चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी शेळीपालन व गायीच्या दुग्ध व्यवसाय आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन चंद्रपूर येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण दोन आठवडे कालावधीचे असून पशुधनावर आधारीत शेळी पालन व गाय पालन तसेच औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय आणि शेडची रचना, व्यवसायाचे फायदे इत्यादी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये पशुधनावर आधारीत विविध विषयांची माहिती विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाव्दारे देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी किमान 7 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक, युवतीना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या युवकांकडे शाळा सोडल्याचा दाखला, मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे.
त्यामुळे जे उमेदवार हे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असेल त्यांनी 24 जुलै 2018 पर्यत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन, बस स्टॉप समोर चंद्रपूर येथे संपर्क साधवा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.