शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरत असलेल्या डुकरांच्या समस्येवर तोडगा काढत बल्लारपूर नगरपरिषदेने शहरातून जवळपास १५० हुन अधिक डुकरांची हकालपट्टी शहराच्या बाहेर करण्यात आली आहे.
विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या या शहरात सध्या डुक्कर एक गंभीर समस्या बनलेआहेत. शहरातील प्रत्येकच भागात डुक्कर आढळत असून यावरूनच त्यांची संख्या किती असावी याचा अंदाज लावता येतो. गल्ली असो वा मुख्य मार्ग डुकरांचा मोकाट वावर प्रत्येकच भागात दिसत असून दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालला आहे. एवढेच नव्हे तर घरांसमोरही डुक्कर फिरत असताना बघावयास मिळतात.
घाण पसरवणारा हा प्राणी आजारांसाठीही कारणीभूत ठरत असल्याने शहरवासी त्रस्त व तेवढेच दहशतीत वावरत आहेत. यासाठी डुकरांच्या समस्येवर तोडगा काढण्याची बल्लारपूर नगरपरिषदेनें आता परीयंत १५० हुन जास्त डुकरांना शहराबाहेर सोडल्याचे सांगितल्या जात आहे. सध्या बल्लारपूर नगर परिषद स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या आखाड्यात उतरल्याने शहराला सुंदर शहर कसे बनवता येईल याकडे लक्ष देत या सर्व खटाटोप सुरु असल्याचे समते आहे.