाने स्वखर्चाने बोअरवेल करून चार वार्डाची भागविली तहान

हर्षल काकडेचे कार्य प्रत्येक नगरसेवकासाठी प्रेरणादायी 
 वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
ज्या समाजात आपला जन्म झाला त्याचे आपण ऋण फेडलेच पाहीजे . ज्या नागरीकांनी आपणाला समाजसेवा करण्याची संधी दिली त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य समजून त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे वाडी नगर परिषदच्या वार्ड क्रमांक ८ चे शिवसेनेचे नगरसेवक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा बांधकाम सभापती हर्षल काकडे यांनी स्वखर्चातुन बोअरवेल करून चार वार्डाला तहान मुक्त करण्याचे मोठे पूण्य पदरात पाडून घेतले . 

नगरपरिषदअंतर्गत येणाऱ्या  बहुतांश वार्डात वेणा जलाशयातून  पाणीपुरवठा केला जातो परंतु  जलाश्यातला पाणीसाठा कमी झाल्याने शहरात पाणीपुरवठा सहा सात  दिवसाआड केला जात आहे .यातच येत्या डिसेंबर महिन्यापासून  वाडीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे .येत्या उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा बंद करणार यासाठी नगरपरिषद प्रशासनाने भविष्यात उद्भवणारी भीषण पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने ३० नोव्हेंबर रोजी  तातडीची सभा घेऊन पाणी टंचाईबाबत नगरसेवकाडून वार्डातील पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने उपाय व सूचना मागितल्या त्यात प्रामुख्याने वॉर्डातील विहिरी स्वच्छ करणे,नवीन पाणी पंम्प बसविणे,नवीन बोअर करणे आदींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.

परंतु या सर्व उपाययोजना राबविण्यासाठी बराच कालावधी लागणार तसेच शासकीय मंजुरीकरिताही वेळ लागणार असल्याची बाब वॉर्ड क्रमांक ८ चे नगरसेवक बांधकाम सभापती हर्षल काकडे यांच्या लक्षात येताच स्वतः पुढाकार घेत त्यांनी त्यांच्या वार्डातील वैष्णवमाता नगर येथील खाली भूखंडावर स्वखर्चाने बोरवेल करण्याचा निर्धार करून वसाहतीतील आजुबाजूच्या परीसरात पाणी कुठे मिळेल याचा शोध घेण्यासाठी या क्षेत्रात निपुण असलेले खाजगी तज्ञाना पाचारण करून जागा निश्चित केली व प्रत्यक्ष हर्षल काकडे हे उपस्थित राहून बोअरच्या कामाला सुरुवात केली असता  १०० फुटावर ५  इंच भरपूर पाणी लागल्याने सर्वत्र आनंदाची लहर पसरली.आपल्या वॉर्डासोबतच आपण शहरातील पाच वॉर्डाला प्रशासनाचे सहकार्य घेऊन पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण झाल्याने पाच वॉर्डातील पाणी टंचाई दूर करण्यात यश मिळाल्याने मानसिक समाधान लाभले .पाण्याचे वाडीत कुठलेही मोठे स्त्रोत नाही त्यातच पाण्याची पातळीही आटल्याने उन्हाळ्यात भिषण पाण्याच्या  टंचाईला सामोरे जावे लागणार या गोष्टीची सतत चिंता मनात बाळगुन हा उपक्रम केल्याचे हर्षल  काकडे यांनी सांगीतले .  

यावेळी माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष केचे, अभियंता नरेंद्र तिडके ,कपिल भलमे,किताबसिंग चौधरी,वसंतराव इखनकर,आनंद इंगोले,विजय मिश्रा,अखिल पोहनकर,रणजीत सोनसरे,संदीप विधले,संदीप उमरेडकर,पर्वत सिंग सोलंखी,अमित चौधरी,नन्हेंलाल गुप्ता,सचिन बोंबले,अजित पॉल,गोलू सांभारे,क्रांति सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. या स्त्युत्य उपक्रमामुळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक तसेच नगर परिषदचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी हर्षल काकडे यांचे अभिनंदन केले.तर स्थानिक शिवसैनिकांनी मिठाई वाटून कौतुकास्पद उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त करून जल्लोष साजरा  केला.

Thursday, December 06, 2018

मुदत संपल्यानंतरही सुरू आहे अवैद्य कॅन्टीन

मुदत संपल्यानंतरही सुरू आहे अवैद्य कॅन्टीन



चालकावर ३ लाख ४३ हजार १५४ रुपये थकीत वसुलीचाआदेश
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारासाठी हिंगणा एमआयडीसीतील सोनेगांव ( निपाणी ) येथील  डी ले -आऊट मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पाच वर्षाकरिता भारत रेस्टॉरेंट व हॉटेलचे संचालक भारत शर्मा यांना ५१ .३२   स्क्वेअर फिट जागा २००८ मध्ये टेंडर काढून ही भाड्याने दिली होती.नियमाप्रमाणे २०१३    पर्यंत ही जागा टेंडर नुसार भाड्याने होती  परंतु पाच वर्षे लोटल्यानंतरही विना टेंडर सतत पाच वर्षापासून कॅन्टीन अवैद्य सुरू आहे पाच वर्षाचे टेंडर संपल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन टेंडर काढणे गरजेचे असताना ते काढले नसल्याने कॅन्टीन मालक राजरोसपणे विनापरवाना पाच वर्षापासून भोजनालय चालवित आहे.
यामुळे एमआयडीसीचे लाखोरुपयाचे नुकसान झाले.यांमध्ये संबंधित विभागाचा हलगर्जीपणा किंवा अधिकारी व कॅन्टीनचा मालक याची मिलीभगत असल्याचे स्पष्ट होते यासंदर्भात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जे . बी . संगीतराव यांना विचारलेअसता माहिती देण्यास टाळाटाळ करतात सामाजिक कार्यकर्ता सुनील हेरोल्ड यांनी एमआयडीसीचे विभागीय संचालक यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करूनही दोन वर्षापासून माहिती देण्यास किंवा योग्य कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने हेरोल्ड यांनी नागपूर ग्रामीण तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली केली असता तहसीलदारांनी दखल घेत विभागीय संचालक एमआयडीसी यांना ९ जून २०१७ ला नोटीस पाठवून कॅन्टीन मालक भारत शर्मा यांच्याकडे थकीत असलेली तीन लाख ४३ हजार १५४  रुपये भरण्यासंबंधी नोटीस देऊन सूचना केली परंतु सात महिने लोटूनही राशी भरल्या गेली नाही किंवा वसुलही केले गेल्या नाही.आजही कॅन्टीनअवैद्यरित्या सुरूआहे. 
करारनामानुसार मुदत संपूनही अवैधपणे काही राशि न भरता कॅन्टीन सुरू आहे हे अधिकारी व कॅन्टीनचा मालक यांच्यामध्ये साटेलोटे तर नाही ना?तसेच संबंधित विभागाच्या ही बाब कशी लक्षात आली नाही.हा चिंतेचा विषय आहे त्यामुळे साहजिकच अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. शंभर रुपयाच्या स्टॅम्पपेपर करारनामा लिहल्यानुसार  २५७५ रुपयाचे महिन्याचे भाडे ठरले होते आणि प्रत्येक वर्षी भाडेवाढ यानुसार २००८  ते २०११ वर्षाचे भाडे २५७५, २०१२  चे भाडे २८३३  व वर्ष २०१४ चे भाडे ३१२६ असे भाडे निश्चित करण्यात आले होते. 
संबंधित कॅन्टींग चालकाने डिसेंबर वर्ष  २०११ पर्यंतचे  भाडे भरले त्यानंतर सात वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे भाडे अदा केले नाही प्रतिमाह रुपये २५७५  याप्रमाणे जानेवारी ते एप्रिल २०१८  असे एकूण ७६ महिन्याचे भाडे एक लाख ९५  हजार ७०० रुपये व त्यावरील व्याज एक लाख ४७ हजार ४५४ रुपयेअसे एकूण ३ लाख ४३ हजार १५४  रुपये ७  दिवसाच्या आत वसूल करण्याचे निर्देश असतानाही संबंधितअधिकारी करू शकले नाही.तसेच एमआयडीसी विभागाने ही कॅन्टीन शर्मा याना भाडे तत्त्वावर चालवायला दिली असता शर्मा यांनी दुसऱ्याला भाड्याने दिल्याचेही माहिती पुढे येत आहे. 
विद्यार्थ्याना अंतर्गत गुणदान लागू करा:विमाशिची मागणी

विद्यार्थ्याना अंतर्गत गुणदान लागू करा:विमाशिची मागणी

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

शेतकऱ्यांप्रमाणे विद्यार्थी आत्महत्या सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे गुणदान लागू करण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव व शिक्षण मंडळाचे सचिव यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळांतर्गत माहे मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान वगळता बाकी विषयासाठी देण्यात येणारे अंतर्गत मूल्यमापनाचे गुणदान बंद करण्यात आले असून हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे मार्च २०१९ मध्ये आयोजित केलेली दहावीची परीक्षा मानसिक दडपणाखाली होऊन काही विद्यार्थी आत्महत्याही करण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे. सी.बी.एस.ई., आय.सी.सी., आय.बी. मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुणदान कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना दहावीच्या परीक्षेत गुणांची टक्केवारी जास्त राहील आणि सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी त्यांना प्राधान्याने प्रवेश मिळेल व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी मागे पडतील त्यामुळे त्यांचेवर फार मोठा अन्याय होईल असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करुन या विद्यार्थ्यांना सर्वच विषयामध्ये पूर्वीप्रमाणे गुणदान लागू करावे अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे विद्यार्थी आत्महत्या सुरू झाल्यास नवल वाटणार नाही असेही श्री बरडे यांनी निवदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व शिक्षण आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
                  

Tuesday, December 04, 2018

पाण्यावरुन पेटले वाडीत राजकारण

पाण्यावरुन पेटले वाडीत राजकारण

दोन वर्ष होऊनही वाडीतील जलकुंभात पोहचलेच नाही पाणी 
नवीन पाइपलाइनचा प्रस्ताव धुळखात;२९ महीने होऊनही पाइपलाइन अपूर्णच
१o लाख लीटर पाण्याची होत आहे नासाडी
दोन वर्षांत १५ टक्के पाणी गेले वाया,वेणा मध्ये फक्त १४ टक्के पाणी शिल्लक
वाडी(नागपूर)/अरूण कराळे:

वाडी मध्ये पाण्याचा प्रश्न पेटला असुन पाण्याच्या समस्येचे राजकारण होवू लागले आहे . वेणा जलाशय धरणात फक्त १४ टक्के पाणी राहिल्याने वाडी शहराला केवळ अर्धा तास पाणी मिळत आहे.ज्यामुळे वाडीची तहान भागत नाही.वाडी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पालघर मधील एका कंपनीला दिले होते ते काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचा करार झाला होता .मात्र २९ महीने होवूनही पाइप लाइन टाकण्याचे काम पूर्ण न झाल्याने वाड़ी च्या जलकुंभात अजुन पाणी पोहचलेच नाही. त्यामुळे दोन वर्षात १५ टक्के पाणी वाया गेले आहे कित्येक वर्षापासुनची जूनी पाइप लाइन असल्याने जीर्ण झाली आहे या पाईप मधून दररोज १० लाख पाण्याची नासडी होत आहे .सध्या वेणा जलाशयात १४ टक्के पानी शिल्लक आहे.

पाइपलाईन टाकण्याचे काम लवकर पूर्ण केले असते तर वेणा जलाशयामध्ये ३५ टक्के पाणी वाचले असते.आज वाडी मध्ये पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे ते झाले नसते . सरकार ने निधि उपलब्ध करुन न दिल्याने काम पूर्ण होवू शकले नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.
सदर योजना ही १३ कोटीची मंजुरात आहे. मात्र १७ टक्केच बिल भरल्याने ७ कोटी ९४ लाख मध्ये देण्यात आल्याचे मजीप्राचे अभियंता एस . पी . भंडारकर यानी सांगितले.
वाडी,डिफेन्स ,दवलामेटी परीसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिका-यांनी पाणी नसल्याचे सिग्नल दिले आहेत.
डिसेंबरनंतर वाडीतील पाण्याच्या समस्येस उग्र रूप धारण होऊ शकते .वाडीचे नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात पाणी मागणार आहेत. ८२ .३१ किलोमीटर पाइपलाइन टाकायची होती त्यमधुन ८० किलोमीटर काम झाले. २ .३१ किलोमीटर पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे तेही लवकर पूर्ण होत असल्याचे उपअभियंता नरेश शनवार यांनी सांगितले .

वाडी शहराला वेणापासून पाणीपुरवठा होत आहे.अनेक वर्षांच्या पाइपलाइनमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी खराब होत आहे.ते वाचविण्यासाठी नवीन पाइप लाइन च्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस,राज्य पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व केन्द्रीय मंंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मे २०१६ मध्ये करण्यात आले १८ महिन्यात काम पूर्ण करायचे होते .परंतु २९ महिने होवून सूद्धा काम अर्धवट आहे.त्यामुळे, दोन वर्षांत वेणा पाण्याचे १० टक्के नुकसान झाले आहे . या योजनेवर ७७७ कोटी ९४ लाख रुपये खर्च करायचे होते.ही रक्कम कामाच्या मुदतीपूर्वीच द्यायची होती.परंतु सरकारने दिले नाही.जूलै २०१८ पर्यंत ४२९ कोटी ७० लक्ष रुपये निधी आतापर्यंत मिळाले आहे.त्यानिधीत ८० किलोमीटर पाइप लाइन टाकली .तसेच २.३१ किलोमीटरची पाइपलाइन उर्वरित आहे.१५ नोव्हेंर २०१७ पर्यंत काम पूर्ण करायचे होते.पण तसे झाले नाही. त्यामुळेच आज वाडीत पाणी पेटले आहे असेच म्हणावे लागेल .पाण्याच्या कमतरतेमुळे आणि नवीन पाइपलाइन न तयार केल्यामुळे मजीप्राच्या अधिकार्यांनी वाडीमध्ये पाण्याची समस्या निर्माण केली आहे. धरणातुन सोडताना पाणी फिल्टर वॉटरकमपर्यंत पोहोचले तर १५ ते २० टक्के पाणी खराब होते.एकूण ३५ टक्के पाणी दोन वर्षांत वाया गेले आहे .मजीप्राच्या माध्यमातून आयुध निर्माणी अंबाझरी,दवलामेटी व वाडीला एकूण ११ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. त्यामध्ये आयुध निर्माणीला ८ दशलक्ष लीटर, वाडीला २ दशलक्ष लीटर,व दवलामेटीला १ दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे . दररोज वाडीतील २३०० व दवलामेटीतील २२५० ग्राहकांना पाणी मिळत आहे .वेणाच्या पाण्याच्या पातळीची क्षमता २१ दशलक्ष घन मीटरची आहे.जे पूर्ण भरल्यानंतर दोन वर्षापर्यंत काहीच काळजी नसते.परंतु यावर्षी फ्वत ६०० एमएम पाऊस परिसरात झाल्याने नोव्हेंबरमध्ये वेणा जलाशयात फक्त ३ दशलक्ष क्यूबिक मीटर पाणी बाकी आहे.मोठ्या प्रमाणावर पाणीची पातळी कमी होत आहे.प्रत्येक दशकात ३ सें.मी. पर्यंतचे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मजीप्रा सुध्दा चिंतित आहे. या बद्दल नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की काम न केल्याबद्दल कंत्राटदार जबाबदार आहे.
वाडीची नवीन पाणीपुरवठा १८ महीन्यापर्यंत पूर्ण करणे आवश्यक होती . परंतु ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.यावर ठेकेदार जबाबदार आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असते तर आज गावाला पाणी मिळाले असते.

Friday, November 02, 2018

व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची सभा

व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची सभा


वाडी / अरूण कराळे:
रुग्णा विषयी चर्चा करतांना मान्यवर

व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या अडचणी संदर्भात प्रत्येक नागरीकांना रुग्णसेवा मिळावी तसेच रुग्णाच्या हिताचे प्रश्न सोडविण्याकरीता रुग्ण कल्याण समितीची सभा पार पडली . यावेळी पंचायत समीतीचे उपसभापती सुजित नितनवरे , रुग्ण कल्याण समीतीचे अध्यक्ष जि. प. सदस्या प्राणिता कडू , सहअध्यक्ष संध्या गावंडे, वंदना पाल, पंचायत समीती सदस्य भारती पाटील, सुजीत अतिकारी, सरपंच विठोबा काळे , सुरेश थुटूरकर, आर. पी. सुखदेवे प्रामुख्याने उपस्थित होते .प.स. नागपूर पंचायत समीती अतंर्गत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये लोक कल्याणार्थ आरोग्य सेवा राबविण्याचे आवाहन पं .स. उपसभापती सुजित नितनवरे यांनी केले .ग्रामिण भागात स्वच्छता अनियमीत केल्यास आजाराला आमंत्रण देणे होय करिता प्रत्येक ग्राम पंचायत तर्फे धूळ फवारणी करणे गरजेचे आहे . तसेच पाणी उकळून पिणे , सभोवतालाचा परिसर स्वच्छ ठेवणे, गाव हगणदारी मुक्त करणे , शुध्द पाणी पुरवठा करणे आदि विषयावर अध्यक्ष प्रणिता पाटील यांनी मार्गदर्शन केले .आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्ण कल्याण समीतीच्या सचिव डॉ. सोनाली बंन्सोड यांनी सांगीतले की सर्वात जास्त रुग्ण हत्ती पायाचे विदर्भात आहे . हत्तीपाय ज्या डासापासुन होतो त्याचा नायनाट करण्यासाठी वेंट पाईपला जाळी लावणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन डासाची उत्पत्ती थांबविण्याची गरज असल्याचे सांगीतले .