काव्यशिल्प Digital Media: कोल्हापूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कोल्हापूर. Show all posts
Showing posts with label कोल्हापूर. Show all posts

Thursday, November 16, 2017

राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना

कोल्हापूर- एका वृद्ध महिलेनं राहत्या घरात  स्वत:ची चिता रचून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडलीये.कलव्वा कांबळे असं मृत महिलेचं आहे.

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना घडलीये. कलव्वा कांबळे ह्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. आपले काम आपणच करून स्वतःला लागेल तेवढे अन्न तयार करून खात होत्या. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी स्वतः चिता रचली आणि अंगाभोवती साड्या गुंडाळून पेटवून घेतले. हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. वृद्ध महिला नेहमीप्रमाणे घराबाहेर आली नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Monday, November 13, 2017

विश्‍वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव

विश्‍वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव

कोल्हापूर/सांगली :
 सांगलीत पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेला संशयास्पद मृत्यू व त्याचा मृतदेह पोलिसांकडूनच आंबोलीत जाळण्याच्या घटनेने गृहविभाग अडचणीत आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीसाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व अनिकेतच्या नातेवाईकांकडून आता दबाव वाढत आहे.
या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापुरात दिली.  केसरकर यांनी सांगलीत जाऊन अनिकेतच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मोठा- छोटा अधिकारी न पाहता दोषींवर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
प्रत्यक्षदश्री अमोल भंडारेलाही मारण्याचा कट
अनिकेतच्या मृत्यूचा प्रत्यक्षदश्री साक्षीदार अमोल भंडारे यालाही मारण्याचा कट निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून बाहेर आली आहे.
आत्मदहनाचा इशारा
आमच्या मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने केसरकर यांना दिला. 
आज सर्वपक्षीय बंद
अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी सांगलीत सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कृती समितीतर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येईल.

Monday, November 06, 2017

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका

सरकार आंधळं आणि बहिरं’ - नाना पटोलेंची घणाघाती टीका


कोल्हापूर / प्रतिनिधी : ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील आता समजतं नाही.’ अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे. *शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असं म्हणत सरकारचं कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.* ‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.